मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ४

संकेत कोश - संख्या ४

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


चार श्रेष्ठ दानें - १ कन्यादान , २ गोदान , ३ भूमिदान आणि ४ विद्यादान .

दानानां च समास्तानां चत्वार्येतानि भूतले ।

श्रेष्ठानि कन्यागोभूमिविद्यादानानि सर्वदा ( शं . सं . )

चार लक्षणें ( ईशदर्शन झाल्याचीं )- १ बालवत् ‌‍, २ पिशाचवत् ‌‍ , ३ जडवत् ‌‍ आणि ४ उन्मत्तवत् ‌‍ . ज्याअ व्यक्तीला ईशदर्शन झालें ती अशा चार लक्षणांनीं युक्त होऊन जाते . ( भागवत )

चार लक्षणें ( खर्‍या ज्ञान्याचीं )- १ वाणी गोड असून उदार , २ ज्ञान असून गर्व नाहीं , ३ शूर असून अंगीं क्षमा आणि ४ अमूप धन तसेंच अपार औदार्य .

या चौलक्षणीं मंडित । तोचि ज्ञानि तोचि पंडित ॥ ( वेदान्तसूर्य )

चार लक्षणें ( शिष्टाचाराचीं )- १ गुरुशुश्रूषा , २ सत्य , ३ अक्रोध आणि ४ दान . हीं चार शिष्टाचाराचीं निय्त लक्षणें होत .

गुरुशुश्रूषणं सत्यमक्रोधो दानमेव च ।

एतच्चतुष्ठय ब्रह्मन ‌‍ शिष्ठाचारेषु नित्यदा ॥ ( म . भा . वन . २०७ - ६५ ).

चार ललितकला - १ नृत्य , २ नाटय , ३ गायन व ४ वादन .

चार लोक - १ स्वर्ग , २ मृत्यु , ३ पाताळ आणि ४ कैलास .

चार वर्ण - १ ब्राह्मण , २ क्षत्रिय , ३ बैश्य व ४ शुद्र . मूळ एका वर्णाचेच हे चार वर्ण म्हणजे चातुर्वर्ण्य महाभारतकाळीं करण्यांत आले . " चत्वारो वै वर्णाः ब्राह्मणो राजन्यो बैश्यः शुद्धः । " ( शतपथ ) हे चार वर्ण म्हणजे चार प्रकारच्या शक्ती होत . १ शिक्षकशक्ति - ब्राह्मण , २ रक्षकशक्ति - क्षत्रिय , ३ पोषकशक्ति - बैश्य वा ४ सेवकशक्ति - शूद्र . राष्ट्राच्या सोयीसाठीं या चार प्रकारच्या शक्तींची आवश्यकता असते . ( वा . रामायणाचें निरीक्षण - पं . सातवळेकर )

चार वर्ण ( मुसलमानांत )- १ सय्यद , २ शेख , ३ मोंगल व ४ पठाण . असे चार वर्ण मुसलमानांत मानतात .

चातुर्वर्ण्य - वैदिक धर्माप्रमाणें निरनिराळ्या समाजांत , निरनिराळ्या नांवाखालीं चातुर्वर्ण्यात्मक समाजरचना प्रचलित आहे . ती अशी -

( अ ) १ प्रीस्ट , २ सोल्जर , ३ मर्चंट व ४ वर्कंमन ( इंग्रज )

( आ ) १ अलिम् ‌‍ , २ आमिल , ३ ताज्जिर व ४ मजदूर . ( महम्मदी )

( इ ) १ अथर्वन् ‌‍ , २ अरथस्तार , ३ वस्त्र्य आणि ४ हूविश . ( पारसीक )

( ई ) १ शोगुन् ‌‍ , २ समूरा , ३ हैमिन् ‌‍ इ . ( जपानी ) अशा प्रकारचे चातुर्वर्ण्य सर्वत्र आढळतें . ( मानवधर्मसार )

चार वर्णांचीं चार दैवतें - १ ब्राह्मण - महादेव , २ क्षत्रिय - विष्णु , वैदय - ब्रह्मदेव व ४ शूद्र - गणेश .

विप्राणां दैवतं शम्भुः क्षत्रियाणां च माधवः ।

वैश्यानां तु भवेद ‌‍ ब्रह्मा शूद्राणां गणनायकः ॥ ( सु . )

चार वर्णांचे चार यज्ञ - १ ब्राह्मण - तप , २ क्षत्रिय - उद्योग , ३ वैश्य - हवि व ४ शूद्र - सेवा . असे चार प्रकारचे यज्ञ चार वर्णांस विहित आहेत . ( म . भा . शांति २३९ - १०० ).

चार वर्णांचे चार सण - १ ब्राह्मण - श्रावणी , २ क्षत्रिय - विजया - दशमी ( दसरा ), ३ वैश्य - दिवाळी व ४ शूद्र - होळी .

चार वस्तूंवर कोणाचेंहि एकाचें स्वामित्व नाहीं - १ अरण्य , नद्या , ३ पर्वत व ४ तीर्थें . यांवर कोणाचेंहि एकाचें स्वामित्व नसतें .

( म . भा . अनु . ६९ - ३४ )

चार वाटेकरी धनाचे - १ धर्म , २ अग्नि , ३ राजा ( शासन ), व ४ तस्कर ( चोर ) असे धनाचे चार वांटेकरी होत .

" चत्वारो धनदायादा धर्म्राग्निनृपतस्कराः ( सु . )

चार वस्तु दुःखाचा विसर पाडणार्‍या - ( अ ) १ मद्य , २ हिरवळ , ३ नदीचा प्रवाह व ४ सुंदर मुख . ( आ ) १ नमाज , २ रोजा , ३ माता आणि ४ तोबा ( झेबुन्निसा , ) ( अमृत जुलै १९६२ )

चार वाणी - १ परा , २ पश्यन्ती , ३ मध्यमा व ४ वैखरी , या चार वाणी आहेत . यांना वाचाचतुष्टय म्हणतात .

आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरूप्रमाणें येणें ।

फेडिली वाचा ऋणें । चौही वाकांची ॥ ( अमृतानुभव )

चार वाचिक पापें - १ कठोर भाषण , २ खोटें बोलणें , ३ चहाडी आणि ४ अद्वातद्वा बोलणें . हीं वाणीचीं चार पापें होत . ( स्कंद - काशी . २७ - १५३ )

चार विद्या - १ तर्कशास्त्र , २ वेदविद्या , ३ कृषिकर्मादि अर्थशास्त्र आणि ४ सामदामदंडादि राजनीति . ( कौ . १ - २ )

चार वेद - १ ऋग्वेद , २ यजुर्वेद , ३ सामवेद , आणि ४ अथर्ववेद . आणि नाटय हा पांचवा वेदच असें भर्त नाटय शास्त्रांत म्हटलें आहे .

सर्वशास्त्रसंपन्नं सर्व शिल्पप्रवर्तकम् ‌‍ ।

नाटयाख्यं पंचमं वेदं सेतिहासं करोम्यहम् ‌‍ ॥ ( भ . ना . अ १ )

चार विकथा - १ भक्तकथा , २ स्त्रीकथाअ , ३ राजकथा व ४ देशकथा . ( रत्नकरंडक श्रावकाचार अ ३ )

चार वेद ( महाराष्ट्राचे )- १ श्रीज्ञानेश्वरी , २ एकनाथी भागवत , ३ दासवोध व ४ तुकारामगाथा .

चार वेदांचीं उपांगें - १ पुराणें , २ न्याय , ३ मीमांसा व ४ धर्मशास्त्र .

चार वेदांचे चार द्रष्टे - १ ऋग्वेद - अग्निऋषि , २ यजुर्वेद - वायुऋषि , ३ सामवेद - आदित्यऋषि व ४ अथर्ववेद - अंगिरसऋषि .

( The wisdom of India )

चार वैष्णव संप्रदाय - १ प्रकाशसंप्रदाय ( श्रीज्ञानेश्वर ), २ आनंद - संप्रदाय ( एकनाथ ), ३ स्वरूपसंप्रदाय ( रामदास ) व ४ चैतन्यसंप्रदाय ( तुकाराम ). असे परमार्थमार्गांत चार प्रकारचे वैष्णव संप्रदाय मानले आहेत . त्यांस वारकरीचतुष्टय म्हणतात . ( अमृता - अमृतवाहिनी टीका )

चार वंश - १ सोमवंश - यादव , २ सुर्यवंश - श्रीरामचंद्रचा , ३ ब्रह्मवंश व ४ शेषवंश , असे चार वंश पुराणांत वर्णिले आहेत . ( चंडमाहात्म्य )

चार व्यसनें सत्ताधार्‍यांना असणारीं - १ मृगया , २ मद्यपान , ३ द्यूत व ४ अतिरिक्त कामासक्ति ( म . भा . सभा . ६८ - २० ).

चार व्यास - १ वृद्धव्यास ,- याचे चार ब्राह्मण सोळा अध्याय , २ बृह्द‌‍व्यास - याची चार अरण्यें वीस अध्याय , ३ वेदव्यास - याच्या चार संहिता चोवीस अध्याय आणि ४ मानवव्यास - याचीं महाभारत अठरा पुराणें व इतिहास . ( दर्शनप्रकाश )

चार व्यृह ( रचना ) वर्णाश्रमात्मक - १ शिक्षाव्यूह , २ रक्षाव्यूह , ३ वार्ताव्य़ूह आणि ४ सोवाव्यूह . ( मानवधर्मसार )

चार वृत्ति अंतःकरणाच्या - १ मन - कल्पनांना आंत घेतें , २ चित्त - त्यांची निवड करतें , ३ अहंकार - कल्पनेचा पक्ष घेतो आणि ४ बुद्धि - निश्चय करते . या चार वृत्ति वेदांतांत मानिल्या आहेत . ( मानवधर्मसार )

चार शक्तित - १ क्रियाशक्ति , २ द्वव्यशक्ति , ३ इच्छाशक्ति व ४ ज्ञानशक्ति . ( दा . बो . १७ - ९ - ६ )

चार शक्ति अथवा विश्व देवता - १ महेश्वरी , २ महाकाली , ३ महालक्ष्मी व ४ महासरस्वती . ( अरविंद के पत्र )

चार शिष्य येशूख्रिस्ताचे - १ मॅथ्यू , २ मार्क , ३ ल्यूक व ४ जॉन . या चौघांनी ’ गॉस्पेल ’ नांवाचे ग्रंथ लिहिले आहेत .

चार शक्ति राष्टू जिवंत राहण्यास आवश्यक - १ शिक्षक - शाक्ति - ब्राह्मण , २ रक्षकशक्ति - क्षत्रिय , ३ पोषशक्तित - वैश्य , आणि ४ सेवक - शक्ति - शूद्र . ( वा . रा . समालोचना )

चार शिष्यप्रकार बुद्धाचे - १ माध्यमिक , २ योगाचार , ३ सौत्रां - तिक व ४ वैभाषिक , ( भारतीयदर्शन संग्रह )

चार शैली ( रचनाप्रकार ) निबंधवाङ्वयाच्या - १ कैशिकी , २ भारती , ३ सात्वती आणि ४ आरमटी . ( साहित्य ) ( आपटेकोश )

चार शून्यें - १ ऊर्ध्वशून्य , २ अधःशून्य , ३ मध्यशून्य व ४ ब्रह्म .

ऊर्ध्वशून्यं मनोभूतं अधःशून्यं तु मारुतः ।

मध्यशून्यं जीवभूतं चतुर्थं ब्रह्म उत्तमम् ‌‍ ॥ ( सु . )

प्रपंचाचा रोविला वेळू । चहूं शून्याचा मांडिला खेळू ॥ ( सकलसंतगाथा )

चार स्त्रिया परमसिद्धीला प्राप्त झाल्या - १ मैत्रेयी , २ सुलमा , ३ शाङ्‌‍गीं व ४ शांडिली . या चौघी पूर्वजन्मांतील पुण्याईनें परमसिद्धीला प्राप्त झाल्या .

मैत्रेयी सुलभा शाङ्‌‍गीं शांडिली च तपस्विनी ।

स्त्रीत्वे प्राप्ताः परां सिद्धिमन्यजन्मसमाधितः ॥ ( योगचिंतामणि )

चार संस्कार - १ संयम , २ सेवा , ३ साधना आणि ४ सज्जन - समागम .

संयम सेवा साधना सत्पुरुषोंका संग ।

ये चारो करते तुरन्त मोहनिशाको भंग ॥ ( कल्याण मासिक )

चार संगीत मतें - १ नारदमत संगीत , २ भरतमत - संगीत , ३ हनुमन्तमत - संगीत व ४ श्रीकृष्णमत - संगीत असे चार प्रकार आहेत .

चार साधनें अंतर्मल विनाशाचीं - १ श्रीहरिस्मरण , २ हरीतकी - भक्षण ( हिरडा ), ३ गायत्री जप व ४ गंगाजल - पान . या चार गोष्टी उक्त मानिल्या आहेत .

हरिं हरीतकीं चैव गायत्री जाह्लवीजलम् ‌‍ ।

अन्तर्मलविनाशाय स्मरेत् ‌‍ भक्षेत् ‌‍ जपेत् ‌‍ पिबेत् ‌‍ ॥ ( जीवनविकास )

चार साधनें जनतासंपर्काची - १ संचार , २ संपर्क , ३ संवाद व ४ संघटना . ( इंद्रायणी दि . अंक १९६२ )

चार साधनें मोक्षाचा अधिकारी होण्याचीं - १ नित्यानित्यवस्नु - विवेक , २ इहामुत्रफलभोगविराग - सांसारिकसुखाविषयीं वैराग्य , ३ शमादिषट् ‌‍- संपत्ति व ४ मुमुक्षुत्व ( वेदांतशास्त्र ब्रह्मसूत्रें अ १ )

चार संस्था संस्कार करणार्‍या - १ घर , २ शिक्षणसंस्था , ३ सामाजिक अथवा बाह्म वातावरण आणि ४ परिस्थिति .

( माहेर मासिक )

चार संप्रदाय विष्णवांचे - १ ब्रह्म , २ सनक , ३ श्री व ४ रुद . ( पद्मपुराण )

चार संप्रदाय शैवांचे - १ शैव , २ पाशुपत , ३ कारुणिक - सिद्धान्ती व ४ कापालिक .

चार संप्रदाय सुफी पंथाचे - १ चिस्ती , २ प्रकाशबंदी , ३ सुहरावर्दी व ४ काद्री ( सुफी संप्रदाय )

चार स्वर ( गायनांत )- १ वादी - राजा , २ संवादी - प्रधान , ३ अवादी - सरदार व ४ व्याधी - शुत्र . ( द्रु . श . को . )

चार स्वातंत्र्यें - १ व्यक्तिस्वातंत्र्य , २ धर्मस्वातंत्र्य , ३ भाषण - स्वातंत्र्य व ४ मुद्रणस्वातंत्र्य . हीं आधुनिक काळचीं चार स्वातंत्र्यें लोक - शाहीचीम मूलभूत तत्त्वें म्हणून मानिलीं आहेत .

चार श्रेष्ठ आसनें - १ सिद्धासन , २ पद्मासन , ३ सिंहासन व ४ भद्रासन ( गोरक्षासन ). योगशास्त्रांतील चौर्‍यायशीं आसनांत हीं चार आसनें श्रेष्ठ होत .

चार श्रेष्ठ शक्ति ( लोकशाहींतील )- १ राष्ट्रपति , २ राज्यसभा , ३ संसद् ‌‍ ( लोकसभा ) व ४ वृत्तपत्रें .

चार सिद्ध आदेश - १ पुराणें , २ मानवधर्म , ३ सांगवेद आणि ४ वैद्यक , या चार गोष्टी सिद्ध म्हणजे अबाधित आज्ञा होत . त्या टाळून चालावयाचें नाहीं .

पुराणं मानवो धर्मः साङ्रो वेदश्चिकित्सितम् ‌‍ ।

आज्ञासिद्धानि चत्वारि न हातव्यानि हेतुभिः ॥ ( वि . स्मृ . )

चार स्थानें मुक्तिप्रद - १ गयाश्राद्ध , २ ब्रह्मज्ञान , ३ गाईच्या गोठयांत मरण व ४ कुरुक्षेत्री निवास . ( करवीरमाहात्म्य अ८ )

चार स्थानीं कृष्णास्त्रान दुर्लभ - १ शूर्पालय , २ मलप्रभा व कृष्णासंगम , ३ छाया ( भगवती ) या नांवाचें एक तीर्थ ( छाया भगवती - कृष्णा संगम - विजापूर पासून १० मैलावर तंगडगी जवळ . ) आणि ४ श्रीशैल .

शूर्पाले संगमे चैव छायायां श्रीगुरौ तथा ।

सर्वत्र सुलभा कृष्णा चतुःस्थानेषु दुर्लभा ॥ ( कृ . मा . ५४ - ८ )

चार स्थानीं कुंभमेळा - १ हरद्वार , २ प्रयाग , ३ उज्जयिनी व ४ नाशिक , समुद्रमंथनांतुन निघालेला अमृतकुंभ या चार ठिकाणीं १ चंद्र , २ बृहस्पति , ३ शनि व ४ सूर्य या चौघांच्या संरक्षणाखालीं बारा दिवसपर्यंत दडवून ठेवला होता . तन्निमेत्त पुराणकालापासून भारतांत प्रचलित असलेली मोठी यात्रा . ( केसरी जानेवारी १९५६ )

चौघेजण कोणत्याहि कार्याच्या चांगल्यावाईटाचे समभागी होत - १ प्रत्यक्ष करणारा , २ तें करविणारा , ३ जवळ असून पाहणारा आणि ४ अनुमोदन देणारा .

कर्ता कारयिता चैव प्रेषको ह्मनुमोदकः ।

सुकृतं दुष्कृतं चैव चत्वारः समाभागिनः ॥ ( सु . )

चार स्थानीं मुंडण व उपोषण वर्ज - १ विरजक्षेत्र , २ कुरुक्षेत्र . ३ विशालतीर्थ व ४ गया क्षेत्र . ( करवीर महात्म्य अ ८ )

चौघांची खरी ओळख चार अवस्थेंत होते - १ विपत्काळांत मित्राची , २ दारिद्यसमयीं स्त्रीची , ३ युद्धांत विरांची आणि ४ अपकीर्तींत बांधवांची .

चौघेजणच चक्रव्यूहाचा भेद जाणणारे - १ श्रीकृष्ण , २ अर्जुन , ३ प्रद्युम्न व ४ अभिमन्यु . हे चार जणच चक्रव्यूहाचा भेद जाणणारे महाभारतकालीं होते .

चौघेजण थट्टेपासून मुक्त - १ शुक , २ भीष्म , ३ हनुमान् ‌‍ आणि ४ कार्तिकस्वामी .

थट्टेपासून सुटले चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान ।

चौथा कार्तिकस्वामी जाण ॥

त्याला नाहीं बट्टा । अशी ही थट्टा ।

भल्याभल्यासी लाविला बट्टा ॥ ( एकनाथ )

चौघेजण ब्रह्महत्त्येच्या पापाचे वाटेकरी - १ भूमि , २ उदक , ३ वृक्ष आणि ४ स्त्रिया . इंद्रानें ब्रह्महत्त्येचा लोकापवाद दूर करण्याकरितां ती ब्रह्महत्त्या चार भाग करून या चौघांना वांटून दिली व ती त्यांनीं कांहीं अटीवर ग्रहण केली अशी कथा आहे . ( भाग - स्कंध ६ अ ९ - ७ )

चौघांशीं मसलत करूं नये - १ मंदमति , २ चेंगट , ३ हर्षानें हुरळून जाणारा आणि ४ स्तुतिपाठक . ( म . भा . उद्योग ३३ - ६९ )

चौघेजण आश्रयास पात्र - १ वृद्ध नातेवाईक , २ खालावलेला कुलीन मनुष्य , ३ दरिद्री मित्र आणि ४ निपुत्रिक भगिनी , ( म . भा . उद्योग ३३ - ७० )

चौघे शत्रुवत् ‌‍ होत - १ भार्या रुपवती , २ निरक्षर पुत्र , ३ ऋणकर्ता बाप आणि ४ अकुलीन माता .

भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः ।

ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी ॥ ( सु . )

चौघेजण शूलवत् ‌‍ दुःखदायक - १ मूर्ख सेवक , २ कंजूप राजा - शासनाधिकारी , ३ कुलटा स्त्री व ४ कपटी मित्र .

सेवक सठ नृप कृपन , कुनारी ।

कपटी मित्र सूलसम चारी ॥ ( राम - मानस किष्किंधाकांड )

चौघांचे स्मरणानें कलिनाश होतो - १ कर्कोटाक नाग , २ दमयंती , ३ नळ आणि ४ राजा ऋतुपर्ण .

कर्कोटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ।

ऋतुपर्णस्य राजर्षेः कीर्तनं कलिनाशनम् ‌‍ ॥ ( सु , )

चौघांकडील अन्न त्याज्य - १ राजा , अथवा शासनाधिकारी , २ वेश्य , ३ वैद्य व ४ दुष्कर्माचरणी .

राजान्नं गणिकान्नं च मिषगन्नं तथैव च ।

दुष्कर्मणां व सर्वेषामन्नं त्याज्यं सयत्नतः ॥ ( कल्याण मासिक )

अनुबंध चतुष्टय - १ प्रयोजन , २ विषय , ३ अधिकारी आणि ४ संबंध . या गोष्टी ग्रंथांत असाव्या लागतात .

अनंत चतुष्टय - १ अनंतज्ञान , २ अनंतदर्शन , ३ अनंतवीर्य व ४ अनंतसुख .

उपसर्ग चतुष्टय - १ आधि , २ व्याधि , ३ उपाधि व ४ समाधि ,

घात चतुष्टय - १ घातचंद्र , २ घाततिथि , ३ घातनक्षत्र व ४ घातवार .

चित्त चतुष्टय - १ मन , २ बुद्धि , ३ चित्त आणि ४ अहंकार .

तनु चतुष्टय - १ स्थूल , २ सूक्ष्म , ३ कारण आणि ४ महाकारण . ( दा . बो . ४ - १ - २८ )

पुरुषार्थ चतुष्टय - १ धर्म , २ अर्थ , ३ काम आणि ४ मोक्ष ,

प्रस्थान चतुष्टय - १ दशोपनिषदें , २ ब्रह्मसूत्रें , ३ भगवद्नीता आणि ४ श्रीमद्भागवत . या चार ग्रंथांना मिळून प्रस्थान चतुष्टय म्हणतात . वेदांचे विभाग व ब्रह्मसूत्रांची रचना करूनहि व्यासांना शांति मिळाली नाहीं . ती त्यांना श्रीभद्भागवताची रचना केल्यानंतर लाभली अशी कथा आहे .

भक्त चतुष्यय - १ नारद , २ ध्रुव , ३ प्रल्हाद व ४ विदुर . हे चार आदर्श भक्त होत .

विद्या चतुष्टय - १ आन्वीक्षकी , २ त्रयी , ३ वार्ता व ४ दण्डनीति . ( मानवधर्मसार )

वीर चतुष्टय ( पुराणकालीन )- १ भरत , २ अभिमन्य , ३ ककुत्स्थ आणि ४ भीषम .

सौभाग्य चतुष्टय - १ धर्मा , २ श्री , ३ जय आणि ४ वैभव , ( भ . गी . १८ - ७८ ) ( गीताईनीतिकथा )

संत चतुष्टय जागतिक कीर्तीचे ( आधुनिक भारतीय )- १ स्वामी रामकृष्ण परमहंस , २ स्वामी विवेकानंद , ३ स्वामी रामतीर्थ व ४ योगी अरविंद . ( महाराष्ट्र जीवन )

पौराणिक चांडाळ चौकडी - १ दुर्योधन , २ दुःशासन , ३ कर्ण आणि ४ शकुनि .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP