संकीर्ण
अध्यात्मिक संकेत
ॐ हा ईश्वराचा वाचक म्हणजे संकेत आहे . ( प्रसाद नवंबर १९६३ )
कामशास्त्र संकेत
पुष्ट , भरदार पोटर्या उघडया दिसल्या कीं नायिका प्रेमाविव्हल होतात . ( खर्डेघाशी )
तंत्रशास्त्र संकेत
द्दष्टाला अद्दष्ट व ज्ञेयाला अज्ञेय हें नेहमीच आधारभूत व अधिष्ठानभूत असतें . ( हिमालय - दर्शन )
काव्य संकेत
" रघुवंशा " चे अध्ययनाची सुरुवात दुसर्या सर्गापासून करावयाची असते . प्रथम सर्गात नंदिनीचा शाप असल्यामुळे अध्ययनास योग्य नाहीं असें परंपरागत मानलें जातें .
धार्मिक संकेत
रामायण ग्रंथ घरी वाचावयाचा नसतो . तसेंच महाभारतांतील आरण्यक पर्व . तसें केल्यास अनेक संकटें उत्पन्न होतात असें मानले आहे . रामायण पुराण सांगतांना तेथेंच एक रिकामा पाट मांडून ठेवण्याची प्रथा आहे . अद्दश्य रुपानें श्री मारुतीराय तेथें रामकथा ऐकता बसतात अशी समजूत आहे . मातापित्यांना प्रदक्षिणा घातली कीं पृथ्वी प्रदक्षिणेचे फल मिळते असें शास्त्र आहे एतद्विषयीं श्रीगणेशाची एक पौराणिक कथाहि आहे . श्वेत मंदार हा वृक्ष एकवीस वर्षें वाढला तर त्याच्या मुळीची आपोआप गणेशामूतीं तयार होते म्हणतात . ( सिद्धपंचरत्न ).
नाटय संकेत
सुखान्तिके ( Comedy ) मध्यें दुःख तीव्र स्वरूपांत असूं नये वा दाखवूं नये असा एक संकेत आहे . ( हास्यकारण आणि मराठी सुखान्तिका )
विविध संकेत
सगळेच स्पष्ट करून दाखविल्यानें साहित्य - विचारांतील व्यंजनेला म्हणजे सूचकतेला बाध येतो असा पूर्वा सूरींचा संकेत आहे
( खर्डेघाशी ) काल जें महत्त्वाचे वाटले तें आज सामान्य वाटावें हा जीवनाचा एक अलिखित संकेत आहे . ( अभिषेक ) सफरचंदाचे झाडाचे पहिले फळ जर एका बहुप्रसवा मातेनें खाल्ले तर त्या स्त्रीची प्रसवशक्ति त्या झाडांत उतरते असें बोहेमिया या देशांत समजतात . ( विज्ञान इतिहास ) आनंदात भागीदार मिळाले म्हणजे तो वाढतो आणि दुःखांत भागीदार मिळाले म्हणजे दुःख कमी होते . ज्यानें देऊळ वांधले त्यानेंच शिखर बांधू नये . तें काम इतर कोणाकरितां शिल्लक ठेवावे . कोणत्याहि गोष्टींत अतिरेक त्याज्यच . विनयानें , जिज्ञासुवृत्तीनें व निरहंकारानें विचारल्याविना कोणी कोणास उपदेश करू नये . परंतु कर्तव्य असेल तथें परिणामाकडे न पाहातां उपदेश केलाच पाहिजे . ( गूढार्थचंद्रिका ) " नापृष्टः कस्यचित् ब्रूयात् " ( सु . ) मध्यम श्रमाचे काम करणार्या निरोगी माणसास रोज सुमारें ३००० ते ३५०० कॅलरीज उष्णता उत्पन्न होईल इतके अन्न पोटांत गेल्यास सकस पौष्टिक पदार्थ पोटांत गेले असें समजण्याचा संकेत रूढ झालेला आहे . ( विज्ञान परिचय - लोकसत्ता ७।७। ३ ) करावयाचें नसेल तेव्हां बारामती मापानें बोलावें व लोकांना बनवावें हा लोकशाही राजकारणांतील प्रतिष्ठित संकेत आहे . ( श्री . न . वि . गाडगीळ . केसरी