मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५

संकेत कोश - संख्या ५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पंचमी तिथी - वैदिक धर्मोत पंचमी तिथीस विशेष महत्त्व आहे . अनेक सण व पर्वें या तिथीस आढळतात . आषाढ शु . ५ स वीज पंचमी म्हणतात . निदान वीज जरी चमकली तर पावसाळा चांगला जाईल , अशी समजूत आहे , श्रावण शु , ५ - नागपंचमी ; भाद्रपद शु . ५ - ऋषिपंचमी ; आश्चिन शु . ५ - ललितापंचमी ; कार्तिक शु . ५ - लाभपंचमी ; माघ शु . ५ - वसंत पंचमी ; फात्गुन व . ५ रंगपंचमी . इ .

पंचाग्नि - ( अ ) १ वडवाग्नि , २ मंदाग्नि , ३ जठराग्नि , ४ शोकाग्नि आणि ५ कामाग्नि . ( क . गी . २ - ३३ ); ( आ ) १ दक्षिणाग्नि , २ गार्हपत्य , ३ आहवनीय , ४ सभ्य व ५ आवसथ्य . हे पांच श्रौताग्नि , होत ; ( इ ) १ स्वर्ग , २ मेघ , ३ पृथ्वी , ४ पुरुष आणि ५ स्त्री . या पांच अग्निद्वारां मानवाचा पुनर्जन्म होतो . ( छां . अ . ५ )

पंचाग्नि विद्या - १ द्युलोक , २ पर्जन्य , ३ पृथिवी , ४ पुरुष व ५ स्त्री . यांचे ठिकाणीम अग्नीची द्दष्टि ठेवून उपासना - चिंतन करणें ही पंचाग्नि - विद्या होय . ( ब्रह्मसूत्र शां . भा . अ ३ )

पंचाग्निसाधन - चारी दिशांना चार अग्निकुंडें प्रज्वलित करून ठेवा - वयाचीं व सूर्याकडे टक लावून तपश्चर्या करावयाची . याला पंचाग्निसाधन म्हणतात . हा विधि ग्रीष्मऋतूंत भरउन्हांत करावयाचा असतो . अशा प्रकारची तपस्या प्राचीन कालीं करीत असत .

पंचनद - १ वितस्ता , २ इरावती ( असिकी ), ३ चंद्रभागा ( परुष्णी ), ४ शतद्रु ( सतलज ) व ५ विपाशा . हीं वेदकालीन नांवें . या पांच नद्या असलेला ( पंजाब ) प्रदेश .

विवस्तेरावती चंद्रभागा मध्ये सरिद्वारा ।

शतद्रुश्च विपाशा च तेन पंचनदः स्मृतः ॥ ( वि . पु . तळटीप ) आधुनिक नांवें - १ झेलम , २ चिनाव , ३ रावी , ४ सतलज व ५ बियास .

पंच नमस्कार - १ अर्हतांना नमस्कार , २ सिद्धांना नमस्कार , ३ आचार्यांना नमस्कर , ४ उपाध्यायांना नमस्कार आणि ५ सर्व संतांना नमस्कार . हे पंच नमस्कार , सर्व पापांचा नाश करणारे व मंगलामध्यें मंगल असे जैन धर्मांत मानले आहेत .

पंचपदी - देवापुढें नित्य पांच अभंग व पांच पदें म्हणण्याची जी प्रथा तीस पंचपदी म्हणतात .

पंच पर्वत - १ वैदार , २ वराह , ३ वृषम , ४ ऋषिगिरि व ५ चैत्यक . मगधांत जरासंधाचे राजधानीं गिरिव्रजाचे परिसरांत असलेल्या पर्वतांस म्हणतात . ( मुक्तेश्वर सभा . ६ - ८८ )

पंचोन्मत्त - १ बलोन्मत्त , २ मदोन्मत्त , ३ राजोन्मत्त , ४ विजयोन्मत्त आणि ५ महामत्त . असा रावणाचा भाऊ कुंभकर्ण पंचोन्मत्त होता .

मदोन्मत्त बलोन्मत्त । राज्योन्मत्त गर्वोन्मत्त ।

विजयोन्मत्त महामत्त । पंचोन्मत्त कुंभकर्ण ॥ ( भा . रा . यु . २७ - ५५ )

पंच पतिव्रता - १ सती , २ पार्वती , ३ अरूंधती , ४ अनसूया आणि ५ शांडिली .

पंचपक्वान्ने - १ लाडू , २ पुरणपोळी , ३ साखरभात , ४ बासुंदी व ५ श्रीखंडपुरी . हीं पांच उंची पक्कान्नें . हीं सर्व भोजनाच्या वेळीं एकत्र वाढणें . ही ऐश्वर्याची परमावधि समजली गेली आहे . ( आ ) १ वीवर , २ लाडू , ३ खाजी , ४ जिलेबी आणि ५ गुळोरी . ( क . क . )

पंच पुरुषार्थ - १ धर्म , २ अर्थ , ३ काम , ४ मोक्ष व ५ पराभक्ति .

जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ ।

पढिये पंच पुरुषार्थ । तो हरि नांदत वैकृंठीं ॥ ( ए . भा . २४ - २७० )

पंच पंच उषःकाल - सूयोंदयापूर्वी पांच घटिकांचा काळ . पांच घटिका मिळून दोन तास होतात . हा समय नित्य उठून कार्यप्रवृत्त होण्याला फार प्रशस्त व शुभ मानला आहे .

पंच पल्लव - ( अ ) १ वड , २ पिंपळ , ३ पायरी , ४ जांभूळ व ५ आंबा ( ब्राह्मांड पुराण ); ( आ ) १ आंबा , २ उंचर , ३ जांभूळ , ४ रुई व ५ पिंपळ ; ( इ ) आंबा , २ जांभूळ , ३ कवठ , ४ महाळुंग आणि ५ वेल . ( शब्दरत्न प्रकाश )

पंच पर्वकाळ - ( अ ) १ व्यतिपात , २ वैधुति , ३ संक्रांत , ४ पौर्णिमा व ५ अमावास्या . ( आ ) १ चतुर्दशी , २ अष्टमी , ३ अमावास्या , ४ पौर्णिमा व ५ रविसंक्रांति , हे पर्वकाल होत .

पंचपर्वा विद्या - १ वैराग्य , २ विचार , ३ योग , ४ तप व ५ ईशभक्ति , अशी पांच पर्वांनीं युक्त अशी विद्या आहे . ही साध्य झाली म्हणजे जीव मुक्तावस्थेस जातो असें वल्लभ संप्रदायांत मानलें आहे .

पंच परमेष्ठी ( जैनधर्म )- १ अर्हतपरमेष्ठी , २ सिद्धपरमेष्ठी , ३ आचार्य , ४ उपाध्याय आणि ५ साधुपरमेष्ठी . ( रत्नाकरंडक श्रावकाचार )

पंच परिवर्तनें ( जैनधर्म )- १ द्रव्यपरिवर्तन , २ क्षेत्रपरिवर्तन , ३ कालपरिवर्तन , ४ भावपरिवर्तन आणि ५ भवपरिवर्तन .

पंच पुष्प - १ चंपक , २ आम्र , ३ शमी , ४ कमल आणि ५ कण्हेर . हीं देवतांना प्रिय आहेत .

पंच प्रमाणें - १ शब्दप्रमाण , २ अर्थापत्ति प्रमाण , ३ अनुमान प्रमाण , ४ उपमान प्रमाण आणि ५ प्रत्यक्ष प्रमाण .

पंच प्रलया - १ नित्यप्रलय , २ मरणप्रलय , ३ दैनंदिनप्रलय . ४ ब्रह्मप्रलय व ५ आत्यंतिक प्रलय . ( भा . रा . किष्किंधा १२ - २४ )

( आ ) निद्र - प्रलय , २ प्राण - प्रलय , ३ भूत - प्रलय , ४ ब्रह्म - प्रलय व ५ विवेक - प्रलय ( ह्रत्पद्म . )

पंच प्रयाग - ( अ ) १ विष्णुप्रयाग - लेटी व अलकनंदा संगम , २ कर्णप्रयाग - पिंडार व अलकनंदा , ३ रुद्रप्रयाग - मंदाकिनी व अलकनंदा , ४ देवप्रयाग - भागीरथी व अलकनंदा व ५ भूतप्रयाग - यमुना व गंगासंगम . अलाहाबादेस जो त्रिवेणी संगम आहे हा भूतप्रयागव बाकीचे चार हिमालयांत बदरीनारायणाचे वाटेवर आहेत .

दूरमार्ग पंचप्रयाग । वेदप्रयाग । शिवप्रयाग ।

कर्णप्रयाग ब्रह्मप्रयाग । अतिगुप्तप्रयाग पांचवा . ( भा . रा . बाल . ७ - २३ )

पंच प्रवृत्ति जीवनाला आधारमूत - १ जिजीविषा - जगण्याची इच्छा , २ विजिगिषा - जिंकत राहाण्याची ३ रिंरसा - सुखाचा शोध घेण्याची , ४ जिज्ञासा - जाणण्याची व ५ मुमुक्ष - मुक्त होण्याची इच्छा . ( माऊली जानेवारी १९६३ )

पंच पांडव - १ धर्म , २ भीम , ३ अर्जुन , ४ नकुल , आणि ५ सहदेव .

पंच प्राण - १ प्राण - अन्नप्राशन , २ अपान - गुदस्थानीं मलमूत्र धारण करणार , ३ व्यान - पाचन , ४ उदान - ऊर्वगमन करणारा व ५ समान - डोळे मिटणें व उघडणें . हे पंचप्राण शरिरांतील पांच प्राणवायु होत . त्यांची स्थानें अनुक्रमें १ नाक , २ गुद , ३ सर्व शरीर , ४ कंठस्थान व ५ नाभिस्थान हीं होत .

पंचप्राण ( नाटयाचे )- १ संघर्ष , २ संवाद , ३ प्रसंग , ४ समस्था आणि ५ स्वभाव लेखन ( केसरी ) ८ - १० - १९५४ .

पंच प्राण ( लौकिकांत )- १ बायको , २ तिची बहीण , ३ सासू , ४ सासरा व ५ मेहूणा . हे कलिनिर्मित पंचप्राण होत .

गृहिणी भगिनी तस्याः श्वशुरौ श्याल इत्यपि ।

प्राणिनां कलिना सृष्टाः पंचप्राणा इमे परे ॥ ( रामदास मासिक आषाढ १८७४ )

पंचप्रान ( भारतीय संस्कृतीचे ) १ वेद , २ उपनिषदें , ३ श्रीभद्‌‍भग - वद्‌‍गीता , ४ रामायण व ५ महाभारत ( पुरुषार्थ )

पंच प्राण वाङवयाचे - १ प्रयत्न , २ प्रचीति , ३ प्रक्षोभ , ४ प्रसाद व ५ प्रतिभा ( महाराष्ट्र . ध . प्रणेते )

पंचप्राण संस्कृतीचे - १ विचार ( तर्क ), २ भावना आणि कल्पना , ३ कला , ४ नीति आणि ५ धर्म ( साहित्याचा संसार )

पंच प्रेषित - १ झरतुष्ट्र , २ महावीर , ३ बुद्ध , ४ खरीस्त व ५ महंमद .

’ पंचैते प्रेषिताः तेषां चिन्तनं हितकारकम् ‌‍ ’ ( श्रीयुत जून १९६३ )

पंच प्रासाद - मध्यभागीं गर्भागाराव एक मुख्य कळस व चार बाजूंस चार लहान कळस अशा प्रकारच्या शिल्परचनेस पंच प्रासाद म्हणतात .

पंच बला - १ बला , २ नागबला , ३ महाबला , ४ अतिबला व ५ राजबला . बला म्हणजे आकस्मिक संकट , अथवा पीडा . ( दु श . को . )

पंच बलें - ( अ ) १ बाहुबल , २ अमात्यबल ( सल्लागार - सामान्य लोकांचे बाबतींत ), ३ धनबल , ४ कुलबल व ५ बुद्धिबल . हीं पांच प्रकारचीं बलें होत ; ( आ ) १ इंद्रियबल , २ मनोबल , ३ बुद्धिबल , ४ नैतिक बल आणि ५ शरीरबल . ( इ ) १ श्रद्धा , २ उत्साह , ३ समाधि , ४ स्मृतिव ५ प्रज्ञा ( अभिधम्म )

पंच बदरी - १ विशाल बदरी ( बदरीनाथ ), २ योगबदरी ( पंडुकेसर ), ३ भविष्यबदरी ( तपोवन - जोशी मठापासून ८ मैल ), ४ वृद्धबदरी

( अत्रिमठ ) व ५ ध्यानबदरी ( सीलांग ). हीं पांची स्थानें स्थानें बदरीनाथाचे परिसरांत आहेत .

पंच बाजारपेठा भक्तीच्या ( महाराष्ट्र )- १ श्रीक्षेत्र पंढरी , २ आळंदी , ३ देहू , ४ सज्जनगड आणि ५ पैठण , ( माऊली मासिक )

पंचबाण - पंचशर - १ अरविंद ( लालकमल ), २ अशोक , ३ आम्रमंजिरी , ४ जाईचें फूल किंवा मोगरा व ५ नीलकमल . हे पंचबाण म्हणजे मदनाचीं आयुधें होत . मदनाला पंचबाण अथवा पंचशर म्हणतात . याच्या धनुष्याचे बाण म्हणजे पांच फुलें असें मानलें आहे . ( आ ) ( गुणवाचक ) १ उन्माद आणणारा , २ तापन - तप्त करणारा , ३ शोषण -- कृश करणार , ३ स्तंभ्भन - क्रियाहीन व ५ संमोहन - मोह पाडणारा .

अरविदमशोकं च चुतं च नवमल्लिका ।

नीलोत्पलं च पञ्चैते पंचबाणस्य सायकाः ॥ ( सु . )

" संमोहनं च कामस्य पंचबाणाः प्रकीर्तिताः ॥ ( सु . )

पंच बिल्व - १ तुलसी , २ बिल्व , ३ निर्गुडी , ४ लिंबू व ५ आवळी .

तुलसी बल्वं निर्गुडी जंबीरामलकं तथा ।

पंचबिल्वसमाख्यातं एकबिल्वं शिवार्पणम् ‌‍ ॥ ( चंडिकोपास्ति दीपिका ।

पंचब्रह्म सनातन - १ तारक , २ दंडक , ३ कुंडल , ४ अर्धचंद्रक आणि ५ बिंदुसंकाश असें सनातन पंच ब्रह्म आहे . ( क . गी . २ - १ )

पंचात्मक ब्रह्म - १ ॐ , २ गणपती , ३ मन , ४ परब्रह्म व ५ आत्मा . ॐ हाच पंचविध किंबा यासच पंचात्मक ब्रह्म म्हणतात . ( ध्यान योग रहस्य )

पंच प्रवाह भारतीय संस्कृतीचे - १ यज्ञ , २ योग , ३ ज्ञान , ४ भक्ति आणि ५ कर्म . ( ज्ञानेश्व्री प्रवेशिका प्रस्तावना )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP