तीन ढोंगीपणाचीं लक्षणें - १ खोटें वेलणें , २ दिलेलें वचन न पाळणें व ३ विश्वास ठेवणारांशीं बेइमान होणें . ( इरलाम आणि नीतिशास्त्र )
तीन तत्त्वें सृष्टींत असलेलीं - १ चित् २ अचित् आणि ३ ईश्वर ( श्रीरामानुजदर्शन )
तीन तंटयाचीं कारणें - १ कनक , २ कांता आणि ३ कृषि . हीं तीन प्रायः तंटयाचीं मूळ कारणें असतात .
तीन दानें - १ विद्यादान , २ धनदान आणि ३ कन्यादान . हीं तीन प्रकारचीं दानें .
तीन दुःखें ( जीवनांतील )- १ जरा ( म्हातारपण ), २ व्याधि ( आजार ) आंणि ३ मरण .
तीन देवता - ( अ ) १ ब्रह्मा , २ विष्णु आणि ३ महेश ; ( आ ) १ आग्नि , २ वायु आणि ३ सूर्य ; ( इ ) १ महाकाली , २ महालक्ष्मी आणि ३ महासरस्वती ; ( ई ) १ सत्ता , २ संपत्ति आणि ३ सरस्वती ; ( उ ) १ मातृभूमि , २ मातृभाषा आणि ३ मातृसंस्कृति . ( ऋग्वेद ७ - २ - ८ )
तीन दोष अंत : करणाच्या ठायीं असणारे - १ मल , २ विक्षेप आणि ३ सुह्रदांचा अविश्वास .
परस्वानां च हरणं परदाराभिमर्षणम् ।
सुहृदामतिशाङ्का च त्रयो दोषाः क्षयावहाः ॥ ( वा . रा . युद्ध . ८७ - २३ )
परद्रव्याचें ज्यासी हरण । परदाराभिलाषण । सुह्लदांचा द्वेषपूर्ण । तेथें मरण सहजचि . ॥ ( भा . रा . युद्ध . ३८ - ५९ )
तीन दंड - ( अ ) १ राजदंड , २ नैसर्गिक दंड आणि ३ दैवी दंड ; ( आ ) १ समाजदंड , २ राजदंड आणि ३ यमदंड ; ( इ ) १ वाग्दंड ( मौन ), २ मनोदंड ( आशाहीन मन ) व ३ देहदंड ( स्वधर्माचरण ). योग हा मनोदंड । मौन होय वाग्दंड । निरिच्छता देहदंड । हें अखंड असावें ॥ ( द . माहात्म्य अ . ३५ )
" वाग्दंडः कर्मदंडश्च मनोदंडश्च ते त्रय : " ( सु . )
तीन द्वारें आत्मशक्तीचा नाश करणारीं - १ काम , २ क्रोध आणि ३ लोभ ( भ . गी . १६ - २१ )
तीन द्दष्टि - १ चाक्षुषी द्दष्टि , २ विचारी द्दष्टि आणि ३ अनुभव द्दष्टी कोणत्याहि पदार्थाकडे पहाण्याच्या अशा तीन द्दष्टि असतात . ( अमृतानुभव अमृतवाहिनी टीका )
तीन धर्मलक्षणें - १ वेदविहित धर्म , २ धर्मशास्त्रांतर्गत स्मार्त धर्म व ३ शिष्टांचा आचार . विधात्यानें सृष्टीच्या सर्गसमय़ीं असे तीन धर्म निर्मिले ; व ते सनातन आहेत .
वेदोक्तः प्रथमो धर्मः स्मृतिशास्त्रांतर्गतोऽपरः ।
शिष्टाचीर्णोऽपरः प्रोक्तस्त्रयो धर्माःसनातनाः ॥ ( म . भा . अनु १४१ - ६५ )
वेदोक्ताः परमो धर्मो धर्मशास्त्रेषु चापरः ।
शिष्टाचारश्च शिष्टानां त्रिविधं धर्मलक्षणम् ॥ ( म . भा . वन . २०७ - ८४ )
तीन नयन ( श्री शिवाचे ) - ( अ ) १ कृशानु ( अग्नि ) २ भानु ( सूर्य ) व ३ हिमकर ( चंद्र ) म्हणून त्रिनयन हें एक शिवाचें नांव आहे . ( आ ) १ श्वेतभानु - सोम , ३ बृद्धभानु - अग्नि आणि ३ भानु - सूर्य हे शिवाचे - महादेवाचे तीन नेत्र होत . ( स्तुतिकुसुमांजलि )
तीन धूर्तलक्षणें - १ मुख - कमलाप्रमाणें , २ वाणी - चंदनाप्रमाणें शीतल आणि ३ पोटांत राग हीं धूर्तांची तीन लक्षणें होत .
मुखं पद्मदलाकारं वाणी चंदनशीतला ।
ह्रदयं क्रोधसंयुक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम् ॥ ( सु . )
तीन नाडीसंस्था मानवी शरिरांतल्या - १ रक्तवश , २ वातवश आणि ३ मनोवश ( स्वर्गदर्शन )
तीन नाडया - ( अ ) १ इडा , पिंगला व ३ सुषुग्ना ( योगशास्त्र ); ( आ ) १ वात , २ पित्त आणि ३ कफ ( वैद्यक ); ( इ ) १ आद्य , २ मध्य व ३ अन्त्य ( ज्योतिष ).
तीन नाशहेतु ( दानाचे )- १ दिल्यानंतर वाईट वाटणें , २ अपात्रीं दान देणें आणि ३ देतांना श्रद्धा नसणें , हे तीन दानाचे नाशहेतु म्हणून सांगितले आहेत .
यद्दत्वा तप्यते पश्चादपात्रेभ्यस्तथा च यत् ।
अश्रद्भया च यद्दानं दाननाशास्त्रयस्त्वमी ॥
तीन नीतिशास्त्रप्रवर्तक - १ शुक्र , २ विदुर आणि ३ चाणक्य . हे तीन जगांतले आद्यनीतिशास्त्रप्रवक्ते होत .
नीतितत्त्वप्रवक्तारस्त्रयः सन्ति धरातले ।
शुक्रश्च विदुरश्चायं चाणक्यस्तु तृतीयकः ॥
तीन परिणाम - १ निरोध परिणाम , २ समाधि परिणाम व ३ एकाग्रता परिणाम . या तिन्ही परिणामांत संयम् केल्यानें भूत व भविष्य - काळाच्या गोष्टींचें ज्ञान होतें . परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञानम् ।
तीन पायर्या ज्ञानविकासाच्या - १ धार्मिक , २ आध्यात्मिक आणि ३ शास्त्रीय
तीन पिते - १ परमात्मा २ गुरु आणि ३ जनकपिता
तीन पीठें - ( अ ) १ व्यासपीठ , २ पूजापीठ आणि ३ दीपपीठ ; ( आ ) १ वाक्पीठ , २ व्यासपीठ आणि ३ मुद्रापीठ . Press हीं तीन पीठें आधुनिक प्रचारतंत्रांत प्रभावी आहेत .
तीन पुरुष जगांत दुर्लभ - १ जननिंदेला पात्र न झालेला श्रीमान् , २ स्वतःची प्रौढी न सांगणारा शूर आणि ३ सर्वत्र समद्दष्टि असणारा राजा अथवा शासनाधिकारी .
श्रीमानजननिंद्यश्च शूरश्चाप्यविकत्थन : ।
समद्दष्टिः प्रभुश्चैव दुर्लभाः पुरुषास्त्रयः ॥
तीन पुराणकालीन महाक्रोधी - १ दुर्बास , २ जमदग्नि आणि २ विश्वामित्र . हे प्राचीन कालचे महाक्रोधी म्हणून प्रसिद्ध आहेत .
तीन पुराणकालीन लोभी आणि महत्त्वाकांक्षी - १ कंस २ जरा - संध आणि ३ दुयोंधन
तीन पुराणकालीन मामा - १ कंसमामा , २ जांगीळमामा ( घटोत्कचाचा कारभारी ) व ३ शकुनिमामा . हे तीन कपटनीतिनिपुण मामा होत .
तीन पुरुष - १ प्रथम पुरुष - मी , २ द्वितीय पुरुष - तूं व ३ तृतीय पुरुष - तो .
तीन पुरुष - १ विश्वव्यापी विराट् पुरूष , २ पृथ्वीवरील सर्व मानव - समाजरूपी राष्ट्र्पुरुष , आणि ३ मानव व्यक्तिरूप - व्यक्ति पुरुष . पुरुषसूक्तांत पहिल्या दोन पुरुषाचें वर्णन आहे . तिसर्या पुरुषाचा संकेत आहे .
तीन प्रकारचे अर्थ ( शब्दांचे )- १ वाच्यार्थ , २ लक्ष्यार्थ आणि ३ व्यंग्यार्थ .
तीन प्रकार अवताराचे - १ आवेश अवतार - नरसिंह , २ अंश अवतार - श्रीरामचंद्र आणि ३ पूर्ण अवतार - श्रीकृष्ण .
तीन प्रकारचीं आकाशें - १ चिदाकाश , २ चित्ताकाश आणि ३ भूताकाश
तीन प्रकार आगम ग्रंथाचे - १ वैष्णवागम ( पांचरात्र ), २ शैवागम आणि ३ शाक्तागम .
तीन प्रकार आहाराचे - १ सात्त्विक - नित्याचा साधा आहार , २ राजस - उंची पक्वान्नें वगैरे व ३ तामस - तळकट वगैरे .
तीन प्रकारचे उत्पात - १ दिव्या - उत्कापात , २ अंतरिक्ष - धूमकेतु इ . आणि ३ पार्थिव - भूकंप
तीन प्रकारच्या उपासना - १ ब्रह्मोपासना , २ मंत्रोपासना आणि ३ प्रतिमोपासना .
तीन प्रकारच्या ओढी - १ विषयी माणसाची विषयांसंबंधीची , २ मातेची मुलांसाठीं असलेली व ३ सतीची पतीविषयीं असलेली . या तीन प्रकारच्या ओढींच्या शक्ति एकत्रित झाल्यास भगवद्दर्शन होतें .
तीन प्रकारचे ऋषि - १ ब्रह्मर्षि , २ देवर्षि आणि ३ राजर्षि .
तीन प्रकारचे कवि - १ धीट , २ धीटपाठ आणि ३ प्रासादिक .
तीन प्रकारचीं कर्मे - १ संचित , २ क्रियमाण आणि प्रारब्ध .
तीन प्रकार कर्मफलाचे - १ इष्ट , २ अनिष्ट आणि ३ संमिश्र . " अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् "
तीन प्रकारचे किरण सूर्याचे - १ ताप देणारे ३ प्रकाश देणारे व ३ आरोग्य देणारे .
किरणास्त्रिविधाः सूर्यें तापाऽरोग्यप्रकाशदाः ।
हरन्ति स्वप्रभावेण दैन्यं तापं च पातकम् ॥
तीन प्रकार कीर्तनभक्तीचे - १ गुणसंकीर्तन , २ लीलासंकीर्तन आणि ३ नामसंकीर्तन .
तीन प्रकारची कृपा - १ गुरुकृपा , २ शास्त्रकृपा व ३ आत्मकृपा
तीन प्रकार खडकाचे - १ स्तरित , २ अग्निजन्य व ३ रूपांतरित .
तीन गति पृथ्वीला - १ परिवलन - स्वतःभोवतीं फिरणें २ परिभ्रमण - सूर्याभोवतीं फिरणें व ३ सहचलन - सूर्य जात आहे त्या दिशेनें जावें लागणें .
तीन प्रकार गाथांचे - १ भक्तिपर , २ उपदेशपर आणि ३ अनुभवपर .
तीन प्रकारचे गुरु - ( अ ) १ उपदेशगुरु , २ कुलगुरु आणि ३ जगद्गुरु . ( आ ) १ लौकिक ज्ञान देणारे , २ वैदिक ज्ञान देणारे आणि ३ आध्यात्मिक ज्ञान देणारे . ( इ ) १ दिव्य , २ सिद्ध आणि ३ मानव
तीन प्रकार ग्रहणाचे - १ खंडग्रहण २ कंकणग्रहण आणि ३ खग्रास ग्रहण .
तीन प्रकार ( चित्रांचे )- १ शिल्पचित्र , २ अर्धशिल्प व ३ चित्राभास
तीन प्रकार जपाचे - १ आध्यात्मिक - वेड लागणें , खरूज इ . २ आधिभौतिक - धरणीकंप , अग्निपीडा इ . व ३ आधिदैविक - विद्युत्पतन , अतिवृष्ट - अनावृष्टि इ .
तीन प्रकार दांनाचे - १ अभयदान , २ उपकारदान व ३ द्रव्यदान .