मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३

संकेत कोश - संख्या ३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


तिघेजण सृष्टिकर्त्याशीं स्पर्धा करणारे - १ ग्रंथकार , २ चित्रकार आणि ३ शिल्पकार . ( प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार )

तिघेजण स्थानांतरामुळें भोभा पावतात - १ सिंह , २ सत्पुरुष व ३ हत्ती , हे तिघे संचारामुळें शोभून दिसतात .

’ स्थानभ्रष्टाः सुशोभन्ते सिंहाः सत्पुरुषा गजाः ’ ( सु . )

तिर्थर्यात्रचीं तीन प्रयोजनें - १ देहदंडन , २ षड्‌‍विकारांचा त्याग आणि ३ आपपर अभेदत्व . अशीं तीर्थयात्रेचीं तीन प्रयोजनें होत . यापरी यात्रा तीन्ही । घडल्या असती ज्यालागुनी । तो ज्ञानियाचा मुकुटमणी । प्रतिईश्वर होईल ॥ ( भक्तिसारामृत ११ - १०६ )

त्रयी - तिन्हींचा समुदाय . ( अ ) १ सत् ‌‍, २ चित् ‌‍ आणि ३ आनंद ; ( आ ) १ ऋक ‌‍ , २ यजुस् ‌‍ आणि ३ सामन ‌‍ ; ( ई ) १ शंसन , २ हवन आणि ३ स्तव ; ( ई ) १ अध्यात्म , २ भक्ति आणि ३ नीति . अशा अनेक त्रयी आहेत . यांच्या एकत्रीकरणांतच वैदिक धर्माची सिद्धि आहे . ( उ ) १ बाप , २ आजा आणि ३ पणज्ञा ; ( ऊ ) १ आई , २ आजी आणि ३ पणजी असे अनुक्रमानें येणारे तीन पूर्वज . ( ए ) १ धर्म , २ अर्थ व ३ काम यांचा समुच्चय ( ऐ ) १ संहिता , २ ब्राह्यण व ३ आरण्यकें मिळून होणारे ग्रंथ .

आत्मत्रय - १ जीवात्मा , २ अंतरात्मा व ३ परमात्मा .

आयुर्वेदग्रंथत्रयी - १ चरक , २ सुश्रुत आणि ३ वाग्मट .

दर्शनत्रयी - १ सांख्य , २ योग व ३ वेदान्त .

पुराण प्रस्थानत्रयी - १ रामायन , २ महाभारत आणि ३ भागवत .

प्रमाणत्रयी - १ श्रुति , २ युक्ति व ३ अनुभव . ( वेदान्त )

प्रार्थनात्रयी ( औपनैषादिक )- १ असतो मा सद् ‌‍ गमय । २ तमसो मा ज्योतिर ‌ गमय । व ३ मृत्योर् ‌‍ मा अमृतं गमय ।

रत्नत्रय ( जैन धर्म )- १ सम्यद्नर्शन , २ सम्यग्ज्ञान व ३ सम्यक चारित्र . ( रत्नकरंडक श्रावकाचार )

रत्नत्रयी - ( बुद्ध धर्माची ) १ बुद्ध , २ धर्म आणि ३ संघ .

वनस्पतित्रयी - १ सुंठ , २ मिरी व ३ पिंपळी .

वारकरी प्रस्थानत्रयी - ( अ ) श्रीज्ञानेश्वरी , २ तुकारामाची गाथा आणि ३ एकनाथी भागवत . ( आ ) १ चांगदेवपासष्टी , २ अमृतानुभव आणि ३ ज्ञानेश्वरी .

वेदान्तप्रस्थानत्रयी - १ दशोपनिषदें , २ भगवद्नीता आणि ३ ब्रह्मसूत्रें .

त्रिकर्में - १ नित्य , २ नैमित्तिक आणि ३ काम्य . ’ नित्यं नैमित्तिकं काम्यमिति कर्म त्रिधा मतम् ‌‍ ’ ( व्यास . स्मृति ३ - १ )

त्रिकटु - १ सुंठ , २ मिरें आणि ३ पिंपळी या तीन औषधांचा समुदाय .

त्रिकूट - तीन शिखरें असलेला लंब नामांतरनें लंकेतील एक पर्वत . ( वा . रा . सुंदर सर्ग १ भारत - प्राचीन ऐति . कोश )

त्रिकूट ( पाकशास्त्र )- १ बोरकूट , २ मेथकूट आणि ३ तिळकूट .

त्रिकांडाबभु - पांडवांपैकीं भीमाचा शक्तिकेतु हा महापराक्तमी पुत्र . पण भारतीयुद्धांत हा कौरवपक्षाला मिळाला होता . याचेजवळ तीन विषारी धूम्रास्त्रें होतीं म्हणून याला त्रिकांडबभरु म्हणत असत . ( शक्तिकेतु )

त्रिकांड वेद - १ कर्मकांड ( मंत्रभाग ), २ उपासनाकांड ( ब्राह्मणभाग ) आणि ३ ज्ञानकांड ( उपनिषद्‌‍भाग ). या तीन कांडांनीं युक्त असा वेद . ज्ञान भक्ति कर्मकांडा । वेद त्रिकांड नेमस्ता ॥ ( ए . भा . २० - ७१ )

त्रिगुण - १ सत्त्व , २ रज आणि ३ तम . हे तीन प्राकृतिक गुण .

ते प्राणिये तंव स्वभावें । अनादि मायाप्रभावें ।

त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥ ( ज्ञा . १७ - ५६ )

त्रिगुणाचीं तीन प्रतीकें - १ रजोगुण - रावण , २ तमोगुण - कुंभकर्ण आणि ३ सत्त्वगुण - बिभीषण . ( विचार पोथी )

त्रिचक्र - आश्विनीकुमारांचा रथ ( आदर्श हिंदी श . को . )

त्रिजात - दालचिनी , २ तमालपत्र आणि ३ वेलदोडे या तीन साल्याच्या पदार्थांस ( समुच्चयानें ).

त्रितन्त्री - ( अ ) तीन तारा असलेली वीणा . ( आ ) १ आध्यात्मिक , आधिभौतिक आणि ३ आधिदैविक .

त्रिताप - १ आधि , २ व्याधि आणि ३ उपाधि .

त्रिदोष - १ वात , २ पित्त आणि कफ हे तीन मुख्य धातु शरीरांत असतात . आयुर्वेदाची मूळ उभारणी शरीरांतील या मुख्या तीन पदार्थांवर केलेली आहे . यांना उद्देशूनच वातपित्तकफात्मक त्रिदोषपद्धति असें नांव आहे . कांहींच्या मतें रक्त हा चवथा पदार्थ किवा दोष मानून चतुर्दांषात्म पद्धति असें म्हणतात .

त्रिदंडी - १ काया ( कर्म ), २ वाचा आणि ३ मन , या तिहींवर ज्यानें ताबा मिळविला आहे असा पुरुष .

वाग्दंडः कर्मदण्डश्च मनोदंडश्च ये त्रयः ।

यस्यैते नियता दण्डाः स त्रिदण्डी महायतिः ॥ ( सु . )

त्रिदंडी संन्यास - ज्यांत १ शिखा , २ यज्ञोपवीत व ३ कच्छ यांचा त्याग करावा लागत नाहीं असा संन्यासाचा एक प्रकार . अशास पुन्हा गृहस्थाश्रमांत येतां येतें , अशी समजूत आहे ,

त्रिधातु - १ वात . ३ पित्त व ३ कफ . ( ऋग्वेद १ - ३४ - ६ ) ( सायण भाष्य . )

त्रिनयन - महादेवाचे तीन नेत्र , १ श्चेत भानु - सोम , २ बृह्द्‌भानु - अग्नि आणि ३ भानु - सूर्य हे महादेवाचे तीन नेत्र होत .

( स्तुतिकुसुमांजलि )

त्रिपथ - १ कर्म , ३ ज्ञान आणि ३ उपासना . या तिन्ही मागौस समुच्चयानें म्हणतात

त्रिपीटक - १ सूत्र , २ विनय आणि ३ अभिधर्म म्हणजे बुद्धदेवाचे आचार आणि तत्त्वज्ञान अशीं तीन पीटकें म्हणजे संग्रह . यांना त्रिपीटक अशी संज्ञा आहे .

त्रिपदागायत्री - तीन पदांचा गायत्री छंद . उदा० -- ॐ तत्सवितुर्वरेण्यम् ‌‍ । भगोंदेवस्य धीमही । धियो यो नः प्रचोदयात् ‌‍ ( गा . मंत्र )

" त्रिपदां जपे पवित्रपूर्ण । यालागीं वेदांचें निवासस्थान ॥ " ( ए . भा . ११ - १३८० )

त्रिपथगा ( भागीरथी )- ही १ स्वर्ग , २ मृत्यु आणि ३ पाताळ या तिन्ही लोकांत वाहणारी . म्हणून त्रिपथगा .

क्षितौ तारयते मर्त्यान् ‌‍ नागांस्तारयतेऽप्यधः ।

दिवि तारयते देवान ‌‍ तेन त्रिपथगा स्मृता ॥ ( सु . )

त्रिपुटी - एक नसेल तर दुसर्‍या दोहोंची सिद्धि होणार नाहीं . अशा रीतीनें एकमेकांशीं संबद्ध अशा तीन गोष्टींचा समुच्चय ; याला त्रिपुटी म्हणतात . अशा त्रिपुटी अनेक आहेत .

उदा० -- परमेश्वर , आत्मा व जगत् ‌‍ ; तत् ‌‍ , त्वे , व असि ; सत् ‌‍ , चित् ‌‍ व आनंद ; ज्ञाता , ज्ञेय व ज्ञान ; कर्ता , कारण व क्रिया ; प्रकृति , पुरुष व परमपुरुष ; द्दश्य , द्रष्टा व दर्शन ; ब्रह्म , माया व जीव ; साध्य , साधक व साधन ; पूजा , पूजक व पूजन ; ध्येय , ध्याता व ध्यान ; पिता , पुत्र आणि पवित्र आत्मा ( खिरस्ती धर्म ); भोक्ता , भाग्य व भोग ; शब्द , अर्थ व प्रत्यय ; प्रिय , प्राणेश्वरी व प्रीति ; शिष्य , सद्‌‍गुरु व साक्षात्कार ; उपमा , उपमेय व उपमान ; व्यष्टि , समष्टि व परमेष्टी ; कर्म , भक्ति व ज्ञान ; कर्ता , कर्म व क्रियापद ; अकार , उकार व मकार ; जागृति , स्वप्र व सुपुप्ति इत्यादि .

त्रिपुंड्र - १ अ - अ - कार , २ उ - कार आणि ३ म - कार या भस्माच्या तीन रेषा कपाळावर लावावयाच्या . यांस त्रिपुंड्र म्हणतात . ( गुरुचरित्र )

त्रिभुवन - १ स्वर्ग , २ मृत्यु व ३ पाताळ .

त्रिमधु - १ तूप , २ गूळ किंवा साखर आणि ३ मधु . हे तीन मधुर पदार्थ मानले आहेत .

’ घृतं गुडं माक्षिकं च विज्ञेयं मधुरत्रयम् ‌‍ । ( शा . नि . )

त्रिमूर्ति - ( अ ) १ ब्रह्या ( सृजन ), २ विष्णु ( पालन ) आणि ३ शिव ( संहार ) या तीन देवता ; ( आ ) ब्रह्मा , विष्णु आणि शिव या तिन्ही देवतांच्या अंशापासूनचा दत्तात्रेयावतार .

त्रिराम - १ दाशरथि राम , २ परशुराम आणि ३ बलराम .

त्रिरूपा लक्ष्मी - १ श्रीदेवी , २ भुदेवी व ३ दुर्गा , लक्ष्मीदेवतेचीं हीं सत्त्व , रज व तम या त्रिगुणात्मक प्रकृतीचीं तीन रूपें आहेत .

’ लक्ष्मी त्रिरूपा संभूता श्री - भू - दुर्गेति संज्ञिता ’ ( गरुड . ब्रह्य . ४ - १ )

त्रिलोह - १ सोनें , २ रुपें व ३ तांबें .

त्रिवाचा - तीन वेळां उच्चारिलेलें वचन . ठाम अभिवच . जानकी आणीन हें प्रमाण । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ( रा . वि . १७ - ११८ )

त्रिवारशांत्रि - १ व्यक्तिमध्यें शांति , २ राष्ट्रास शांति आणि ३ जगांत शांति . याचा अर्थ सर्वत्र शांति नांदावी असा आहे . म्हणून कोणत्याहि शुभकार्याचे अंतीं ’ ॐ शांतिः शांतिः शांतिः ’ असा शांतिपाठ त्रिवार उच्चारण्याचा परिपाठ आहे .

त्रिशूल - १ कटिशूल ( कामेच्छा ), २ पोटशूल व ३ मस्तकशूल .

त्रिविध - आनंद - १ काव्यानंद २ ज्ञानानंद व ३ भक्त्यानंद .

त्रिविध आदर्श मानवी जीवनाचे - १ धर्म , २ अर्थ व ३ काम . " धर्मार्थाविरोघेन कामं सेवेत । " ( कौटिल्य )

त्रिविध गंडांतर - १ नक्षत्र गंडांतर , २ तिथि गंडांतर व ३ लग्न गंडांतर . ( म . वा . को . ).

त्रिविध केतू अथवा दुश्चिन्हें - १ दिव्य - उल्कापात इ ., २ अंत रिक्ष - घूमकेत ‌‍ इ . व ३ पार्थिव - भूकपं इ . असे तीन प्रकार . असे उत्पात भारतीय युद्धारंभीं झाले होते अशी कथा आहे . ( मुक्तेश्वर सभा अ . १२ )

त्रिविध ताप - १ आधिदैविक ( विद्युत्पतन , अतिवृष्टि इ . ). २ आध्यात्मिक ( ज्वर , शूळ इ . ) आणि ३ आधिभौतिक ( पाण्यांत बुडणें , चौर्य , भय इ . )

देवापासूनि आधिदैविक । मानसताप आध्यात्मिक ।

भूतापासाव तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥ ( ए . भा . २२ - ३९९ )

त्रिविध देह - १ स्थूल देह , २ सूक्ष्म देह आणि ३ कारण देह .

त्रिदोष ( आयुर्वेद )- १ वात , २ पित्त आनि ३ कफ . हे शरिरांत असणारे तीन दोष , चांगल्या स्थितींत असले म्हणजे शरीराचें रक्षण करतात व बिघडले म्हणजे नाश करतात .

’ वात - पित्त - कफा एते त्रयो दोषा इति स्मृताः । ’ ( भावप्रकाश पूर्वखंड )

त्रिविध दोष खाद्यपदार्थासंबंधीं - १ जातिदोष - कांदा , लसूण वगैरे २ निमित्त दोष - हलवायाकडील पदार्थ व ३ आश्रयदोष - चारित्र्यहीन व्यक्तींनीं स्पर्शिलेले ( स्वामी विवेकानंदांच्या सहवासांत )

त्रिविध नायिका - १ मुग्धा , २ मध्या व ३ प्रौढा .

त्रिविध प्रतिबंध - १ भूत प्रतिबंध - मनाची अस्थिरता , विषयचिंतन वगैरे , २ वर्तमान प्रतिबंध - कुतर्क दुराग्रह वगैरे आणि ३ भावी प्रतिबंध - निश्चय करण्याची शक्ति बुद्धींत नसणें , मिथ्या ज्ञान इ . ( बोधामृत )

त्रिविध प्रकार औषधाचे - १ दिव्य - हवा व उष्णता , २ पार्थिव - खनिज , उद्भिज्ज पदार्थ व ३ औदक - प्रवाही किंवा द्रवरूप ( ऋ . मंडल १ - ३४ )

विविध बुद्धि - १ देहबुद्धि , २ जीवबुद्धि आणि ३ आत्मबुद्धि .

त्रिविध ब्रह्म - १ उपभोग घेणारा जीवात्मा २ उपभोग्य हें बाह्य वस्तुविश्व व ३ त्या दोहोंना प्रेरणा देणारें चैतन्य़ ही ब्रह्यची त्रिविधता ( धवलगिरी )

त्रिविध मृदंग - १ मायूरी , २ अर्धमायूरी आणि ३ कूर्मरता .

त्रिविध वीरचूडामणी - १ रणवीर , २ विद्यावीर आणि ३ दानवीर . अशा तीन गुणांनीं युक्त असा प्राचीन कालीं राजा भोज होऊन गेला . त्याला त्रिविध वीरचूडामणी म्हणत .

त्रिविध श्रद्धा - १ सात्त्वि , २ राजस आणि ३ तामस .

’ त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । ’ ( भ . गी . १७ - २ )

त्रिवेणी संगम - १ गंगा , २ यमुना आणि ३ सरस्वती ( गुप्त ). या तीन नद्यांचा संगम हा प्रयागास आहे . त्रिवेणी संगमावरील स्नान फार पुण्यकारक मानलें आहे .

त्रिविध श्रोता - १ मुक्त , २ मुमुक्षू आणि २ विषयी ( गूढार्थचिंतामणी कोश )

त्रिविध सुखें - १ लौकिक , २ पारलौकिक आणि ३ पारमर्थिक .

त्रिविध समीर - १ शीतल , २ मंद व ३ सुगंध .

त्रिपाद भूमि - १ त्रिविष्टप . २ भरतखंड आणि ३ पाताळ या तीन देशविभागांना संकेतानें त्रिपाद भूभि म्हटलें आहे . ही त्रिपाद भूमि वामनानें बलीजवळ मागितली व ती त्यानें दिली अशी पौराणि कथा आहे .

त्रिसूत्रि ( भगवंताच्या अवतारकार्याची )- १ सज्जनांचें रक्षण , २ दुष्टांचें निर्दालन व ३ धर्माची संस्थापना .

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम ‌‍ ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ( भ . गी . ४ - ८ )

त्रिस्थळी याता - १ काशी , २ प्रयाग आणि ३ गया . या तीन तीर्थांची यात्रा .

त्रिस्त्रोता - १ स्वर्ग . २ मृत्यु आणि ३ पाताळ . या तिन्ही लोकांत वाहणारी - गंगा . पृथ्वीवरील प्रवाहास भागीरथी , स्वर्गांतील प्रवाहास मंदाकिनी व पाताळ लोकांतील प्रवाहास भोगावती अशी संज्ञा आहे .

त्रैविद्या - १ ऋग्वेद , २ यजुर्वेद आणि ३ सामवेद या तीन वेदांना मिळून त्रैविद्या अशी संज्ञा आहे .

" त्रयी वै विद्या ऋचो यजूंषि सामानि " ( शतपथ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP