मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३

संकेत कोश - संख्या ३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


तीन प्रकारच्या दीक्षा ( वीरशैव संप्रदाय )- १ वेधादीक्षा , २ क्रियादीक्षा आणि ३ मंत्रदीक्षा .

सा दीक्षा त्रिविधा प्रोक्ता शिवागमविशारदैः ।

वेधारूपा क्रियारूपा मंत्ररूपा च तापस ॥

तीन प्रकार दीक्षेचे - १ ईक्षण ( द्दष्टिविक्षेप ) २ भाषण ( शब्दानें ) व ३ स्पर्शन - देहास स्पर्श करून . ( साधुसंतांचा देवयानपंथ )

तीन प्रकारचे दूत - २ स्वतंत्रपणें कार्य साधणारा , २ सांगितले तेवढेंच करणार आणि ३ नुसता निरोप पोहोंचविणारा .

तीन प्रकारचीं दुःखें - १ परिणाम - दुःख , २ ताप - दुःख व ३ संस्कार - दुःख

तीन प्रकारचे दोष भोजानांत टाळावेत - १ जातिदोष ( पदार्थाचा स्वाभाविक दर्प वगैरे ), २ आश्रयदोष ( पदार्थ शुद्ध असला तरी अपवित्र स्थानीं ठेविल्यामुळें ) आणि ३ निमित्तदोष ( कुत्रें वगैरेच्या स्पर्शामुळें ).

तीन प्रकारची दृष्टि - १ सूक्ष्मद्दष्टि , २ विज्ञानद्दष्टि व ७ दिव्यद्दष्टि .

तीन प्रकारचे धर्म - १ संन्याश्याचा यतिधर्म २ कर्मयोग्याचें निष्काम कर्म व ३ एकान्त धर्म

तीन प्रकारचा ध्वनि - १ अलंकारध्वनि , २ वस्तुध्वनि व ३ रसध्वनि ( साहित्यशास्त्र ) ( हिंदी संत वाङ् ‍ मयाचा परमार्थ मार्ग )

तीन प्रकारचे नास्तिक - १ क्रियादुष्ट ( कर्म न करणारे ), २ मनोदुष्ट ( मनानेंच विघडलेले ) आणि ३ वाग्दुष्ट ( वाणीनें दोष देणारे ).

नास्तिकास्त्रिविधाः प्रोक्ता धर्मज्ञैस्तत्त्वदर्शिभिः ।

क्रियादुष्टो मनोदुष्टो वाणीदुष्टस्तथैव च ॥

तीन प्रकार नाशाचे ( अध्यात्मशास्त्र )- १ स्वभावनाश , २ परतः नाश आणि ३ आश्रयनाश . या तिन्हीहि प्रकारचा नाश आत्माचे ठिकाणीं नाहीं म्हणून तो अविनाशी आहे .

तीन प्रकार कावळ्यांचे - १ साधा कावळा , २ डोम कावळा आणि ३ पाण कावळा .

तीन प्रकारचीं पापें - १ कायिक , २ वाचिक आणि ३ मानसिक

तीन प्रकार पारायणाचे - १ योजित , २ पल्लवित व ३ संपुटित

तीन प्रकारच्या पीडा - १ स्वस्थ बसल्यावेळीं याचकांपासून होणारी कटकट , २ भोजनसमयीं मुलांचा त्रास व ३ निद्राकाळीं स्त्रीहट्ट . या तीन प्रकारच्या पीडा नित्याच्या असतात व त्या तशा मोठया माणसांना असाव्यात असा आशीर्वाद दिल्याची कथा आहे .

आसने विप्रपीडा च सुतपीडा च भोजने ।

शयने स्त्रीपीडा च त्रिभिः पीडा दिने दिने ॥

तीन प्रकार प्रतिज्ञेचे - १ द्वेषमूलक प्रतिज्ञा - सूडबुद्धि , स्वार्थमूलक प्रतिज्ञा व ३ परार्थमूलक्र प्रतिज्ञा - परार्थहितबुद्धीनें केलेलीं

तीन प्रकारची प्रकृति मनुष्याची - १ दैवी , २ आसुरी आणि ३ राक्षसी . " दैव्यासुरी राक्षसी च "

तीन प्रकार प्रारब्धाचे - १ इच्छा प्रारब्ध , २ अनिच्छा प्रारब्ध व ३ परेच्छा प्रारब्ध .

तीन प्रकारचीं बेटें - १ उपखंड बेटें - मुख्य भूमि लगतचीं , २ सामुद्रिक बेटें व ३ प्रवाळ द्वीपें

तीन प्रकारर्ची भूतसृष्टि - १ असंज्ञ - पाषाण वगैरे २ अंतःसंज्ञ - वृक्ष इ . आणि ३ ससंज्ञ - पुरुष पशु इ .

तीन प्रकार मानवाचे - १ ज्ञानी मानव , २ भक्त - मानव आणि ३ कर्मनिष्ट मानव .

तीन प्रकार मानवी अनुभूतीचे - १ भावना २ विचार आणि ३ आचार

तीन प्रकार माणसांचे - १ वीर माणूस - दुर्दम्य महत्त्वाकांक्षी , २ पशुमाणूस - कोणतीहि मह्त्त्वाकांक्षा नसलेला आणि ३ दिव्या

( शाक्ततंत्र )

तीन प्रकार मंगलाचरणाचे - १ वस्तुनिर्देशरूप , २ आशीर्वादरूप आणि ३ नमस्काररूप ( अमृतानभव - कौमुदी )

तीन प्रकार मृत्यूचे - १ आध्यात्मिक ( कालमृत्यु ), २ आधिभौतिक ( कुपथ्यामुळें होणारे ) आणि ३ आधिदैविक ( गंडांतर वगैरे स्वरूपाचे ) या तिघां माजी बलिष्ठदेख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥ ( ग . वि . ३ - ८५ )

तीन प्रकार मंत्रांचे - १ बीजमंत्र , २ मूलमंत्र व ३ मालामंत्र ( मंत्रशास्त्र )

तीन प्रकारची यात्रा - गुरुयात्रा , २ देवयात्रा व ३ तीर्थयात्रा . ’ गुरुयात्रा देवयात्रा तीर्थयात्रेति च त्रिधा ’ ( वी . प्र . १० - ३७ )

तीन प्रकार रोगांचे - १ तीव्र - नवज्वर , ग्रंथिक सन्निपात . इ . २ सौम्यपडसें , खोकला इ . व ३ विलंबी - क्षय मधुमेह इ .

तीन प्रकारचे लोक - १ हौसे २ नौसे आणि ३ गौसे असे तीन प्रकार जगांत असतात .

तीन प्रकारचे वाद - १ वाद ( गुरुशिष्यसंवाद ), २ जल्प ( युक्तिप्रमाण कुशल पंडितांचा वाद ) व ३वितंडा ( मूर्खांचा प्रमाणरहित वाद ).

( मो , प्रदीप )

तीन प्रकार वेदवाणीचे - १ यथार्थ , २ भयानक आणि ३ पुष्पित . ( एकनाथ दर्शन खंड २ रा )

तीन प्रकार विधींचे - १ अपूर्वविधि २ नियमविधि आणि ३ परिसंख्याविधि .

तीन प्रकार विवाहाचे - १ स्त्रीविवाह , २ आर्किविवाह आणि ३ कुंभविवाह . ( दु . श . को . )

तीन प्रकारचीं विषें - १ स्थावर विष , २ जंग्म विष आणि ३ कृत्रिम विष . ( निघंटु )

तीन प्रकारचें वैराग्य - १ पुराणवैराग्य , २ प्रसूतिवैराग्य आणि ३ स्मशानवैराग्य .

तीन प्रकारांनीं शहाणपण प्राप्त होतें - १ शास्त्राचा अभ्यास केल्यानें , २ संप्रदायांत वावरल्यानें व ३ निरीक्षणानें .

तीन प्रकार शास्त्रग्रंथाचे - १ आकर ग्रंथ , २ प्रकरणग्रंथ व ३ वाद ग्रंथ . ( लक्षण रत्नाकर )

तीन प्रकार ( शिवयोगींचे )- २ क्रियायोगी , २ तपोयोगी आणि ३ जपयोगी . ( कल्याण विशेषांक १९६२ )

तीन प्रकारची शुद्धि - १ अंतःशुद्धि , २ बहिःशुद्धि आणि ३ संबंधितशुद्धि - संबंधित दोषांपासून मुक्त होणें . ( अथर्व - अनु .- मरठी )

तीन प्रकार श्रद्धेचे - १ सात्त्विक , २ राजस आणि ३ तामस . ( भ . गी . १७ - २ )

तीन प्रकार सद्‌‍गुरुस शरण जाण्याचे - १ प्रणिपात , २ प्रश्न आणि २ सेवा .

तीन प्रकार ( संगीताचे )- १ गीत , २ वाद्य आणि ३ नृत्य असे संगीताचे तीन प्रकार . " गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते ॥ "

( सं . रत्नाकर अ . १ )

तीन प्रकार स्वभावाचे - १ पूर्व बालस्वभाव , २ वडिलार्जितस्वभाव व ३ कष्टार्जित स्वाभाव . ( परिसरांत )

तीन ’ प्र - कार ’ समर्थोच्या उपदेशाचे - १ प्र - बोध , २ प्र - यत्न व ३ प्र - चीति .

तीन प्रकार सूर्य - किरीटाचे ( ज्योतिःशास्त्र )- १ वैषुव किरीट , २ ध्रूवीय किरीट आणि ३ ३ उभयान्वयी किरीट . ( राहुकेतु - ग्रहणें )

तीन प्रकार सूत्रग्रंथाचे - १ शब्दप्रधान , २ अर्थप्रधान आणि ३ व्यवहारप्रधान .

तीन प्रकारचें स्वयंवर - इच्छास्वयंवर , २ पण लावून आणि ३ पराक्रम करून . अशा तीन प्रकारांनीं प्राचीन काळीं स्वयंवरें होत असत .

इच्छास्वयंवरश्चैको द्वितीयश्च पणाभिधः ।

तृतीयः शौर्यशुल्कश्च शूराणां परिकीर्तितः ॥ ( देवी . भाग . तृतीयस्कंध १८ - ४२ - ४३ )

तीन प्रकार स्वरांचे - १ तार = वरचा षड्‌‍ज = निषाद , २ मंद्र = मधला षड्‌‍ज , मध्यम , व ३ घोर = खलचा षड्‌ज , खर्ज .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP