पंच प्रकार ( ललित - लेखनाचे )- १ काव्य , २ नाटय , ३ कांदवरी . ४ लघुकथा व ५ लघुनिबंध . ( साहित्याचा संसार )
पांच प्रकार लोकर्गातांचे - १ ओव्या , २ गवळन , ३ भारूड , ४ लळित व ५ गोंधळ . ( महाराष्ट्र्राज्य परिचय )
पांच प्रकारचे वर्ष - १ चांद्र , २ सौर , ३ सायन , ४ नाक्षत्र व ५ बार्हस्पत्य . असें पांच प्रकारचें वर्ष कालगणनेंत मानलें आहे .
( धर्मसिंधु )
पांच प्रकार वेदांचे - १ विधि , २ मंत्र , ३ नामधेय , ४ निषेध आणि ५ अर्थवाद . ( म . ज्ञा . को . वि . ५ )
पांच प्रकार वेश्येचे - १ गणिका - गुणलुब्ध पण एकनिष्ठ , २ कंचनीधन घेऊन देह अर्पण करणारी , ३ रामजेणी - ईश्वरभजनी . तिची धर्मप्रवृत्ति पाहून विषयीजन तिला फसतात , ४ वेश्या - केवळ विषयाधीन व ५ कुलटा - अत्यंत अधम . ( चंद्रकांत भाग २ रा )
पांच प्रकारचें वैर - १ सापत्नभाव , २ घर वगैरेंच्या योगें , ३ स्त्रीयोगें , ४ शिवीगाळ व ५ अपराध केल्यानें . असें पांच प्रकारचें वैर उत्पन्न होतें . तें इष्ट मार्गानें शमवावें .
सापत्न्यं वास्तुजं स्त्रीजं वाग्जातमपराधजम् ।
वैरं पञ्चबिधं प्रोक्तं साधनैःप्रशमं नयेत ॥ ( अग्नि . २४० . १९ )
पांच प्रचारचें वैराग्य - १ त्रासवैराग्य , २ स्मशानवैराग्य , ३ प्रसूति - वैराग्य , ४ मैथुनवैराग्य आणि ५ शुद्धवैराग्य ( सि . बो . ४० )
पांच प्रकारचे वैद्य अपूज्य - १ निंद्य वस्त्र अंगावर घेणारा , २ कठोर , ३ स्तब्ध असणारा , ४ गांवकामगार आणि ५ रोग्याकडे आपण होऊनच आलेला . अशा पांच वैद्यांकडून ते धन्वंतरीसारखे असले तरी औषध घेऊं नये .
कुचैलः कर्कशः स्तब्धो ग्रामणी स्वयमागतः ।
पञ्च वैद्या न पूज्यन्ते धन्वंतरिसमा अपि ( रा . नि . )
पांच प्रकारच्या वृत्ति - १ यथार्थज्ञान , २ विपरीतज्ञान , ३ शब्द - भ्रम , ४ निद्रा व ५ स्मृति - आठवण . " प्रमाण - विपर्यय - विकल्प - निद्रा - स्मृतयः " ( पा . यो . १ - ६ )
पांच प्रकार शास्त्रीय ग्रंथांचे - ( संस्कृत वाङमय ) १ सूत्र . २ वृत्ति , ३ भाष्य , ४ वार्तिक व ५ टीका . ( व्याकरण महाभाष्य - प्रस्तावना खंड . )
पांच प्रकारची शुद्धि - १ सत्य , २ मनःशौच , ३ इंदियनिग्रह , ४ सर्वभूतदया आणि ५ पाण्यानें शुद्धि .
सत्यशौचं मनःशौचं शौचमिंद्रियनिग्रहः ।
सर्वभूते दयाशौचं जलशौचं च पंचमम ॥ ( ग . पु . )
पांच प्रकार शैव - धर्माचे - १ तप , २ कर्म , ३ जप , ४ ध्यान व ५ ज्ञान . ( शिव . पु . वा . संहिता अ ७ )
पांच प्रकारच्या सख्या - १ सखी , २ नित्यसखी , ३ प्राणसखी , ४ प्रियसखी आणि ५ परमेष्ठ सखी . ( कल्याण नारी अंक )
पांच प्रकारचे साक्षीदार - १ लेख , २ प्रत्यक्ष पाहिलेलें आठवणीनें सांगणारा , ३ सहजगत्या येऊन सांगणारा , ४ गुप्तपणें सांगणारा व ५ उलट बाजूचा पण अनुकूल सांगणारा .
लिखितः स्मारितश्चेव यद्दच्छाभिज्ञ एव च ।
गूढश्रोत्तरसाक्षी च साक्षी पंचविधः स्मृतः ॥ ( ना . स्मृ . )
पांच प्रकारचे सगुण ध्याग - १ श्रीविष्णुध्यान , २ अग्निध्यान , ३ सूर्यध्यान , ४ भूध्यान व ५ पुरुषध्यान . ( श्रीगुरुदत्तयोग )
पांच प्रकार संतांचे - १ भोगी , २ योगी , ३ रोगी , ४ रागी , व ५ त्यागी . ( परमार्थपर व्याख्यानें )
पांच प्रकारची सृष्टि - १ खनिजसृष्टि , २ वनस्पतिसृष्टि , ३ प्राणिसृष्टि , ४ मनुष्यसृष्टि व ५ देवसृष्टि . अशी क्रमानें सृष्टीची उत्पत्ति झाली .
पांच प्रकारच्या सिद्धि - १ जन्म , २ औषधी , ३ मंत्र , ४ तप व ५ समाधि . ( पां . योग . )
पांच प्रकार स्वप्रांचे - १ यथातथ्य , २ प्रतान ( विस्तार ), ३ चिंतास्वप्र , ४ विपरीत व ५ अव्यक्त ( स्वप्राची अंधुक स्मृति ).
पांच प्रमुख गाथा झरतुष्ट्र धर्माच्या - १ अहुनवद , २ उस्तवड , ३ स्पेनतोमर्द , ४ वोहुक्षत्र व ५ वहिशटोइस्ट ( झेंदावस्ता )
पांच प्रमुख प्रकार प्राणायामाचे - १ सूर्यभेदन , २ उज्जयी , ३ सीत्कारी , ४ शीतली व ५ भस्त्रिका . ( योगशास्त्र )
पांच प्रकारचें बल - १ आत्मबल , २ तपोबल , ३ बाहुबल , ४ धनबल व ५ ईशबल .
पांच प्रमुख शिष्य व्यासांचे - १ सुमंतु , २ वैशंपायन , ३ जैमिनि , ४ पैल व ५ शुकाचार्य ( पुत्र व शिष्य ). या पांच जणांना व्यासांनीं वेदविद्या पढविली . ( म . भा . शांति . अ . ३२० )
पांच प्रकार सत्तेचे - १ धर्मसत्ता , २ जातिसत्ता , ३ राजसत्ता , ४ अर्थसत्ता आणि ५ लोकसत्ता . ( भारतीय लोकसत्ता )
पांच प्रकार संन्यासदीक्षेचे - १ आश्रम , २ तीर्थ , ३ सरस्वती , ४ भारती व ५ परमहंस . ( ह्रत्पद्मा )
पांच प्रकार साक्षात्कारी पुरुषांचे - १ रुपदशीं , २ तेजोदर्शी , ३ वर्णदर्शी , ४ नादश्रवा व ५ अमृतास्वादी .
( संत - स्वरूप साक्षात्कार मार्ग )
पांच प्रभास क्षेत्रें - १ आद्यप्रभास , २ वृद्धप्रभास , ३ जलप्रभास , ४ कृतस्मरप्रभास व ५ महाप्रभास . अशीं पांच प्रभासक्षेत्रें प्रभास खंडांत आहेत . ( श्रीयुत - दिवाळी अंक )
पांच प्रकारचें ज्ञान - १ मतिज्ञान , २ श्रुतज्ञान , ३ अवधिज्ञान , ४ मनःपर्याय व ५ केवलज्ञान . ( तत्त्वार्थ सूत्र अ १ )
पांच प्रमुख आसनें ( योगाचीं )- १ पद्मासन , २ स्वस्तिकासन , ३ भद्रासन , ४ वज्रासन आणि ५ वीरासन . योगशास्त्रांतील चौंर्यायशी आसनांतील हीं पांच आसनें मुख्य आहेत . ( कल्याण योगांक )
पांच प्रमुख तत्त्वें ( बौद्ध धर्माचीं )- १ प्रज्ञा , २ शील , ३ दया , ४ करुणा आणि ५ मैत्री .
पांच प्रमुख तत्त्वें ( समर्थसंप्रदायाचीं - १ शुद्ध उपासना , २ विमलज्ञान , ३ वीतराग ( वैंराग्य ), ४ ब्राह्मण्यरक्षण आणि ५ शुद्ध कर्माचरण .
पांच प्रसंगीं खोटें बोलणें पाप नाहीं - १ थट्टेंत , २ पत्नीजवळ , ३ विवाहकालीं , ४ प्राणसंकटाचे वेळीं आणि ५ सर्वस्व लुबाडलें जात असतांना . ( वसिष्ठस्मृति अ . १६ ) ( म . भा . आदि . ८२ - १६ )
पांच प्रपंचांतील प्रमुख सुखें - १ निरोगी काया , २ द्रव्याची अनुकूलता , ३ पतिव्रता व मधुरभाषिणी स्त्री , ४ आज्ञांकित पुत्र व ५ धन देणारी विद्या .
पांच प्रतीकें ( भारतीय संस्कृतीचीं )- १ दीप - ज्ञानाचें प्रतीक , २ कमळ - जन्मस्थान नव्हे पण कर्तृत्वाचें प्रतीक , ३ वटवृक्ष - औंदार्याचें प्रतीक , ४ स्वस्तिक - कल्याण व ५ ॐ ध्वनीचें उगमस्थान . हीं भारतीय संस्कृतीचीं पांच मुख्य प्रतीकें होत .
पांच फारशी महाकवि - १ खुस्त्रौ , २ फैजी , ३ सैनिक , २ धर्मगुरु , ३ वैद्य अथवा डॉक्टर , ४ विधिज्ञ आणि ५ व्यापारी , ( Unto this Last )
पांच भक्तिमार्गांतले कांटे - १ जाति , २ विद्या , ३ मह्त्त्व , ४ रूप व ५ यौवन ,
जातिर्विद्या महत्त्वं च रूपं यौवनमेव च ।
यत्नेन परिहर्तव्याः पंचैते भक्तिकंटकाः ॥ ( सु )
पांच भक्तीचीम लक्षणें - १ निरपेक्षता , २ मनन , ३ शांति , ४ समता व ५ नर्वैरता .
निरपेक्षता आणि माझें मनन । शांति आणि समदर्शन ॥
पांचवें तें निर्वैर जाण । पांच लक्षणें हें मुख्यत्वें ॥ ( ए . भा . अ . १४ )
पांच भाग ( वेदांचे )- १ मंत्रसंहिता , २ ब्राह्मण , ३ आरण्यक , ४ सूत्र व ५ अनुक्रमणि . या पांच भागांना मिळून श्रुति अशी संत्रा आहे . ( कल्याण - बालकांक )
पांच मराठेशाहींतील प्रसिद्ध शाहीर - १ परशराम , २ होनाजी बाळा , ३ अनंत फंदी , ४ रामजोशी व ५ प्रभाकर .
पांच मराठी संतकवि व त्यांचे प्रासादिक ग्रंथ - २ श्रीज्ञानेश्वर - ज्ञानश्वरी २ नामदेव - अभंग गाथा , ३ एकनाथ - एकनाथी भागवत . ४ तुकाराम - अभंग गाथा , आणि ५ रामदास - दासबोध .
पांच मराठी संत कवयित्री - १ महदंबा किंवा महदाईसा , २ मुक्ताबाई , ३ जनाबाई , ४ बहिणाबाई , आणि ५ वेणाबाई .
पांच महान तत्त्वें ( इस्लाम धर्माचीं )- १ कलमा ( धर्मश्रद्ध ), २ नमाज ( प्रार्थना ), ३ उपवास , ४ दानधर्म व ५ मक्केची यात्रा .
( इस्लाम आणि संस्कृति )
पांच मान प्राप्त होण्याचीं कारणें - १ धन , २ बंधुवर्ग , ३ वय , ४ कर्म आणि ५ विद्या , ( मनु २ - १३६ )
पांच मानव जातीचे शत्रु - १ दारिद्र्य , २ अस्वच्छता , ३ रोगराई , ४ अज्ञान आणि ५ आळस .
पांच मानसिक तपे - १ मनाची प्रसन्नता , २ सौम्यता , ३ ईश्वराचें ध्यान , ४ मनोनिग्रह व ५ अन्तःकरणाची शुद्धि .
मनःप्रसादःसौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ ( कल्याण नारी अंक )
पांच मानसिक दोष - १ विषाद मानणें , २ निर्दय विचार करणें , ३ व्यर्थ चिंता करणें , ४ मन स्वाधीन न ठेवतां भटकूं देणें , ब ५ अपवित्र विचार बाळगणें . ( कल्याण साधनांक )
पांच मार्गांनीम सिद्धी प्रकट होतात - १ विशिष्ट जन्म , २ दिव्य औषधी , ३ भिन्न देवतांचे मन्त्र , ४ तपःसामर्थ्य व ५ समाधि ( पा . योग ३ - १ )
पांच मूर्खलक्षणें - १ रस्त्यानें खात जाणें . २ हंसत हंसत बोलणें , ३ गेल्या गोष्टीचा शोक करणें , ४ आत्मप्रशंसा करणें व ५ दोघे बोलत असतील तेथें जाणें .
पांच यम ( संयमन करावयाच्या गोष्टी )- १ अहिंसा , २ सत्य , ३ अस्तेय , ४ ब्रह्मचर्य आणि ५ अपरिग्रह . ( यो . सू . २ - ३० )
हे पांच यम सार्वभौम महाद्रत म्हणजे सर्वांना व्यापून असणारे आचरणांत आणण्याचे नियम होत .
पांच यज्ञ ( राजकर्तव्यें ) शासनाचीं - १ सज्जनांचा परामर्ष , २ दुर्जनांना शासन , ३ न्याल्य मार्गानें कोशसंवर्धन , ४ प्रजारक्षण व ५ निःपक्षपाती न्यायदान .
पांच योगदोष - १ काम , २ क्रोध , ३ लोभ , ४ भय आणि ५ स्वप्र ( म . भा . शांति ३ - २४० )