छ्त्तीसाचा आकडा - यांतील तीन व सहा अंकाच्या आकृति एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या माणसाप्रमाणें दिसतात . दांपत्यांत एकाचें तोंड पूर्वेकडे व दुसर्याचें पश्चिमेकडे अशा अर्थी प्रेमाचा अभाव असा अर्थ . ( मराठी शब्दाचें उद्धाटन )
छत्तीस आयुधें - १ चक्र , २ धनुष्य , ३ वज्र , ४ खड्ग , ५ क्षुरिका , ६ तोमर , ७ कुंत , ८ शूल , ९ त्रिशूल , १० शक्ति , ११ पाश , १२ अंकुश , १३ मुद्रर , १४ मक्षिका , १५ भल्ल , १६ भिंडमाल . १७ मुसुंडी , १८ लुंठि , १९ गदा , २० शंख , २१ परशु , २१ पट्टिस , २३ रिष्टि , २४ कणय , २५ संपन्न , २६ हल , २७ मुसल , २८ पुलिका , २९ कर्तरि , ३० करपत्र ३१ तरवारी , ३२ कोद्दाल , ३३ दुस्फोट , ३४ गोफण , ३५ डाह आणि ३६ डबूस . असे आयुधाचे छत्तीस प्रकार प्राचीन कालीं होते . ( वस्तुरत्नकोश )
छत्तीस गुणमेलन - विवाहद्दष्टया मेलन आठ प्रकारानें पाहातात व प्रत्येक प्रकारास गुण ठरलेले आहेत ते असेः - १ वर्ण गुण - १ , २ वश्य गुण - २ , ३ नक्षत्र गुण - ३ , ४ योनी - गुण४ , ५ ग्रह गुन - ५ , ६ गण गुण - ६ , ७ राशी गुण - ७ , ८ नाडी गुण - ८ हीं सर्व मिळून छत्तीस होतात . बधूवरांचे छत्तीस गुण जमल्यास विवाहास उत्तम मानतात . ( ज्योतिष )
एकनाड षडाष्टक चुकवून । दोहींचा पाहोन एकगण ।
गृहमैत्री छत्तीस लक्षण । कुशल शोधुनि पहाणें ॥ ( सिद्धान्तबोध २४ - ८५ )
छत्तीस गुण राज्यशासकास आवश्यक - १ रागद्वेषाचा त्याग , २ नास्तिक असूं नये , ३ क्रूरता न करतां द्रव्यसंपादन , ४ औद्धत्याचा अस्वीकार , ५ प्रिय भाषण , ६ शौर्य , ७ आत्मश्लाघा नसावी , ८ दानशूरत्व , ९ अपात्रीं द्रव्याचा अपव्यय न करणें , १० प्रगल्मता , ११ निष्ठुर असूं नये . १२ नीच लोकांशीं संगनमत न करणें , १३ बांधवांशीं वैर न करणें , १४ एकनिष्ठ नसेल असा हेर ठेवूं नये , १५ दुसर्याला क्लेश न होतील अशा रीतीनें कार्य क्रावें , १६ असज्जनांना आपला उद्देश कळवूं नये , १७ आपल्या गुणांचा उच्चार करूं नये , १८ सत्पुरुषांकडून कांहीं घेऊं नये , १९ असज्जनांना आश्रय देऊं नये , २० सर्व बाजूंनीं विचार केल्यावांचून दंड करूं नयेम २१ कारस्थान गुप्त असावें , २२ लुब्ध मनुष्यांचा दान करूं नये , २३ अपकार करणारांवर विश्वास ठेवूं नये , २४ स्त्रियांचे संरक्षण , २५ काम नियमित , २६ परिमित भोजन , २७ सन्मानीयांचा मान ठेवणें , २८ गुरुजनांची सेवा , २९ देवांचे पूजन , ३० संपत्तिप्राप्तीची इच्छा करावी , ३१ संपत्तीचा उपभोग घ्याव पणा मोह नसावा , ३२ दक्ष अवावें पण कालज्ञानशून्य असूं नये , ३३ शत्रूंना मुक्त करण्याविषयीं आश्चासन देऊं नये , ३४ शत्रु व त्याचा अपराध हीं जाणल्यावांचून शस्त्रप्रहार करूं नये , ३५ वध केल्यानंतर शोक करूं नये व ३६ अपकार करणारांवर दया दाखवूं नये . ( म . भा . शांति . अ . ७० )
छत्तीस गुण स्त्रीचे ( अरबांचे मतें )-
चार ठिकाणीं काळेपणा - १ डोक्याचें केंस , २ भुंबई , ३ पाणण्या व ४ डोळ्याचें बुबुळ .
" पांढरेपणा - ५ त्वचा ( गौरवर्ण ) ६ डोळ्यामधील भाग , ७ दांत व ८ पाय .
" लालसर - ९ जिव्हा , १० ओष्ठ , ११ कपोल , व १२ हिरडया .
" वर्तुलाकार - १३ कपाळ , १४ मान , १५ बाहू व १६ कोंपरे .
" लांब - १७ पाठ , १८ बोटें , १९ हात व २० पाय .
" विशाल - २१ भाल , २२ डोळे , २३ छाती व २४ पुठ्ठे - ( कटिपश्चाद भाग ).
" सुंदर - १५ मुंबई , २६ नाक , २७ ओंठ व २८ बोटें .
" जाड ( मांसल ) - २९ कंबर , ३० मांडया , ३१ दंड , ३२ पोटर्या ,
" संकृचित - ३३ कान , ३४ उरस्थल , ३५ हात व ३६ पाय ( अंकशास्त्र )
छत्तीस तत्त्वें ( शैवसिद्धान्त )- १ शिव , २ शक्ति , ३ सदाशिव , ४ ईश्वर , ५ शुद्धविद्या , ६ माया , ७ विद्या ( अविद्या ), ८ कला , ९ राग , १० काल , ११ नियति , १२ जीव , १३ प्रकृति , १४ मन , १५ बुद्धि , १६ अहंकार , १७ श्रोत्र , १८ त्वक , १९ चक्षु , २० जिह्ला , २१ घ्राण , २२ वाक् , २३ पाणि ( हात ), २४ पाद ( चरण ), २५ पायु , २६ उपस्थ , २७ शब्द , २८ स्पर्श , २९ रूप , ३० रस , ३१ गंध , ३२ आकाश , ३३ बायु , ३४ तेज , ३५ जल आणि ३६ पृथ्वी . या बाहेरील " परमशिव " हें सदतिसावें तत्त्व होय . ( शैवसिद्धान्त )
छत्तीस प्रकार राजविनोदाचे - १ दर्शन विनोद , २ श्रवण विनोद , ३ कृत्रिम विनोद , ४ गीत विनोद , ५ वाद्य विनोद , ६ नृत्य विनोद , ७ शुद्ध लिखित विनोद , ८ सख्य विनोद , ९ ववकृत्व विनोद , १० कवित्व विनोद , ११ शास्र विनोद , १२ कर विनोद , १३ विबुध्य विनोद , १४ अक्षर विनोद , १५ गणित वनोद , १६ शस्त्र विनोद , १७ राज विनोद , १८ तुरग विनोद , १९ पक्षि विनोद , २० आखेटक विनोद , २१ जल विनोद , २२ यंत्र विनोद , २३ मंत्र विनोद , २४ महोत्सव विनोद , २५ फल विनोद , २६ गणिका विनोद , २७ पठित विनोद , २८ पत्र विनोद , २९ पुष्प विनोद , ३० कला विनोद , ३१ कथा विनोद , ३२ केशविनोद , ३३ प्रहेलिका विनोद , ३४ चित्र विनोद , ३५ चलच्चित्र विनोद आणि ३६ स्तव विनोद . असे विनोदाचे छत्तीस प्रकार पूर्वकाळीं असत . ( वस्तुरत्नकोश )
छत्तीस यक्षिणी - १ विचित्रा , २ विभ्रमा , ३ हंसी , ४ भीषणा , ५ जनरंजिका , ६ विशाला ७ मदना , ८ कालकरणी , ९ महाभया , १० माहेंद्री , ११ शंखिनी , १२ शंडिका , १३ स्मशाना , १४ वटकांक्षिणी , १५ मेखला , १६ विकला , १७ लक्ष्मी , १८ मानिनी , १९ शतपत्रिका , २० सुलोचना , २१ सौमाग्या , २२ कपिला , २३ विलासिनी , २४ नटिका यक्षिणी , २५ कानेश्वरी , २६ सुवर्णसुरसुंदरी , २७ मनोहरा , २८ प्रमोदा , २९ रागिणी , ३० नखकेशिका , ३१ पद्मिनी , ३२ भोगिनी , ३३ स्वर्णावती , ३४ देवरातप्रिया , ३५ कर्णपिशाच व ३६ करकंकणी , ( मंत्रशास्त्र )
छत्तीस रागिण्या ( संगीत )- जनमनरंजनास योग्य होतो असा स्वरसमुदाय याला राग म्हणतात . असें सुमारें दीडशेवर राग हल्लीं प्रचारांत आहेत . पण मुख्य पुरुष राग सहा व त्यांच्या प्रत्येकीं सहा भार्या म्हणजे छत्तीस रागिण्या होत . कोणी पांचच मानतात . राग , रागिण्या व पुत्रराग याबावतींत ऐकमत नाहीं . निरनिराळे ग्रंथकार नांवें व संख्या निरनिराळीं देतात . राग हे भगवान् शंकराच्या शरीरापासून व रागिण्या मस्तकापासून उत्पन्न झाल्या अशी कथा आहे .
राग रागिण्या
१ श्रीराग - १ गौरी , २ कोलाहली , ३ धीरा , ४ द्राविडी , ५ मालकौशिकी व ६ गांधारी .
२ वसंत - १ आंदोला , २ कौशिकी , ३ चरमंजिरी , ४ गंडगिरि , ५ देवशास्त्र व ६ रामगिरी .
३ पंचम - १ त्रिगुणा , २ स्तंभतीर्था , ३ आदिरी , ४ कुंकुमा , ५ वैराटी व ६ सामवेरी ,
४ भैरव - १ मैरव , २ गुर्जरी , ३ भाषा , ४ वेलागुली , ५ कर्णाटकी व ६ रक्तहंसा .
५ मेघ किंवा मेघमल्हार - १ बंगाली , २ मधुरा , ३ कामोदा , ४ अक्षिनारिका , ५ देवगिरी व ६ देवाली .
६ नरनारायण - १ त्रोटकी , २ मोडकी , ३ नरा , ४ दुंबी , ५ मल्हारी . व ६ सिंधु मल्हारी .
तेणें साही राग छत्तीस भार्या । चौसष्टी मूर्च्छना दावूनियां ।
अनेक उपरागांचिया क्रिया । दाविल्या तेव्हां रिसानें ॥ ( ह . वि . २५ - ११९ ) ( स्कंद - नागरखंड अ . २५४ )
छत्ती ल क्षणे ( काव्याचीं )- १ विभूषण , २ अक्षरसंघात , ३ शोभा , ४ अभिमान , ५ गुणकीर्तन , ६ प्रोत्साहन , ७ उदाहरण , ८ निरुक्त , ९ गुणानुवाद , १० अतिशय , ११ हेतु , १२ सारूप्य , १३ मिथ्याध्यवसाय , १४ सिद्धि , १५ पदोच्चय , १६ आक्रंद , १७ मनोरथ , १८ आख्यान , १९ याञ्चा , २० प्रतिषेध , २१ पृच्छा , २२ द्दष्टांत , २३ निर्मासन , २४ संशय , २५ आशी , २६ प्रियोक्ति , २७ कपट , २८ क्षमा २९ प्राप्ति , ३० पश्चात्ताप , ३१ अनुवृत्ति , ३२ उपपत्ति , ३३ युक्ति , ३४ कार्य , ३५ अनुनीति आणि ३६ परिदेवना . " काव्यबन्धाः षट् त्रिंशल्लक्षणान्विताः "
( म . ना १६ - ४२ )
छत्तीस व्यंजनें - क् , ख् , ग् , घ् , ङ् , च् , छ् , ज् , झ् , ञ् , ट् , ठ् , ड् , ढ् , ण् , त् , थ् , द् , ध् , न् , प् , फ् , ब् , भ् , म् , य् , र् , ल् , व् , श् , ष् , स् , ह् , ळ् , क्ष् , ज्ञ् , हीं छत्तीस व्यंजनें होत .