बत्तीस अक्षरी मंत्र - ( अ ) सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखाप्राप्नुयात् ( विश्वशांति मंत्र ) ( आ ) कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ॥ संकट नाशनाकरितां म्हटला जाणारा महामंत्र , ( इ ) हरेराम हरेराम हरेराम हरेहरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ’ ( रामगीता १३ - ८ )
बत्तीस अलंकार - १ मणि , २ मंगळसूत्र , ३ वज्रटीक , ४ गळसरी , ५ पुतळ्यांची माळ , ६ ठुशी , ७ चंद्रहार , ८ हुल्लड पांच पदरी , ९ मूद , १० राखडी , ११ केकत , १२ केवडा , १३ कुर्डू , १४ कर्णफुल , १५ बाळ्या , १६ बुगडया , १७ बाजुबंद , १८ वाकी , १९ कंगण्या , २० गोट , २१ तोडे , २२ बांगडया , २३ बिलवर , २४ माजपट्टा , २५ शिंदेशाही तोडे , २६ तोरडया , २७ रणजोडबी , २८ जोडवी , २९ विरोद्या , ३० मासोळ्या . ३१ नथ व ३२ चमकी . असे स्त्रियांचे पूर्वकाळीं प्रमुख बत्तीस अलंकार होते .
र्हाईबाईचें रूप नटला सावळा वनमाळी ।
सोळा शिणगार बत्तीस अलंकारलेणीं त्याला सगळीं ॥ ( पठ्ठे बापुराव लावण्या व गवळणी )
बत्तीस आसनें इहलोकीं सिद्धिप्रद - १ सिद्ध , २ पद्म , ३ भद्र , ४ मुक्त , ५ बज्र , ६ स्वस्तिक , ७ सिंह , ८ गोमुख , ९ वीर , १० धनुरासन , ११ शव , १२ गुप्त , १३ मत्स्य , १४ मत्स्येन्द्र , १५ गोरक्ष , १६ पश्चिमोत्तान , १७ उत्कट , १८ संकट , १९ मयूर , २० कुक्कुट , २१ कूर्म , २२ उत्तानकूर्मक , २३ उत्तानमण्डुक , २४ वृक्ष , २५ मण्डुक , २६ गुरुड २८ वृष , २८ शलभ , २९ मकर , ३० उष्टु , ३१ भुजंग आणि ३२ योगासन . " द्वात्रिंशदासनानि तु मर्त्यलोके च सिद्धिदम् ॥ ( सु . )
बत्तीस उपराग - १ शंकराभरण , २ यमनकल्याण , ३ पूर्वी , ४ भैरवी , ५ कलिंगडा , ६ काफी , ७ तोडी , ८ पिलु , ९ सोहनी , १० ललन , ११ शंकर , १२ भूप , १३ देशकार , १४ सांरग , १५ मालकंस , १६ धानी , १७ तिलंग , १८ खमांज , १९ बागेसरी , २० बिहाग , २१ भीमपलासी , २२ सिंदुरा , ३३ मुलतानी , २४ देस , २५ जीवनपुरी , २६ आसावरी , २७ वसंत , २८ दरबारी कानडा , २९ हमीर , ३० केदार , ३१ तिलककामोद व ३२ अडाणा ( गायनवादन शिक्षक )
सहा राग रागिणि सहित ॥ पुत्र जातक छत्तीस ॥ कळा बाहात्तर अभ्यास ॥ बावीस श्रुति ॥ मूर्छना एकवीस ॥ सप्तस्वर तान एकुणपन्नास ॥ बत्तीस उपराग अभ्यासिले ( काशीखंड ६ - ३० )
बत्तीस औषधें शांतिप्रीत्यर्य - १ उंबर , २ कुश , ३ दूर्बा , ४ कमळ , ५ चांफा ६ बेल , ७ विष्णुक्रांत , ८ तुलसी , ९ वाळा , १० शंखाहुळी , ११ शतावरी , १२ आस्कंद , १३ निर्गुंडी , १४ पांढर्या मोहर्या , १५ लाल मोहर्या , १६ ( जीवक ) अघाडा , १७ पळस , १८ फणस , १९ कांटेरी आसाणा , २० राळे , २१ गहूं , २२ भात , २३ पिंपळ , २४ दूध , २५ दहीं , २६ तूप , २७ कमळाचें पान , २८ कमळ , २९ तीन प्रकारच्या कोरांटी ३० गुंजा , ३१ वेखंड आणि ३२ नागरमोथे . ( संस्कार कौस्तुम )
बत्तीस प्रकार सूत्र - स्वरूप - लक्षणांचे - १ प्रतिज्ञासूत्र , २ प्रमाणसूत्र , ३ द्दष्टांतसूत्र , ४ उपपत्तिसूत्र , ५ व्यावृत्तिसूत्र , ६ विषयप्रदानसूत्र , ७ विशेषप्रबोधकसूत्र , ८ उत्सर्गसूत्र , ९ अपवादसूत्र , १० निषेधसूत्र , ११ न्यायसूत्र , १२ विरोधपरिहारसूत्र , १३ काकुसूत्र , १४ कथासूत्र , १५ भावार्थसूत्र , १६ प्रकरणसूत्र , १७ आस्तित्वसूत्र , १८ निर्देशसूत्र , १९ निर्णयसूत्र , २० पक्षसूत्र , २१ प्रमेदसूत्र , २२ आशंकासूत्र , २३ आक्षेपसूत्र , २४ कार्यसूत्र , २५ लक्षणसूत्र , २६ स्वरूपसूत्र , २७ कारणसूत्र , २८ हेतुसूत्र , २९ संबंधसूत्र , ३० प्रतीतिसूत्र , ३१ विशेषणसूत्र , आणि ३२ प्रतिष्ठासूत्र , अशाअ बत्तीस लक्षणांनीं युक्त असलेला भाव ज्यांत प्रतीत होतात त्यास " सूत्र स्वरूप " म्हणतात .
( श्रीचक्रधर सिद्धांत सूत्रें )
बत्तीस प्रमुख विद्या - विद्या अनंत असल्या तरी या बत्तीस विद्या प्रमुख विद्या होत - ४ वेद , ४ उपवेद , ६ वेदांगें मिळून १४ व १५ मीमांसा , १६ तर्क , १७ सांख्य , १८ वेदांत , १९ योग , २० इतिहास , २१ पुराणें , २२ स्मृति , २३ नास्तिकमत , २४ अर्थशास्त्र , २५ कामाशास्त्र , २६ शिल्प , २७ अलंकृति , २८ काव्य , २९ देशभाषा , ३० अवसरोक्ति , ३१ यावनमत व ३२ देशादिधर्म , ( शुक्रनीतिसार )
बत्तीस ब्रह्म विद्या - १ सद्विद्या , २ आनंदविद्या , ३ अंतरादित्य विद्या , ४ आकाशविद्या , ५ प्राणविद्या , ६ गायत्री - ज्योतिविद्या , ७ इंद्रप्राणविद्या , ८ शाण्डिल्यविद्या , ९ नाचिकेतसविद्या , १० उपकोसलविद्या , ११ अन्तयामीविद्या , १२ अक्षरविद्या , १३ वैश्वानर विद्या , १४ भूमाविद्या , १५ गार्ग्यक्षरविद्या , १६ प्रणवोपास्यपरमपुरुषविद्या , १७ दहरविद्य , १८ अगुष्वप्रमितविद्या , १९ ज्योतिविद्या , २० मधुविद्या , २१ संवर्गविद्या , २२ अजाशारीरकविद्या , २३ बालाकिविद्या , २४ मैत्रेयीविद्या , २५ द्रुहिणरुद्रादिशारिरकविद्या , २६ पंचाग्निविद्या , २७ आदित्यस्थाहनामिकविद्या , २८ भामकविद्या , २९ पुरुषविद्या , ३० ईशावास्यविद्या , ३१ उषास्तिकवेलविद्या आणि ३२ व्याद्दष्टिशारीरकविद्या . ( कल्याण उपनिषद् अंक )
बत्तीस मतवादी सृष्टीच्या उत्पत्तिसंबंधी - १ प्राणोपासक व वैशे षिक , २ चारभूतें व स्थूलदेह हेंच जगत् कारण मानणारे , ३ सत्त्व , रज व तम हे त्रिगुणच जगाचे कारण मानणारे , ४ शैव , ५ पादवेत्ते ( विश्व तैजस व प्राज्ञ हे पाद जगन्निर्मितीचे कारण मानणारे ), ६ वात्सायनादिक - शब्दादि विषय हेंच मानणारे , ७ पौराणिक , ८ मीमांसक , ९ वेदपाठक , १० बौधायन अग्निहोत्रादि यज्ञ हेच जगाचे मानणारे , ११ सांख्य , १२ सूपशास्त्रवेत्ते , १३ वैशेषिक ( अणुवादी ), १४ चार्वाक - स्थूल देह हेंच जगाचें कारण मानणारे , १५ सांप्रदायिक , १६ शुन्यवादी , १७ कालवादी , १८ दिशावादी , १९ धातुवादी , २० भुवनकोश वेत्ते , २१ बौद्ध - मन हेंच जगाचे कारण मानणारे , २२ बुद्धि हेंच जगाचे कारण मानणारे , २३ चित्त हेंच मानणारे , १६ सेश्वरसांख्या , २७ पाशुपत , २८ अनंत तत्त्वें मानणारे , २९ लोकतंत्रवेत्ते , ३० दक्ष प्रभृति स्मृतिकार , ३१ वैयाकरण आणि ३२ परब्रह्म व अपरब्रह्म म्हणजे ओंकार हेंच जगाचे कारण मानणारे असे बत्तीस मतवादी सृष्टीच्या उत्पत्तिसंबंधीं विचार करणारे प्राचीन काळीं होऊन गेले . ( मांडूक्यकारिका वैतथ्य प्रकरण )
बत्तीस लक्षणें ( मनुष्य शरीराचीं )- पांच ठिकाणें सूक्ष्म म्हणजे बारीक असावीं :- १ त्वचा , २ केस , ३ अंगुली , ४ दांतु , ५ बोटाची पेरें ; पांच ठिकाणें दीर्घ म्हणजे लांब असावीं :- ६ भुज , ७ नेत्र , ८ हनुवटी , ९ जांघ व १० नाक ; सात ठिकाणें आरक्त असावीं :- ११ हाताचे तळवे , १२ पायाचे तळवे , १३ अधरोष्ठ , १४ नेत्र , १५ तालु , १६ जीभ व १७ नखें ; सहा ठिकाणें उन्नत असावीं :- १८ वक्षःस्थळ , १९ कुक्षी , २० केस , २१ खांदे , २२ हात व २३ तोंड ; तीन ठिकाणें विस्तीर्ण म्हणजे रुंद असावीः - २४ वक्षःस्थळ , २५ कटि व २६ ललाट ; तीन ठिकाणें र्हस्व म्हणजे आखूड असावीं :- २७ ग्रीवा , २८ जंघा व २९ शिश्न ; तीन ठिकाणें गंभीर असावीं :- ३० स्वर , ३१ कर्ण व ३२ नाभि .
पंच सूक्ष्मः पंच दीर्घः सप्त रक्तः षडुन्नतः ।
त्रिःपृथुर्लघुगंमीरो द्वात्रिंशल्लक्षणः पुमान् ॥ ( बौद्ध - धर्मसारसंग्रह )
एकूण हीं मनुष्य शरीराचीं बत्तीस शुभ लक्षणें होत . ( काशीखंड अ . ४१ ) या वत्तिसांत सर्वश्रेष्ठ नाक हें आहे .
तुका म्हणे काय करावीं तीं बत्तीस लक्षणें ।
नाक नाहीं तेणें वाया गेलीं ॥ ( तुकाराम )
बत्तीस लक्षणें शककर्त्या शिवाजीचीं - १ निश्वयाचा महामेरू , २ बहूत जनांसी आधारू , ३ अखंड स्थितीचा निर्धारू , ४ श्रीमंत योगी , ५ परोपकारी , ६ नरपति , ७ हयपति , ८ गजपति , ९ गडपति , १० भूपति , ११ आदिशक्ति - पृष्ठभागी , १२ यशवंत , १३ कीर्तिवंत , १४ सामर्थ्यवंत , १५ वरदवंत , १६ पुण्यवंत , १७ सुकृति , १८ नीतिवंत , १९ जाणता , २० आचारशील , २१ विचारशील , २२ दानशील , २३ धर्मशील , २४ सर्वज्ञ , २५ सुशील सकळांठायीं , २६ धीर , २७ उदार , २८ सुंदर , २९ शूर , ३० क्रियेशीं तत्पर , ३१ सावधानी व ३२ देव - धर्म - गोब्राह्मण संरक्षण समर्थ . ( दासायन )
बत्तीस शुभ लक्षणें ( सामुद्रिक )- १ छत्र , २ कमल , ३ धनुष्य , ४ रथ , ५ वज्र , ६ कांसव , ७ अंकुश , ८ विहीर , ९ स्वस्तिक , १० तोरण , ११ चामर , १२ सिंह , १३ वृक्ष , १४ चक्र , १५ शंख , १६ हत्ती , १७ समुद्र , १८ कलश , १९ प्रासाद , २० मच्छ , २१ यव , २२ स्तंभ ( स्तूप ), २३ सूर्य , २४ कमंडलु , २५ पर्वत , २६ चवरी , २७ दर्पण , २८ उक्षा ( वृष ), २९ पताका , ३० लक्ष्मी , ३१ पुष्पमाला व ३२ मयूर . हीं बत्तीस लक्षणें पुण्यवान् राजपुरुषाच्या ठिकाणीं असतात . असे हस्ती संजीविनी ग्रंथांत सांगितलें आहे . ( हस्तसामुद्रिक शास्त्र )
बत्तीस विद्या ( शिल्पशास्त्र )- १ वृक्षविद्या , २ पशुविद्या , ३ मनुष्यविद्या , ४ संसेचनविद्या , ५ संहरणविद्या , ६ स्तंभनविद्या , ७ द्दतिविद्या , ८ भस्मीकरणविद्या , ९ संकरविद्या , १० पार्थयविद्या , ११ तरीविद्या , १२ नौविद्या , १३ नौकाविद्या , १४ अध्वविद्या , १५ पथविद्या , १६ घंटापथविद्या , १७ सेतुविद्या , १८ शकुंतविद्या , २३ प्रासादविद्या , २४ दुर्गविद्या , २५ कूटविद्या , २६ आकरविद्या , २७ युद्धविद्या , २८ आपणविद्या , २९ राजरालयविद्या , ३० नगररचनाविद्या , ३१ वनोपवविद्या . व ३२ देवालयविद्या . शिल्पशास्त्रांत अगणित विद्या आहेत , त्यापैकीं बत्तीस विद्या व चौसष्ट कला मुख्य आहेत .
विद्या ह्मनंताश्च कलः संख्यातुं नैव शक्यते
विद्या मुख्यास्तु द्वात्रिंशच्चतुःषष्टिः कलाःअ स्मृताः ॥ ( भृगुसंहिता अ . १ )
बत्तीस वैज्ञानिक रहस्यें ( विमानशास्त्र )- १ मांत्रिक रहस्य , २ तांत्रिक रह्स्य , ३ कृतक रहस्य , ४ अंतराळ रहस्य , ५ गूढ रहस्य , १० संकोचन रहस्य , ११ विस्तृत रहस्य , १२ विरूपकरण रहस्य , १३ रूपान्तर रहस्य , १४ सुरूप रहस्य , १५ ज्योतिर्भाव रहस्य , १६ तमोमय रहस्य , १७ पलय रहस्य , १८ विमुख रहस्य , १९ तार रहस्य , २० महाशब्द विमोहन , २१ लंघन रहस्य , २२ सार्धगमन , २३ चापल रहस्य , २४ सर्वतोमुख रहस्य , २५ परशब्द ग्राहक रहस्य , २६ रूपाकर्षण रहस्य , २७ क्रियाग्रहण रहस्य , २८ दिक् प्रदर्शन , २९ आकाशाकार रहस्य , ३० जलदरूप रहस्य , ३१ स्तब्धीकर रहस्य व ३२ कर्षण रहस्य , ( यंत्रसर्वस्वे विमान प्रकरणम् )
बत्तीस सिद्ध ( रसग्रंथकार )- १ अगस्ति , २ अग्निवेश , ३ अन्नंपोतमदास , ४ अष्टावक्र , ५ अश्चिनौ , ६ कालनाथ , ७ काश्यप , ८ काशीराजा , ९ कृष्णात्रेय , १० गहनानंद , ११ गोरखनाथ , १२ चंद्रट , १३ चंद्रनाथ , १४ त्रिपुरांतक , १५ धन्वतरि , १६ नंदिनाथ , १७ नागर्युन , १८ नित्यनाथ , १९ भृगु , २० भैख , २१ भालुकि , २२ मंजुनाथ , २३ मन्थान भैतव , २४ मत्स्येंद्रनाथ , २५ रेवणसिद्ध , २६ वासुदेव , २७ विष्णु , २८ विद्यनाग , २९ शंभु , ३० पूज्यपाद गोविंद , ३१ सिद्धनाथ व ३२ सोमनाथ , ( रसयोग सागर )
सिंहासन बत्तिशी - एक कथासंग्रह . राजा विक्रमाचे रत्नजडित सिंहासन भोजराजास भूमिगर्भांत एके ठिकाणीं सांपडलें , तें बत्तीस हात लांब व आठ हात उंच व बत्तीस रत्नजडित पुतळ्या जडविलेलें होतें त्यांचीं नांवें :- १ जया , २ विजया , ३ जयंती , ४ अपराजिता , ५ जयघोषा , ६ लीलावती , ७ मंजुघोषा , ८ जयसेना , ९ मदनसेना , १० मदनमंजिरी , ११ शृंगारकलिका , १२ नरमोहिनी , १३ भोगनिधि , १४ रतिप्रिया , १५ सुमित्रा , १६ प्रेमावती , १७ सुलभा , १८ कुरंगनयना , १९ चंद्रज्योति , २० चंद्रकांति , २१ सौभाग्यमंजिरी , २२ लावण्यवती , २३ करुणावती , २४ हंसगमना , २५ रूपकांता , २६ देवानंदा , २७ देवांगना , २८ चित्रिणी , २९ सुलोचना , ३० पेमावती , ३१ गुणप्रिया व ३२ चित्रकला . या बत्तीस पुतळ्यांनीं राजा भोज सिंहासनावर आरोहण करूं लागतांच मनुष्यरूप धारण करून त्यास विक्रमाच्या शौर्य , घैर्य वगैरे गुणांबद्दल सांगितलेल्या बत्तीस गोष्टी दिल्या आहेत . त्यांस ’ सिंहासन बत्तिशी ’ म्हणतात . ( सिंहासन बत्तिशी )