सत्तावीस नक्षत्रें - १ अश्चिनी , २ भरणी , ३ कृतिका , ४ रोहिणी , ५ मृग , ६ आर्द्रा , ७ पुनर्वसु , ७ पुष्य , ९ आश्लेषा , १० मघा , ११ पूर्वा , १२ उत्तरा , १३ हस्त , १४ चित्रा , १५ स्वाती , १६ विशाखा १७ अनुराधा , १८ ज्येष्ठा , १९ मूळ , २० पूर्वाषाढा , २१ उत्तराषाढा , २२ श्रवण , २३ धनिष्ठा , २४ शततारका , २५ पूर्वाभाद्रपदा , २६ उत्तराभाद्रपदा आणि २७ रेवती ( ज्योतिष ). हीं सत्तावीस नक्षत्र देवाचीं मंदिरें होत . पहिलीं चौदा देवनक्षत्रें व शेवटचीं तेरा यमनक्षत्रें होत . अभिजित् हें अठ्ठविसावें नक्षत्र अलिकडे मानले जातें , या सत्तवीस नक्षत्रांपैकीं मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत नऊ नक्षत्रें पर्जन्यामानाचीं होत . ( तै . ब्रा . )
सत्तावीस योग - १ विष्कंभ , २ प्रीति , ३ आयुष्यमान , ४ सौभाग्य , ५ शोभन , ६ अतिगंड , ७ सुकर्मा , ८ धृति , ९ शूल , १० गंड , ११ वृद्धि , १२ ध्रव , १३ व्याघात , १४ हर्षण , १५ वज्र , १६ सिद्धि , १७ व्यतिपात , १८ वर्याण , १९ परिघ , २० शिव , २१ सिद्धि , २२ साध्य , २३ शुभ २४ शुक्ल , २५ ब्रह्या , २६ ऐंद्र आणि २७ वैघृति . ( ज्योतिषसार )
सत्तावीस प्रकार लोककथेचे - १ राजकथा , २ चोरकथा , ३ महामात्रकथा , ४ सेनाकथा , ५ भयकथा , ६ युद्धकथा , ७ अन्नकथा , ८ पानकथा , ९ वस्त्रकथा , १० शयनकथा , ११ मालाकथा , १२ गन्धकथा , १३ ज्ञातिकथा , १४ यानकथा , १५ ग्रामकथा , १६ निगमकथा , १७ नगरकथा , १८ जनपदकथा , १९ स्त्रीकथा , २० पुरुषकथा , २१ शूरकथा , २२ विशिखाकथा ( बाजारांतील गप्पा ), २३ कुम्मस्थाकथा
( पाणावठयावरील कथा ), २४ पूर्वप्रेतकथा ( मृतांच्या गोष्टी ), २५ निरर्थककथा , २६ लोकाख्यायिका आणि २७ समुद्राख्यायिका ,
( दीघनिकाय १ - ८ )
सत्तावीस रसायनशास्त्र प्रवर्तक - १ आदिनाथ , २ चन्द्रसेन , ३ लंकेश , ४ विशारद , ५ कपाली , ६ मत , ७ मांडल्य , ८ भास्कर , ९ शूरकनक , १० रत्नघोष , ११ शंभू , १२ अर्क , १३ नरवाहन , १४ इन्द्रद , १५ गोमुख , १६ कम्बलि , १७ व्याडि , १८ नागार्जुन , १९ सुरानंद , २० नागवोधि , २१ यशोधन , २२ खंड , २३ कापालिक , २४ ब्रह्या , २५ गोविंद , २६ लम्पक आणि २७ हरि . हे सत्तावीस रसशास्त्राचे आद्यप्रवर्तक व रससिद्धि देणारे होत . ’ सप्तविंशतिसंख्याका रससिद्धिप्रदायकाः ॥ ’ ( अ . र . र . १ )
सत्तावीस ( मराठी ) वृत्तें - १ स्वर्गंगा किंवा फटका , २ बालानंद , ३ साकी किंवा रसवाहिनी , ४ चंद्रकांत किंवा सुलाभ , ५ सूर्यकांत किंवा राजसा , ६ माधवकरणी तथा मधुरा , ७ मेनका , ८ केशवकरणी , ९ राजहंस तथा रसतरंगिणी , १० हंसाराणी ११ शारदा , १२ नृपममता , १३ भूपतिबैभव , १४ अक्रूर , १५ सुद्रिका , १६ पादाकुलक , १७ वधुवल्ली , १८ देवला , १९ म्हातारा , ज २० माळीण , २१ पन्ना , २२ पचकल्याणी , २३ आर्द्रा , २४ घुंग्ररवाळा , २५ कृष्णाकोयना , २६ कुसुमगंधा व २७ कबीर , कवितेच्या प्रत्येक चरणांत किती अक्षरें असवींत याचें मापन असलेलीं हीं सत्तावीस प्रमुख मराठी वृत्तें होत . ( म . ज्ञा . को . विभाग ५ वा )
सत्तावीस शास्त्रें - १ शब्दशास्त्र , २ छंदःशास्त्र , ३ अलंकारशास्त्र , ४ काव्यशास्त्र , ५ कथाशास्त्र , ६ नाटकशास्त्र , ७ वाद्यशास्त्र , ८ नर्घंट , ९ धर्मशास्त्र , १० अर्थ , ११ काम , १२ मोक्षशास्त्र , १३ वाद , १४ विद्या , १५ वास्तुशास्त्र . १६ विज्ञान , १७ कलाशास्त्र , १८ कृत्यशास्त्र , १९ कल्पशास्त्र , २० शिक्षा , २१ लक्षणशास्त्र , २१ पुराण , २३ मंत्रशास्त्र , २४ तर्कशास्त्र , २५ गणित , २६ गांधर्व आणि २७ सिद्धांतशास्त्र . ( वस्तुरत्नकोश )