मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
परिशिष्ट १ ते ३

संकेत कोश - परिशिष्ट १ ते ३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


परिशिष्ट १ लें

कटपयादि सांकेतिक भाषा पद्धति

( शब्दांचे अनुक्रम ठरविण्यासाठीं योजिलेली एक स्मृतिसाहाय्यक पद्धति . संगीत ज्योतिष इ . शास्त्रांत याच पद्धतीचा उपयोग करतात . ) या पद्धतींत क पासून ह पर्यंत जितके वर्ण आहेत त्यांतून अ हा वर्ण सोडून बाकीच्या वर्णांचे पांच भाग केलेले असतात व त्यांतील प्रत्येक अक्षरासाठीं विशिष्ट अंकही ठरविलेला असतो .

_______________________________________________________

क्रम अंक क्रम १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ०

१ कादिनवाः - कपासून झपर्यंत ९ वर्ण क ख ग घ ङ च छ ज झ

२ टादिनवाः - टपासून धपर्यंत ९ वर्ण ट ठ ड ढ ण त थ द ध

३ पादिपंचाः - प ते म हे ५ वर्ण प फ ब भ म

४ याद्याष्टाः - य ते हपर्यंतचे ८ वर्ण य र ल व श ष स ह

५ नकाराय बिंदुः - न

_________________________________________________________

या पद्धतींत अक्षरांनीं कोणते आंकडे घ्यावयाचे याबरोबर असाहि संकेत आहे कीं वाक्यांत वा शब्दांत कोणताहि स्वर आला तर त्याचा आंकडा शून्य असा समजावयाचा तसेंच स्वराशिवाय व्यंजन ( पाय मोडून लिहिण्याचें आलें तर तें लक्षांतच घ्यावयांचें नाहीं ,

या पद्धतीत " ज " या अक्षराचा अर्थ आठ हा आंकडा व " य " चा अर्थ एक हा आकडा . यामुळें जय = १८ ( अंकानां वामतो गतिः या न्यायानें ) हा आंकडा सिद्ध होतो . महाभारतांत मूळ संहितेचें " जय " असें नांव होतें व तें प्रथमच्या नमनाच्या श्लोकांत दिलेलेंच आहे ( संस्कृति कोश ).

परिशिष्ट २ रें

नंदभाषा संकेत

केवली = एक , अवारू = दोन , उधानु = तीन , पोकू = चार , मुळु = पांच , शेली = सहा , पवित्र = सात , मंगी = आठ , तेवसू = नऊ , लेवनू = नऊ ,

अंगुळु = दहा , एकडू = अकरा , रेघा = बारा , ठेपरू = तेरा , चोपडू = चवदा , तळी = पंधरा , तान आणि भुरकातानतळी = सोळा ,

उधानुतानतळीं = अठरा , काटा = वीस , भुरकातानकाटी = एकवीस , विटी = शंभर , ढका = हजार , फाटा = एक आणा , अवारू फाटे = दोन आणें , मंगीफट = आठ आणे , तळी फटे = पंधरा आणे इत्यादि ( मोलस्वर्थ - म - ज्ञा - को - वि . १६ )

परिशिष्ट ३ रें

संख्या - संकेत

प्राचीन भारतांत संख्यावाचक शब्दांशिवाय दुसर्‍या सांकेतिक शब्दांचा संख्या दर्शविण्याकरितां वाङ्मयांत उपयोग करण्यांत येत होता . हे शब्दांक म्हणजे निरनिराळ्या वस्तूंची अथवा कल्पनांचीं नांवें सुचविलीं जातात त्यांकरितांअच नियुक्त केलेले असत . उदाः -

शन्य - शून्य , आकाश , पूर्ण इ , एक - शशि , गणपतिरदन , ईश्वर इ . २ - भुज , नेत्र , नदीतट इ . ३ - गुण , अग्नि , ताप इ . ४ - वेद , वर्ण , आश्रम इ . ५ - वाण , पांडव , प्राण इ , ६ - शास्त्र , ऋतु , रस इ . ७ - ऋषि , वार , स्वर इ . आठ - वसु , सिद्धि , दिग्गज इ . ९ - निधि , ग्रह , भक्ति इ . १० - दिशा , अवतारा , रावणशिरस इ . ११ - रुद , अक्षौहिणी , १२ - आदित्य , मास , राशि इ , १३ - विश्वेदेव अतिजगती इ . १४ - मनु , विद्या , रत्न इ . १५ - तिथि , पक्ष , पक्ष इ . १६ - शृंगार , कला , संस्कार इ . १८ - पुराण , स्मृति , २० - नख , रावणबाहु , ब २४ - गायत्री , अर्हत् ‌. २५ - प्रकृति , २७ - नक्षत्र ,

३२ - लक्षण दांत , ३३ - देवता , ३६ - रागिणी , ४९ - मरुत् ‌, ५६ - भोग , ६४ - कला , ८४ - योनि , १००० इंद्र , कमलद्ल , सूर्यकिरण इ . ( हिंदी साहित्य कोश ) ( संस्कृति कोश )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP