मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १६

संकेत कोश - संख्या १६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


षोडशाक्षरी मंत्रः - ( अ ) " हरेराम हरेराम रामराम हरेहरे । "

( आ ) " हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरेहरे । " इति षोडशकं नाम्नां कलिकत्मषनाशनम् ‌‍ ॥

या मंत्राच्या जपानें सर्व पापांचा नाश होतो असें कलियुगांतील महान् ‌‍ साधन म्हणून हिरण्यागर्मानें नारदास उपदेशिलें आहे .

( कलि - संतरणोपनिषद् ‌ ).

षोडशोषचार ( पूजेचे )- १ आवाहन , २ आसन , ३ पाद्य , ४ अर्व्य , ५ आचमन , ६ स्नान , ७ वस्त्र , ८ यज्ञोपवीत , ९ गंध , १० पुष्प , ११ धूव , १२ दीप , १३ नैवेद्य , १४ नमस्कार , १५ प्रदक्षिणा व १६ मंत्र - पुष्प ( पूजेचे मंत्र ) " समर्पण . " ( मेरूतंत्र प्रकाश ११ )

षोडशावतार श्रीदत्तात्रयारे - १ योगिराज , २ अत्रिवरद , ३ द्त्तात्रेय , ४ कालग्निशमन , ५ योगीजन वल्लभ , ६ लीला विश्वंमर , ७ सिद्धराज , ८ ज्ञानसागर , ९ विश्वंमर , १० मायामुक्त , ११ मायायुक्त , १२ आदिगुरु , १३ शिवरूप . १४ देवदेव , १५ दिगंबर आणि १६ कृष्णश्याम कमलनयन ( माऊली विशेषांक १९६० )

षोडशकला ( चंद्राच्या )- १ शंखिनी , २ पदि‌‍मनी , ३ लक्ष्मणी , ४ कामिनी , ५ पोषिणी , ६ पुष्टिवर्धनी , ७ आल्हादिनी , ८ अश्वपदिनी , ९ व्यापिनी , १० प्रयोदिनी , ११ मोहिनी , १२ प्रभा , १३ क्षीरवर्धनी , १४ वेधवर्धनी , १५ विकाशिनी , व १६ शौमिनी ( क . क . ); ( आ ) १ अमृता , २ मानदा , ३ पूषा , ४ तुष्टि , ५ पुष्टि ६ रति , ७ धृति , ८ शशिनी , ९ चंद्रिका , १० कांति , ११ ज्योत्स्ना , १२ श्री , १३ प्रीति , १४ अंगदा , १५ पूर्णा आणि १६ पूर्णामृता .

अमृता मानदा पूषा तुष्टिः पुष्टि रतिर्घृतिः ।

शशिनी चंद्रिका कांतिर्ज्योत्स्ना श्रीः प्रीतिरेव च ।

अंगदा च तथा पूर्णाऽमृता षोडश वै कलाः ।

अशा चंद्राच्या सोळा कला असून सतरावी अमृतकळा म्हणून मानिलि आहे .

ऐशा तुझ्या षोडशकला । सत्रावी बोलिजे अमृतकळा ॥ ( काशीखंड - १७ . १९ )

षोडश दर्शनें ( तत्त्वज्ञानविषयक )- १ चार्वाक , २ बौद्ध ( माध्यमिक , योगाचार , सौत्रान्तिक व वैमाषिक या चार पोटमेदासह ) ३ जैन किंवा आर्हत , ४ रामानुज , ( विशिष्टाद्धैतवादी ), ५ माध्व किंवा पूर्णप्रज्ञ ( द्वैतवादी ), ६ नकुलीश पाशुपत , ७ शैव , ८ प्रत्यमिज्ञा , ९ रसेश्वर , १० औलुक्य किंवा काणाद अथवा वैशेषिक , ११ अक्षपाद किंवा गौतम अथवा न्याय , १२ जैमिनी किंवा पूर्वमीमांसा , १३ पाणिनीय - व्याकरण दर्शन , १४ सांख्य किंवा कापिल , १५ पातंजल किंवा योग आणि १६ शाङ्रकर किंवा अद्वैत . निरनिराळ्या आस्तिक आणि नास्तिक तत्त्वज्ञान विषयक विचारांचे हे सोळा दर्शन ग्रंथ होत . ( सर्वदर्शनसंग्रह )

सोळा अंगें अथवा मूलाधार ( हिंदु संस्कृतीचे )- १ सदाचार , २ अद्विचार , ३ वर्णाश्रचधर्म , ४ सतीत्व प्राधान्य , ५ आश्रच धर्म , ६ दैवावर विश्वास , ७ परमेश्वरी अवतारावर विश्वास , ८ योग आणि भक्तिमूलक उपासना , ९ मूर्तिपूजा , १० शुद्धाशुद्ध विवेक , ११ यज्ञ , १२ वेद , स्मृति पुराणें यांवर विश्वास , १३ कर्मव संस्कार यांवर निष्ठा , १४ पुनर्जन्म , १५ सगुण व निर्गुण उपासना आणि १६ जीवाला कैवल्य प्राप्ति . ( कल्याण हिंदु सं . अंक )

सोळा अंगें मंत्रयोगाचीं - १ भक्ति , २ शुद्धि , ३ आसन , ४ पंचांग सेवन , ( १ उपास्य देवतेची गीता , २ सहस्त्रनाम , ३ स्तव , ४ कवच व ५ ह्रदय ) ५ आचार , ६ धारणा , ७ दिव्यदेश सेवन , ८ प्राणक्रिया , ९ मुद्रा , १० तर्पण , ११ हवन , १२ बलि , १३ याग , १४ जप , १५ ध्यान व १६ समाधि , ( शक्तिपात रहस्य )

" प्राणक्रिया तथा मुद्रा तर्पणं हवनं बलिः ।

योगो जपस्तथा ध्यानं समाधिश्चेति षोडशः ॥ " ( योगशास्त्र )

सोळा आणे - सोळा आण्यांचा एक बंदा रुपया होतो . तसें कोणतेंहि काम संपूर्णपणें पूर्ण झाल्यावर उत्तम या अर्थी ’ सोळा आणे ’ असा संकेत मानला जातो . आतां दशमानपद्धति रूढ करण्यांत आल्यामुळें आणा हें नाणें व्यवहारबाह्म झालें आहे .

सोळा आधारस्थानें ( मानवी शरीरांतील जीवनकार्य चाल - विणारी )- १ पादांगुष्ठाधार , २ मूलाधार , ३ गुदाधारा , ४ मेंढ्राधार ५ उड्डियानाधार , ६ नाभ्याधार , ७ ह्रदयाधार , ८ कंठाधार , ९ घंटिकाधार , १० तत्त्वाधार , ११ जिह्लामूलाधार , १२ ऊर्ध्व दंतमूलाधार १३ नासाग्राधार , १४ भ्रूमध्याधार , १५ ललाटाधार व १६ ब्रह्मरंघ्राधार .

षट् ‌‍ चक्रं षोडशाधारं द्विकल्पं योगपञ्चकम् ‌‍ .

स्वदेहे ये न जानन्ति कथं सिध्यन्ति योगिनः ॥ ( गोरक्षशतक )

सोळा आश्चर्यें ( गीतेंतील )- १ अनंत अर्थ , २ संज्ञा , क्रिया , सर्वनाम आणि अव्यय याचें आधिक्य , ३ मंत्रोद्धार , ४ कोटयवधि सूक्तें , ५ सर्व धातूंची प्राप्ति , ६ सूत्ररूप लिखाण , ७ सुलभता , ८ स्पष्ट शब्दांत नामोच्चार , ९ अर्थचमत्कार , १० वर्ण्य विषयाची इतर ग्रंथांशीं साम्यता , ११ सर्व शब्दशास्त्रांची उपपत्ति , १२ सर्व शास्त्रज्ञांची एकवाक्यता , १३ सर्व तत्त्वेत्त्यांची निष्ठ , १४ गूढार्थ , १५ दुर्जनांना अगग्य आणि १६ सर्व वर्णो - च्चारांचा समावेश , ( कल्याण - श्रीमद्भगवद्नीतांक )

सोळा आयुर्येद ( प्राचीन ) ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ अनुक्रमें - १ धन्वन्तरि - चिकित्सातत्त्वविज्ञान , २ दिवोदास - चिकित्सादर्पण , ३ काशीराज - दिव्यचिकित्साकौमदी , ४ - ५ दोघे अश्चिनी कुमार - चिकित्सासारतन्त्र , ६ नकुल - वैद्यकसर्वस्व , ७ सहदेव - व्याधिसिंविमर्दन , ८ यमराज - ज्ञानार्णव , ९ च्यवन - जीवदान , १० जनक - वैद्यसंदेहभंजन , ११ बुध - सर्वसार , १२ जाबाल - तन्त्रसार , १३ जाजलि - वेदाङ्‌‍गसार , १४ पैल - निदानतन्त्र , १५ करथ - सर्वधरतन्त्र आणि १६ अगस्ति - द्वैधनिर्णयतन्त्र .

धन्वन्तरिर्दिवोदासः काशीराजोऽश्विनीसुतौ ।

नकुलः सहदेवोऽर्किश्चवनो जनको बुधः ॥

जाबालो जाजलिः पैलः करथोऽगस्त्य एव च ।

एते वेदाङ्र्वेदज्ञाः षोडश व्याधिनाशकाः ॥ ( ब्रह्मवैवर्त , ब्रह्मखंड अ . १६ )

सोळा कला व त्यांच्या नियामक सोळा देवता - १ प्राण - वायु , २ श्रद्ध - भारती , ३ आकाश - गणेश , ४ वायु - प्रवाह वायु , ५ अग्नि - अग्नि , ६ जल - वरून , ७ पृथिवी - शनैश्वर , ८ इंद्रिय - सूर्यादिदेवता , ९ मना - रुद्र अथवा अनिरुद्ध , १० अन्न - सोम , ११ वीर्य - वरुण , १२ तप - पावक , १३ मंत्र - स्वाहा , १४ कर्म - पुष्कर , १५ लोक - पर्जन्य व १६ नाम - उषा ,

" परिद्रष्टुः इमाः कलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्यास्तं गच्छन्ति " ( प्रश्नोपनिषद ‌‍ )

सोळा कला पुरुषाच्या ( वेदान्तशास्त्र )- १ प्राण , २ श्रद्धा , ३ आकाश , ४ वायु , ५ तेज , ६ आप , ७ पृथ्वी , ८ इंद्रियें , ९ मन , १० अन्न ११ वीर्य , १२ तप , १३ मंत्र , १४ कर्म , १५ लोक व १६ नाम - अशा सोळा तत्त्वांनीं पुरुष व्याप्त असतो . ( म . भा . शांति . अ . ३३०१ )

सोळा कामधेनु - १ सुमना , २ सुनंदा , ३ सुशील , ४ सुरभि , ५ कपिला , ६ क्रपिलधारा , ७ कमोदिनी , ८ मधुगा , ९ सिद्धि , १० पूर्ण - भद्रा , ११ महासिद्धि , १२ कामभूता , १३ ब्रह्मघातिनी , १४ मोक्षावती , १५ वसुमती व १६ त्रिपदा अथवा प्रणवी . या सोळा कामधेनु दधि , समुद्रमंथनांतून निघाल्या अशी कथा आहे . ( काशीखंड ६१ . ५७ )

सोळा चि न्हे भगवंताचे चरण क मलीं असलेलीं - १ उजवा चरण - १ चक्र , २ कमल , ३ ध्वज , ४ वज्र , ५ अंकुश , ६ यव , ७ स्वस्तिक , ८ ऊर्ध्वरेखा ; डावा चरण - ९ अष्टकोण , १० इंद्रचाप , ११ त्रिकोण , १२ कलश , १३ अर्धचंद्र . १४ अंबर , १५ मत्स्य आणि १६ गोष्पद ( कल्याण )

वर्ष . ३२ अंक . ३ )

सोळा तिथींचे सोळा अधिपति - १ प्रतिपदा - अग्नि , २ द्वितीया - ब्रह्मा , ३ तृतीया - यक्षराज , ४ चतुर्थी - गणेश , ५ पंचमी - नागराज , ६ षष्ठि - कार्तिकेय , ७ सप्तमी - सूर्य , ८ अष्ट्रमी - रुद्र , ९ नवमी - दुर्गा , १० दशमी - यमरज , ११ एकादशी - विश्वश्वर , १२ द्वादशी - विष्णु , १३ त्रयोदशी - मदन , २४ चतुर्दशी - शंकर , १५ पौर्णिमा - चंद्र व १६ अमावास्था - पितर .

देवेम्यस्तिथयो द्त्ता भास्करेण महात्मना ।

यस्यैव यद्दिनं द्त्तं स तस्यैवाधिपः स्मृतः ॥ ( भ . ब्रा . १०२ - ९ ).

सोळा तेजाचीं प्रतीकें - १ सिंह , २ वाघ , ३ सर्प , ४ अग्नि , ५ ब्राह्मण ६ सूर्य , ७ हत्ती , ८ तरस , ९ सोनें , १० जल , ११ गाय , १२ पुरुष , १३ वृषभ , १४ वायुः पर्जन्य , १५ क्षत्रिय व १६ दुन्दुभि अश्व . हीं तेजांची निरनिराळीं प्रतीकें होत . ( अथर्व - अनु . मराठी भाग २ रा )

सोळा दुःखें अथवा दुःखकारणें ( प्रपंचांत )- १ पारतंत्र्य , २ आधि - मानसिकाचिंता ३ व्याधि , ४ मानखंडना , ५ शत्रु असणें , ६ कुमार्या , ७ दारिद्य . ८ कुग्रामवास , ९ दुर्जन सेवा , १० कन्या संतति अधिक असणें , ११ म्हतारापण , १२ दुसर्‍याच्या घरीं राहण्याचा प्रसंग येणें , १३ पर्जन्यकाळीं प्रवास , १४ दोन भार्या असणें , १५ दुर्गुणी नौकर आणि १६ वाईट नांगरानें केलेली शेती - अयोग्य साधनानें करावे लागणारे कोणतेंहि काम . ( न्यायकोश )-( कविकल्पलता )

सोळा ध्रुवताल - १ जयंत , २ शेखर , ३ उत्साह . ४ कंदर्य , ५ जयमंगळ , ६ मधुर , ७ निर्मल , ८ कुंतल , ९ कमला , १० चारी , ११ नंदन , १२ चंद्रशेखर , १३ कामद , १४ विजय , १५ तिलक आणि १६ ललित . ( गायन प्रकाश )

सोळा नांवें तुळशीचीं - १ तुळस , २ श्री , ३ आवश्यक , ४ लक्ष्मी , ५ महालक्ष्मी , ६ विद्या , ७ यशःश्री , ८ धर्माधर्म , ९ देवी , १० देवदेवी ,

११ सखी , १२ शुभ , १३ भूमि , १४ अचल , १५ अमिला व १६ अमला . ( ब्रह्मांड पुराण )

सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ - १ विष्णु - औषध , २ जनार्दन - भोजन , ३ पद्मनाम - शयन , ४ प्रजापति - विवाह , ५ चक्रधर - युद्ध , ६ त्रिविक्रम - प्रवास , ७ नारायण - अंतकाल . ८ श्रीधर - प्रिय - संग समयीं , ९ गोविंद - दुःखप्न , १० मधुसूदन - संकट , ११ नारसिंह - अरण्य , १२ जलशायिन - अग्निंत , १३ वराह - जलांत , १४ रघुनंदन - एर्वत , १५ वामन - गमनकालीं व १६ माधव - सर्वप्रसंगीं ( बृहत्स्तोत्र रत्नाकर )

सोळा भूषण शृंगार ( स्त्रियांचे )- १ पातिव्रत्य - हा जरताती पाटाव , २ संसार - व्यवहार - दक्षता - जरतारी चोळी , ३ शिशु संगोपन चातुर्य - कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा - कर्णभूषणें , ५ शुद्ध - अश्रमधर्म - सांगसंपादनत्व - हस्तभूषणें , ६ निर्मल गृह व्यवस्थ , ७ अतिथिसत्कार - मस्तकभूषन , ८ लेखन वाचनादिकला - मोहनमाळ , ९ ईश्वर आस्तिक्य - मंगळसूत्र , १० मृदु मंजुळ भाषण - मूदाराखडी , ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण - गोठ , १२ पतिसेवा परायणत्व - कुंकुमतिलम १३ दुःखितांस साह्म - बिजवरा , १४ अढल घैर्य - बुगडी , १५ संकटकाली वीरता - काप

आणि १६ स्वकुलधर्मामिमान - कंकण . या सोळा शृंगारांनीं युक्त असते ती जगद्वंद्य होते . ( गृहिणी रत्नमाला . वर्ष १ अंक . १ , १९३६ )

सोळा पदार्थ - १ प्रमाण , २ प्रमेय , ३ संशय , ४ प्रयोजन , ५ द्दष्टांत ६ सिद्धांत , ७ अवयव , ८ तर्क , ९ निर्णय , १० वाद , ११ जल्प , १२ वितण्डा , १३ हेत्वभास , १४ छल , १५ जाती , व १६ निग्रहस्थान , या सोळा पदार्थांचे उद्देश - लक्षण - परीक्ष इत्यादींनीं तत्त्वज्ञान होतें . गौतमप्रणीत न्यायदर्शनांत असे सोळा पदार्थ मानले आहेत व त्यामुळें दुःख नाश होऊन निश्रेयस मिळतें असें न्यायशास्त्र मानतें , ( न्यायशास्त्र ).

सोळा प्रतीकें लक्ष्मीचीं - १ श्री ( लक्ष्मी ), २ भूति , ३ श्रद्धा , ४ मेधा , ५ सन्नति , ६ विजिति , ७ स्थिति , ८ धृति , ९ सिद्धि , १० कांति , ११ समृद्धि , १२ खाहा , १३ स्वधा , १४ संस्तुति , १५ नियतित व १६ स्मृति . ( म . भा . शांति . अ . २२२ )

सोळा प्रकारच्या जपमाळा - १ करमाला , २ वर्णमाला , ३ माणिमाला , ४ रुद्राक्ष , ५ तुळसी , ६ शंख , ७ पद्मबीज , ८ जीवपुत्रक , ९ मोतीं , १० स्फटिक , ११ मणि , १२ रत्न , १३ सुवर्ण , १४ चांदी , १५ चंदन आणि १६ कुशमूळ ( दर्भमूळ ). ( श्रीगायत्रीजप - जज्ञविधि )

सोळा प्रकारची पत्री - १ अशोक , २ अघाडा , ३ कण्हेर , ४ चाफा , ५ जाई , ६ डाळिंब , ७ तुळस , ८ दूर्वा , ९ धोतरा , १० पुन्नाग

( नागचाफा ), ११ बकुल , १२ बेल , १३ बोर , १४ रुई , १५ विष्णुक्रांता व १६ हदगा . अशी सोळा प्रकारची पत्री मंगलागौरीच्या पूजेला लागते . ( ब्रतराज )

सोळा प्रकारचे संधि ( तह )- १ कपालसंधि - बरोबरीचा तह , २ उपहारसंधि - खंडणी देऊन , ३ संतानसंधि - सोयरीक करून , ४ संगत - संधि - मैत्री करून , ५ कांचनसंधि , ६ उपन्याससंधि - हेतु धरून , ७ प्रतिकार - संधि - परस्पर कार्य साधेल असा , ८ संयोगसंधि - सामायिक उद्देशानें , ९ पुरुषांतरसंधि - शर्त ठेवून केलेला , १० अद्दष्टपुरुषसंधि - शत्रूची शर्त पतकरून , ११ आदिष्टसंधि - प्रदेश देऊन , १२ आत्मदिष्टसंधि - प्राण संरक्षण करण्याकरितां , १३ परिक्रयसंधि - सन्मान्यांचें रक्षण व्हावें म्हणून , १४ उच्छिन्नसंधि - भूमि देऊन , १५ बरभूषसंधि - जमिनीचें सर्व उत्पन्न देऊन , १६ स्कंधोप - नेयसंधि - जमिनींतील पीक आपण वाहून नेऊन देऊन देऊन . ( हितोपदेश )

सोळा प्रमुख वैदिक छंद - १ अत्यष्टि , २ अनुष्टुभ ‌‍, ३ आष्टि , ४ अस्तारपंक्ति , ५ उष्णह , ६ ककम , ७ गायत्री , ८ जगती , ९ त्रिष्टुप् ‌, १० पंक्ति , ११ प्रस्तार पंक्ति , १२ बृहती , १३ महापंक्ति , १४ विराज् ‌‍, १५ शक्करी व १६ सतोबृहती . ( ऋग्वेददर्शन )

सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे - १ सारीपुत्र , २ मोग्गलान , ३ अज्ञात कौण्डिण्य , ४ महाकाश्यप , ५ महाकात्यायन , ६ आनंद , ७ अनुरुद्ध , ८ भद्दिय , ९ सुभूति , १० सोण , ११ बक्कुल , १२ उपालि , १३ स्वाती , १४ नंद . १५ सुनीत व १६ सोपाक . ( बुद्धदर्शन )

सोळा भारतीय संवत ‌‍ ( कालगणना )- १ कल्पाब्द , २ सृष्टिसंवत् ‌‍ , ३ वामन संवत् ‌‍ , ४ श्रीराम संवत् ‌‍ , ५ श्रीकृष्ण संवत्‌ , ६ यधिष्ठिर संवत ‌‍ , ७ बौद्ध संवत् ‌‍, ८ महावीर ( जैन संवत्‌ , ) ९ श्रीशंकराचार्य संवत ‌, १० विक्रमसंवत ‌, ११ शालिवाहन संवत् ‌‍ , १२ कलचुरी संवत , १३ वलभी , १४ नागार्जुन , १५ बंगला आणि १६ हर्षाब्द संवत ‌, ( कल्याण हिं , सं . अंक ) शिवशक हा सतरावा संवत् ‌‍ होय .

सोळा माता - १ स्तनपान करविणारी , २ गर्मधानी , ३ भक्ष्यदात्री , ४ गुरुपात्नी , ५ इष्टदेवपत्नी , ६ सापत्नमाता , ७ कन्या , ८ गर्मारमागिनी , ९ स्वामिपत्नी , १० सासू , ११ आईची आई , १२ बापाची आई , १३ बन्धुपत्नी , १४ मावशी , १५ आत्या व १६ मामी .

मातुःअ पितुश्च भगिनी मानुलानी तथैव च ।

जनानां वेदविहिता मातरः षोडश स्मृताः ॥ ( ब्रह्मवैवर्त गणपति खंड )

सोळा मातृका ( पुण्याहवाचनांतील )- १ गौरी , २ पद्मा , ३ शची , ४ मेधा , ५ सावित्री , ६ विजया , ७ जया , ८ देवसेना , ९ स्वधा , १० स्वाहा , ११ माता , १२ लोकमाता , १३ धृति , १४ पुष्टि , १५ तुष्टि व १६ कुलदेवता . या सोळा मातृकांचें सर्व शुभकार्यांत गणपतिपूजनाबरोबर पूजन केलें जातें .

सोळा मुहत - १ रौद्र , २ श्चेत , ३ मैत्र , ४ चार्व , ५ जयदेव , ६ रोचन , ७ वैतुर , ८ अभिजित् ‌‍ , ९ रावण , १० बालव , ११ बिमीषण , १२ नंदन , १३ याम्य , १४ सौम्य , १५ भग व १६ सावित्र . ( ज्योतिष )

सोळा राज्यें भारतीय संघराज्यान्तरगत - १ आंध्र , २ आसाम , ३ उत्तरप्रदेश , ४ ओरिसा , ५ केरळ , ६ गुजराथ , ७ जम्मू व काश्मीर , ८ नागाप्रदेश , ९ पूर्वपंजाब , १० पश्चिम बंगाल . ११ बिहार , १२ महाराष्ट्र , १३ मद्रास , १४ मध्यप्रदेश , १५ म्हैसूर व १६ राजस्थान .

सोळा विकारात्मक मनुष्य देह - ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय ( शब्द , स्पर्श , रूप , रस व गंध ) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन . अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे .

सोळा विद्या - १ सत्यविद्या , २ दहरविद्या , ३ वैश्वानरविद्या , ४ पंचाग्निविद्या ( ओंकाराचें ध्यान ), ५ षोडषकला विद्या ( या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो ), ६ उद्निथविद्या , ७ शांडिल्य विद्या , ८ पुरुषविद्या , ९ पर्यंकविद्या - पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता , ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो , १० अक्षरविद्या , ११ संवर्गविद्या , १२ मधुविद्या - सृष्टीची उपासना , १३ प्राणविद्या , १४ उपकोसलविद्या - उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली १५ सद्विद्या - सत्यब्रह्माचें परोष ज्ञान , १६ भूमाविद्या - अपरोक्ष ज्ञान . वेदान्तांत ( उपनिषदांत ) सांगितलेल्या विद्यांपैकीं या सोळा मुख्य विद्या होत . ( श्रीतत्त्वसारायण रामगीता अ . १७ )

सोळा वृत्ति ( मनोव्यापार ) अंतःकरणाच्या - १ संज्ञान ( चेतनभाव ), २ आज्ञान ( ईश्वरभाव ), ३ विज्ञान , ४ प्रज्ञान , ५ बुद्धि , ६ द्दष्टि , ७ धृति , ८ मनन , ९ इच्छा , १० युति ( मनाची व्यग्रता ), ११ स्मृति १२ संकल्प , १३ क्रतु , १४ प्राणवृत्ति , १५ विषयतृष्णा व १६ लोभ .

( ऐतरेयोपनिषद् ‌‍ ५ - २ )

सोळा शृंगार - ( अ ) १ मज्जन , २ चीर , ३ हार , ४ तिलक , ५ अंजन , ६ कुंडळ , ७ नासामौक्तिक , ८ केशपाशरचना , ९ कंचुक , १० नूपुर , ११ सुगंध ( अंगराग ), १२ कंकण , १३ चरणराग ( अलक्तक ), १४ मेखलारणन ( क्षुद्रघंटिका ), १५ तांबूल आणि १६ करदर्पण ( आंगठयांत घालावयाचा एक अलंकारविशेष , यावर आरसा बसविलेला असे त्यांत मुखो - लोकन करतां येत असे . )

आदौ मज्जनचीरहारतिलकं नेत्राज्जनं कुंडले

नासामौक्तिककेशपाशरचना सत्कंचुकं नूपुरौ ।

सौगन्धं करकङ्‌‍कणं चरणयो रागो रणन्मेखला

ताम्बूलं करदर्पणं चतुरता शृंगारकाः षोडश । ( सु . ) ( कविवल्लभदेव - पंधरावें शतक . )

( आ ) १ मज्जन , २ वस्त्र , ३ आलक्तक , ४ केशपाश , ५ सौगंघ्य , ६ भूषण , ७ मुखसुत्रास , ८ कज्जल , ९ भाषण , १० हास्य , ११ चातुर्य , १२ चालन , १३ पातिव्रत्य , १४ गान , १५ कटाक्ष व १६ क्रीडा . ( दुर्बोध श . कोष . ); ( इ ) १ शौच , २ उटणें , ३ स्नान , ४ वेणीफणी , ५ वस्त्र - आभूषणें , ६ काजळ . ७ अळत्याचा रंग , ८ देंतरंजन , ९ तांबूल , १० वसंत , ११ अलंकार , १२ सुगंध , १३ पुष्ह्पहार , १४ कुंकू , १५ तिलक व १६ हनुवटीवर गोंदणें , ( तत्त्व - निज - विवेक )

सोळा शृंगार ( हिंदी दोहरा )- ( इ ) १ चार चतुष्पद , चार खगपद , चार फूल , फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार , स्पष्टीकरण

असेः -

चार चतुष्पद

१ तुरंगवत् ‌‍- घुंगट .

२ कुरंगव्त् ‌- नेत्र .

३ गज - गति .

४ सिंह - कटि .

चार खगपद

१ कोकिला - स्वर .

२ भ्रमराकृति - भोंवई .

३ शुकचंचुवत् ‌- नासिका .

४ मीनखेचनावत् ‌- चंचलता .

चार फूल

१ चंपकवत् ‌‍- कांति .

२ केतकीवत् ‌‍- सुगंध .

३ कमलाकृति - नाभि .

गुलाबवत - गाल .

चार फल

१ कपित्थवत्‌‍ - कुच .

२ दाडीमीबीजवत् ‌‍- दंत .

३ आम्रबीजापरि - हनुवटी .

४ प्रवालाप्रमाणें - अधर .

सोळा संस्कर - १ गर्भाधान , २ पुंसवन , ३ सीमंतोन्नयन , ४ जातकर्म , ५ नामकरण , ६ निष्कमण , ७ अन्नप्राशन , ८ चौल . ९ उपनयन . १० ते १३ वेदव्रतचतुष्टय - ( १० ) महानाग्नीव्रत , ११ महाव्रत , १२ उपनिषद्‌‍व्रत व १३ गोदान ), १४ केशान्त , १५ समावर्तन आणि १६ विवाह .

गर्भाधानं पुंसवनं सीमंतोन्नय्नं तथा ।

जातकं नामसंस्कारो निष्कमश्चान्नभोजनम् ‌‍ ॥

चौलकर्मोपनयनं वेदव्रतचतुष्टयम् ‌ ।

केशान्तः स्नानमुद्वाहः संस्काराः षोडशाः स्मृताः स्मृताः ॥ ( ज्योतिर्मयूख )

सोळा ( सांधे ) मानव शरीराचे - १ मान , १ कंबर , २ खांदेअ , २ कोपरे ( हाताचे ) २ मनगटें , २ मनगटें , २ बोटांचे , २ जांघा . २ गुडघे आणि २ घोटे मिळून सोळा .

घरा सोळा सांदी । बहात्तर कोठे ( कोठडया ) ।

नवही दारवंटे । झाडीत होतें ( ज्ञा . रूपकात्मक अभंग )

सोळा स्वर - अ , आ , इ , ई , उ , ऊ , ऋ , ऋ , ल , लृ , ए , ऐ , ओ , औ , अं , अः ,

सोळा स्त्री - जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार - आंतर शृंगार - १ दया , २ क्षमा , ३ शांति , ४ प्रीति , ५ नीति , ६ भक्ति , ७ चातुर्य , ८ धैर्य , ९ पातिव्रत्य , १० परोपकार , ११ मनमिळाऊपणा , १२ समाधान , १३ सत्यवचन , १४ नम्रता , १५ सहिष्णुता व १६ ज्ञानलालसा ; बाह्म शृंगार - १ चोळी , २ डोकीवरून पदर घेणें , ३ दागिने बेतानें घालणें , ४ हळू चालणें , ५ हरिणाक्षी , ६ वेणीफणी नित्य करणें , ७ वस्त्र व्यवस्थित असणें , ८ काजळ घालणें , ९ कुंकूं लावणें , १० सडपातळ असणें , ११ गौर वर्ण १२ अल्प निद्रा , १३ हंसतमुख , १४ मधुर भाषण , १५ हात राखून खर्च करणें व १६ आदरातिथ्य राखणें , हे सोळा स्त्री जीवनाचे अनुक्रमें आंतर व बाह्म शृंगार शास्त्रकारांनीं सांगितले आहेत .

" नारीणां षोडश कला शृंगारास्तत्प्रमाणकाः " ( ब्रंह्मवैवर्त श्रीकृष्णखंड ३८ - ११० )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP