चव्वेचाळीस क्षुद्ररोग - १ पुटकुळ्या , २ कफवातापासून उद्भवलेली पुळीं , ३ कच्छपिका ( पांच किंवा सहा पुळ्या एकाच ठिकाणीं उत्पन्न झालेल्या ), ६ वारुळ , ७ इंद्रविद्धा , ८ गर्दभिका , ९ पाषाणगर्दभ , १० पनसिका , ११ जालगर्द्भ , १२ मस्तकावर उत्पन्न होणारी पुळी , १३ काखमांजरी , १४ गंधमाला , १५ काळपुळी , १६ नखुरडे , १७ कुनख ( अर्ध नखुरडे ), १८ अनुशयी ( पायावर येणारी पुळी ), १९ विदारिका , २० शर्करा , २१ शर्करार्बुद , २२ पायाच्या तळव्यांना भेगा पडणें , २३ कुरूप , २४ चाई , २५ टक्कल , २६ दारुणक , २७ खवडे २८ पलित , २९ तारुण्यपीटिका , ३० पद्मिनी कंटक , ३१ जंतु मणी , ३२ मस , ३३ तीळ , ३४ न्यच्छ ( सांवळे अथवा पांढरे डाग ), ३५ वांग , ३६ नीलिका ३७ परिवर्तिका , ३८ अवपाटिका , ३९ निरुद्धप्रकाश , ४० सनिरुद्धगुद , ४१ अहिपूतन , ४२ वृषण कच्छ्र , ४३ गुदभ्रंश आणि ४४ डक्कर दाढ ( माधवनिदान ).