मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २५

संकेत कोश - संख्या २५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पंचवीस तत्त्वें काव्याचीं - ९ नवरस ( नवाचेअ अंकीं ) व १६ अंगें मिळून पंचवीस तत्त्वें - १ ललित्य , २ अर्थ , ३ गौरव , ४ साहित्य , ५ संगीत , ६ शृंगार , ७ टेव ( रचना ), ८ पद , ९ सिद्धांत , १० भाव , ११ ह्ष्टांत , १२ न्याय , १३ वर्णक , १४ उपमा , १५ श्लेष , आणि १६ समयोचित प्रकरण . " जे नवरस आणि सोळा आंगें ; ते काव्य महापवित्र सांगें ॥ ( गोपाळकविकृत रूक्मिणी स्वयंवर )

पंचवीस तत्त्वें ( सांख्यशास्त्र )- १ प्रकृति , २ पुरुष , ३ बुद्धि , किंवा महत्तत्त्व , ४ अहंकार , ५ मन , ६ ते १० पंच ज्ञानेंद्रियें , ११ ते १५ पंच कर्मेंद्रियें , १६ ते २० पंच तन्मात्रें म्हणजे पंचमहाभूतांचे सूक्ष्म अंश , उदा - १ शब्दतन्मात्रा , २ स्पर्शतन्मात्रा , ३ रूपतन्मात्रा , ४ रसतन्मात्रां , आणि ५ गंधतन्मात्रा व २१ ते २५ पंचमहाभूतें , या पंचवीस तत्त्वांवर सृष्टीची उभारणी आहे , असें सांख्याशास्त्र मानतें , सांख्य शब्दाचे दोन अर्थ आहेत - एक ज्ञान अथवा तत्त्वज्ञान . विशेषेंकरून कपिलमुनींनी प्रतिपादिलेलें दर्शन असा बोध होतो . सांख्य शास्त्रांत सृष्टीची उभारणी पंचवीस तत्त्वांवर झाली असल्यामुळें व इतर अनेक प्रकारांतहि विवक्षित संख्या निर्दिष्ट केली असल्यामुळें सांख्या म्हणजे मोजणारें शास्त्र असाहि दुसरा अर्थ आहे . या पंचवीस तत्त्वाच्या पलीकडला जो सविसावा तो वेदान्तप्रतिपादित परमात्मा . या पंचवीस तत्त्वाचें ज्ञान होईल त्या पुरुषाला तो ब्रह्मचारी , गृहस्थ वा संन्यासी असो तो सर्व दुःखापासून मुक्त झाल्याशिवाय रहात नाहीं . असें सांख्यशास्त्र मानते .

पंचविंशतितत्त्वज्ञो यत्र तत्राश्रमे वसन् ‌‍ ।

जटी मुण्डी शिखी वापि मुच्य्ते नात्र संसयः ॥ ( सां . का . गौडपादभाष्य )

पंचवीस तत्त्वें ( स्थूल शरीराचीं )- १ अस्थि , २ मांस , ३ त्वचा , ४ नाडी , ५ केंस ( पृथ्वीचे गुणधर्म ), ६ लाळ , ७ मूत्र , ८ रक्त , ९ रेत आणि १० स्वेद ( आप ) , ११ क्षुधा , १२ तृषा , १३ आलस्य , १४ निद्रा , १५ मैथुन ( तेज ), १६ चलन , १७ वलन , १८ निरोधन , १९ प्रसरण , २० आकुंचन ( वायु ) २१ काम , २२ क्रोध , २३ लोभ , २४ मोह आणि २५ भय ( आकाश गुण ) ( दासबोध १७ - ८ )

पंचवीस दोष ( गायकाचे )- १ दांत चावूण गाणें , २ ओरडून गाण्याचा विरम करणें , ३ सू सू असा आवाज निघणें , ४ भीत भीत गाणें , ५ गडब्डीनें गाणें , ६ कंपयुक्त , ७ तोंड वंडेंवाकडें करणें , ८ बेसूर , ९ कर्कश , १० बेताल , ११ मान उंच करून गाणें , १२ बकर्‍याप्रमाणें तोंड करून गाणें , १३ चेहरा फुगवणें , १४ मान वांदडी करणें , १५ तुंब्याप्रमाणें तोंड फुगवून गाणें , १६ हात व पाय आपटणें , १७ डोळे मिचकावून गाणें , १८ रसहीन , १९ रागांत न लागणारे स्वर लावून गाणें , २० स्वर आणि वर्ण यांचा उच्चार बरोबर न करणें , २१ स्वरांच्या योग्य जागीं आवाज लागत नाहीं असे , २२ नियमाप्रमाणें न गाणें , २३ एका रागांत अनेक अयोग्य राग मिश्रण करून गाणें , २४ वेफिकीर गाणें व २५ नाकांतून आवाज काढून गाणें .

मिश्रकोऽनवधानश्च तथाऽन्यःसानुनासिकः ।

पंचविंशतिरित्येते गायका निन्दिता मताः ॥ ( संगीतरत्नाकर )

पंचवीस वाद - १ अद्वैतबाद , २ द्वैतवाद , ३ विशिष्टाद्वैतवाद , ४ कर्मवाद , ५ कालवाद , ६ ईश्वरवाद , ७ योगवाद , ८ सांख्यावाद , ९ ब्रह्मवाद - शुद्धाद्वैतवाद , १० निराकारवाद , ११ अंहब्रह्मवाद , १२ वायुवाद , ( दरवेश ), १३ पृथ्वीवाद ( योगी ), १४ चंद्रमुक्त स्वयं - शिलावाद ( जैनी ), १५ महादाकाशवाद ( जंग , ), १६ पौराणिक स्वर्गवाद , १७ ज्ञानस्वरोदयवाद , १८ शब्दवाद , १९ ज्योतिषवाद , २० नास्तिकवाद , २१ शून्यवाद

( बौद्ध ), २२ वीर्यवाद ( नास्तिकविषयी ) २३ देहवाद - भौतिकवादी पाश्चात्त्य , २४ भक्तिवाद , आणि २५ ( मुस्लीम ). असे अघ्यात्मांत पंचवीसवाद वा मतमतांतरें आहेत . ( पंचग्रथी )

वेताळ पंचविशी - एक कथासंग्रह . यांत वेताळानें सांगितलेल्या लोकप्रिय अद‌भुत अशा पंचवीस कथा आहेत . म्हणून यास वेताळपंचविशी म्हणतात . हा ग्रंथ जंभलदत्तकृत असून तो सोळाव्या शतकांत होऊन गेला असें म्हणतात .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP