मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १०

संकेत कोश - संख्या १०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


दहा देवयोनि - १ विद्याधर , २ अप्सरा , ३ यक्ष , ४ राक्षस , ५ गंधर्वाआआअ ६ किन्नर , ७ पिशाच , ८ गुह्मक , ९ सिद्ध आणि १० भूत .

( अमर )

दहा दोष काव्याचे - १ गूढार्थ , २ अर्थांतर , ३ अर्थहीन , ४ मिन्नार्थ , ५ एकार्थ , ६ अभिप्लुप्तार्थ , ( तुटकतुटक ), ७ न्यायाला सोडून . ८ कठीण . ९ विसंगत व १० शब्द गाळून . शब्दच्युंत वै दश काव्यदोषाः । ( भरत नाटय १६ - ८६ )

दहा दोष ( वरासंबंधीं )- ( अ ) १ मुका , २ आंधळा , ३ बहिरा , ४ खुज्या बांध्याचा , ५ मूर्ख , ६ पांगळा , ७ नपुंसक , ८ कुष्ठी , ९ महारोगी आणि १० फपरें येणारा ( विवाहसार ); ( आ ) १ उन्मत्त , २ उपजीविकेचें साधन नसलेला , ३ फेपरें येणारा , ४ दूरदेशीं वास करणारा , ५ कुष्ठ असलेला , ६ मूर्ख , ७ मोक्षमार्गाला अनुसरलेला , ८ शूर - सैनिकपेशा पत्करलेला , ९ अक्षरशून्य व १० विवाह परावृत्त असलेला . अशांना कन्या देऊं नये .

उन्मत्ता वृत्तहीनाश्च तथापस्मारदूषिताः ।

दूरस्था कुष्ठ्नो मूर्खा मोक्षमार्गानुसारिणः ॥

शूरा अवेद्या निर्वृत्ता दश दोषयुता वराः ।

तथा षंढाश्च पतिता चक्षुःश्रोत्रविवर्जिताः ॥ ( ज्योतिर्मयूख )

दहा दोष ( वाणीचे )- १ विरोधी भाषण , २ एखाद्याला कासावीस करील असें , ३ उपहास , ४ छळ , ५ वर्मस्पर्श , ६ कोरडें आवेशाचें बोलणें , ७ कोटीबाज , ८ आशा पोटांत ठेवून बोलणें , ९ शंका उत्पन्न होईल असें व १० प्रतारणा ( फसवेगिरी . हे भाषणप्रसंगीं दहा दोष मानले आहेत .

आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु ।

हे सन्यसिले अवगुणु । ज्या वाचा ॥ ( ज्ञाने . १३ - २७२ )

दहा द्दष्टियोग ( ज्योतिष - १ युती योग , २ एकराश्यांतर योग , ३ अर्ध काटकोन योग , ४ द्विराश्यांतर , ५ काटकोन , ६ त्रिकोण , ७ सार्ध काटकोन , ८ षडाष्टक , ९ प्रीतियोग आणि १० समक्रांति योग . असे दहा द्दष्टियोग ज्योतिषांत मानले आहेत .

दहा धर्मलक्षणें - १ धृति ( धैर्य ), २ क्षमा , ३ सहिष्णुता , ४ चोरी न करणें , ५ पवित्रता , ६ इंद्रियनिग्रह , ७ बुद्धि , ८ विद्या , ९ सत्य व १० अक्रोधता .

धृतिः क्षमा दमोऽस्तेय शाचमिंद्रियनिग्रहः ।

धीर्विद्या सत्यक्रोधौ च दशकं धर्मलक्षणम् ‌‍ ॥ ( मनु . ६ - ९२ )

दहा धर्मसाधनें - १ अहिंसा , २ क्षमा , ३ सत्य , ४ लोभलज्जा , ५ श्रद्धा , ६ इंद्रियनिग्रह , ६ दान , ८ यज्ञ , ९ तप व १० ध्यान . हीं दहा धर्मसाधनें होत . ( भ . ब्रह्म . १८९ - ३५ )

दहा धातूंचें शरीर - १ वात , २ पित्त , ३ कफ , ४ चर्म , ५ रुधिर , ६ मांस , ७ मेद , ८ हाडें , ९ मज्जा व १० शुक्र . प्रत्येक शरीर या दहा धातूंचें बनलें आहे . ( भा . दर्शनसंग्रह )

दहा नांवें अर्जुनाचीं - १ अर्जुन , २ फाल्गुन , ३ जिष्णु , ४ किरीटी , ५ श्वेतवाहन , ६ बीभत्सु , ७ विजय , ८ कृष्ण , ९ सव्यसाची आणि १० धनंजय .

अर्जुनः फाल्गुनो जिष्णुः किरीटी श्वेतवाहनः ।

बीभत्सुर्विजयः कृष्णः सव्यसाची धनंजयःअ ॥ ( म . भा . विराट ४४ - ९ )

दहा नांवें शनीचीं - १ कोणस्थ , २ पिंगल , ३ बभरु , ४ कृष्ण , ५ रौद्रा , ६ अंतक , ७ यम , ८ सूर्यपुत्र , ९ शनैश्वर ( शनि आणि १० मंद ,

कोणस्थः पिंगलो बभरुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।

सौरिः शनैश्वरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः ॥ ( श्रीशनैश्वरस्तोत्र )

दहा नियम - ( अ ) १ तप , २ संतोष , ३ आस्तिकता , ४ इंद्रियदमन , ५ देवपूजा , ६ सच्छास्त्रश्रवण , ७ लज्जा , ८ बुद्धि , ९ जप आणि १०

हवन , हे दहा नियम म्हणजे आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें .

तपः संतोष आस्तिक्यं दान्तो देवस्य पूजनम् ‌‍ ।

सिद्धान्तं श्रवणं चैव ह्लीर्मतिश्च जपो हुतम ‌ ।

दशैते नियमाः प्रोक्ता मया पर्वतनायक । ( देवीगीता )

दहा निरनिराळे अर्थ " योग " शब्दाचें - १ ध्यान धारणा - अध्यात्मशास्त्र , २ औषधी योजना - वैद्यशास्त्र , ३ दोन वस्तूंना जोडणें - वास्तुशास्त्र , ४ कामधंदा - व्यवहारशास्त्र , ५ हस्तलाघव - इंद्रजाल , ६ युद्धसाहित्य जुळवणी - युद्धशास्त्र , ७ कुशाग्रतेनें होणारें कर्म - कर्मयोग , ८ ग्रहांची युति - ज्योतिष , ९ अनेक रसांचें मिश्रण - रसायन आणि १० कुशलतापूर्ण शासनप्रबंध - राज्यशासन , असे योग शब्दाचे अर्थ निरनिराळ्या शास्त्रांत अमिप्रेत आहेत . ( गीतेंतील राजकीय तत्त्वज्ञान )

दहा पदार्थ गुणोत्पादक - १ शास्त्रें , २ तीर्थें , ३ पुत्रादिसमाज , ४ देश , ५ काल , ६ कर्म , ७ जन्म , ८ ध्यान , ९ मंत्र , आणि १० जातकादि - संस्कार . ( भाग ११ - १३ - ४ )

दहा पापकर्में ( शारीरिक तीन )- १ हिंसा , २ चोरी , व ३ निषिद्ध कामवासना ; ( वाचिक चार )- १ चहाडी , २ कठोर , ३ खोटें व ४ अप्रसिद्ध असें बोलणें आणि ( मानसिक तीन )- १ दुसर्‍याचा घात करण्याची इच्छा , २ मत्सर , व ३ खोटी समजूत .

दहा पुराणकालीन मूर्ख - १ दुर्योधन , २ रावणा , ३ शिशुपाल , ४ जरासंध , ५ कंस , ६ हिरण्यकशिपु , ७ भस्मासुर , ८ रुक्मी , ९ जयद्रथ आणि १० शकुनि . हे दहा पुराणकालीन मूर्ख होत असे भीष्म सांगतात . ’ ऐसे दशमूर्ख संसारीं । म्यां ऐकिले पाहिले नेत्रीं ॥

( सिद्धान्तबोध )

दहा पुष्टी - १ वाक्‌पुष्टि , २ ज्ञानपुष्टि , ३ शरीरेंद्रिय युष्टि , ४ ग्रहक्षेत्रपुष्टि , ५ धनधान्यपुष्टि , ६ प्रजापुष्टि , ७ पशुपुष्टि , ८ ग्रामपुष्टि , ९ धर्मपुष्टि , व १० अणिमादिपुष्टि , अशा दहा पुष्टी सांगिलेतल्या आहेत . ( रुद्रार्थ दीपिका )

दहा प्रकारच्या कपिला गाई - १ सुवर्ण कपिला , २ गौर पिंगला , ३ आरक्त पिंगाक्षी , ४ जल पिंगला , ५ बभरुर्णाभा , ६ श्चेत पिंगला . ७ रक्त पिंगाक्षी , ८ खूर पिंगला , ९ पाटला आणि १० पुच्छ पिंगला , ( जिच्या शेपटाच्या केसाचा रंग पिवळा असतो ती . ( म . भा . अश्वमेध - १०५ - ५१ )

दहा प्रकारचे गारुड मंत्र - १ वेदगारुड , २ देवीगारुड , ३ वीरगारुड , ४ कृष्णगारुड , ५ मंत्रगारुड , ६ यंत्रगारुड , ७ सिद्धगारुड , ८ नाथगारुड ,

९ अघोरगारुड आणि १० कालमैरवगारुड , ( मंत्रशास्त्र व मंत्र शक्तियोग )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP