मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५

संकेत कोश - संख्या ५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पांच रत्नें ( महाभारतान्तर्गत )- १ भगवदी़ता , २ विष्णुसहस्त्रनाम , ३ भीष्मस्तवराज , ४ अनुस्मृति आणि ५ गजेंद्रमोक्ष .

गीतासहस्त्रनामैव स्तवराजो ह्मनुस्मृतिः ।

गजेंद्रमोक्षणं चैव पंचरत्नानि भारते ॥ ( सु . )

पांच लक्षणें सदगुरूंचीं - १ श्रोत्रिय ( शास्त्रज्ञ ), २ ब्रह्मनिष्ठ ( अनुभवी ), ३ शिष्यप्रवोधिनी ( समर्थ ), ४ कृपालुत्व आणि ५ पूर्ण शांति

( पु . दी . )

पांच लेखन गुण - १ अर्थानुक्रम , २ वाक्यसंगति , ३ परिपूर्णता , ४ माधुर्य आणि ५ गौख आणि निःसंदेहपणा ( कौ . अधि . २ अ . १ )

पांच लेखन दोष - १ कलाहीनपणा , २ विरोध . ३ पुनरुक्ति , ४ चुकीचा शब्दप्रयोग आणि ५ अक्षरांचा घोटाळा ( कौ . अ . २ अ . ३१ )

पांच लोक आणि त्यांच्य दिशा - ( अ ) सत्यलोक , २ वैंकुंठलोक , ३ कैलास , ४ आश्रय आणि ५ निराश्रय . ( क . गी . २ . २६ ) ( आ ) १ इंद्रलोक - पूर्वेस , २ यमलोक - दक्षिणेस , ३ वरुणलोक - पश्चिमेस , ४ धनदलोक ( कुबेर )- उत्तरेस आणि ५ ब्रह्मलोक - ऊर्ध्व दिशा ( म . भा . सभापर्व )

पांच वस्तु अति पवित्र होत - १ उच्छिष्ट - वासराचें उष्टें दूध , २ शिवनिर्माल्य - शंकराच्या मस्तकापासून निघालेली गंगा , ३ वमन - मधमाश्यांपासून उत्पन्न झालेला मध , ४ शवकर्पट - प्रेतचीवर म्हणजे किडे नष्ट होऊन उत्पन्न झालेलें रेशीभ व ५ काकविष्ठेपासून झालेला पिंपळ .

उच्छिष्टं शिवनिर्माल्यं वमनं शवकर्पटः ।

काकविष्ठासमुत्पन्नाः पञ्चैतेऽतिपवित्रकाः ॥ ( सु . )

पांच वस्तु निद्रेसप्रयीं जवळ असाव्या - १ पादत्राण , २ काठी , ३ पाण्याचें तांब्याचें भांडें , ४ दिवा व ५ आगपेटी .

पांच वस्तु स्वर्गांत देखील दुर्मिळ - १ विद्या , २ उंच उंचा घरें , ३ केशर , ४ बर्फमय पाणी , व ५ द्राक्षें . पण या पांचहि वस्तु भूनंदनवन - काश्मीरमध्यें विपुल प्रमाणांत .

विद्या वेश्मानि तुङ्‌‍गानि कुकुमं सहिमं पयः ।

द्राक्षेति यत्र सामान्यमस्ति त्रिदिवदुर्लभम् ‌‍ ॥ ( राजतरंगिणी )

पांच वनस्पति पापमोचक - ( अ ) १ सोमवल्ली , २ शमी , ३ आपटा , ४ तुळस ( पांढरी व काळी ) आणि ५ तीळ . ( आ ) १ तुळस , २ शमी , ३ आपटा , ४ गोरोचन व ५ तीळ . ( निघंट शिरोमणि )

पांचावर शस्त्रप्रहार करूं नये - १ स्त्री , २ गाय , ३ ब्राह्मण , ४ ज्याचें अन्न खावें तो व ५ ज्याचा आपण आश्रय केला आहे तो . ( म . भा . सभा . ४१ - ४३ )

पांच वाणीचीं तपें - १ उद्धेग न करणारे , २ प्रिय , ३ हितकर , ४ यथार्थ भाषण आणि ५ स्वाध्याय .

पांच वाचिक दोष - १ अस्त्य भाषण , २ निंदा करणें , ३ मर्मीं लागेल असें बोलणें , ४ आत्मश्लाघा व ५ परदोषकथन .

पांच विद्यासंपादनाचे मार्ग - १ आस्था , २ जिज्ञासा , ३ शिस्त , ४ एकाग्रता आणि ५ तज्ज्ञसहवास .

पांच वैदिक संप्रदायाचे प्रमुख आचार्य - १ श्रीशंकराचार्य , २ श्रीरामानुजाचार्य , ३ श्रीवल्लभाचार्य , ४ श्रीनिंबार्काचार्य व ५ श्रीमध्वाचार्य . वैदिक धर्माला आलेलें मालिन्य नाहींसें करून धर्माची घडी नीट बसवून देणारे हे प्रमुख पांच आचार्य होत .

पांच वैश्याचे स्वाभाविक गुणधर्म - १ श्रद्धा , २ दान , ३ विचारा - प्रमाणें आचार , ४ वेदब्राह्मणांची सेवा आणि ५ धनसंग्रहासंबंधानें असमाधान . ( भा . स्कंध ११ . ३७ . १८ )

पांच शक्ति ( शिवाच्या )- १ चित्शक्ति , २ आनंदशक्ति ,, ३ इच्छाशक्ति , ४ ज्ञानशक्ति , व ५ क्रियाशक्ति , या पांच मुख्य शक्ति शैव मतांत मानल्या आहेत .

पांच शब्द औदार्यसूचक - १ वेदघोष , २ धनुष्याचा टणत्कार ( शत्रूंचा संहार ), ३ खा , ४ प्या व ५ उपभोग घ्या . असे पांच औदार्य सूचक शब्द कधीं नाहीसे झाले नाहींत , अशा प्रकारचें राजा दिलीपाचें राज्य होतें अशी कथा आहे .

पंचशब्दा न जीर्यन्ते खट्‌‍वांगस्य निवेशने ।

स्वाध्यायघोषो ज्याघोषो पिवताश्नीत खादत ॥ ( सु )

पांच शारीरिक तपें - १ देव , गुरुजन आदि ज्ञानी पुरुषांचें पूजन , २ पवित्रता , ३ सरलता , ४ ब्रह्मचर्य आणि ५ अहिंसा .

पांच श्रेष्ठत्वदर्शक नारायणनामें - १ अग्निनारायण , २ वेदोनारायण , ३ व्यासोनारायण , ४ आपोनारायण व ५ सूर्यनारायण . ( ऐति . गोष्टी भाग . ३ रा . )

पांच साधनें आत्मज्ञानाचीं - १ सद्‌‍गुरुप्राप्ति , २ सत्संग , ३ श्रवण , ४ मनन आणि ५ निदिध्यास ( दा . बो )

पांच साधनें सिद्धीचीं - १ जन्म , २ औषश , ३ मंत्र , ४ तप व ५ समाधि ( योगशास्त्र )

पांच सिद्धांत विरोधाभासात्मक व त्यांचा समन्वय ( गीतोक्त )- १ ईश्वर सगुण कीं निर्गुण - तो गुणातीत , २ तो कर्ता कीं द्रष्टा - तो मूळप्रेरक , ३ ईश्वर अंतर्यामी कीं सर्वातीत - दोन्हीहि , ४ जगत् ‌‍ सत्य का असत्य - तें क्षणभंगुर आणि ५ विदेहमुक्ति कीं क्रममुक्ति - जीवन्मुक्ति . ( भ . गी . साक्षात्कारदर्शन )

पांच श्रेष्ठ वेदान्ती - १ याज्ञवल्क्य , २ आरुणि , ३ शांडिल्य , ४ दध्यच आणि ५ सनत्कुमार .

पांच सन्मान स्थानें - १ धन , २ बंधु , ३ अवस्था , ४ कर्म व ५ विद्वत्ता . यांत उत्तरोत्तर प्रशस्त . ( कल्याण मासिक )

पांच स्कंध ( भाग ) ज्योतिषाचे - १ सिद्धांत , २ होरा , ३ संहिता , ४ स्वर व ५ सामुद्रिक . ( तत्त्व - निज - विवेक )

पांच हिंदी संत कवि - १ कबीर , २ जायसी , ३ सूरदास , ४ तुलसीदास व ५ मीराबाई .

पांच हेतु ज्योतिर्गणिताचा विचार करतांना जाणावेत - १ चक्षु , २ शास्त्र , ३ जल . ४ लिखाण व ५ प्रत्यक्ष गणित .

चक्षुःशास्त्रं , जलं लेख्यं गणितं बुद्धिसत्तमाः ।

पञ्चेते हेतवो ज्ञेया ज्योतिर्गणितविचिन्तने ॥ ( वायु . पु . )

पांच हेतु ( विवाहाचे )- १ संयम , २ कुलरक्षण , ३ सुप्रजोत्पादन , ४ प्रेम आणि ऐक्य व ५ भगवद्भाव .

पांच क्षुद्र सिद्धि - १ त्रिकालज्ञान , २ अद्वंद्वता - शीत , उष्ण , सुखदूःख या द्वंद्वाच्या आधीन न होणें , ३ परचित्त ज्ञान , ४ भूत प्रतिकार ( अग्नि , वायु , विष वगैरेंची बाधा न होणें ) आणि ५ अपराजय .

पांच जण आनुवंशिक वीर होत - १ बलराम , २ श्रीकृष्ण , ३ ३ प्रद्युम्न , ४ सांब व ५ अनिरुद्ध ,

संकर्षणो वासुदेवः प्रद्युम्नः सांब एव च ।

अनिरुद्धश्च पञ्चैते वंशवीराः प्रकीर्तिताः ॥ ( वायु . पु . )

पांचजणांना कन्या देऊं नये - १ मूढ , २ विरक्त , ३ स्वतःला फार मोठे समजणारा , ४ रोगी आणि ५ उद्धट .

मूढाय च विरक्ताय आत्मसंभाविताय च ।

आतुराय प्रमत्ताय कन्यादांन न कारयेत् ‌‍ ॥ ( स्कंद , माहेश्वर खंड )

पांचजण अवश्यमेव पोष्य - १ अतिथि , २ बालक , ३ पत्नी , ४ जननी आणि ५ जनक .

अतिथिर्बालकः पत्नी जननी जनकस्तथा ।

पञ्चैते गृहिणः पोष्या इतरे च स्वशक्तितः ॥ ( सु . )

पांचजण यथानुशक्ति पोष्य - १ मोठीं मुलें , २ बाप , ३ नातू , ४ भाऊ आणि ५ भाचा .

बालाः पिता च दौहित्रो भ्राता च भगिनीसुतः ।

एतेऽवश्यं पालनीयाः प्रयत्नेन स्वशक्तितः ॥ ( सु . )

पांचजण कर्मचांडाल होत - १ नास्तिक , २ पिशुन , ३ कृतघ्न , ४ दीर्घद्वेषी आणि ५ अधर्मजन्य संतति .

नास्तिकः पिशुनश्चैव कृतघ्नो दीर्घदोषकः ।

चत्वारः कर्मचांडाला जन्मतश्चापि पंचमः ॥ ( व . स्मृति )

पांचजण कार्य उरकलें म्हणजे तृणवत् ‌‍ होतात - १ उपाध्याय , २ वैद्य , ३ ऋतुकालीन स्त्री , ४ सुईण आणि ५ दूती . हे पांचजण तें तें कार्य उरकलें म्हणजे तृणवत् ‌‍ होतात .

पांचजण गुरुसमान - १ पिता , २ माता , ३ अग्नि , ४ आत्मा आणि ५ आचार्य . ( म . भा . वन . १२ - २१४ )

पांचजणांना तीर्थाचें फल मिळत नाहीं - १ श्रद्धाहीन , २ स्वभावमच पापमय आहे असा पापात्मा , ३ नास्तिक , ४ संदेहशील व ५ हेतुवादी .

अश्रद्दधानः पापात्मा नास्तिकोऽच्छिन्नसंशयः ।

हेतुनिष्ठश्च पञ्चैते न तीर्थफलभागिनः ॥ ( कृष्णा म . अ . २९ )

पांचजण दुसर्‍याव जगतात - १ वैद्य - रोग्यावर , २ दुकानदार - गिर्‍हाइकावर . ३ शहाणा - अजागळावर . ४ चोर - गाफिलावर आणि ५ भिक्षुक - गृहस्थावर . ( पंचतत्र )

पंचजणांना निद्रा येत नाहीं - १ बलवानानें दांत धरलेला . २ दुर्बल आणि साधनहीण , ३ सर्वस्व गमावून बसलेला , ४ विषयलंपट व ५ चोर . ( म . भा . उद्योग ३३ - १३ )

पांचजण नित्य स्मरणीय - १ जननी , २ जनक , ३ विद्यादाता , ४ राष्टृ आणि ५ धर्माचा उपदेशक .

जननी जन्मदाता च सुविद्यां प्रददाति यः ।

राष्ट्रं धर्मोपदेष्टा च पञ्चक संततं स्मरेत् ‌‍ ॥ ( सु . )

पांचजण पंक्तिपावन होत - १ विकलांग नसलेला , २ विनयी , ३ योगी , ४ सकलशास्त्र्ज्ञ व ५ फिरता साधु .

षडङ्‌गी विनय़ी योगी सर्वतन्त्रस्तथैव च ।

यायावरश्च पञ्चैते विज्ञेयाः पंक्तिपावनाः ॥ ( वायु . पु . )

पांचजण पचनशक्ति श्रेष्ठ असलेले - १ अगस्ति , २ कुंभकर्ण , ३ शनि , ४ वनवानल आणि ५ वृकोदर .

अगस्तिं कुंभकर्णं च शनिं च वडवानलम् ‌‍ ।

आहारपरिपाकार्थं स्मरामि च वृकोदरम ‌‍ ॥ ( यो . र . भाग १ )

पांचजण पित्यासमान - १ जन्मदाता , २ उपनयनकर्ता , ३ विद्या देणारा , ४ अन्नदाता आणि ५ भयत्राता .

जनिता चोपनीता च यस्तु विद्यां प्रयच्छति ।

अन्नदाता भयत्राता च पञ्चैते पितरः स्मृताः ॥ ( वृ . चा ४ . ९ )

पांच चणांना विद्या प्राप्त होत नाहीं - १ रागीट , २ दुराग्रही , ३ आळशी , ४ रोगी आणि ५ चंचल चित्त असलेला .

पञ्च विद्यां न गृह्लन्ति चंडास्तब्धा च ये नराः ।

अलसश्च सरोगश्च येषां च विस्मृतं मनः ॥ ( नारदीय - पूर्वखंड )

पांचजणांवर विश्वासूं नये - १ जामात , २ कृष्णसर्प , ३ अग्नि , ४ दुर्जन व ५ भाचा .

जामातो कृष्णसर्पश्च पावको दुर्जनस्तथा ।

विश्वासो नैव कर्तव्यः पञ्चमो भगिनीसुतः ॥ ( सु . )

पंचजण विद्वान ‌‍ असले तरी अपूज्य - १ चंचल , २ कठोर , ३ दुराग्रही , ४ निंद्य वस्त्र धारण करणारा आणि ५ आगंतुक .

अधीरः कर्कशः स्तब्धः कुचलः स्वयमागतः ।

पंच विप्रा न पूज्यन्ते बृहस्पतिसमा अपि ॥ ( गरुड . आचारकांड )

पांचजण व्याधींचा परिहार करणारे - १ धन्वंतरी , २ बृकोदास , ३ काशीराज , ४ नकुल आणि ५ सह्देव , हे पांच व्याधींचा परिहार करणारे म्हणून सांगितले आहेत . ( नेपाळी पंचांग )

पंचजण संगतीला वर्ज्य - १ गर्विष्ठ , २ मूर्ख , ३ रागीट , ४ अविचारी आणि ५ धर्माला सोडून वागणारा .

पांच संस्कृत महाकवि - ( अ ) १ कालिदास , ज २ भवभूति , ३ भारवि , ४ माघ व ५ हर्ष ; ( आ ) १ कालिदास , २ भवभूति , ३ दंडी , ४ वाण आणि ५ सुबंधु ,

पांचजण सुखानें निद्रा करणारे - १ अगस्ति - अन्न चांगलें पचल्यामुळें , २ माधव - पुण्याचरणामुळें , ३ मुचकुंद - फर मेहनत झाल्यामुळें , ४ कपिल - घ्यानधारणेमुळें आणि ५ आस्तिक - दुष्टावरसुद्धां उपकार करणारा . निद्रासमयीं या पांचांचें स्मरण केल्यानें सुखानें निद्रा येते .

अगस्तिर्माधवश्चैव मुचकुंदो महामुनिः ।

कपिलो मुनिरस्तिकः पञ्चैते सुखशायिनः ॥ ( गोभिल )

पांचजणांच्या स्प्ररणानें घोर संकटांचा नाश होतो - १ हर , २ हरि , ३ हरिश्रंद्र , ४ हनुमान् ‌‍ आणि ५ हलायुध , ( माध्यं . आ . सूत्रावलि )

पांचजण जिवंत असून मृतवत् ‌‍ होत - १ दरिद्री , २ नित्यरोगी ३ मूर्ख , ४ सदा प्रवास करणारा , ५ आजन्म नोकरीवर निर्वाह करणारा .

जीवन्तोऽपि मृताः पञ्च श्रूयन्ते किल भारते ।

दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः ॥ ( पंचतंत्र )

पांच जणांच्या स्मरणानें द्दष्टिदोष होत नाहीं - १ शर्याति , २ शर्यातिकन्या - सुकन्या , ३ च्यवनमहार्षि , ४ सोम व ५ अश्चिनीकुमार .

शर्यातिं च सुकन्यां च च्यवनं सोममाश्चिनौ ।

भोजनान्ते स्मरेन्नित्यं तस्य चक्षुर्न हींयते ॥ ( सु . )

पांचाच्या स्मरणानें वेदपठणास प्रवृत्त व्हावें - १ गणेश , २ सरस्वती , ३ रवि , ४ शुक्र आणि ५ बृहस्पति .

गणनाथसरस्वतीरविशुक्रबृहस्पतीन् ‌‍ ।

पंचैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणीप्रवृत्तये ॥ ( प्रातःस्मरण )

पांच जणांच्या स्मरणानें विषबाधा होत नाहीं - १ कपिला , २ कालिया , ३ अनंत , ४ वासुकि व ५ तक्षक ( माध्यं , आ . सूत्रावलि )

पांचजणांच्या प्रातः स्मरणानें सौभाग्यवर्धन होतें - १ उमा , २ उषा , ३ जानकी , ४ रसा आणि ५ गंगा ( माध्यं . आ . सूत्रावलि )

पांचजणांना नांवानें संबोधूं नये - १ आत्मनाम , २ गुरु , ३ अतिकृपण मनुष्य , ४ ज्येष्ठपुत्र व ५ पत्नी . कल्याणेच्छु पुरुषानें या पांचांना नांवानें संबोधूं नये .

आत्मनाम गुरोर्गाम नामातिकृपणस्य च ।

श्रेयःकामो न गृह्लीयात् ‌‍ ज्येष्ठापत्यकलत्रयोः ॥ ( सु . )

पांचजणांची पांच प्रकारची आसक्ति - १ हरिण - शब्द - ध्वनिलुब्ध झाल्यामुळें , २ हत्ती - स्पर्श - हत्तिणीवर आसक्त झाल्यामुळें , ३ पतंग - रूप - दिव्यावर मोहित झाल्यानें , ४ भ्रमर - रम - मधुररसावर आसक्त झाल्यामुळें आणि ५ मत्स्य - गंध - आमिषाला भूलून जाळ्यांत अडकल्यामुळें . असे हे पांच विषयांच्या आसक्तीनें नष्ट होतात .

" कुरंग - पातंग - पतंग - भृंग - मीना हताः पंचभिरेव पंच ( गरुड . ६ - ३५ )

पांच जणांडून प्रजेला भय असतें - १ अधिकारी वर्ग , २ चोर , ३ शत्रु ४ शासनाचे संबंधी लोक व ५ लोभी शासन मंडळ " प्रजानां पञ्चधा भयम् ‌‍ " ( नीतिसार )

अंतःकरणपंचक - १ अंतःकरण , २ मन , ३ बुद्धि , ४ चित्त , व ५ अहंकार . ( दा . बो . १७ - ८ )

गाथापंचक - १ श्रीज्ञानदेव गाथा , २ श्रीनामदेव गाथा , ३ श्रीएकनाथ गाथा , ४ श्रीतुकाराम गाथा व ५ श्रीसंत गाथा .

गीतपंचक - १ वेणूगीत , २ गोपीगीत , ३ युगलगीत , ४ भ्रमरगीत व व ५ महिषीगीत . या भागवतांतील भक्तिरसानें भरलेल्या पांच गीतांस गीतपंचक अशी संज्ञा आहे .

दुष्टपंचक - १ वाणी दुष्ट असणें , २ क्रिया क्रूर असणें , ३ स्वाभाविक दुष्टता , ४ संसर्गदुष्टता आणि ५ शिळेंपाकें . यांना दुष्टपंचक म्हणतात . हीं वर्ज्य करावींत .

भावदुष्टं क्रियादुष्टं जातिदुष्टमिति त्रिधा ।

संसर्गं कालदुष्टं च वर्जयेत् ‌‍ दुष्टपंचकम् ‌‍ ॥ ( द्वैतसिद्धान्तकेसरी )

देवतापंचक - १ अग्नि , २ वायु , ३ सूर्य , ४ चंद्र व ५ नक्षत्रें , ( तैत्तिरीय उपनिषद )

नारीपंचक - १ गायत्री , २ भूति , ३ श्री , ४ धी आणि ५ जयन्ती . राष्ट्राराष्ट्रांतील युद्धामुळें स्त्रीपुरुषांना अपत्यांचा कंटाळा आल्यामुळें प्रजा झपाटयानें नाहींशी होत चालली . अखेर पांच स्त्रिया राहिल्या त्या . आपटेकृत अजरामर )

निदानपंचक - १ निदान , २ पूर्वरूप , ३ रूप , ४ उपशय आणि ५ संप्राप्ति . या पांच प्रकारांनीं रोगाचें ज्ञान होतें . ( सार्थ माधवनिदान )

पुरुषपंचक - १ गौतम , २ कौशिक , ३ अगस्ति , ४ धाता आणि ५ शुक्त . राष्ट्राराष्ट्रांतील युद्धांमुळें स्त्रीपुरुषांना अपत्यांचा कंटाळा आला . अखेर पाच पुरुष राहिले ते . ( आपटेकृत अजरामर )

पुष्पपंचक - १ चाफा , २ आंबा , ३ शमी , ४ कमळ व ५ कण्हेर . ’ चम्पकाम्रशमी पद्म करवीरं च पञ्चकम् ‌‌ । ’ ( भविष्य मध्यम पर्व )

प्राणपंचक - १ प्राण , २ अपान , ३ व्यान , ४ उदान व ५ समान .

मघापंचक - १ मघा , २ पूर्वा , ३ उत्तरा , ४ हस्त व ५ चित्रा .

मलंपचक - १ मिथ्याज्ञान , २ अधर्म , ३ आसक्ति , ४ हेतु आणि ५ च्युति . हे पांच अंतःकरणाचे मल होत . ( नकुलीश पाशुपतदर्शन )

मृगपंचक - १ मृग , २ आर्द्रा , ३ पुनर्वसु , ४ पुष्य व ५ आश्लेषा .

विषयपंचक - १ शब्द , २ स्पर्श , ३ रूप , ४ रस आणि ५ गंध .

प्रवाळपंचामृत - १ प्रबाळ , २ मोतीं , ३ शंख , ४ कवडी व ५ मोत्यांचा शिंपला . या पांचांना मिळून प्रवाळपंचामृत असें म्हणतात .

भागवत धर्माची पंचाध्यायी - एकादश स्कंधाच्या पहिल्या पांच अध्यायांना म्हणतात . यांत नारदानें वसुदेव - देवकीस सर्व भागवत धर्मरहस्य सांतितलें आहे . ( भागवत ११ - १ ते ५ )

तो मार्ग दावावया पुरा , हांकारी स्त्री शुद्रा पंचाध्यायी ॥ ( ए . भा . अ . २ )

रासपंचाध्यायी - श्रीमत् ‌‍ भागवत दशमस्कंध अध्याय २९ ते ३३ . या पांच अध्यायांत भागवतांतील सर्व भक्तिसर्वस्व व काव्यकौशल्य भरलेलें आहे . यास रासपंचाध्यायी असें म्हणतात .

एकनाथंपचायतन - १ एकाजनार्दन , २ रामाजनार्दन , ३ जनीजनार्दन ४ विठारेणुकानंदन आणि ५ दासोपंत .

कृष्णपंचायतन - १ बलराम , २ गरुड , ३ श्रीकृष्ण , ४ अर्जुन आणि ५ उद्धव .

गणेशपंचायतन - १ विष्णु , २ शिव , ३ गणेश , ४ सूर्य आणि ५ देवी .

" मध्ये गणपतिर्विष्णुशिवसूर्थांबिका ईशानादिक्रमेण . " ( धर्मसिंधु )

देवतापंचायतन - १ सूर्य ( उग्र प्रकाश ), २ चंद्र ( सौम्य प्रकाश ), ३ बायु ( गति ), ४ अग्नि ( ताप ) आणि ५ आप ( शांति ). ( अथर्ववेद )

दत्तपंचायन - १ सूर्य , २ अनसूया , ३ दत्त , ४ अग्नि व ५ गणपति . असा पूजा प्रकार इंदापुरास ( जि . पुणें ) आहे . ( स्वराज्य साप्ताहिक )

देवीपंचायतन - १ विष्णु , २ शिव , ३ देवी , ४ गणेश आणि ५ सूर्य .

बद्रीशपंचायतन - १ गणेश , २ कुबरे , ३ बद्रीनाथ , ४ लक्ष्मी व ५ नारनारायण .

रामपंचायतन - ( अ ) १ श्रीराम ( जानकीसह ), २ लक्ष्मण , ३ भरत , ४ शत्रुघ्र व ५ मारुती हे पांच मिळून रामपंचायतन होतें .

वारकरीपंचायतन - १ नामदेव , २ ज्ञानदेव , ३ तुकाराम , ४ एकनाथ व ५ निळोबा .

विष्णुपंचायतन - १ शिव , २ गणेश , ३ विष्णु , ४ सूर्य व ५ देवी .

शिवपंचायतन - १ विष्णु , २ सूर्य , ३ शिव , ४ गणेश व ५ देवी .

समर्थपंचायतन - १ श्रीसमर्थ , २ जयरामस्वामी वडगांवकर , ३ रंगनाथस्वामी निगडीकर , ४ केशवस्वामी भागानगरकर आणि ५ आनंदमूर्ति ब्रह्मनाळकर .

सूर्यपंचायतन - १ शिव , २ गणेश , ३ सूर्य , ४ विष्णु व ५ देवी .

श्रीज्ञानेश्वरपंचायतन - १ निवृत्ति . २ ज्ञानदेव , ३ सोपान , ४ मुक्ताबाई आणि ५ चांगदेव तथा चांगावटेश्वर .

श्रीशिवपंचस्थली ( शिवाजीमहाराजांची )- १ जन्भभूमि - शिवनेरी , २ कार्यारंम - तोरणा , ३ बलिदान - घोडखिंड , ४ प्राणार्पण - सिंहगड आणि ५ समाधि - रायगड .

श्रीसमर्थपंचस्थली - १ जन्ममूमि - जांब , २ तपोभूमि - टाकळी , ३ कार्यभूमि - कृष्णातीर , ४ इष्ट देवता स्थापना स्थळ - चाफळ आणि ५ समाधि - सज्जनगड .

श्रीकृष्णचरित्रांतील लीलायुगुलपंचक - १ दोन पिता - वसुदेव , नंद ; २ दोन माता - देवकी , यशोदा ; ३ दोन भगिनी - सुमद्रा , द्रौपदी ; ४ दोन गुरु - श्रीदुर्वास , सांदीपनि आणि ५ दोन शिष्य - अर्जुन , उद्धव ; याखेरीज श्रीकृष्णांनीं निर्माण केलेले ग्रंथहि दोनच आहेत . गीता आणि भागवत .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP