मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६

संकेत कोश - संख्या ६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सहा प्रकारचीं विषें - १ निकोटीन , २ प्रसिकऑसिड , ३ पाइअरीडीन , ४ कोलीडीन , ५ अमोनिया आणि ६ कार्वन मोनो ऑक्साइड . अशीं सहा प्रकारचीं विषें तंबाखूंत असतात . असे चालू युगाचे वैज्ञानिक सांगतात . ( कल्याण जून १९६१ )

सहा प्रकार व्याख्यानांत आवश्यक - १ संधी सोडून पदें सांगणें , २ पदांचा अर्थ , ३ समास सोडवणें , ४ वाक्य योजना , ५ आक्षेपांचा अनुवाद करणें व ६ त्या आक्षेपांचें निरसन करणें . ( वैदिकधर्म व भारतीय राजनीति )

सहा प्रकार शृंगार चेष्टांचें - १ विलास , २ विव्वोक , ३ विभ्रम , ४ ललित , ५ हेला व ६ लीला . ( अमर )

सहा प्रकारचे वैष्णव - १ भक्त , २ भागवत , ३ वैष्णव , ४ पांच - रात्रागमाप्रमाणें चालणारे , ५ वैखानसशाखी व ६ कर्म न करणारे .

भक्ता भागवतश्चैन वैष्णवाः पांचरात्रिणः ।

वैखानसाः कर्महीनाः षड्‌‌विधा वैष्णवा मताः ॥

सहा प्रकार सैन्याचे - १ पिढीजाद सैन्य , २ पगारी , ३ पथक सैन्य , ४ मित्रराजांचें , ५ शत्रुराजांचे आणि ६ रानटी लोकांचें सैन्य , असे सहा प्रकार महाभारतकालीं असत . ( कौ . अर्थ . अधि . ९ )

सहा प्रकार ( स्नानाचे )- १ नित्य , २ नैमित्तिक , ३ काम्य , ४ क्रियास्नान , ५ मलापकर्षण आणि ६ कर्मांग .

नित्यं नैमित्तिकं काम्यं क्रियाख्यं मलकर्षणम् ‌‍ ।

कर्माङ्राश्चेति विज्ञेया षट्‌‍प्रकाराः समासतः ॥ ( भ . ब्राह्म . )

सहा प्रकारचें स्त्रीधन - १ विवाहसमयीं अग्नीसमक्ष दिलेलें २ सासरीं जातांना मिळालेलें , ३ प्रेमानें दिलेलें , ४ भावाकडून मिळालेलें , ५ मातेकडून मिळालेलें व ६ पित्याकडून मिळालेलें . ( मनु . ९ - १९४ )

सहा प्रकारची समाधि - १ द्दश्यानुविद्ध , २ शब्दानुविद्ध , ३ निः - संकल्प , ४ निर्विकल्प , ५ निर्वृत्तिक आणि ६ निर्वासन . ( सरस्वती रहस्यो - पनिषद् ‌‌ )

सहा प्रकारची सिद्धि - १ प्रतिभा ( त्रिकालज्ञान ), २ श्रवणा , ३ वार्ता , ४ दर्शना , ५ आस्वादा आणि ६ वेदना ( स्पर्शज्ञान ).

( लिंग . अ . ४ )

सहा प्रकार सिद्धांचे - १ नित्यसिद्ध , २ अचानकसिद्ध , ३ स्वप्रसिद्ध , ४ दैवसिद्ध , ५ कृपासिद्ध व ६ हठात्‌‌सिद्ध , असे सहा मुख्य प्रकार . ( जीवनविकास . आक्टोबर १९६२ )

सहा प्रकार सूत्रांचे - १ संज्ञासूत्रें , २ परिभाषासूत्रें , ३ विधिसूत्रें , ४ नियमसूत्रें , ५ अतिदेशसूत्रें व ६ अधिकारसूत्रें , ( व्याकरण म . भा प्रस्तावना )

सहा प्रकारचें सैन्यबल - १ शारीरिक बल - कष्ठाळूपणा , २ शूर असणें , ३ सैन्यबल - भरपूर संख्या असणें , ४ आस्त्रिक बल - तीक्ष्ण ह्त्यारें , ५ बुद्धिबल आणि ६ आयुर्बल - सैन्याचा सतत पुरवठा होत असणें . ( शुक्र - नीति अ . ४ )

सहा प्रकार हास्याचे - १ स्मित - गालांतल्या गालांत हसणें , २ दांत काढून हसणें , ३ विहसित - बोलत बोलत हसणें , ४ उपहसित - नाक फुगवून हसणें , ५ अपहसित - डोळ्यांला आंसवें आणून हसणें आणि ६ अतिहसित - मोठमोठयानें टाळी वाजवून हसणें . ( तत्त्व - निज - विवेक भ . ना . ६ - ६० )

सहा प्रकारचे होम - १ राष्ट्रभृत होम , २ जया होम , ३ अभ्यातन होम , अरिष्टनाशक , ५ लाजा होम व ६ पापमोचन . असे सहा प्रकारचे होम विवाहसंस्कारसमयीं करावे लागतात . ( रामतीर्थ . दिवाळी अंक )

सहा प्रकार संभोगासनांचे - १ उत्तान आसन , २ तिर्यक् ‌‍ आसन , ३ उपविष्ट आसन , ४ उत्थित आसन , ५ व्यानत आसन व ६ पुरुषायित आसन ( कामशास्त्र )

सहा प्रकार ( संन्यासाचे )- १ कुटीचक , २ बहूदक , ३ हंस , ४ परमहंस , ५ तुरीयातीत व ६ अवधूत , ( नारद परिव्राजकोपनिषद )

सहा प्रयोजनें ( काव्याचीं )- १ कीर्ति , २ धनप्राति , ३ व्यवहारज्ञान , ४ अशुभपरिहार , ५ परमानंद व ६ कांतेकडून होतो तसा माधुर्यानें तत्त्वबोध . ( काव्यप्रकाश )

सहा प्राचीन तेलगु कवि आणि त्यांचीं काव्यें - १ नन्नयभट्ट - तेलगू महाभारत , २ तिक्कन सोमयाजी - निर्वचनोत्तर रामायय्ण महाभारत , ३ एराप्रग्गड - हरिवंश , ४ नाचनसोम - उत्तर हरिवंश , ५ श्रीनाथ - आंध्रनैषध ६ व वम्मन पोतराम - श्रीमद्भागवत . संस्कृत भागवत पुराण शैलींत तसें आंध्रभागवत प्रबंध शैलींत प्रसिद्ध आहे . ( म . ज्ञा . को . वि . १५ )

सहा स्थानें भुक्ति आणि मुक्ति ह्मा दोन्ही प्राप्त करून देणारीं - १ करवीर , २ विरूपाक्ष , ३ श्रीशैल , ४ पंढरीक्षेत्र , ५ श्रींरगम् ‌‍ व ६ सेतुबंध रामेश्वर .

करवीरं विरूपाक्षं श्रीशैलं पांडुरंगकम् ‌‍ ।

श्रीरङ्‌‌गं सेतुबन्धं च भुक्तिमुक्तिप्रदानि षट् ‌‍ ॥ ( करवीरमहात्म्य )

सहा प्रमाणें - १ प्रत्यक्ष , २ अनुमान , ३ शब्द , ४ उपमान , ५ अर्थापत्ति व ६ अनुपलब्धि .

सहा प्रमुख अंगें संध्येचीं - १ आसन , २ आचमन , ३ प्राणायाम , ४ मार्जन , ५ अर्व्यप्रदान व ६ जप व उपस्थान , ( आर्यांची दिनचर्या )

सहा प्रमुख नीतिशास्त्रकार - १ मनु , २ बृहस्पति , ३ शुक्र , ४ पराशर , ५ व्यास व ६ कौटिल्य .

सहा पशुधर्म - १ आच्छादन २ भोजन ३ मैथुन ४ भय ५ निद्रा व ६ मोह .

छादन भोजन मैथुन । भय निद्रा मोह षटधर्मा ॥ ( पंचग्रंथी )

सहा पंथ गाणपत्य सांप्रदायाचे - १ महागणपति पंथ , २ हरिद्रा गणपति , ३ उच्छिष्ट गणपति , ४ नवनीत गणपति , ५ स्वर्ण गणपति व ६ संतान गणपति पंथ . ( अ . रा . सर्ग . ७ - ७ )

सहा प्राचीन पुराणवेत्ते - १ त्रैयारुणी , २ कश्यप , ३ सावर्णि , ४ अकृतव्रण , ५ वैशंपायन व ६ हारीत . ( भा . स्कंध १२ - ७ - ५ )

सहा प्रीतिलक्षणें - १ जो देतो , २ तसेंच घेतो , ३ आपलें गुह्म सांगतो , ४ तसेंच ऐकून घेतो , ५ पंक्तीला जेवतो , आणि ६ जेवूंहि घालतो . हीं सहा प्रीतिलक्षणें होत .

ददति प्रतिगृह्लाति गुह्ममाख्याति पृच्छति ।

भुंक्ते भोजयते चैव षड्‌‍विधं प्रीतिलक्षणम् ‌‍ ॥ ( हितो . २ - ५१ )

सहा प्रेरणा ग्रंथलेखनाच्या - १ द्रव्य , २ कीर्ति , ३ अमंगल स्थितींतून मुक्त होण्यासाठीं , ४ सरकार - दरबारची लोकांना माहिती पुरविण्यासाठीं , ५ तात्कालिक आनंद व ६ उपदेश करण्यासाठीं , अशा सहा प्रेरणा अथवा प्रयोजनें आहेत .

सहा ब्रह्मवादी - १ काश्यप , २ वत्सार , ३ विभ्रस , ४ रैभ्य , ५ असित आणि ६ देवल .

काश्यपश्वैव वत्सारो विभ्रमो रैभ्य एव च ।

असितो देवलश्चैव षडेते ब्रह्मवादिनः ॥ ( वायुपु . ५९ - १०३ )

सहा भाग पृथ्वीचे - १ द्यु २ पृथिवी , ३ अहन ‌‍ , ४ रात्रि , ५ उदक व ६ ओषधी ( ऋग्वेद मंडल ६ - ४७ )

सहा भाव - जीवगर्भोत्पत्तीला कारणीभूत - १ मातेचा भाव , व ६ सत्त्वाचा भाव ( ईशावास्योपनिषद - आर्य भैषज्य शास्त्र )

सहा महारथी ( कौरवपक्षीय )- १ कर्ण , २ भूरिश्रवा , ३ अश्वत्थामा , ४ वृषसेन , ५ कृपाचार्य व ६ शल्य

( म . भा . द्रोण . अ . ७५ )

सहा महान दोष ( आसुरी वृत्तीच्या मानवांचे )- १ दंभ , २ दर्प , ३ अभिमान , ४ क्रोध , ५ दुष्टपणा आणि ६ अज्ञान , हे सहा महान् ‌‍ दोषा संख्येनें कमी असले तरी त्यांचा प्रभाव विषारी असतो . ( भ . गी . १६ - ४ )

सहा मनोव्यापार कार्यान्वित होणारे विज्ञानाचे रचनेस आवश्यक - १ निरीक्षण , २ विकलन ( पृथक्करण ), ३ संक्लन , ४ अमूतींकरण , ५ सामान्यीकरण व ६ समन्वय . ( तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक विवेचन पद्धति )

सहा मुख्य परिमेयें - १ लांबी , २ क्षेत्रफळ ( पृष्ठफळ ) ३ अवकाश फळ अगर घनफळ ( गर्मफळ ), ४ वजन , ५ मूल्य व ६ काल . खेरीज घनता व शक्ति अशीं अनेक परिमेयें गणिताच्या उपशाखांतून द्दष्टीस पडतात . ( म . ज्ञा . को . वि . ९ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP