मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५०

संकेत कोश - संख्या ५०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पन्नासगुणी औषधी तांबूल ( विडा )- १ विडयाची पानें , २ सुपारी , ३ चुना , ४ कात , ५ काजू , ६ जायफळ , ७ पत्री , ८ लवंग , ९ वेलदोदे , १० कंकोळ , ११ पिस्ते , १२ अक्रोड , १३ बदाम , १४ खोबरें , १५ केशर , १६ कस्तुरी , १७ खारीक , १८ वेदाणा , १९ खडीसाखर , २० ज्येष्ठमध , २१ गुलाबकळी , २२ पुदीना , २३ दालचिनी , २४ पांढर्‍या - गुंजेची पानें , २५ जिरे , २६ शहाजिरे , २७ सुंठ , २८ तमालपत्र , २९ दगडफूल , ३० भुईमूग , ३१ मध , ३२ मनुका , ३३ ओंवा , ३४ पाच ३५ चंदन , ३६ हीना , ३७ बकुल , ३८ वाळा , ३९ तळलेला डिंक , ४० अहाळीव , ४१ कोरटे , ( कारळे ) ४२ तीळ , ४३ जवस , ४४ मोहरी , ४५ मेथी , ४६ धणे , ४७ कापूर , ४८ जर्दाळू , ४९ जर्दाळू , बी व ५० चारोळी . हा विडा बाळंतिणीस तसेच अजीर्ण व पोटदुखी यांवर गुणकारी आहे .

पन्नास - प्राचीन भारतीय क्रीडा - १ कृत्रिम वृषमक्रीडा , २ निलयन क्रीडा , ३ मर्कटोत्प्लवन क्रीडा , ४ शिक्यादि - प्रोषण क्रीडा , ५ अहमह - मिका - स्पर्श क्रीडा , ६ भ्रामण क्रीडा , ७ गर्तादिलंधन क्रीडा , ८ बिल्‌वादि प्रक्षेपण क्रीडा , ९ अस्पर्श्यत्व क्रीडा , १० नेत्रवन्ध क्रीडा , ११ स्वेदांदोलिक क्रीडा , १२ नृप क्रीडा , १३ हरिणा क्रीडनक , १४ वाह्म - वाहक क्रीडा , १५ देव - दैत्य क्रीडा , १६ जलक्रीडा , १७ कन्दुक क्रीड , १८ वनभोजन क्रीडाअ , १९ रासक्रीडा , २० छालिक्य क्रीय , २१ नियुद्ध क्रीडा , २२ नृत्य क्रीडा , २३ अक्षक्रीडा , २४ मृगयाक्रीडा , २५ पक्षिघात क्रीडा , २६ मत्स्यक्रीडा , २७ चतुरंग क्रीडा , २८ शालमंजिका क्रीडा , २९ लतोद्वाह क्रीडा , ३० वीटा क्रीडा , ३१ कनशृंगकोण क्रीडा , ३२ विवाह क्रीड , ३३ हल्लीश क्रीडा , ३४ गानकूर्दन क्रीडा , ३५ नौक्रीडा , ३६ जलस्तंभक्रीडा , ( जलस्तंम विद्या दुर्योधनाला अवगत होती , ) ३७ वनविहार क्रीडा , ३८ आमलक मुष्टयादि क्रीडा , ३९ दर्दुरप्लाव क्रीडा , ४० नाटयाक्रीडा , ४१ अलात चक्रक्रीडा , ४२ गदा क्रीडा , ४३ अशोक - पादप्रहार क्रीडा , ४४ चित्रक्रीडा , ४५ काव्यविनोद क्रीडा , ४६ बाजिवाह्य क्रीडा , ४७ करिवाह्य क्रीडा , ४८ मृगवाह्य क्रीडा , अ ४९ गोपक्रीडा , आणि ५० घटक्रीडा , या प्रमुख पन्नास प्रकारच्या क्रीडा प्राचीन कालीं भारतांत प्रचलित होत्या . ( कल्याण - हिंदु सं . अंक )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP