मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५

संकेत कोश - संख्या ५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पंच व्यास - १ बृहद्वयास , २ देवव्यास , ३ मानवव्यास ४ द्वैपायनव्यास आणि ५ वेदव्यास .

पंचविध चित्तवृत्ति - १ प्रमाण , २ विकल्प , ३ विपर्यय , ४ निद्रा व ५ स्मृति ( योगशास्त्र )

पंचविध दानें - १ धर्ममूलक - निर्मत्सर बुद्धीनें देणें , २ अर्थमूलक - याचकाच्या तोंडूउन धन्योद्नार , ३ भयमूलक - पीडा देईल म्हणून , ४ काममूलक - परस्पर प्रेम जाणून , ५ करुणामूलक - दया म्हणून .

पंचविध द्दष्टान्त - १ शुक्तिरजत न्याय - शिंपीच्या ठिकाणीं रुप्याचा आभास , २ रज्जुसर्प न्याय - रज्जूवर सर्पाचा आभास , ३ स्थाणुचोर न्यायस्थाणु ( खोड ) त्याचे ठिकाणीं चोराचा भास , ४ ख - पुष्प न्याय - आकाशामध्यें पुष्पाचा किंवा नीलतेचा भास आणि ५ मृगजल न्याय - मध्याह्ल समयीं मरुभूमीवर प्रतिबिंबित होणारा पाण्याचा आमास . असे जगन्मिथ्यात्वाविषयीं पंचविध द्दष्टान्त आहेत .

पंचविध प्रकार पारमार्थिक अनुभूतीचे - १ श्रवण , २ स्पर्श , ३ दर्शन , ४ आस्वाद आणि ५ गंध ( रानडे चरित्र व तत्त्वज्ञान )

पंचविध पांडित्य - १ वक्तृत्व , २ कवित्व , ३ वादित्व , ४ आगभिकत्व व ५ सारस्वतप्रमाण ( वस्तुरत्नकोश )

पंचविध ( प्रभुत्व )- १ कुलप्रभुत्व , २ ज्ञानप्रभुत्व , ३ दानप्रभुत्व , ४ स्थानप्रभुत्व आणि ५ अभयप्रभुत्व असे मोठेपणाचे पांच प्रकार .

( वस्तुरत्नकोश )

पंचविध लक्षणें ( समर्थ सांप्रदायाचीं )- १ शुद्ध उपासना , २ विमलज्ञान , ३ बीतराग , ४ ब्राह्मण्यरक्षण व ५ गुरुपरंपरा ( समर्थबाङ्मय )

पंचविधलक्षणें साक्षात्कारी पुरुषांचीं - १ मौन , २ नम्रता , ३ समता , ४ प्रपत्ति ( पूर्ण शरणागति ) व ५ परोपकार ( हिंदी संत परमार्थमार्ग )

पंचविध सृष्टिविकास - १ जडजीवन , २ वनस्पतिजीवन ३ प्राणिजीवन ४ मानवजीवन आणि ५ परमात्मजीवन ( अरविंददोहन धार २ री )

पंचशिला - १ नारद शिला , २ नृसिंह शिला , ३ वराह शिला , गरुड शिला आणि ५ मार्केडेय शिला . हीं पांच तीर्थें . त्या त्या तीर्थांच्या ठिकाणीं अति अजस्त्र शिला बद्रीनाथास अलकनंदेच्या प्रवाहांत आहेत . त्या ठिकाणीं ज्यांनीं तपश्चर्या केली त्यांचीं नांवें दिलीं आहेत .

पंच शिल्पकार - १ सुतार , २ कोष्टी , ३ न्हावी , ४ धीबी व ५ चांभार .

तक्षश्च तंत्रवायश्च नापितो रजकस्तथा ।

पंचमश्चर्मकारश्च कारवः शिल्पिनो मताःअ ॥ ( सु )

पंचशील ( भगवन ‌‍ बुद्धाचे )- १ स्वतः हिंस करूं नये व दुसर्‍याला अनुमति देऊं नये , २ स्वतः चोरी करूं नये व दुसर्‍याकडून तो घडूं देऊं नये , ४ खोटें कधीं बोलूं नये व खोटयाला संमति देऊं नये व ५ स्वतः मद्यपान करूं नये व दुसर्‍याकडून घंडू देऊं नये .

पंचशील ( आंतरधार्मिक )- १ सर्व धर्मासंबंधीं समान आदर , २ ज्ञानानें धर्मपरिवर्तन मान्य , पण छलबलानें निषिद्ध , ३ पूजास्थानाविषयीं समान आदर , ४ गतकालीन समाजानें केलेल्या पूजास्थानाच्या विध्वंसनासंबंधीं आजच्या समाजाला उत्तरदायी धरूं नये . तसेंच तशा विध्वंसनाचें समर्थनहि करूं नये आणि ५ धार्मिक संघर्षप्रसंगीं परस्पर सहिष्णुतेच्या तत्वावर एकत्र विचारानें मार्ग काढणें . ( केसरी १२।१०।१९५४ )

पंचशील ( आंतरराष्ट्रीय )- १ परस्परांच्या प्रादेशिक अभंगत्वाबद्दल व सार्वमौत्वाबद्दल आदर , २ अनाक्रमण , ३ एकमेकांच्या अंतर्गत कारभारांत हस्तक्षेप न करणें , ४ परस्पर समानता व ५ शांततापूर्ण सहजीवन , हे आतरराष्ट्रीय पंचशील होत . ( केसरी जून १९५५ )

पंच शुन्यें ( शून्य प्रकार )- अधःशून्य - अकार , २ मध्यशुन्युउकार , ३ ऊर्ध्वशून्य - मकार , ४ चतुर्थशून्य - ॐ व ५ शुद्धचैतन्य - निःशुन्य .

" शुद्ध तें पांचवें शून्य । तें निःशून्य बोलिजे " ( दर्शनप्रकाश )

पंचशौच - १ मनःशौच . ( वृद्ध गौतमस्मृति )

पंच ’ स ’ कार - ( अ ) १ सहिष्णुता , २ सेवा , ३ सन्मानदान , ४ स्वार्थत्याग व ५ समता ; ( आ ) १ सत्संग , २ सदाचार , ३ संतोष , ४ सरलता व ५ सत्य .

पंच सरस्वती - सरस्वती नदी पांच ठिकाणीं असून प्रवाह गुप्त आहे असें म्हणतात - १ रुद्रावर्त - हिमालयांत , २ कुरुक्षेत्र , ३ श्रीस्थल - सिद्धपूर , ४ पुष्कर व ५ प्रयाग .

रुद्रावर्ते कुरुक्षेत्रे श्रीस्थले पुष्करेऽपि वा ।

प्रभासे पंचमे तीर्थे पंच प्राची सरस्वती ॥

प्रभासाजवळ प्राचीन सरस्वती आहे . ( ऐति . गोष्टी भाग ३ रा . )

पंच सरोवरें ( पवित्र तीर्थें )- १ नारायण सरोवर - कच्छ प्रांतीं , २ पुष्कर - अजमीर जवळ , ३ बिंदु सरोवर - सिद्धपूर , ४ पंपा सरोवर - किष्किंधे जवळ आणि ५ मानस सरोवर - हिमालयांत . ( ऐति . गोष्टी भाग ३ रा )

पंचसार - १ तूप , २ मध , ३ तापविलेलें दूध , ४ पिंपळी व ५ खडीसाखर . हे पांच पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार . हें ह्रद्रोग . श्वास व कास यांचा नाश करितें .

पंचसम्राट् ‌‍- १ यौवनाश्व ( मांधाता ) अजिंक्य - लोकांना जिंकल्यामुळें , २ भगीरथ - प्रजापालनामुळें , ३ कार्तवीर्य - तपःप्रभावानें , ४ भरत - सामर्थ्यसंपन्न्तेमुळें आणि ५ मरुत् ‌‍- प्रजेची भरभराट करून , या पांचांनीं सम्राट् ‌‍ ही पदवी मिळविली . ( म . भा . अ सभा . १५ - १६ )

पंच सिद्धऔषधी - १ बचनाग , २ पांढरा भुइकोहळा , ३ क्रोडकन्द , ४ रुद्रवंती ( रानहरभ्रे ) आणि ५ सर्पाक्षी ( थोर मुंगुसवेल .

तैलकन्दः सुधाकन्दः क्रोडकन्दोरुदंतिका ।

सर्पनेत्रयुताः पञ्च सिद्धौषधिकसंज्ञकाः ॥ ( रा . नि . )

पंचसिद्धि - १ जन्मसिद्धि , २ औषधिसिद्धि , ३ मंत्रसिद्धि , ४ तपसिद्धि आणि ५ समाधिसिद्धि . ( पातंजल योगसूत्रें )

पंचसिद्धान्तिका - वराहमिहिरकृत एक ज्योतिषग्रंथ . यांत १ रोमक सिद्धान्त , २ पैतामह , ३ वासिष्ठ , ४ पौलिश आणि ५ सौर सिद्धान्त , अशा ज्योतिषांतील पांच पुरातन ज्योतिष सिद्धान्तांचें विवरण असल्यामुळें त्यास पंचसिद्धान्तिका म्हणतात .

पंच सुगंध - १ कापूर , २ कंकोळ , ३ लवंग ४ सुपारी व ५ जायफळ . हे पांच पदार्थ समभाग विडयांत घातले असतां उत्तम सुगंध तयार होतो . त्यास पंच सुगंध म्हणतात .

पंच सूक्तें - १ पुरुषसूक्त , २ देवीसूक्त , ३ सूर्यसूक्त , ४ पर्जन्यसूक्त व ५ श्रीसूक्त ,

पंचसूत्री ( संसारोपयोगी )- १ विचार करून बाजारासाठी बाहेर पडा , २ भेटीस गेल्यावेळीं दोन शब्द कमी बोला , ३ सौंदर्य मावळत जातें पण गुणविकास होतो , ४ डोळे उघडे ठेवा , कानाचा नीट उपयोग करा , जीभ जपून वापरा व ५ आधीं गरजा व मग सोई आणि नंतर चैनी . ( कण आणि क्षण )

पंचसूत्री ( स्वास्थ्यसंरक्षणाची )- १ आहार , व्यायाम व मैथुन नियमित , २ निर्व्यसनता , ३ नित्य सुखानें ७ - ८ तास झोंप , ४ मच्छरदाणी वापरणें व ५ सुशील सुग्रण व हंसतमुख पत्नी असणें , ( ज . नानासाहेब शिंदे )

पंच सूत्रें ( ग्रंथालय शास्त्र )- १ ग्रंथ अध्ययनाकरितां आहेत . २ ते सर्वांकरितां आहेत , ३ प्रत्येक ग्रंथाला वाचका असतोच , ४ अभ्यासकांचा वेळ वांचवा आणि ५ ग्रंथालय सारखें वाढतें असावें . ( ग्रंथालय शास्त्राचीं पंचसूत्रें )

पंच सूत्रें ( वेदविहित ) शाश्वत सुख प्राप्त करून देणारीं - १ यज्ञ , २ दान , ३ तप , ४ कर्म आणि ५ स्वाध्याय . ( In Search of Happiness )

पंच सूत्रें व त्यांचे कर्ते - १ ब्रह्मसूत्रें - वेदव्यास , २ कर्मसूत्रें - जैमिनि , ३ भक्तिसूत्रें - नारद , ४ योगसूत्रें - पतंजलि व ५ तंत्रसूत्रें - परशुराम . ( नाम चिंतामणि )

पंचसूना दोष - १ झाडसारवण , २ कांडणें , ३ चूल पेटविणें , ४ दळणें , वाटणें व ५ पाणी भरणें , एतन्मूलक ह्त्त्या - सूक्ष्म जीवांची हिंसा मनुष्याच्या हातून नकळत नित्य घडत असते . ( मनु ३ - ६८ )

पंच संस्कार ( मुस्लिमांचे )- १ जातकर्म , २ सुंता , ३ बिस्मिल्ला ( श्रीगणेशा ), ४ विवाह आणि ५ अंत्यसंस्कार ( मु . सण आणि संस्कार )

पंच संस्कार ( वैष्णवांचे )- १ तप्तमुद्रा , २ ऊर्ध्वपुंड्र , ३ नाम , ४ मंत्र व ५ याग .

तापः पुण्ड्रं तथा नाम मन्त्रो यागश्व पञ्चमः ।

अमीःपंच च संस्काराः पारमैकान्तहेतवः ॥ ( भारद्वाज संहिता )

पंच स्नान - १ पाण्यांत दोन बोटें भिजवून मस्तकावर शिंपडणें , २ - ३ दोन्ही डोळ्यांना स्पर्श , ४ - ५ त्याच थेंबांचा दोन्ही कर्णमूळांना स्पर्श . हें पंचस्नान . ( हिमप्रदेशांतील एकस्त्रान प्रकार - जीवनलीला )

पंच स्नानें - १ आग्नेय , २ वारुण , ३ ब्राह्म , ४ वायव्य आणि ५ दिव्य - ( पराशर स्मृति १२ - ९ )

पंच स्कंध ( भाग ) मनुष्य शरीराचे - १ जडत्व , २ संज्ञा , ३ वेदना , ४ संस्कार व ५ विज्ञान .

मनुष्य प्राण्याचे ठायीं । पंच स्कंद असती पाही ।

ज्यावांचून अस्तित्व नाहीं । मनुष्य देहाकारणें ॥ शंकराचार्य चरितामृत २ - १२६

पंच हत्त्या - १ भरूणहत्त्या , २ वीरहत्त्या , ३ स्त्रीहत्त्या , ४ बालहत्त्या व ५ आत्महत्त्या - या पांचहि हत्त्या म्हणजे महान् ‌‍ पापें होत .

पंच क्षीरवत - १ वड ( न्यग्रोध ), २ औदुंबर , ३ अश्वत्थ , ४ पारस - पिंपळ व ५ पिंपरी ( प्लक्ष ). हे पांच चीक असलेले वृक्ष होत . ( नूतनामृत सागर )

पंच क्षुद्रसिद्धि - १ त्रिकांड ज्ञान , २ शीतोष्णादि द्वंद्वावर सत्ता , ३ दुसर्‍याचें मन जाणणें , ४ अग्नि - सूर्य - उष्ण - जल - विष इत्यादींचे स्तंभन ( परिणाम थांबविणें ) आणि ५ अजिंक्यता . ( भाग . स्कंध ११ अ १५ )

पंचज्ञानी - १ श्रीकृष्ण , २ शुकाचार्य , ३ जनक , ४ श्रीरामचंद्र आणि ५ वसिष्ठ .

कृष्णो योगी शुकस्त्यागी राजानौ जनकराघवौ ।

वसिष्ठः कर्मकर्ता च पञ्चैते ज्ञानिनः स्मृताः ॥ ( जीवनन्मुक्तिविवेक )

पंच ज्ञानें ( जैनधर्म )- १ मतिज्ञान , २ श्रुतिज्ञान , ३ अबाधिज्ञान , ४ मनःपर्यय ज्ञान , व ५ केवळज्ञान .

पंचज्ञानेंद्रियें व त्यांच्या अधिष्टात्री देवता - १ श्रोत्र ( कान )- दिशा , २ त्वचा ( कातडी )- वायु , ३ डोळे - सूर्य , ४ जिव्हा - वरुन आणि ५ नासिक ( नाक )- अश्चिनीदेव ( भास्कराचार्य ) " श्रोत्रं चक्षुःस्पर्शनं च रसनं घ्राणमेवच " ( भ . गी . १५ - ९ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP