मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६

संकेत कोश - संख्या ६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सहा गुण मिताहारी पुरुषाचा आश्रय करतात - १ आरोग्य , २ आयुष्य , ३ बल , ४ सुख , ५ शुद्ध संतति आणि ६ अधाशी म्हणून निंदिला न जाणें . या सहा गोष्टी मिताहारी पुरुषाला लाभतात . ( भा . उद्योग . ३७ - ३४ )

सहा गुण राज्यशासकांस आवश्यक - १ वक्तृत्व , २ शत्रूचें दमन कराण्याची सिद्धता , ३ तर्ककुशलता , ४ स्मरणशक्ति , ५ नीतिशास्त्रज्ञता आणि ६ विद्वत्ता . ( म . भा . सभा . ५ - २२ ).

सहा गुण लेखकाचे अंगीं असावेत - १ बुद्धिमान् ‌‍, २ समयस्फूर्त बोलणारा , ३ धीर - गंमीर , ४ जलद लिहिणारा , ५ संयमी आणि ६ दुसर्‍याचें इंगित संपूर्णपणें जाणणारा .

मेधावी वाक्पटुर्धीरो लघुहस्तो जितेंद्रियः ।

परशास्त्रपरिज्ञाता एष लेखक उच्यते ॥ ( सु . )

सहा गुण वधूपरीक्षेकामीं उपयुक्त - ३ कन्या - कमनीया - सुडौल म्हणजे पाहातांच आकर्षण उत्पन्न करणारी , २ पतिगृह हेंच स्वतःचें खरें घर समजते , ३ उभय कुलांचे यश वाढविणारी , ४ पतीचें भाग्य वाढविणारी , ५ सासर सोडून इतरत्र कोठेंहि राहूं न इच्छिणारी व ६ वृक्षावरील फुलाप्रमाणें पितृकुलाला सुंगधित करणारी , ( अथर्व - अनु - मराठी भाग . ३ रा )

सहा गुण वरपरीक्षेकामीम उपयुक्त - १ यम - नियम पालन करणारा , २ धर्मपत्नीचा संतोष वाढविणारा , ३ स्वातंत्र्यप्रिय , ४ परिस्थिति आणि कर्तव्याची जाणीव असलेला , ५ बलवान् ‌‍ आणि ६ ज्ञानी . ( अथर्व - अनु - मराठी )

सहा गुण विद्यापरंपरा चिरकाल टिकण्यास आवश्यक - १ स्वाभाविक बुद्धि , २ सतत वाचन , ३ दीर्घकाल चिंतन , ४ चर्चा , ५ अध्यापन आणि ६ वेदलेखन ( स्वराज्य्य ३ - ८ - १९६३ )

सहा गुण सत्पुरुषाचे ( स्वाभाविक )- १ विपत्कालीं धैर्य , २ भाग्यकालीं सहिष्णुता , ३ समेंत पांडित्य , ४ रणांत शौर्य , ५ यशाविषयी आवड आणि ६ ज्ञानसंपादन करण्याचें व्यसन . ( भर्तृ . नीति . )

सहा सद्‌‍गुण सुवैद्यास आवश्यक - १ विद्या , २ विचार , ३ अन्यशास्त्राचें ज्ञान , ४ स्मरण , ५ तल्लीनता आणि ६ दीर्घ अनुभव .

" यस्यैते षड्‌‍गुणास्तस्य न साध्यमतिवर्तते " ( चरक सूत्रस्थान . ९ - २१ )

सहा गुरु - १ मातापिता , २ सुईण , ( कान फुंकून हातपाय थोपटते ) ३ शिक्षक , ४ कर्ममार्गी , ५ नामकरण करणारा व ६ बीजमंत्र देणारा . ( सिद्धांत बोध . अ . ५० )

सहा गोष्टी अग्निविना शरीर जाळणार्‍या - १ कुग्रामांत वसति , २ दुर्जनाची सेवा , ३ जेवण चांगलें नसणें , ४ क्रोधमुखी भार्या , ५ मूर्ख मुलगा आणि ६ विधवा कन्या .

कुग्रामवासः कुलहीनसेवा कुभोजनं क्रोधमुखी च भार्या ।

पुत्रश्च मूर्खो विधवा च कन्या विनाग्निना षट् ‌‍ प्रदहन्ति कायम् ‌‍ ( सु . )

सुहा गोष्टी अशाश्वत होत - १ तारुण्य , २ रूप , ३ जीवित , ४ धनसंचय , ५ आरोग्य आणि ६ प्रियजनांचा सहवास . या सहा गोष्टींची शहाण्यानें आसक्ति ठेवूं नये .

अनित्यं यौवनं रूपं जीवितं द्र्व्यसंचयः ।

आरोग्यं प्रियसंवासो मुह्मेत् ‌‍ तत्र न पण्डितः ॥ ( सु . )

सहा गोष्टी अभ्युदयाच्या आड येणार्‍या - १ आळस , २ स्त्रीमोह , ३ व्यधि , ४ जन्मभूमिवात्सल्य , ५ अल्पसंतुष्टता आणि ६ भीरुता .

आलस्यं स्त्रीसेवा सरोगता जन्मभूमिवात्सल्यम् ‌‍ ।

संतोषो भीरुत्वं षड्‌‍व्याघाता महत्त्वस्य ॥ ( हितो . )

सहा गोष्टीमुळें आयुष्याची हानि होते - १ अमर्याद अभिमान , २ अमर्याद भाषण ३ अमर्याद पाप , ४ क्रोध , ५ आप्पलपोटेपणा व ६ मित्रद्रोह . ( म . भा . उद्योग . ३७ - १० )

सहा गोष्टी तत्काल क्षीण करणार्‍या - १ शिळें मांस , २ वृद्ध स्त्री , ३ सकाळचें उन्ह , ४ पूर्ण न विरजलेलें दहीं . ५ सकाळचें मैथुन आणि ६ निद्रा .

शुष्कमांस्सं स्त्रियो वृद्धा बालार्कस्तरुणं दधि ।

प्रभाते मैथुनं निद्रा सद्यः प्राणहराणि षट् ‌‍ ॥ ( शा . नि .

सहा गोष्टी पाण्यावरील बुडबुडयाप्रमाणें होत - १ आभाळाची सावली , २ गवतापासून उत्पन्न झालेला अग्नि , ३ दुष्ट पुरुषाच्या ठिकाणची प्रीति , ४ उंचवठयावरील पाणी , ५ वेश्येचें प्रेम आणि ६ कुमित्र .

सहा गुण पद्यरचनेस आवश्यक - १ मृदु , ललित , आणि सोपी शब्दरचना , २ व्याकरण शुद्धता , ३ सुबोधता , ४ वेचक शब्दांचा उपयोग , ५ प्रसंगानुसार भाषा व चाल व ६ रचनेत सहजता ( नाटक - शास्त्र आणि तंत्र ).

सहा गोष्टी प्रारब्धाधीन - १ हानि , २ लाभ , ३ जनन , ४ मरण , ५ यश व ६ अपयश . या सहा गोष्टी प्रारब्धवशात् ‌‍ ज्या समयीं ज्या स्थानीं घडावयाच्या त्या ठिकाणीं तेव्हांच त्या घडतात . ( तुलसीरामायण - टीप )

सहा गोष्टी बल वाढविणार्‍या - १ ताजें मांस , २ ताजें अन्न , ३ तरुण स्त्री , ४ दुधाचे पदार्थ , ५ तूप आणि ६ ऊन पाणी .

सद्योमांसं नवान्नं च बाला स्त्री क्षीरभोजनम् ‌‍ ।

घृतमुष्णोदकं चैव सद्यः प्राणकराणि षट् ‌‍ ॥ ( शां . नि . )

सहा गोष्टी ब्रह्मचर्यास वर्ज्य - १ सुखशय्या , २ वेषभूषा , ३ तांवूल , ४ अभ्यंगस्नान , ५ दन्तकाष्ठ वापरणें आणि ६ सुगंधी पदार्थ सेवन .

सूखशय्यासनं वस्त्रं तांबूलं स्नानमज्जनम् ‌‍ ।

दन्तकाष्ठं सुगंधं च ब्रह्मचर्यस्य दूषणम् ‌‍ ॥ ( शिवपुराण )

सहा गोष्टींत मौन आवश्यक - १ शौच , २ विषयसेवन , ३ लघ्वी , ४ दांत घासणें , ५ श्राद्धकाल व ६ भोजन .

उच्चारे मैथुने चैव प्रस्त्रावे दन्तधावने ।

श्राद्धे च भोजने चैव षट्‌‍सु मौनं समाचरेत् ‌‍ ॥ ( हारीत )

सहा गोष्टी योगाला साधक - १ उत्साह , २ साहस , ३ धैर्य , ४ भावना , ५ अभ्यास चालू ठेवण्याचा निश्चय व ६ विषयीजनसंग त्याग .

सहा गोष्टी योगाभ्यासाला बाधक - १ अति आहार , २ अधिक श्रम , ३ फार बोलणें , ४ उपोषण ( एकादशी वगैरे आवश्यक उपोषणांखेरीज ), ५ योगाभ्यासी नव्हेत अशांची संगति व ६ जिह्लालौल्य .

अत्याहारः प्रवासश्च प्रजल्पो निय्यमग्रहः ।

जनसंगश्च लौल्यं च षड्‌‍भिर्योगो विनश्यति ॥ ( ह . प्र . ).

सहा गोष्टी लघुता म्हणजे कमीपणा आणणार्‍या - १ लहान मुलाबरोबर सख्यत्व , ३ अकारण हास्य , ३ स्त्रियांशीं वाद , ४ असज्जनांची सेवा , ५ गर्दभ - वाहनाचा योग आणि ६ ग्राम्यभाषा . ( सु . )

सहा गोष्टी विडंबन करणार्‍या - १ ब्राह्मण - पण मूर्ख , २ स्थविर ( वृद्ध )- पण कामी , ३ कामी - पण दरिद्री , ४ धनवान् ‌‍- पण तपस्वी , ५ वेश्या - पण कुरूपा आणि ६ थोर - पण कृपण .

सहा गोष्टी क्षणिक असतात - १ ढगाची छाया , २ दुर्जनाची प्रीति , ३ शिजलेलें अन्न , ४ स्त्री , ५ तारुण्य आणि ६ धन .

अभ्रच्छाया खलप्रीतिः सिद्धमन्नं च योषितः ।

किंचित्कालोपभोग्यानि यौवनानि धनानि च ॥ ( पंचतंत्र )

सहा गोष्टी क्षणभंगुर होत - १ यौवन , २ जीवित , ३ मन , ४ शरीराची सावली , ५ लक्ष्मी आणि ६ स्वामिता ( नीतिशास्त्र ).

सहा गोष्टी संसारांत सुखप्रद - ( अ ) १ धनलाभ , २ निरोगी प्रकृति , ३ प्रियमित्र , ४ मधुरभाषिणी स्त्री व ५ आज्ञाधारक पुत्र आणि ६ द्रव्य मिळवून देणारी विद्या ; ( आ ) १ आरोग्य़ , २ ऋण नसणेंज , ३ सारखा प्रवास नसणें , ४ सज्जनसमागम , ५ अनुकूल उपजीविका आणि ६ भयरहित वसतिस्थान , हीं सहा जीवलोकींचीं सुखें होत . ( म . भा . उद्योग ३३ - ८९ )

सहा गव्य पदार्यांच्या उपयोगानें दुःस्वप्रांचें निवारण होतें - १ गोमूत्र , २ गोमय , ३ दूध ४ दहीं , ५ तूप व ६ गोरोचन .

गोमूत्रं गोमयं क्षीरं दघि सर्पिश्च रोचना ।

षडङ्रं परमं पाने दुःस्वप्रादि निवारणम्‌६ ॥ ( सु . )

सहा जाती पुरुषांच्या - १ शश , २ मृग , ३ अश्च , ४ गर्दभ , ५ वृषभ व ६ महिष ( टोणगा ). ( तत्त्व निजबोध - विवेक )

सहा जाती ( बाभळीच्या )- १ कांटे बाभूळ , २ निकांटे बाभूळ . ३ देवबाभूळ , ४ रानबाभूळ , ५ संतबाभूळ , व ६ गुआबाभूळ . ( वाभळीचा उपयोग )

सहा जाती स्त्रियांच्या - ( अ ) १ पद्मिनी , २ हरिणी ३ हस्तिनी , ४ चित्रिणी , ५ वडवा आणि ६ शंखिनी , पैकीं सहावी शंखिनी वर्ज्य करून बाकीच्या पांच शुभ होत .

’ शखिनी प्रहरूनि अन्य सुंदरी । येरे पंच त्या शुद्धा ॥ "

( आ ) १ पद्मिनी २ चित्रिणी , ३ हस्तिनी , ४ शंखिनी , ५ नागिणी व ६ डाकिणी . ( तत्त्व - निजबोध ’ विवेक )

सहा ज्योति ( अवकाशांतला पदार्थ )- १ सूर्य , २ चंद्र , ३ ग्रह , ४ उल्का , ५ धूमकेतु आणि ६ तारे असे सहा ज्योति अनंत आकाशांत आहेत . ( राहु - केतु आणि ग्रहणें )

सहा ठिकाणें आश्रयास पात्र - १ इष्ट प्राप्तीविषयीं निश्चिति , २ अनिष्टाचा त्याग , रक्षण होईल असा विश्वास , ४ रक्षणाविषयींची मान्यता , ५ ठेवीची सुरक्षितता व ६ मनाचा मोठेपणा . अशा प्रकारचीं असलेलीं सहा ठिकाणें आश्रयास पात्र होत .

आनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ‌‍ ।

रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृविधा शरणागतिः ॥ ( वायुपुरान )

सहा तीर्थें - १ भक्तितीर्थ , २ गुरुतीर्य , ३ मातृतीर्थ , ४ पितृतीर्थ , ५ पतितीर्थ आणि ६ पत्नीतीर्थ , हीं सहा तीर्थें मानवाला पावन करणारीं . ( पद्म - भूमिखंड )

सहा दाते ( पुराणप्रसिद्ध भारतीय )- १ बलि - सत्ययुग , २ भार्गव राम व ३ श्रीरामचंद्र - त्रेतायुग , ४ धर्मराज , व ५ कर्ण - द्वापरयुग आणि ६ व्यापारी - कलियुग .

सहा दुःखी - १ मत्सरी , २ दयाळू , ३ असंतुष्ट , ४ रागीट , ५ सदा शंकेखोर आणि ६ दुसर्‍याच्या भाग्यावरा उपजीविका करणारा . हे सहा नित्याचे दुःखी असतात . ( म . भा . उधोग ३३ - ९० )

सहा दुःखें जीवितांतील - १ गर्भदुःख , २ जन्मदुःख ३ व्याधिदुःख , ४ दारिद्य - दुःख , ५ जरादुःख व ६ मृत्युदुःख .

सहा दोष ( आसुरी संपत्तीचे )- १ दंभ , २ दर्प , ३ अभिमान , ४ क्रोध , ५ पारुष्य ( कठोरपणा ) आणि ६ अज्ञान . ( भ . गी . १६ - ४ )

सहा दोष ( अभ्युदयाच्या आड येणारे )- १ निद्रा , २ सुस्ती , ३ भय , ४ क्रोध , ५ आळस आणि ६ दीर्घसूत्रीपणा . ( म . भा . उद्योग . ३३ - ७८ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP