द्वादश अंगें ( व्याकरणाचीं )- १ समास , २ वचन , ३ लिंग , ४ विभक्ति , ५ प्रत्यय , ६ वव्यय , ७ काल , ८ नाम , ९ उपसर्ग , १० प्रयोग , ११ धातु आणि १२ संहिता .
समासो वचनं लिंगं विभक्तिः प्रत्ययोऽव्ययम् ।
कालो नामोपसर्गश्च प्रयोगो धातुसंहिते ॥ ( सु . )
द्वादश अंगें ( शरीराचीं )- १ शिर , २ नेत्र , ३ कर्ण , ४ प्राण , ५ मुख , ६ हात , ७ पाय , ८ नाक , ९ कंठ , १० त्वचा , ११ गुद आणि १२ शिश्न .
द्वादश अप्सरा - १ कृतस्थला , २ पुंजिकस्थला , ३ मेनका , ४ सहजन्या , ५ प्रम्लोचा , ६ अनुम्लोचा , ७ घृताची , ८ विश्वाची , ९ उर्वशी , १० पूर्वचिती , ११ तिलोत्तमा आणि १२ रंभा . ( लिंग अ . ५५ )
द्वादश अक्षरी मंत्र - ( अ )’ ॐ नमो भगवते वासुदेवाय ’ हा मंत्र म्हणजे सिद्ध वाणी ; ( आ ) पुंडलिक वरदा हरि विठ्ठल . ( वारकरी सांप्रदाय )
द्वादश आदित्य - हीं बारा सूर्याचीं नावें निरनिराळीं आढळतातः - ( अ ) १ मित्र , २ रवि , ३ सूर्य , ४ भानु , ५ खग , ६ पूषा , ७ हिरण्यगर्म ,
८ मरीचि , ९ आदित्य , १० सविता , ११ अर्क आणि १२ भास्कर . हीं प्रचलित सूर्यनमस्कारांतील बारा नांवें ; ( आ ) १ धाता , २ मित्र , ३ अर्यमा , ४ शुक्र , ५ वरुण , ६ अंशु , ७ भग , ८ विवस्वान , ९ पूषा , १० सविता , ११ त्वष्टा आणि १२ विष्णु . ( इ ) १ लोलार्क , २ उत्तरार्क , ३ सांबादित्य , ४ द्रुपदादित्य , ५ मयूखादित्य , ६ अरुणादित्य , ७ वृद्धादित्य , ८ केशवादित्य , ९ विमलदित्य , १० गंगादित्य , ११ यमादित्य व १२ सकोलकादित्य . ( स्कंद २ - ४ - ४६ )
द्वादशकला ( सूर्याच्या )- १ जालिनी , २ कीरनी , ३ दाहिनी , ४ दीपिनी , ५ ज्योतिणी , ६ तेजनी , ७ विद्या , ८ मोहिनी , ९ जीतनी १० शंखिनी , ११ प्रकाशिनी आणि १२ दीपकलिका . ( मूळ स्तंभ ). खेरीज स्वप्रकाशिका ही तेरावी कला मानली आहे . ( आ ) १ तापिनी , २ ग्रासिका , ३ उग्रा , ४ आकुंचनी , ५ शोषिणी , ६ प्रबोधिनी , ७ स्मरा , ८ आकर्षिणी , ९ तुष्टिवर्धनी , १० उमींरेषा व ११ किरणवती आणि १२ ?, ( भा . दर्शन - संग्रह )
द्वादशकोश - १ अंतःपुर , २ धान्यागार , ४ अश्वशाळा , ५ गजशाळा , ६ उष्ट्र्शाळा , ७ रत्नशाळा , ८ पाकशाळा , ९ रथशाळा , १० शस्त्रशाळा , ११ कोशशाळा व १२ नाटकशाळा ( पुरुषार्थ मासिक )
द्वादश गंधर्व - १ तुंबरू , २ नारद , ३ हाहा , ४ हूहू , ५ विश्वावसु , ६ उग्रसेन , ७ सुरुचि , ८ परावसु , ९ चित्रसेन , १० ऊर्णायु , ११ धृतराष्ट्र आणि १२ सूर्यवर्मा . ( लिंग . अ . ५५ )
द्वादश गुण ( स्त्रीचे )- १ रूप , २ शील , ३ सत्य , ४ कुलीन , ५ धर्म , ६ सतीत्व , ७ खंबीरपणा , ८ साह्स , ९ मुलक्षणी , १० उद्योगी , ११ रति आणि १२ मधुरभाषिणी .
’ एकादश्यस्तथा स्त्रीणां कामाधिक्यं प्रकीर्तितम् ।
मधुरं वचनं प्रोक्तं द्वादशं वरवर्णिनि ॥ ’ ( पद्म . भूमि अ . ३३ )
द्वादश ज्योतिर्लिगें - ( अ ) सोरटी सोमनाथ - सौराष्ट्र , २ श्रीशैल - श्रीशैल पर्वतावर , ३ महांकाळेश्वर - उज्जयिनी , ४ ओंकारमांधाता - मध्यप्रदेश , ५ परळी वैजनाथ - परभणीजवळ , ६ भीमाशंकर - पुणें जिल्ह्मांत , ७ काशी विश्वेश्वर - वाराणशी , ८ त्र्यंबकेश्वर - नासिकजवळ , ९ सेतुबंध - रामेश्वर , १० औंढया नागनाथ - मराठवाडयांत आणि ११ केदार - हिमालयांत व १२ घृष्णेश्वर - वेरूळजवळ .
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् ।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्थां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारं घृष्णेशं तु शिवालये ॥४॥ ( द्वा . ज्योतिर्लिंगस्तोत्र )
( अ ) शिवपुराणांत " वैद्यनांथ चिताभूमौ नागेशं दारुकावने । " असा निराळा पाठ आहे . हीं दोन ठिकाणें मराठवाडयाव्यतिरिक्त भारतांत अन्यत्र असल्याचीं मानलीं आहेत . ( शिव . पु . कोटी रुद्र १ - २१ ) ( इ ) १ ब्रह्म , २ माया , ३ जीव , ४ मन , ५ बुद्धि , ६ चित्त , ७ अहंकार , ८ आकार , ९ वायु , १० अग्नि , ११ जल व १२ पृथ्वी . यांसहि तैत्तिरीयांत बारा ज्योतिर्लिंगेंच म्हटलें आहे . ( शिवलिंगोपासना )
द्वादश देवासुर संग्राम - प्राचीन कालीं देव आणि असुर यांच्यांत झालेले संग्राम द्वादश देवासुरसंग्राम म्हणून पुराणांतून वर्णिले आहेत . ते असेः - १ नासिंहसंग्राम - नारसिंह व हिरण्याक्ष , २ वामन - वामन व बलि , ३ वाराह - वराह व हिरण्याक्ष , ४ अमृतमंथन - देव व दानव , ५ तारकामय - तारकास्रु व कार्तिकेय , ६ आडिबक युद्ध - वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यांत आडि व बक या पक्षीरूपानें झालेला संग्राम ( मार्कंडेय पु . अ ९ ), ७ त्रैपुर - मयनिर्मित - तीन पुरांचा ( नगरांचा ) शिवाकडून विध्वंस , ८ अंधकवध संग्राम , ९ ध्वजसंग्राम - विप्रचिति व इंद्र , १० वृत्रघात संग्राम - वृत्रासुर व इंद्र ११ हालाहल संग्राम व १२ कोलाहल संग्राम - सर्व दैत्यवर्ग व आयुपुत्र रवि . प्राचीनकालीं देवदैत्यांत असे बारा निकराचे संग्राम झाल्याचें पुराणांतरीं वर्णिलें आहे . ( मत्स्य , आग्नि , ब्रह्म आणि मार्कंडेय इ . पुराणें )
द्वादशनाश द्वादश मासांचे - अधिपति क्रमानें - १ चैत्र - वासुकि , २ वैशाख - कंकनीर , ३ ज्येष्ठ - तक्षक , ४ आषाढ - नागमुख्यक , ५ श्रावण - एलापत्र , ६ भाद्रपद - शंखपाल , ७ आश्चिन - ऐरावत , ८ कार्तिक - धनंजय ९ मार्गशीर्ष - महापद्म , १० पौष - कर्कोटक , ११ माघ - कंबल आणि १२ फाल्गुन - अश्वतर .
कंबलाश्वतर श्वैववहंत्येते प्रभाकरम् ।
नागा द्वादशमासेषु प्रजाधीश यशाक्रमम ॥ ( मुद्रल पु . खंड २ अ १३ )
द्वादश नांवें ( गणेश देवतेचीं )- १ सुमुख , २ एक त , ३ कपिल , ४ गजकर्ण , ५ लंबोदर , ६ विकट , ७ विघ्ननाश , ८ गणाधिप ९ धूम्रकेतु , १० गणाध्यक्ष , ११ भालचंद्र व १२ गजानन ( पूजेचे मंत्र ) ( आ ) १ वक्रतुंड , २ एकदंत , ३ कृष्णपिंगाक्ष , ४ गजवक्त्र , ५ लंबोदर , ६ विकट , ७ विघ्नराज , ८ धूम्रवर्ण , ९ भालचंद्र , १० विनायक , ११ गणपति आणि १२ , गजानन . ( नारद पुराण ) ( गणेशस्तोत्र )
द्वादश पदार्थ ( अर्ध्याचे )- १ दूध , २ दर्भाग्रं , ३ अक्षता , ४ जल , ५ दही , ६ पांढर्या मोहर्या , ७ सातू , ८ दूर्वा , ९ तीळ , १० मध , ११ कुंकूं आणि १२ गोरोचन . या बारा पदार्थांनीं देवीला अर्ध्यप्रदान करावयाचें असतें . ( देवीमाहात्म्य )
द्वादश पुंड् ( द्वादश टिळे - गोपीचंदनाचे )- १ ललाट , २ उदर , ३ ह्रदय , ४ कंठमूल , ५ - ६ दोन कुशी , ७ - ८ दोन बाहु , ९ - १० दोन कर्ण , ११ पाठ आणि १२ पाठीचा कणा . स्नानानंतर गोपीचंदन , ’ ॐ नमो गारायणाय ’ या मंत्रानें मंत्रून शरिराच्या ज्या बारा भागांवर वैष्णव संप्रादायांत तिलक लावतात त्यांस द्वादश पुंड्र म्हणतात .
द्वादश प्रमुख स्थानें ( देवीचीं )- १ कामाक्षी ( कांचीपूर ), २ भ्रामरी , ( मलयगिरी , ), ३ कन्याकुमारी , ४ अंबा ( गुजरात ), ५ महालक्ष्मी
( कोल्हापूर ), ६ कालिका ( जज्जयिनी ), ७ ललिता ( प्रयाग ), ८ विंध्यवासिनी ( विंध्याद्रि ), ९ विशालाक्षी ( वाराणसी ), १० मंगलवती
( गया ), ११ सुंदरी ( बंगाल ) आणि ११२ गुह्मकेश्वरी ( खाटमांडू - नेपाळ ). ’ इति द्वादशरूपेण संस्थिता भारते शिवा । ’
( त्रिपुरारहस्यमाहात्म्य )
द्वादश भागवत धर्मज्ञाते - १ स्वयंभु , २ नारद , ३ शंभु , ४ कुमार , ५ कपिल , ६ मनु , ७ प्रह्लाद , ८ जनक , ९ भीष्म , १० बलि , ११ व्यास व १२ शुकाचार्य . ’ द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटाःअ । ’ ( भा . स्कं . ६ - ३ - २१ )
द्वादश भावना अथवा अनुपेक्षा - १ अनित्यभावना , २ अशरणभावना , ३ संसारभावना , ४ एकत्वभावना , ५ अन्यत्वभावना , ६ अशुचिभावना , ७ आस्त्रिवभावना , ८ संवरभावना , ९ निर्जराभावना , १० लोकभावना , ११ बोधिदुर्लमभावना व १२ धर्मभावना , अशा द्वादशभावना जैन धर्मांत मानल्या आहेत . ( रत्नकरंडक श्रावकाचार )
द्वादशयोनि ( मानवजाती )- १ देव , २ दैत्य , ३ सिद्ध , ४ गंधर्व , ५ विद्याधर , ६ किंपुरुष , ७ पैत्रिक , ८ आर्ष , ९ मानव १० गुह्मक , ११ राक्षस आणि १२ पिशाच . प्राचीन काळीं भारतांत या बारा मानव जाती होत्या . ( वामन - पुराण अ . ११ )
द्वादश वनें ( मुथरेच्या आसमंतांतलीं )- १ मधुवन , २ तालवन , ३ कुमदवन , ४ बहुलाख्यवन , ५ खादिरवन , ६ बिल्वकवन , ७ लोहसंश्मकवन , ८ भांडीरवन , ९ भद्रकवन , १० काम्यकवन , ११ छत्रवन आणि १२ वृंदावन , हीं बारा वनें , मथुरेच्या परिसरांत होतीं . ( आदिपुराण )
द्वादश शक्ति ( भगवंतांच्या )- १ श्री , २ तुष्टि , ३ गिरा , ४ कान्ति , ५ कीर्ति , ६ पुष्टि , ७ इला , ८ ऊर्जा , ९ विद्या , १० अविद्या , ११ शक्ति व १२ माया . भगवान श्रीकृष्णानें ह्मा द्वादशशक्तीच्यारूपाचें दर्शन अक्रृरास दिलें . अशी कथा आहे . ( भागवत कल्याण डिसेंबर १९६० )
द्वाद्श स्थानें अथवा भाव ( कुंडलींतील )- १ तनुस्थान , १ धनस्थान , ३ सहज अथवा पराक्रमस्थान , ४ सुह्रद् - मातृस्थान अथवा सुखस्थान , ५ सुत - बुद्धि - संततिस्थान , ६ शत्रुस्थान - रोगस्थान , ७ जायास्थान , ८ मृत्युस्थान अथवा गंडांतरस्थान , ९ धर्म अथवा भाग्यस्थान , १० कर्म अथवा पितृस्थान , ११ आय अथवा लामस्थान आणि १२ व्ययस्थान . ( ज्योतिष )
द्वादश स्थानें ( मदनाचीं )- १ स्त्रीचे नेत्रकटाक्ष , २ केशपाश , ३ जघन , ( मांडया ), ४ स्तन , ५ नाभि , ६ कक्ष , ७ अधरोष्ठ , ८ कंकण , ९ वसंत , १० कोकिलालाप , ११ चंद्रिका व १२ वर्षाऋतु . हीं द्वादश स्थानें म्यानें मदनास नेमून दिलीं .
’ तस्मात्स्थानानि दत्तानि तव द्वादश संख्यया । ’ ( स्कंद . आवंत्यखंडम् )
बारा अंगें बौद्ध ( तत्वज्ञानाची )- १ अविद्या , २ संस्कार , ३ विज्ञान , ४ नामरूप , ५ षडिंद्रियें , ६ स्पर्श , ७ वेदना , ८ तृष्णा , ९ उपादान , १० भव , ११ जाति व १२ जरामरण ( अमिधम्म १ - ८ )
बारा अलुते - १ तेली , २ तांबोळी , ३ साळी , ४ माळी , ५ जंगम , ६ कलावंत , ७ डौरी , ८ ठकार , ९ घडशी , १० तराळ , ११ सोनार आणि १२ चौगुला . हे बारा अलुते म्हणजे खालच्या वर्गाचे बारा कामगार अथवा गांवगाडयांतले दुसर्या क्रमांकाचे हक्कदार पूर्वी असत .
बारा अळवार ( तामिळनाड वैष्णव संत व कवि )- १ पोइगई - आळवार , २ भुतसार - अळवार , ३ पेइ - आळवार , ४ तिरुमळसै - आळवार , ५ नम्म - आळवार , ६ मधुरकवि - आळवार , ७ कुलशेखर , ८ आंडाळ - आळवार ( स्त्री ) ९ पेरी - आळवार , १० तोंडर डिपोडिड - आळवार , ११ तिरुप्पाण - आळवार आणि १२ तिरुमंगयी . हे बारा आळवार दक्षिण भारतांत निरनिराळ्या कालांत होऊन गेले ( संस्कृतिकोश )
( म . ज्ञा . को . वि . ८ )
बारा अन्नाचे परिणाम - १ पाक , २ रस , ३ मल , ४ रक्त , ५ रोम , ६ मांस , ७ कोश , ८ स्त्रायु , ९ अस्थि , १० मज्जा , ११ वसा आणि १२ वीर्य . ( कल्याण पद्मपुराणांक )
बारा आनद्ध वाधें - १ पखवाज , २ नाल , ३ तबला , ४ डफ , ५ संबळ , ६ चौघडा , ७ ताशा ८ ढोल , ९ मर्फा , १० खंजिरी , ११ डौर व १२ कुड्मुडें . हीं बारा आनद्ध वाद्यें ( कातडयानें मढवून वाजविलीं जाणारीं ) होत .
बारा आभरणें ( स्त्रियांचीं )- १ नृपुर , २ किंकिणी , ३ हार , ४ चूरी , ५ मुदरी , ६ कंकण , ७ बाजुबंद , ८ कंठश्री , ९ बेसर , १० बिरीया , ११ टिका आणि १२ शिरफूल .
पादाग्र गुल्फ नळिका कंठीं । बोटें मनगटें बाहुवटीं ।
कंठ नासिक श्रवणपुटीं । भाळ मस्तकीं वेणिका ।
द्वादशांगी स्त्री भूषणें च ( मुक्तेश्वर समापर्व )
बारा इमाम ( इस्लाम )- १ शाहमर्दान २ हसन , ३ हुसेन , ४ जैनुल , ५ अबदीन , ६ महम्मद बाकर , ७ जाफर , ८ मूसाकाजी , ९ अली ,
१० मूसारजा , ११ नकी - हसन अजगरी आणि १२ भेहेंद्री . हे बाराजण मुसलमानांत महापुरुष मानले जातात व त्यांची कालतिथी पाळतात . ( पंचग्रंथी )
बारा कापालिक - १ आदिनाथ , २ अनाथ , ३ काल , ४ अतिकालक , ५ कराल , ६ विकराल , ७ महाकाल , ८ कालमैरवनाथ , ९ बाहुक , १० भूतनाथ , ११ वीरनाथ आणि १२ श्रीकंठ , हे बारा कापालिक तंत्रशास्त्रप्रणेते होत . ( तंत्रशास्त्र )
बारा काव्याचीं उत्पत्तिस्थानें - १ श्रुति , २ स्मृति , ३ इतिहास , ४ पुराणें , ५ प्रमाणविद्या , ६ समयविद्या ( दार्शनिकसिद्धान्त आणि धर्मपंथांचीं रहस्यें ), ७ नाटयशास्त्र , ८ कामशास्त्र , ९ अर्थशास्त्र , १० कोक . ११ विरचना , ( प्रत्यक्ष व काल्पनिक व्यक्तींचीं व स्थलांचीं वर्णनें ) आणि १२ प्रकीर्णक . ( हस्तिपरीक्षा , रत्नपरीक्षा वगैरे ) ’ प्रकीर्णकं च काव्यार्थानां द्वादशयोगनयः । ’ ( काव्यमीमांसा अ . ८ )
बारा कुलक्षणें वधूसंबंधीं - १ अरुंद कपाळ , २ डोकीवर केसाचे झुबके असणें , ३ पाय हरणासारखे बारीक , ४ दांत वैलासारखे , ५ चालगायीसारखी , ६ कर्कश आवाज , ७ केसामध्यें क्रूरता , ८ क्रूरद्दष्टि , ९ बेढब अवयवी , १० क्रौर्यभाव , ११ औदार्याचा अभाव व १२ हातापायांना कांहीं विकार असणें , ( अथर्व - अनु - मराठी भाग ३ रा )
बारा गुण भिक्षा भागणारास आवश्यक - १ मोठयानें म्हणणें , २ पुरातन कथा सांगणें , ३ स्त्रियांबरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगणें , ४ त्यांच्या मुलाबाळांना कुरवाळणें , ५ त्यांच्या पतीची स्तुति करणें , ६ त्यांच्या पाकक्रियेची अवास्तव स्तुति , ७ किरकोळ पडेल तें काम करण्याची तयारी , ८ लेखनिपुणता , ९ ज्योतिष पाहता , येणें , १० गारुड विद्या , ११ मंत्रा आणि १२ जादूटोणा . हे बारा गुण भिक्षा मागणाराचे अंगीं असावे लागतात .
बारा गुण रसायनाचे - १ दीर्घायु , २ स्मृति , ३ बुद्धि , ४ आरोग्य ५ तारुण्य , ६ प्रमा , ७ उत्तम वर्ण , ८ उत्तम स्वर , ९ इंद्रियांची बळकटी , २० वातसिद्धि , ११ नम्रता व २२ कान्ति . ( चरक - चिकिसा १ - ६ )
बारा गुण शासनाधिकार्यांचे आवश्यक - १ विद्वान , २ कुलीन , ३ धार्मिक , ४ जितेंद्रिय , ५ विर्व्यसनी , ६ कामक्रोधादिकांनीं रहित , ७ ब्रुद्धो पसेवी ८ प्रजावात्सल्य , ९ प्रजेला धार्मिक शिक्षण देणारा , १० नीतिमान् , ११ उदार , आणि १२ पराक्रमी , ( वैदिक धर्म भारतीय राजनीति )
बारा गुण स्नानाचे - १ बलकारक , २ दीर्घायुष्य , २ पित्तहरण करणारे , ४ कंडूशामक , ५ निर्मलता , ६ श्रमहारक , ७ आळस झाडून टाकणारे , ८ घामटपणा नाहींसे करणारे , ९ तहान नाहींसे करणारे , १० केसाला स्थिरता निर्माण करणारे , ११ तेजस्विता व १२ मुखाला शोभा आणणारे . " इत्येवं द्वादशगुणं सदा स्नानमाचरेत् " ( सु . ).
बारा गुण ज्ञानी पुरुषाच्या नित्याचरणाचे - १ धर्म , २ सत्य , ३ दम , ५ तप , ५ निमत्सरता , ६ लोकापवादाचें भय , ७ काटकपणा , ८ हेवादावा न करणें , ९ यज्ञ , १० ज्ञान , ११ धैर्य आणि १२ गुरुजनांच्या उपदेशाचें श्रद्धापूर्वक श्रवण . ( म . भा . उद्योग . ४३ - २० )
बारा गोष्टींत शिवचरित्रसार - १ शहाजीची सुटका , २ अफजल - खानाचा वध , ३ पन्हाळ्याहून निघून जाणें , ४ उंबरखिंडीचें युद्ध , ५ राजापूर लुटलें , ६ फिरंग्यांना कैद , ७ शाहिस्तेखानाचीं बोटें छाटलीं , ८ सुरतेची लूट , ९ आग्र्याहून सुटका , १० सिंहगड घेतला , ११ राज्यभिषेक व १२ दक्षिण - दिग्विजय . ( दत्तोपंत आपटे लेखसंग्रह )
बारा ग्रह ( आतांपर्यंत ज्ञात ) सूर्य मालेंतले - १ रवि , २ मंगळ , ३ बुध , ४ गुरु , ५ शुक्र , ६ शनि , ७ राहु , ८ केतू , ९ चंद्र , १० हर्शल ११ नेपच्यून आणि १२ फलूटो ( अष्ट ग्रहांचा आसूड )
बारा दशा जीवाच्य्या - १ गर्मवास , २ जन्म , ३ बाल्य , ४ कौमार , ५ पौगण्ड , ६ यौवन , स्थावीर्य , ८ जरा , ९ प्राणरोध , १० मरण ११ स्वर्ग आणि १२ मोक्ष ( म . भा . अनु . अ . १७ )
बारा दोष वर्ज्य करावेत - १ क्रोध , २ काम , ३ लोभ , ४ मोह , ५ अनावर हाव , ६ निर्दयता , ७ दुसर्या नांवें ठेवण्याची वृत्ति , ८ विषयासक्ति , ९ परोत्कर्ष न पाहवणें , १० परनिंदा , ११ आढयता आणि १२ इष्टानिष्ट गोष्टीविषयीं मनास लावून घेणें , हे बारा माणसानें मग तो ज्ञानी असो वा साधारण संसारी असो - टाळावेत . ( म . भा . उद्योग . ४३ - १६ )