मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ९

संकेत कोश - संख्या ९

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


नऊ प्रकारचीं भक्तीचीं साधनें - १ सज्जनसंगति , २ ईशकथावर्णन ३ त्याचें गुणगान , ४ त्याच्या वचनांचें व्याख्यान करणें , ५ गुरूची उपासना , ६ ईशपूजनीं एकनिष्ठा , ७ मंत्रांची सांग उपासना , ८ भूतमात्राचे ठिकाणीं ईशमाव , ८ बाह्मेंद्रिय - निग्रह आणि ९ परमेश्वरी स्वरूपाचा तत्तविचार , ’ नवं नवांवधा भक्तिः साधनम् ‌‍ । ’ ( अ . रा . अरण्य . सर्ग १० . २७ )

नऊ व्यृहमूतीं व त्यांचे नऊ भक्त - १ वासुदेव - उद्धव आणि अर्जुन , २ संकर्षण - रैवत , ३ अनिरुद्ध - उषा , ४ प्रद्मुम्न - कामुक , ५ हय - ग्रीव - वेदव्यास , ६ नारायण - ब्रह्मदेव , ७ श्वेतवराह - पृथ्वी , ८ वामन - बळी आंणि ९ नृसिंह - भक्तप्रह्लाद .

नवभक्ति नवमूतीं , तेथील भक्तीची स्थिती ,

उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ( ए . भा . स्कंध . ११ अ . १६१ )

नऊ विग्रह ( मूर्ती ) नृसिंह देवतेच्या - १ ज्वाला . ५ अहोबिल , ३ मालोल , ४ क्रीडाकार , ५ कारेज , ६ भार्गव , ७ योगानंद , ८ छत्रवट व ९ पवन . अहोबिल हें पवित्र क्षेत्र आंध्र प्रदेशांतील कर्नूल जिल्ह्मांत आहे . ही प्राचीनकाळीं हिरण्यकश्यपूची राजधानी होती . ( संस्कृतिकोश )

नऊ शुभ चिह्लें हस्तसामुद्रिकाचीं - १ सूर्य , २ चंद्र , ३ लता , ४ नेत्र , ५ अष्टकोण , ६ त्रिकोण , ७ मंदिर ८ हत्ती आणि ९ घोडा . हीं चिन्हें

हातांवर असल्यास अत्यंत शुभ म्हणून मानिलीं आहेत . ( ह्स्तसामुद्रिकशास्स्त्र )

नऊ संख्या विशेष - आठ या संख्येला वृद्धि , क्षय हीं दोन्ही आहेत पण नऊ ही संख्या अशी आहे कीं ती कोणत्याहि परिस्थितींत मैत्री वाढेल पण क्षीण होणार नाहीं .

उदा ९ * २ = १८ , १ + ८ = ९ , ९ * ३ = २७ , २ + ७ = ९ , ९ * ४ = ३६ , ३ + ६ = ९ , ९ * ५ = ४५ , ४ + ५ = ९ ,

वर्धते क्षीयते चापि मैव्यष्टांकमिवासताम् ‌ ।

नवांकवत्सतांअ मैत्री वर्धते न च हीयते ॥ ( सु . )

नऊ सच्छिष्याचीं लक्षणें - १ सन्मानाची अपेक्षा नसणें , २ निर्मत्सरता , ३ दक्षता , ४ अहंमन्यता सुटणें , ५ सद्‌‍गुरुशीं सह्लदयपण , ६ निष्ठा , ७ परमार्थ जिज्ञासा , ८ अनसूया आणि ९ वितंडवाद न करणें .

एवं शिष्याचीं नव लक्षणें । नवखंड पृथ्वीचीं आमरणें ॥

निजकृपेनें नारायणें । भक्ताकारणें दीधलीं ॥ ( ए . भा . १० - २३७ )

नऊ संवेदना - १ प्रेम , २ हास , ३ आश्चर्य , ४ उत्साह , ५ घृणा , ६ क्रोध , ७ भीति , ८ शोक व ९ शांति , कोणताहि प्राणी जन्माला येतांना या नऊ संवेदनांनीं युक्त असतो . ( सह्याद्रि एप्रिल १९५३ )

नऊ स्थायी भाव - १ रति , २ उत्साह , ३ शोक , ४ विस्मय , ५ भय , ६ हास्य , ७ जुगुप्सा , ८ क्रोध आणि ९ निर्वेद ( वीट येणें किंवा विरक्ति ). हे नऊ स्थायीभाव अथवा मनोवृत्ति होत . ’ निर्वेदस्थायिभावोऽस्ति शांतोऽपि नवमो रसः । ’ ( काव्यप्रकाश )

नऊ हस्त - वाद्यें - १ झांज , २ टाळ , ३ चिपळी . ४ करताळ . ५ जलतरंग , ६ घंटा , ७ तास , ८ घुंगुर आणि ९ घागर्‍या .

नऊजणांकडे विपित्कालीं देखील याचना करूं नये - १ कृपण , २ निंदक ( शिवीगाळ करणारा ), ३ मूर्ख , ४ पारधी , ५ जुगारी , ६ पूज्यांना मान न देणारा , ७ निष्ठुर , ८ बैरबुद्धीनें वागणारा व ९ कृतघ्र , ( म . भा . उद्योग . ३७ - ३६ )

नऊ जण श्रीकृष्णाचे सवंगडी - १ स्तोककृष्ण , २ श्रीदाम , ३ सुबल , ४ अर्जुन , ५ विशाल , ६ ऋषम , ७ तेजस्वी , ८ देवप्रस्थ आणि ९ वरूथप ( भाग . १० - २२ - ३१ )

नव खंड पृथ्वी - ( अ ) पौराणिक कालीन पृथ्वीवरील नऊ मोठाले भूभाग - १ इलावृत्त , २ भद्राश्व , ३ हरिवर्ष , ४ किंपुरुषवर्ष , ५ केतुमाल , ६ रम्यक , ७ भरतवर्ष , ८ हिरण्मय आणि ९ उत्तर कुरु . हीं नव खंडें होत . " नव खंड पृथ्वी व दहावें खंड काशी असें म्हणतात "; ( आ ) १ भरतखंड , २ पुष्करखंड , ३ हरिखंड , ४ रम्यखंड , ५ सुवर्णखंड , ६ इलावृत्तखंड , ७ कौरव खंड , ८ किन्नर खंड आणि ९ केतुलाखंड . ( मूळ स्तंम कथासार ) ( इ ) १ इंद्रखंड , २ कशेरूखंड , ३ ताम्रखंड , ४ गमस्ति खंड , ५ नागखंड , ६ वारुणखंड , ७ सौम्य खंड , ८ ब्रह्मखंड व ९ भरतखंड ( हंस कोश )

नव खंड ( देहांतर्गत )- १ ब्रह्मखंड - कान , २ सौम्यखंड - त्वचा , ३ गमस्तिखंड - नेत्र , ४ वरूणखंड - जीभ , ५ नागखंड - नाक , ६ इंद्रखंड - हात . ७ कशेरू खंड - पाय , ८ भरतखंड - लिंग , आणि ९ ताम्रखंड - गुद . पृथ्वीवर जसे नवखंड तसे देहांतर्गत नवखंड योगशास्त्रांत मानिले आहेत .

( पंचग्रंथी )

नवग्रह - १ सूर्य , २ चंद्र , ३ मंगळ , ४ बुध , ५ गुरु , ६ शुक्र , ७ शनि , ८ राहू आणि ९ केतु , यांखेरीज हर्शल व नेपच्यून हेहि ग्रह आधुनिक मानतात . यांनाच अनुक्रमें वरुण व प्रजापति असें म्हणतात . या शिवाय प्यूटो नामक एक ग्रह अलिकडे ( १९३० ) पाश्चात्यांनीं नवीन शोधून काढला आहे .

सूर्यः सोमो महीपुत्रः सोमपुत्रो बृहस्पतिः ।

शुक्रः शनैश्वरो राहुः केतुश्चैते ग्रहःस्मृताः ॥ ( या . स्मृति )

नवग्रहांचीं नव धान्यें - १ रवि - गहूं , २ चंद्र - डांगेर , ३ मंगळ - तूर , ४ बुध - जव , ५ गुरु - चणे , ६ शुक्र - मूग , ७ शनि - तीळ , ८ राहू - उडीद , ९ केतु - कांग . ( ज्योतिप )

नव ग्रहांचीं नऊ रन्तें - १ सूर्य - माणिक , २ चंद्र - मोतीं , ३ मंगळ - प्रवाळ , ४ बुध - पांच . ५ गुरु - पुष्पराग , ६ शुक्र - हिरा , ७ शनि - नीळ , ८ राहु - गोमेद आणि ९ केतु - वैड्रर्य मणि . हीं क्रमानें नवग्रहांचीं रत्ने असून त्या त्या रत्नांची आंगठी धारण केल्यानें त्या त्या ग्रहांची प्रसन्नता होऊन इष्टसिद्धि होते . ( र . र . समुच्चय )

नवगौप्यें - १ आयुष्य , २ वित्त , ३ गृहच्छिद्र , ४ मंत्र , ५ मैथुन , ६ औषध , ७ दान , ८ मान आणि ९ अपमान . या नऊ गोष्टींची वाच्यता करूं नये ,

आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मन्त्रमौषधमैथुने ।

दानं मानापमानौ च नव गौप्यानि कारयेत् ‌‍ ॥ ( सु . )

नवचक्रें शरीरांतर्गत - १ मूलाधार , २ स्वाधिष्ठान , ३ मणिपूर , ४ अनाहत , ५ विशुद्ध , ६ ललना , ७ आज्ञा , ८ ब्रहारंध्र आणि ९ सोमचक्र . या नवचक्रवर लय केला असतां अनेक सिद्धि प्राप्त होतात .

कृष्णद्वैपायनाद्यैस्तु साधितो लयसंज्ञितः ।

नवस्यैव हि चक्रेषु लयंकृत्वा महात्मभिः ॥ ( श्रीगुरुदत्तयोग )

नवदुर्गा - ( अ ) १ शैलपुत्री , २ ब्रह्मचारिणी , ३ चंद्रघंटा , ४ कुष्मांडा , ५ स्कंदमाता , ६ कात्यायनी , ७ कालरात्री , ८ महागौरी आणि ९ सिद्धिदात्री . ’ नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः । ( चण्डीकवचम् ‌‍ ) ( आ ) १ काली , २ कात्यायनी , ३ ईशानी , ४ चामुंडा , ५ मुंडमर्दिनी , ६ मद्रकाली , ७ मद्रा , ८ त्वरिता व ९ वैष्णवी . ( शिव , पु . सतीखंड अ . २ )

नवद्वारें - २ डोळे , २ कान , २ नाकपुडया , १ तोंड , १ गुदद्वार आणि १ मूत्रद्वार , अशीं मानवी शरिराचीं नऊ द्वारें आहेत .

’ नवद्वारे देही । तो असुतची परि नाहीं . । ’ ( ज्ञा . ५ - ७५ )

नव नाग - १ अनंत , २ वासुकि , ३ शेष , ४ पद्मनाम , ५ कंबल . ६ शंखपाल , ७ धृतराष्ट्र , ८ तक्षक आणि९ कालिया . ( नवनागस्तोत्र )

नवनाग सहस्त्रबळी - १ दुयोंधन , २ जरासंध व ३ भीमसेन या तिघांना नऊ सहस्त्रहत्तींचे बळ असे . त्यांत भीमाचा विशेष म्हणजे त्याची पाठ भूमीला लागली असतां दुष्पट बळ चढत असे अशी कथा आहे .

नव नाथ - ( अ ) १ मच्छिंदर , २ गोरख , ३ जालंधर , ४ कानिफ , ५ चरपटी , ६ नागेश , ७ भरत , ८ रेवण आणि ९ गहिनीनाथ . हे नव नारायणाचे अवतार होत . ( नवनाथ भक्तिसार ); ( आ ) १ ओंकारनाथ , २ शैलनाथ , ३ संतोकनाथ , ४ अकलकंबुनाथ , ५ गजबली गजकांतनाथ , ६ उदयनाथ , ७ मत्स्येंद्रनाथ , ८ गोरखनाथ आणि ९ पूर्णभरत . ( Gorakhanath and Kanphatas )

नवनाडया ( देहांतर्गत )- १ गणेशनाडी , २ पयास्विनी नाडी , ३ हस्तिनी , ४ पुहुखा नाडी , ५ गांधार , ६ अलंबुखा , ७ कुहू नाडी , ८ वारुणी आणि ९ शंखिनी नाडी . या नवनाडया योगशास्त्रांत सांगितल्या आहेत . ( पंचग्रंथी ),

नव नारायण - १ कवि , २ हरि , ३ अंतरिक्ष , ४ प्रबुद्ध , ५ पिप्पलायन , ६ आविहोंत्र , ७ द्रुमिल , ८ चमस आणि ९ कराभाजन . हे नऊहि मुनि आत्मविद्याविशारद होते . ( भाग . ११ . २ . २१ ).

कीं ते नवही नारायण । स्वयें प्रगटलें आपण ।

नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥ ( ए . भा . २ - १८९ )

नवनिधि - ( अ ) १ महापद्म , २ पद्म . ३ शंख , ४ मकर , ५ कच्छप , ६ मुकुंद , ७ कुंद , ८ नील आणि ९ खर्व . असे कुवेराचे नवनिधि आहेत . ( स्कंद वैष्णव खंड अ . मा . ७ - ५१ ); ( आ ) १ हय , २ गज , ३ रथ , ४ दुर्ग , ५ भांडार , ६ अग्नि , ७ रत्न , ८ धान्य आणि ९ प्रमदा ;

( इ ) १ कामधेनु , २ अंजन , ३ सिद्धपादुका , ४ अन्नपूर्णा , ५ कल्पतरु , ६ चिंतामणि , ७ घुटिका , ८ कलका आणि ९ परिस . ( दुर्वाध श . कोश )

नव बालग्रह - १ स्कंद , २ स्कंदापस्मार , ३ शकुनीग्रह , ४ पूतनाग्रह , ५ अन्धपूतनाग्रह , ६ शीतपूतना , ७ रेवती , ८ मुखमंडिका ग्रह आणि ९ नैगमग्रह . हे नव बालग्रह बालकांन पीडा देणारे आहेत . ( सुश्रुत )

नव महाणि - १ स्फटिक , २ शिवहत्या , ३ गंभीर , ४ गुरुडोघ्नत , ५ नीरोगण , ६ हरडल , ७ केयूर , ८ सलर व ९ मौक्तिक .

( भूगोल पुराण )

नव मेघ - १ घन , २ दवन , ३ पवन , ४ पांगुळ , ५ मिद्रन , ६ धीरधनु , ७ सहदेव , ८ तालवन , ९ पक्षराज . ( क . क . ) ( दु . श . को . )

नव मूलभूत जीवन प्रेरणा - १ पोषणेच्छा , २ संरक्षणेच्छा , ३ विश्रामेच्छा , ४ कार्येच्छा , ५ उत्सर्जनेच्छा , ६ कामेच्छा , ७ वात्सल्येच्छा , ८ प्रभुत्वेच्छा आणि ९ अनुसरणेच्छा . ( नवभारत सष्टेंबर १९५७ )

नवाह पारायण - नऊ दिवसांत करावयाचें पारायण . गुरुचरित्र भागवत इ , ग्रंथाचें पारायण सात दिवसांचें त्यास सप्ताह म्हणतात . पण रामायणपारायण नऊ दिवसांचे करण्याचा विधि आहे . ( श्रीराम चरित्रमानस )

नवरत्नें - १ हिरा , २ मोतीं , ३ प्रवाळ , ४ गोमेद , ५ इंद्रनील , ६ बैडूर्य , ७ पुष्कराज , ८ पाच ब ९ माणिक .

वज्रं मुक्ता प्रवालं च गोमेदश्चेंद्रनीलकः ।

वैडूर्यः पुष्कराजश्च पाचि माणिक्यमेव च ॥

महारत्नानि चैतानि नव प्रोक्तानि सूरिमिः ॥ ( शुक्रनीतिसार )

नवरत्नें ( अ ) ( विक्रमाच्या समेंतील )- १ धन्वंतरी ( वैद्य ), २ क्षपणक , ( फलज्योतिषी ), ३ अमरसिंह ( कोशकार ), ४ शंकु ( भूमापन शास्त्रज्ञ ), ५ वेतालभट्ट ( मंत्रशास्त्रज्ञ ), ६ घटकर्पर ( शिल्पशास्त्रज्ञ ), ७ कालिदास ( कवि ), ८ बराहमिहिर ( ज्योतिषी ), आणि ९ वररुचि ( वैयाकरणी ).

ख्यातो वराहमिहिरो नृपतेः सभायां रत्नानि वै ।

वररुचिर्नव विक्रमस्य । ( ज्योतिर्विदाभरण

( आ ) ( अकबरकालीन )- १ राजा बिरबल , २ अबुल फजल ( वैज्ञानिक ), ४ अबुल फैजी , ४ राजा तोडरमल , ५ तानसेन ( संगीतज्ञ ), ६ अबदुल रहीम ( कवि ), ७ मानसिंह , ८ खानखाना आणि ९ भगवानदास .

नवरस - १ शृंगार , २ बीर , ३ करुण , ४ अद्‌भुत , ५ हास्य , ६ भयानक , ७ बीभस्स , ८ रौद्र आणि ९ शांत . असे नऊ रस साहित्यशास्त्रांत मानले आहेत . कोणी कोणी भक्ति हा दहावा रस मानतात .

शृंगारवीरकरुणाद्‌‍भुतहास्यभयानकाः ।

बीमत्सरौद्र्शांताश्च नवधा कीर्तिता रसाः ॥ ( रसगंगाधार )

संत श्रीतुलसीदासांनीं " अकथित रस " नांवाचा एक अभिनव रसप्रकार मानला आहे .

नवरस व त्त्यांचे स्थायीभाव - १ शृंगार - रति , २ हास्य - आनंद , ३ करुण - शोक , ४ रौद्र - क्रोध , ५ वीर - उत्साह , ६ भयानक - भय , ७ बीभत्स - जुगुप्सा , ८ अद्‌भुत - विस्मय , ९ शांत - शम , ( प्रतापरुद्र )

नवलक्षणें ब्राह्यणाचीं - १ आचार , २ विनय , ३ विद्या , ४ प्रतिषठा , ५ तीर्थदर्शन , ६ निष्ठा , ७ वेदपठण , ८ तपस्या व ९ दान .

नवविध अन्न - १ सूप - बरण , २ शाक - शाकभाजी , ३ मिष्टान्नमधुरान्न , ४ जेमन - भात वगैरे , ५ उपदेश - मूलक्र इत्यादिक , ६ वितरदंश - लोणचें , ७ संधान - मद्यादि , ८ रोचन - कोंशिम्बरी आणि ९ व्यंजन - कढी इत्यादि . ( दु . श . को . )

नवविध स्वभाव स्त्रियांचे - १ देवसत्त्वा , २ गंधर्वसत्त्वा , ३ यक्षसत्त्वा , ३ मनुष्यसत्त्वा , ५ पिशाचसत्त्वा , ६ नागसत्त्वा , ७ काकसत्त्वा , ८ वानरसत्त्वा आणि ९ खरसत्त्वा , ( अनंगरंग )

नवविधपरीक्षा ( आयुर्वेदीय )- १ नाडी , २ मूत्र , ३ मल , ४ शब्द , ५ स्पर्श , ६ रूप , ७ द्दक् ‌, ८ मुख व ९ जिव्हा परीक्षा . ( भावप्रकाश )

नवविध भक्ति व नऊ भक्तश्रेष्ठ - ( अ ) १ श्रवण - परीक्षिति , २ कीर्तन - शुकाचार्य , ३ स्मरण - प्रह्लाद , ४ पाद्सेवन - लक्ष्मी , ५ अर्चन - पृथु रजा , ६ वंदन - अक्रूर , ७ दास्य - हनुमान ‌‌ , ८ सख्य - अर्जुन आणि ९ आत्मनिवेदन - बलि .

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ‌ ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ‌‍ ॥ ( भाग . स्कंध ७ - ५ - २३ )

( आ ) १ सत्‌‍संग , २ हरिकथेविषयीं प्रेम , ३ गुरुसेवा , ४ प्रभुगुणगान , ५ मंत्रजप , ६ दम , शील व वैराग्य , ७ सर्व विश्वांत परमेश्वर पाहणें , ८ मिळेल त्यांत संतोष व परदोष न पाहणें व ९ सर्वस्वीं रामावर भरंवसा ( तुलसीदास ), ( परमार्थपर व्याख्यानें ).

नवविधशक्ति - १ धर्मशक्ति , २ दानशक्ति , ३ मंत्रशक्ति , ४ ज्ञानशक्ति , ५ अर्थशक्ति , ६ कामशक्ति , ७ युद्धशक्ति , ८ व्यायामशक्ति व ९ भोजनशक्ति . ( वस्तुरत्नकोश )

नवसमिधा - १ रुई , २ पळस , ३ खैर , ४ आघाड , ५ पिंपळ , ६ उंबर , ७ शमी , ८ हरळी व ९ दर्म .

नवसाक्षिदेवता - १ सूर्य , २ चंद्र , ३ यम , ४ काल , ५ पृथ्वी , ६ आप , ७ तेज , ८ वायु व ९ आकाश .

सूर्यःअ सोमो यमः कालो महाभूतानि पंच च ।

एते शुभाशुभाख्याणां कर्मणां नव साक्षिणः ॥ ( सु . )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP