अठरा पगड जात - १ तांबट , २ पाथरवट , ३ लोहार , ४ सुतार , ५ सोनार , ६ कासार , ७ कुंभार , ८ गुरव , ९ धनगर , १० गवळी , ११ वाणी , १२ जैन , १३ कोळी , १४ साळी , १५ चितारी , १६ माळी , १७ तेली व १८ रंगारी ,
अठरा पर्ठें ( महाभारताचीं )- १ आदि , २ सभा , ३ आरण्यक , ४ विराट , ५ उद्योग , ६ भीषम , ७ द्रोणा , ८ कर्ण , ९ शल्य , १० सौप्तिक , ११ स्त्री , १२ शांति १३ अनुशासन , १४ अश्वमेथ , १५ आश्रमवासिक , १६ मौसल , १७ महाप्रस्थान व १८ स्वर्गारोहण .
अठरा पक्कान्नें - १ मांडे , २ वडे , ३ घृतपुर्या , ४ लडू , ५ तिळवे , ६ गुळवर्या , ७ तेळवर्या , ८ फेण्या , ९ कुरबंडीया , १० घार्या , ११ घारगे , १२ वडोरीया , १३ चोरवे , १४ वेठनीगे , १५ खांडवी , १६ शिखरणी , १७ सांजोर्या व १८ खिरी . ( क . क . )
अठरा पुराणें - १ बृहद्विष्णु , २ शिव उत्तर खंड , ३ लघुवृहन्नारदीय , ४ मार्कंडेय , ५ वह्रि , ६ भविष्योत्तर , ७ वराह , ८ स्कंद , ९ वामन , १० वृहद्वामन , ११ वृहन्मत्स्य , १२ स्वल्पमत्स्य , १३ लघुवैवर्ण आणि पांच प्रकारचीं भविष्य पुराणें . या सर्वां मिळून अठरा पुराणें होत .
अठरा पुराणें ( वर्गीकरण ) सहासात्त्किक - १ वैष्णव , २ नारदीय , ३ भागवत , ४ गारूड , ५ पाद्म व ६ वाराह , सहा राजस - १ ब्रह्मांड , २ ब्रह्मवैवर्त , ३ मार्कंडेय , ४ भविष्य , ५ वामन , व ६ ब्राह्म . सहा तामस - १ मात्स्य , २ कौर्म , ३ लिंग , ४ शैव , ५ स्कान्द व ६ आग्नेय ( भारत - दर्शन संग्रह )
अठरा पौराणिक विषय - १ सृष्टि , २ प्रतिसृष्टि , ३ वंश , ४ बंशानु - चरित , ५ मन्वंतर , ६ आख्यान , ७ उपाख्यान , ८ गाथा , ९ कल्पशुद्धि , १० सिद्धान्त , ११ संहिता , १२ डामर ( अद्भुंत ) १३ जामल , १४ तंत्र , १५ ज्योतिश्चक , ( खगोल ), १६ भुवनकोश , ( भूगोल ) १७ वेद आणि १८ पुराण . ( गीता विज्ञान भाष्य - भूमिका )
अठरा पंथ बौद्ध धर्माचे - १ स्थविरवाद , २ महासंघिक , ३ गोकुलिक , ४ एकव्यवहारिक , ५ प्रज्ञाप्ति , ६ बाहुलिक , ७ चैत्य , ८ महींशासक , ९ व्रजीपुत्रक , १० धर्मोत्तरीय , ११ भद्रयानिक , १२ छन्नागरिक , १३ सम्मिति , १४ सर्वार्थवादी , १५ धर्मगुप्तीय , १६ काश्यपीय , १७ संक्रांतिक आणि १८ सूत्रवाद , ( महावंस परिच्छेद ५ )
अठरा प्रकार भूताचे - १ देवग्रह , २ दैत्यग्रह , ३ गंधर्वग्रह , ४ सर्पग्रह , ५ यक्षग्रह , ६ ब्रह्मदग्रह , १२ औकिरणग्रह , १३ वेताळ , १४ पितृग्रह , १५ ते १८ गुरु , वृद्ध , ऋषि व सिद्ध यांचे शाप . ( वाग्भट अ . ४ )
अठरा प्रकारचीं व्यसनें - १ मृगया , २ जुगार , ३ दिवसा झोंप , ४ निंदा , ५ स्त्रियांबद्दल आसक्ति , ६ नशा करणें , ७ गीत , ८ वाद्य , ९ नृत्य , १० उगीचच भटकणें , ११ चहाडी , १२ वाईट काम , १३ विश्वासघात , १४ मत्सर , १५ द्वेष , १६ चौर्य , १७ कटु भाषण आणि १८ मारझोड करणें . ( तत्त्व - निज - विवेक )
अठरा पकारचे सत्त्वगुण - १ प्रीति , २ प्रसिद्धि , ३ उन्नति , ४ विनयशीलता , ५ सुख , ६ दैन्य न दाखविणें , ७ निर्मयता , ८ समाधान , ९ श्रर्द्धाळुपणा , १० क्षमा , ११ धैर्य , १२ अहिंसा , १३ शुचिर्मूतता , १४ अक्रोअध , १५ आर्जव , १६ समता , १७ सत्य व १८ निर्मत्सरता . ( म . भा . शांति - अ . ३४१ तळटीप )
अठरा प्रमुख उपनिषदें - १० द्शोपनिषदें ( १० चे अंकीं पाहा . ) ११ श्वेताश्वतर , ११२ कौषीतकी , १३ मैत्रायणी , १४ बाष्कलमंत्रोपनिषद् , १५ छागलेय , १६ आर्षेय , १७ शौनक आणि १८ जैमिनीय . या प्रमुख अठरा उपनिषदांचा संकलित ग्रंथ - भगवद्नीता . ( भ . गी . साक्षात्कारदर्शन )
अठरा भार वनस्पति - पृथ्वीवरील सर्व वृक्ष , वनस्पति यांस समुच्चयानें :- अठरा भार वनस्पतींची लेखणी . ( व्यंकटेश स्तोत्र )
अठरा महारथी ( पांडवाकडील )- दहा हजार वीराशीं एकटा युद्ध करूं शकतो त्याला महारथी म्हणतात .- १ भीम , २ अर्जुन , ३ सात्यकि , ४ विराट , ५ द्रुपद , ६ धृष्टकेतु , ७ चेकितान , ८ काशिराज , ९ पुरुजित् कुंतिभोज , १० शैब्य , ११ युधामन्यु , १२ उत्तमौज , १३ अभिमन्यु , १४ प्रतिविंध्य , १५ श्रुतसोम , १६ श्रुतकीर्ति , १७ शतानीक आणि १८ श्रुतकर्मा , हे शेवटचे पांच द्रौपदेय होत .
अठरा महारथी ( श्रीकृष्णपुत्रांत )- १ प्रद्युम्न , २ अनिरुद्व , ३ दीप्तिमान् , ४ भानु , ५ सांब , ६ मधु , ७ बृहद्भानु , ८ चित्रभानु , ९ वृक , १० अरुण , ११ पुष्कर , १२ बेदबाहु , १३ श्रुतदेव , १४ सुनंदन १५ चित्तभानु , १६ विरूप , १७ कवि व १८ न्यग्रोध . भगवान् श्रीकृष्णाच्या पुत्रांत हे अठरा महारथी होते . ’ तेषामुद्दामवीर्याणामष्टादश महारथाः ॥ ’ ( भा . स्कं . १० . ९० - ३२ )
अठरा महापुराणें - १ बाह्म , २ पद्म , ३ विष्णु , ४ शिव अथवा वायु , ५ भागवत , ६ नारद , ७ मार्कंडेय , ८ अग्नि , ९ भविष्य , १० ब्रह्मवैवर्त , ११ नृसिंह किंवा लिंग , १२ वाराह , १३ स्कंद , १४ वामन , १५ मत्स्य , १६ कूर्म , १७ गारुड आणि १८ ब्रह्माण्ड .
मात्स्यं च गारुडं चैव ब्रह्माण्डं च ततः परम् ।
अष्टादशपुराणानां नामधेयानि यः पठेत ॥
अष्ठादश पुराणें । तींची मणि भूषणें ।
पदपद्धतिखेवणें । प्रमेय रत्नांचीं ( ज्ञा . ४ - ५ )
अठरा पुराणकर्ते - १ बकदालम्य - मस्त्य पुराण , २ मृकंडी - मार्कंडेय पुराण , ३ व्यास - भारत , ४ लोमहर्षण - भविष्योत्तर , ५ कूर्म - बृहन्नारदीय , ६ अगस्ति - ब्रह्मांड , ७ कश्यप - ब्रह्मवैवर्त , ८ भारद्वाज - वराहपुराण , ९ अंगिरा - वायुपुराण , १० शृंगऋपि - विष्णुपुराण , ११ कण्व - वामनपुराण , १२ अत्रि - आदित्यपुराण , १३ पराशर - लिंगपुराण , १४ पद्मऋषि - पद्मपुराण , १५ विभांडक - अग्निपुराण , १६ वसिष्ठ - कूर्मपुराण , १७ कर्तिक - स्कंदपुराण आणि १८ बृहस्पति - गुरुडपुराण , ( सिद्धान्तबोध अ . २३ )
अठरा मर्म स्थानें ( शरीरांतील )- सर्व शरीरांतील बाय़ूचा निरोध करून त्याला शरीरांतील अठरा मर्मस्थानांच्या ठिकाणीं खिळून ठेवणें . या अठरा प्रत्याहार प्रेरणा होत . ( म . भा . शांति अ . ३७६ )
अठरा मुनीश्वर - १ जाबालि , २ नाचिकेत , ३ स्कन्द , ४ लोकाक्षि , ५ काश्यप , ६ लिखित , ७ सनत्कुमार , ८ शन्तनु , ९ जनक , १० ब्याघ्र , ११ कात्यायन , १२ बभरु , १३ जातुकर्ण्य , १४ कपिंजल , १५ बोधायन , १६ कणाद , १७ विश्वामित्र आणि १८ सुमन्तु . ( यमलाष्टकतन्त्रम् )
अठरा जज्ञनामें - १ अतियाज , २ अतिरात्र , ३ अनुयाज , ४ अश्वमेध , ५ इष्टापूर्त , ६ इष्टि , ७ उक्थ्य , ८ त्रिकद्रुक , ९ दर्शपैर्णिमास , १० परिवत्सर , ११ पशुयाग , १२ पितृयज्ञ , १३ पुरुषमेध , १४ प्रयाज , १५ प्रातःसव , १६ बृहस्पतीसव , १७ माध्यंदिनसव व १८ सोमयाग . ( ऋग्वेददर्शन ).
अठरा मंत्री विश्वराज्याचे - १ जातवेदाअग्नि - शिक्षणमंत्री , २ इंद्र - युद्धमंत्री वा आंतर्बाह्म - संरक्षण , ३ उपेंद्र - उपयुद्धमंत्री , ४ रुद्र - सेनासंचलनमंत्री , ५ अश्चिनौ - आरोग्यमंत्री , ६ पूषा - पोषणमंत्री , ७ सूर्य - शोधनमंत्री , ८ भग - अर्थमंत्र , ९ विश्वकर्मा - उद्योगमंत्री , १० वास्तोष्पति - गृहमंत्री , ११ त्वष्टा - शस्त्रास्त्र - निर्माण - मंत्री , १२ ऋभु - लघुउद्योगमंत्री , १३ वरुण - नौका - युद्धमंत्री , १४ चंद्रमा - मानस समाधान मंत्री , १५ पर्जन्य - कृषिमंत्री , १६ वायु - जीवनमंत्री , १७ बल - संरक्षण मंत्री आणि १८ गुप्त -- संरक्षणमंत्री ( पुरुषार्थ डिसेंबर १९६० )
अठरा योग ( गीर्तेतील )- १ अर्जुनविषादयोग , २ सांख्ययोग , ३ कर्मयोग , ४ कर्मबह्मार्पणयोग , ५ कर्मसंन्यासयोग , ६ आत्मसंयमयोग , ७ ज्ञानविज्ञानयोग , ८ अक्षरब्रह्मयोग , ९ राजविद्याराजगुह्ययोग , १० विभूतियोग , ११ विश्वरूपदर्शनयोग , १२ भक्तियोग , १३ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग , १४ गुणत्रविभागयोग , १५ पुरुषोत्तमयोग , १६ देवासुरसंपद्विभागयोग , १७ श्रद्धात्रयविभागयोग आणि १८ मोक्षसंन्यासयोग . ( अर्जुन उत्थानयोग - गीतातत्त्व मंजिरी ) हे श्रीमद्भगवद्नीतेंतील अठरा अध्यायांत वर्णिलेले अठरा योग होत हे अठराहि योग मिळून गीतेचें योगशास्त्र होतें .
अठरा लक्षणें ज्ञानाचीं - १ निरभिमानी , २ निष्कपट , ३ निरुपद्र्वी , ४ सहनशील , ५ सरल , ६ गुरुभक्ति , ७ निर्मलता , ८ द्दढनिश्चयी , ९ आत्मसंयमन , १० विषयवैराग्य , ११ अहंकाररहित , १२ जन्म , जरा , मृत्यु , वाधि आणि दुःख हे दोष आहेत असें समजणें , १३ अनसक्ति , १४ पुत्रदारागृहादिकांनाहि लिप्त नसणें , १५ स्थिरचित्तत्व , १६ एकनिष्ठभक्ति , १७ लोक समुदायाचा कंटाळा व १८ एकांताची आवड ( भ . गी . १३ - ७ ते १० ) मागा श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदे । ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ( ज्ञा . १३ - ८५३ )
ज्ञानाचींच लक्षणें उलटीं केलीं म्हणजे तींच अज्ञान लक्षणें ठरतात . एवं इयें अठरा । ज्ञान लक्षणें अवधारा । श्रीकृष्णें धनुधंरा , निरूपिली ॥ ( ज्ञा . अ . १३ )
अठरा वादस्थानें ( व्यवहारांत )- १ कर्ज घेणें , २ ठेव ठेवणें , ३ धनी नाहीं अशा वस्तूंचा केलेला विक्रय , ४ समाईक व्यापार , ५ दिलेलें दान परत घेणें , ६ सेवकांचें वेतन , ७ केलेल्या संकेतांचे उल्लंघन , ८ विकत घेतलेली वस्तु पसंत न पडल्यानें उत्पन्न होणारा वाद , ९ धनी व गुराखी यांत जनावरांसबंधीं होणारा , वाद , १० ग्रामादि सीमा , ११ शिवीगाळ , १२ चोरी , १३ अपहार , १४ स्त्री , १५ स्त्री व पुरुषांची धर्मामध्यें व्यवस्था , १६ वडिलोपार्जित धनविभाग , १७ द्यूत आणि १८ पक्षीक्रीडा वगैरे बाबत , अशीं व्यवहारांत वाद उत्पन्न होण्य़ाचीं अठरा वादस्थानें आहेत .
स्त्रीपुंधर्मो विभागश्च द्यूतमाह्लय एव च ।
पदान्यष्टदशैतानि व्यवहारस्थिताविह ॥ ( मनु . ८ - ७ )
अठरा विद्या - चौदा विद्या ( चौदाच्या अंकीं पाहा ) आणि १ आयुर्वेद , २ धनुर्वेद , ३ गांधर्व वेद आणि ४ अर्थशास्त्र हीं चार मिळून अठरा विद्या होतात .
आयुर्वेदो धनुर्वेदो गांधर्वश्वैव ते त्रयः ।
अर्थशास्त्रं चतुर्थं तु विद्या ह्मष्टादशैव तु ॥ ( वायु . पूर्वार्ध . ३ - ६१ )
अठरा व्यक्तिवैशिष्टयें - ( श्री शिवछत्रपतीचीं )- १ कमालीची ५ साक्षात्कारी , ६ आध्यात्मिक स्थायी भावाचा , ७ स्थितप्रज्ञ , ८ आपण यंत्र व ईश्वर यंत्री समजणारा , ९ भौतिक सुखाविषय़ीं उदासीन , १० अग्रगण्य मुत्सद्दी १२ विधायक बुद्धिमत्ता , १३ राजपुरुष , १४ श्रेष्ठसेनानी , १५ साहसी शूरयोद्धा , १६ सर्वंकषप्रतिभा १७ द्रष्टा व , १८ आजन्म - यशस्वी . ( पु . छत्रपति शिवाजी भाग ४ था )
अठरा विदेशीय कालगणना ( जगांतील विविध देशीय सन )- १ चिनी , २ खताई , ३ पारसी , ४ मिश्री , ५ तुकीं , ६ आदम , ७ इसवी , ८ यहुदी , ९ इब्राहीम , १० मूसा , ११ युनानी , १२ रोमन , १३ ब्रह्मा , १४ मलयकेतु , १५ पार्थियन , १६ इराणी , १७ जावा आणि १८ घृताचि .
( भारतीय साम्राज्य )
अठरा विर्श्वे दारिद्रय - विसवा म्हणजे रुका अथवा पै याचा १ - २० भाग म्हणजे कमालीचें दारिद्रय , ( आ ) ’ विश्वें ’ हें ’ विसा ’ या शब्दाचें अकारण संस्कृतीकरण आहे , ’ वीस ’ ही संख्या गणनाचें एक परिमाण म्हणून ग्रामीण भागांत अजूनहि वापरलें जातें . अठरा विसा म्हणजे ३६० . दिवस म्हणजे वर्ष . वर्षाचे सर्व दिवस म्हणजे सदासर्वकाळ दारिद्र्य , हा भाव .
अठराअ व्यसनें - १० कामवासनेपासून उत्पन्न होणारीं ( १० च्या अंकीं पहा ) ११ चहाडी , १२ दुस्साहस , १३ द्रोह , १४ ईर्ष्या , १५ द्वेष , १६ अपहरण , १७ कटु भाषाण आणि १८ अत्यंत मारपीट . हीं क्रोधापासून उत्पन्न होणारीं आठ , मिळून अठरा .
अठरा शिल्पशास्त्रप्रणेते - १ भृगु , २ अत्रि , ३ वसिष्ठ , ४ विश्वामित्र , ५ मय , ६ नारद , ७ नग्नजित् , ८ विशालाक्ष , ९ पुंरदर , १० ब्रह्मा , ११ कुमार , १२ नंदीश , १३ शौनक , १४ गर्ग , १५ वासुदेव , १६ अनिरुद्ध , १७ शुक्र आणि १८ बृहस्पति .
अष्टादशैते विख्याता शिल्पशास्त्रोपदेशकः ।
संक्षेपेणोपदिष्टं सन्मनवे मत्स्यरूपिणा ॥ ( मत्स्य . २५२ - ४ )
अठरा संख्यान पदें ( संख्यागणनेचीं स्थानें )- १ एकम् , २ दहम् , ३ शतम , ४ सहस्त्र , ५ दशसहस्त्र , ६ लक्ष , ७ दशलक्ष , ८ कोटि , ९ दशकोटि , १० अब्ज , ११ खर्व , १२ निखर्व , १३ महापद्म , १४ शंकु , १५ जलधि , १६ अंत्य , १७ मध्य व १८ परार्ध , अशीं हीं दहाच्या पटीनें वाढणारीं अठरा संख्या पदें होत . हीच प्राचीन भारतीय दशमानपद्धति होय .
अठरा सिद्धि - १ अणिमा , २ महिमा , ३ लघिमा , ४ प्राप्ति , ५ प्राकाश्य , ६ ईशिता ७ वशिता आणि ८ प्राकाम्य - या आठ स्वाभाविक सिद्धि आणि १ अनूर्मिमत्व , २ दूरश्रवण , ३ दूरदर्शन , ४ मनोजव , ५ कामनासिद्धि , ६ पर कायाप्रवेस , ७ स्वेच्छा मृत्यु , ८ सुरक्रीडादर्शन , ९ संकल्पसिद्धि आणि १० अकुंठितता . या दहा गुणमूलक सिद्धि . या दोन्ही मिळून अठरा सिद्धि योगशास्त्रांत सांगितल्या आहेत .
सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः ।
तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥ ( भाग ११ - १५ - ५ )
अठरा सिद्ध पुरुष - सिद्धि प्राप्त करुन घेणें हेंच मुख्य कर्तव्य मानणारे अगस्ति वगैरे अठरा सिद्ध पुरुष होऊन गेले . ते अधिकारी ( सिद्धि व मुक्ति ) दोन्ही प्राप्त झाल्या होत्या .
अष्टादश प्रसिद्धास्ते सिद्धिप्राधान्यवादिनः ।
अगस्त्यप्रमुखाः सिद्धीस्त्वधिकारादुभे गताः ( रामगीता १६ - १५ )
अठरा सिद्धान्त ( ज्योतिषशास्त्राचे )- १ ब्रह्मसिद्धांत , २ सूर्यसिद्धांत , ३ सोमसिद्धांत , ४ वसिष्ठसिद्धांत , ५ रोमक , ६ पौलस्य , ७ बृहस्पति ८ गर्गासिद्धांत , ९ व्यास , १० पाराशर , ११ भोज , १२ वराह , १३ ब्रह्मगुप्त ’ १४ सिद्धांतशिरोरोमणि , १५ सुंदरसिद्धांत , १६ तत्त्वविवेक , १७ सार्वभौमसिंद्धांत व १८ लघु आर्यसिद्धांत , असे अठरा सिद्धांत ज्योतिषांत मानले आहेत . ( बर्जेस - सूर्यसिद्धांत )
अठरा सूक्तद्रष्टे ऋषि - १ कक्षीवान् २ कवष , ३ गय , ४ गृत्समद , ५ गौरविति , ६ नाभाक , ७ नाभानेदिष्ट , ८ नोधा , ९ परुच्छेप , १० बरु , ११ भरद्वाज , १२ वसिष्ठ , १३ वामदेव , १४ विमद , १५ विश्वामित्र , १६ शार्यात , १७ सुकीर्ति व १८ हिरण्यस्तूप .
" ॠषयो मंत्रद्रष्टारः वसिष्ठादयः । " ( ऐ , ब्रा , म . ज्ञा . को . वि . ३ )
अठरा संख्याविशेष - १ जाति अठरा , २ पोषाख अठरा , ३ धान्यें अठरा , ४ उपधान्यें अठरा , ५ वनस्पति अठरा , ६ ज्योतिषी अठरा , ७ पुराणें अठरा , ८ महापुराणें अठरा , ९ अतिपुराणें अठरा , १० उपपुराणें अठरा , ११ स्मृति अठरा , १२ शिल्पशास्त्रप्रवर्तक अठरा , १३ गीतोक्त योग अठरा , १४ युगें अठरा , १५ तत्त्वें अठरा , १६ महापुराणकर्ते अठरा , १७ सिद्धि अठरा आणि १८ यज्ञांत ऋत्विज अठरा .
( छां . उपनिषद ). असा अठरा संख्याविशेष भारतांत मानला आहे . त्यावरून भारताचे प्राचीन काळीं अठरा प्रमुख भाग अ सा वेत असा तर्क आहे . ( प्रा हिंदी शिल्पशास्त्रसार ), ( महाभारतांतर्गत )- १ महाभारताचीं पर्वें अठरा , २ भारतांतर्गत भगवद्नीतेचे अध्याय अठरा , ३ भारतीय युद्ध अठरा दिवस झालें , ४ भारतीय युद्धांत सैन्य अठरा अक्षौहिणी होतें , ५ भारतीय युद्धानंतर अठरा वर्षांनीं व्यासांनीं महाभारत लिहिलें , ६ पांडवांकडील प्रमुख वीर अठराच होते , ७ भारतीय युद्धानंतर अठरा वर्षाणीं धृतराष्ट्राचें पतन झालें , ८ युद्धारंमीं अठराहि दिवस राजा युधिष्ठिरानें पतिव्रता गांधारीचा ’ यतो धर्मस्ततो जयः ’ असा आशीर्वाद घेतला होता , ९ राजा जनमेजयानें परीक्षिताच्या मृत्यूचा सूड म्हणून पिपीलिका पर्वतावर अठरा दिवसांनीं पूर्णाहुति करावयाचा नरयाग आरंभिला , १० या यज्ञांना अ ठरा ऋत्विज होते . पण त्यांजवर भगवंतांनीं मोहिनी घातली तेव्हां यज्ञकार्य बंद पडलें . जनमेययानें सिंचन केलेल्या जलकणांमुळें ते ब्राह्मण मृत झालें , ११ व्यासांनीं तीं अठरा प्रेतें मंडपांत आणून अठरा हात कृष्णवस्त्र मध्यें धरून वैशंपायनाकडून जनमेजयास भारत ऐकविलें , प्रत्येक पर्वाबरोबर एकेक हात कृष्णवस्त्र पांढरें होत गेलें . संपूर्ण अठरा पर्वें भारत ऐकल्यावर ते अठराहि ब्राह्मण जिवंत झाले .
व्यासगुरुआज्ञेप्रमाणें । भारत सांगितलें वैशंपायनें ।
अठरा पर्वें संपूर्णं । अनुक्रमेंसी ॥ ( क . क . स्तवक ८ - ५ - ५५ )
( आधुनिक ) कवि मोरोपंत यांनीहि अठरा या संख्या संकेताचा आपल्या आर्या भारतांत कटाक्षाने उपयोंग केला आहे . आर्याभारताची पद्यसंख्या १७१३६ येतें . या संख्याची वेरीजहि अठराच . ( रोहिणी आगष्ठ १९६३ )
अठरा संदेष्टे ( कुराणोक्त )- १ आब्राहाम - इब्राहिम , २ इसाक , ३ जेकब - याकुब , ४ नूह , ५ दाऊद , ६ सुलेमान , ७ अय्युब , ८ युसूफ , ९ मोझेस ( मूसा ). १० हारून - हरून , ११ जकरिय्या , १२ याहया १३ जीझस , १४ इलियास , १५ इस्माईल , १६ अल्यसआ , १७ युनुस आणि १८ लूत , हजरत महम्मद पैगंबरापूर्वी हे अठरा संदेष्ट होऊन गेले आणि त्या प्रत्येकाला ईश्वरानें एकेक पुस्तक दिले अशी कथा आहे . ( कुराण अ ६ ऋचा ८४ ते ८७ )
अठरा स्मृतिकार - १ विष्णु , २ पराशर , ३ दक्ष , ४ संवर्त , ५ व्यास , ६ हारीत , ७ शातातप , ८ वसिष्ठ , ९ यम , १० आपस्तंब , ११ गौतम , १२ देवल , १३ शंख , १४ लिखित , १५ भारद्वाज , १६ उशना , १७ शौनक आणि १८ याज्ञावल्वय .
’ शौनको याज्ञवल्क्यश्च दशाष्टौ स्मृतिकारिणः । ’ ( सु . )
अठरा हावभाव ( शृंगारचेष्टा )- १ भाव , २ हाव , ३ हेला , ४ माधुर्य ५ धैर्य , ६ लीला , ७ विलास , ८ विच्छिती , ९ विभ्रम , १० किलकिंचित् , ११ मोट्टायित , १२ कुट्टमित १३ विव्वोक , १४ ललित , १५ कुतूहल , १६ चकित , १७ विहत आणि १८ हास . ( प्रतापरुद्र )