मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७५

संकेत कोश - संख्या ७५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पंचाहत्तर परमेश्वराच्या प्रधान विभूति - परमेश्वर सर्व व्यापक आहे , तथापि भगवान् श्रीकृष्णानें प्ररमेश्वरी अंश म्हणून सांगितलेल्या पंचाहत्तर प्रधान विभूती या आहेत - १ आत्मा , ( प्राणिमात्रांचा ) २ सकला सृष्टींचा आदि ( उत्प्त्ति ) मध्य ( स्थिती ) व अंत , ( लय ) ३ आदित्यांत विष्णु ३ जोतींत सूर्य , ५ मरुद्नणांत मरीचि , ६ नक्षत्रांत चंद्रा , ७ वेदांत सामदेव , ८ देवांपैकीं इंद्र , ९ इंद्रियांत मन , १० प्राण्यांत चेतना , ११ रुद्रांत शंकर , १२ यक्षांत कुबरे , १३ वसूंमध्यें अग्नि , १४ पर्वतांत मेरू , १५ पुरोहितांत बृहस्पति , १६ सेनापतींत स्कंद , १७ जलाशयांत सागर , १८ महर्षीमध्यें , भृगु , १९ शब्दरूप वाणींतील एकाक्षर , ( ॐ कार ) २० यज्ञांत जप , २१ स्थावरांत हिमालय , २२ वृक्षांत अश्वत्थ , २३ देवर्षीमध्यें नारद , २४ गंधर्वांत चित्ररथ , २५ सिद्धांमध्यें कपिलमुनि , २६ घोडयांत उच्चैःश्रवा , २७ हत्तींत ऐरावत , २८ मनुष्यांत राजा , २९ हत्यारांत वज्र , ३० गाईमध्यें कामधेनु ३१ प्रजा उत्पन्न करणारा राजा , ३२ सर्पांत वासुकि , ३३ नागांत अनंत , ३४ जलदेवांत वरुण , ३५ पितरांत अर्यमा , ३६ नियमन करणारांत यम , ३७ दैत्यांत प्रह्राद , ३८ गणना करणारांत काल , ३९ पशूमध्यें सिंह , ४० पक्ष्यांत गुरुड , ४१ वेगवानांत वायु , ४२ शस्त्रधार्‍यांत राम , ४३मत्स्यामध्यें नक्र , ४४ नद्यांत भागीरथी , ४५ विद्यांमध्यें अध्यात्मविद्या , ४६ वाद करणार्‍यांचा युक्तिवाद , ४७ अक्षरांत अकार , ४८ समासांत द्वंद्व , ४९ अक्षय काल आणि सर्वतोमुखी सर्वांचा आधार , ५० संहार करणारा मृत्यु , ५१ पुढें उत्पन्न होणार्‍या प्राण्यांचें उत्पत्तिकारण , ५२ स्त्रियांत कीर्तिनित्य नवी अशी , ५३ लक्ष्मी - धन औदार्यासह , ५४ वाणी - विवेक असलेली , ५५ स्मृति , ५६ मेधा , ५७ धृति , ५८ क्षमा , ५९ सामांत बृहत्साम , ६० छंदांत गायत्री ६१ मासांत मार्गशीर्ष , ६२ ऋतूंत वसंत , ६३ छळ करणार्‍यांचे द्यूत , ६४ तेजस्व्यांचे तेज , ६५ व्यवसायांत जय , ६६ सत्त्वशीलांचे सत्त्व , ६७ यादवांमध्यें वासुदेव , ६८ पांडवांत अर्जुन , ६९ मुनीमध्यें व्यास , ७० कवींत शुक्राचार्य , ७१ शासन करणार्‍यांचा दंड , ७२ विजयेच्छूंची नीति , ७३ गुह्य गोष्टींतील मौन , ७४ ज्ञान्यांचें ज्ञान आणि ७५ सर्व भूतमात्रांचें बीजरूप .

ऐशियाही सात पांच या प्रधाना । विभूति सांगितलिया तुज अर्जूना ॥

तो हा उद्देश जो गा मना । आहाच गमला ( ज्ञा . १० - ३०२ )

पाषाणामाजी रत्न । धातूंमाजी कांचन ।

वस्त्रांमाजी तें जाण । देवांग तें मी ॥

तृणामाजी दर्मू वीरा । धारांमाजी मेघधारा ।

ऐसिया विभूती अपारा । जाण प्रकारें येणें ॥ ( गीतार्णव अ. ३० )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP