मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३

संकेत कोश - संख्या ३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


तीन वासना - १ लोकवासना ( लोकांनीं चांगलें म्हणावें म्हणून ), २ शास्त्रवासना ( शास्त्राध्ययनाची आवड ) आणि ३ देहवासना ( वेशभूषा वगैरेंनीं चांगलें दिसावें म्हणून खटपत ). यांमुळें जीवांना खरें ज्ञान होत नाहीं . यांनाच वासनात्रय म्हणतात .

तीन वारकरी वैशिष्टयें - १ टाळ , २ माळ आणि ३ पताका . हीं तीन वारकरी सांप्रदायिकांस धारण करावीं लागतात .

तीन विद्या - १ प्रकृति विद्या २ आत्मविद्या - आध्यात्मिक ज्ञान आणि ३ ब्रह्मविद्या . यांच्या अध्ययनानें ऐहिक सुख आणि अमृतत्व प्राप्त होतें ( अथर्व - अनु - मराठी )

तीन विद्याप्राप्तीचीं साधनें - १ गुरुशुश्रूषा , २ पुष्कळ धन आणि ३ विद्या देऊन विद्या घेणें .

" गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा ।

अथवा विद्यया विद्या चतुर्थं नोपपद्यते ॥ " ( सु . )

तीन विद्येचे शत्रु - १ गुरुशुश्रूषेचा अभाव , २ त्वरा आणि ३ आत्मश्लाघा .

" अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रुवत्‌‍त्रयः ॥ " ( म . भ . उद्योग ४० - ४ )

तीन विश्रांतिस्थानें सांसारिकांस - १ पुत्र , २ पत्नी आणि ३ सज्जनसमागम .

संसारतापदघानां त्रयो विश्रांतिहेतबः ।

अपत्यं च कलत्रं च संतसंगतिरेव च ॥ ( सु . )

तीन वेळां विश्वरूपदर्शन - पहिलें - घृतराष्ट्राच्या राज्समेंत शिष्टाईस गेल्या वेळीं , दुसरें - अर्जुनास गीता उपदेशितांना आणि तिसरें - युधिष्ठिरास राज्याभिषेक झाल्यानंतर द्वारकेस परत जात असतां , उत्तंक नांवाच्या तपोधन ऋषीस त्याचे विनंतीवरून श्रीकृष्णानें विश्वरूपदर्शन दिलें . ( भगवान् ‌‍ श्रीकृष्ण )

तीन वैभवलक्षणें - १ दुसर्‍याच्या गोष्टींत ढवळाढवळ न करणें , २ आपल्या कामामध्यें मग्न असणें आणि ३ मिळालेल्या संपत्तीचें रक्षण करणें . हींद तीन वैभव प्राप्त होण्याचीं लक्षणें होत .

अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु ।

रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम् ‌‍ ॥ ( म . भा . सभा . ५४ - ७ )

तीन व्यसनें ( कामापासनून उत्पन्न होणारीं )- १ मिथ्या भाषण , २ परस्त्रीगमन व ३ वैरावांचून क्रर कर्म . हीं तीन व्यसनें कामापासून उत्पन्न होणारीं . ( वा . रा . अरण्य . ९ - ३ )

तीन व्याह्रति गायत्रीमंत्राच्या - १ भूः ( पृथ्वी ) २ भुवः ( अंतरिक्ष ) आणि ६ स्वः ( स्वर्ग )

तीन वृत्ति ( शब्दाची अर्थबोधक शक्ति )- १ अभिधा , २ लक्षणा आणि ३ व्यंजना . अर्थ ज्या शक्तीमुळें बोधित होतो ती वृत्ति . कांहीं

" तात्पर्य " नामक चौथी वृत्तीहि मानतात .

तीन शरीरें - १ स्थूल शरीर ( पंचमहाभूतांच्या पंचीकरणानें बनलेलें ), २ सूक्ष्म शरीर ( मनु , बुद्धि , पंचज्ञानेंद्रियें , पंचकर्मेंद्रियें व पंचाप्राण यांचें ) आणि ३ कारणशरीर ( अविद्या ). अशीं तीन शरीरें आत्म्याला असतात .

तीन शक्ति - १ ज्ञानशक्ति , २ क्रियाशक्ति आणि ३ अर्थशक्ति . ( देवी . भाग . तृतीयस्कंध ७ - २५ )

तीन शत्रू चंद्राचे - १ कावळा , २ चोर आणि ३ विरही ( चंद्रप्रभा )

तीन शास्ते - ( जगाचे नियंत्रण करणारे )- १ मनोनिग्रही माणसाचा शास्ता गुरु , २ दुष्टांचा शास्ता राजा ( शास्नाधिकारी ) आणि ३ गुप्तपणें पाप करणारांचा प्रत्यक्ष यमच . हे तीन शास्ते होत .

गुरुरात्मावतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ‌‍ ।

अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥ ( म . भा . उ . ३५ - ७१ )

तीन ’ स ’ कार प्रतिष्ठा वाढविणारे - १ संपत्ति , २ सन्मान आणि ३ सत्ता .

तीन सत्ता - १ पारमार्थिक सत्ता , २ व्यावहारिक सत्ता आणि ३ प्रातिभासिक सत्ता ( वेदान्तशास्त्र )

तीन सप्तक ( गायनशास्त्र )- १ मंद्र , २ मध्य आणि ३ तार .

तीन संग्रहणीय वस्तु - १ ग्रंथ , २ स्नेही व ३ औषधी . यांचा संग्रह करावा .

तीन संप्रदाय व त्यांचीं घोषणावाक्यें ( द्त्त उपासकांचे )- १ गुरु संप्रदाय - श्रीगुरुदेवदत्त , २ अवधूत संप्रदाय - अबधूत चिंतन श्रीगुरुदेवद्त्त . ३ आनंद संप्रदाय - आनंदे द्त्तात्रय देवदेव . ( दासोपंतांची पासोडी - प्रस्तावना )

तीन साधनें ( तिघांना आपलेसे करून घेण्याची )- १ वृद्ध - इष्ट वस्तूचें दान , २ बालक - प्रेचळ अंतःकरन आणि ३ विद्वान् ‌‌- मधुरवाणी .

तीन साधनें ब्रह्मविद्या शिकण्याचीं - १ श्रद्धा , २ भक्ति व ३ घ्यान ( कैवल्योपनिषद् ‌‍ १ - २ )

तीन साधनें ज्ञानप्राप्तीचीं - १ प्रत्यक्ष , २ अनुमान आणि ३ आगम ( शास्त्र )’ प्रत्यक्षानुमानागमाभ्याम् ‌‍ ’ ( पातंजलयोगशास्त्र )

तीन सिद्धि - १ व्यवहार सिद्धि , २ अलौकिक सिद्धि म्हणजे अणिमा लघिमा इ . सिद्धि आणि ३ अत्यंत दुःखनिवृत्ति व परमानंद प्राप्तिरूप सिद्धि . ( हरिपाठ रहस्य )

तीन सांस्कृतिक गर्जना महाराष्ट्रधर्माच्या - १ पुंडलिक वरदे हरि विठ्ठल , २ हरहर महादेव आणि ३ जयजय रघुवीर समर्थ . ( महाराष्ट्रा जीवन )

तीन स्थानीं गंगा विशेष पुण्यपद - १ तीर्थराज प्रयाग , २ हरिद्वार व ३ गंगासागर संगम . ( गूढार्थचंद्रिका )

तीन सौंदर्यें - १ विचारसौदर्य , २ गुणसौंदर्य व ३ मनोसौंदर्य .

तीन स्थानें ध्वनीचीं - १ ह्रदय , २ कंठ व ३ मूर्ध्नया स्थानांतून अनुक्रमें मंद्र , मध्यम व तार हे स्वरालाप उगम पावतात . ( गायनशास्त्र )

तीन स्थानें ( पवित्र )- १ अवतारांची जन्मभूमि , २ संतांची मृत्युभूमि आणि ३ वीरांची कर्मभूमि . ( विचार पोथी )

तीन स्थानें भगवान् ‌‍ सूर्यदेवतेचीं - १ उदयकाल - पूर्वदेशाच्या पर्वतावर -- कोणार्कजवळ , २ मध्यान्ह - कनोजच्या दक्षिणेस कालप्रिय

( कालपी ) येथें व ३ अस्तमान - मूलस्थान ( मुलतान ). चंद्रभागा ( चिनाव ) कांठीं . अशीं तीन स्थानें श्रीकृष्णपुत्र सांबानें स्थापन केलीं . ( वराह पु . अ . १७८ )

तीन स्वर - १ उदात्त , २ अनुदात्त व ३ स्वरित .

तीन स्कंध ( विभाग ) ज्योतिषाचे - १ सिद्धान्त , २ संहिता आणि ३ होरा .

तीन हट्ट - १ बालहट्ट , २ स्त्रीहट्ट आणि ३ राजहट्ट .

तीन हेतु तीर्थप्राशनाचे - १ देहशुद्धि , २ धर्मसाधन आणि ३ मोक्षप्राप्ति असे तीन हेतु तीर्थ घेण्याचे क्रमानें सांगितले आहेत .

प्रथमं कायशुद्धयर्थं द्वितीयं धर्मसाधनम् ‌‍ ।

तृतीयं मोक्षमाप्नोति एवं तीर्थं त्रिधा पिबेत् ‌‍ ॥ ( क्रग्वेदी ब्रह्मकर्म )

तीन हेतु ( विवाहाचे )- १ धर्मसाधन , २ प्रजोत्पत्ति व ३ रतिसुख . " धर्मप्रजारत्यर्थां हि विवाहः । "

तीन हास्यें - १ सुप्तहास्य , २ स्पितहास्य आणि ३ व्यक्तहास्य . असे हास्याचे तीन प्रकार .

तिघांना आश्रयाविना शोभा नाहीं - १ विद्वान , २ स्त्री आणि ३ वेली .

विनाश्रयं न शोभन्ते पण्डितावनितालताः । ( सु . )

तिघेजण जगांत निंद्य - १ लग्न केल्यानंतर पत्नीला टाकणारा पति , २ बापाचे पश्चात् ‌‍ आईचें भरणपोषण न करणारा मुलगा आणि ३ उपवर मुलीचा योग्य वेळीं विवाह न करून देणारा बाप . ( सावित्रीचरित्र )

तिघांच्या तीन प्रकारें परीक्षा - १ सोन्याची - अग्नीनें , २ स्त्रियांची - सोन्यानें व ३ पुरुषाची परीक्षा - स्त्रियांनीं . ( विनोद महदाख्यायिका )

तिघांना तीन प्रकारचें भय असतें - १ कनिष्ठ वर्गांना बेकारीचें भय , २ मध्यम वर्गीयांना मरणाचें भय आणि ३ उच्च वर्गीयांना अपमानाचें भय .

अवृत्तेर्मयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ‌‍ ।

उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम् ‌‍ ( म . भा . उ . ३४ - ५२ )

तिघेजण दुर्दैवी - १ जुगारानें धनप्राप्ति , २ सेवा करून मान आणि ३ भिक्षेनें भोग मिळण्याची इच्छा करणारा . हे तिघे दुर्दैवी होत .

द्यूतेन धनमिच्छन्ति मानमिच्छन्ति सेवया ।

भिक्षया भोगमिच्छन्ति ते दैवेन विडम्बिताः ॥ ( सु . )

तिघेजण नामधारी होत - १ नांव विद्याधर पण मूर्ख , २ नांव दिवाकर पण जन्मांध व ३ नांव लक्ष्मीधर पण दरिद्री . कृति व आकृति यांत विसंगति असली म्हणजे हा संकेत उपयोजिला जातो .

विद्याधरो यथा मूर्खों जन्मांधश्च दिवाकरः ।

लक्ष्मीधरो दरिद्रश्च - त्रयस्ते नामधारकाः ॥ ( सु , )

तिघांचा नाश अटळ - १ अज्ञ - ज्ञान नसणारा , २ अश्रद्ध - स्वतःला ज्ञान नसून ज्ञानी पुरूषाच्या वचनांवर विश्वास न ठेवणारा आणि ३ संशयात्मा - ज्ञानी सांगतात त्याविषयीं सतत संशय घेणारा .

तिघांना नरक मिळतो - १ जन्मदाता , २ प्राणदाता व ३ विश्वासघातकी

मित्रद्रोही कृतघ्नश्च योहि विश्वासघातकः

ते नरा नरकं यान्ति यावच्चंद्रदिवाकरौ ( विक्रमचरितम् ‌‍ )

तिघेजण पित्यासमान - १ जन्मदाता , २ प्राणदाता व ३ अन्नदाता .

शरीरकृत प्राणदाता यस्य चान्नानि भुंजते ।

क्रमेणैते त्रयोऽप्युक्ताः पितरो धर्मशासने ॥ ( म . भा . आदि ७२ - १५ )

तिघेजण पृथ्वीचा उपभोग घेणारे - १ शूर , २ विद्यासंपन्न आणि ३ सेवा कशी करावी हें जाणणारा . ( म . भा . उद्योग ३५ - ७४ )

तिघेजण महाभारताचे ( आजच्या ) कर्ते - १ व्यास - जय , २ वैशंपायन - भारत आणि ३ खौती - महाभारत ( म . भा . उपसंहार )

तिघेजण यज्ञ न करितां स्वर्ग प्राप्त करून घेतात - १ अन्नदान करणारा , २ पाणपोई घालणारा आणि ३ रोगी बरा करणारा . या तिघांना यज्ञ न करितां स्वर्ग ( उत्तम गति ) प्राप्त होते .

अन्नदो जलद्श्चैव ह्यातुरस्य चिकित्सकः ।

त्रयस्ते स्वर्गमायान्ति विना यज्ञेन भारत ॥ ( योगरत्नाकर )

तिघेजण वक्रोक्तिमार्गनिपुण - १ सुबंधु , २ बाणभट्ट आणि ३ कविराज - ( राघवपाण्डवीय काव्याचाः कर्ता ) हे तीन संस्कृत वाङ्‌मयांत वकोक्तिमार्गनिपुण असे कवि होऊन गेले .

सुबंधुर्बाणभट्टश्च कविराज इति त्रयः ।

वक्रोक्तिमार्गनिपुणाश्चतुर्थों विद्यते न वा ॥ ( रा . पा . १ - ४१ )

तिघेहि सुखी असावेत - १ अन्नदाता , २ भोजन करणारा व ३ स्वयंपाक करणारा .

" अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भवेत् ‌‍ । " ( सु . )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP