आठ प्रकार चित्रांचे ( दर्शनगम्य )- १ वास्तबिक , २ साद्दश्यवादी , ३ वस्तुवादी अथवा विषयावादी , ४ चित्रणवादी , ५ विवरणवादी , ६ स्थिररूप , ७ स्थानकचित्र व ८ व्यक्तिचित्र ( कला आणि कलास्वाद )
आठ प्रकार चित्रतांडव नृत्याचे - १ थरक , २ चाचरी , ३ भवरी , ४ तिरप , ५ खांडव , ६ वोडव , ७ गिरडी आणि ८ झंप . अशाप्रकारचे नृत्य श्रीकृष्णानें कालियाचे मस्तकावर केलें अशी कथा आहे . ( हरिवरदा अ . १६ )
आठ प्रकारच्या जपमाळा - १ रुद्राक्ष , २ तुळसी , ३ स्फटिक , ४ मोती , ५ प्रवाल ( पोवळें ), ६ पुत्रजीव , ७ सुवर्ण व ८ रत्न .
आठ प्रकारचे दैवी कोप - १ अग्नि , २ जल , ३ , रोग , ४ दुष्काळ , ५ उंदीर , ६ हिंस्त्रपशु , ७ सर्प व ८ भूत - पिशाच . ( कौटिल्य अ . ८० )
आठ प्रकार ध्वनीचे - १ हंस , २ कांसे , ३ मेघ , ४ ढक्का ( ढोल ), ५ कावळा , ६ वीणा ( सतार ), ७ गाढव व ८ दगड ( बद्द ). असे आठ प्रकार . पहिले चार शुभ व पुढचे चार वाईट असतात . " गर्दभश्च स्वरश्चैव ध्वनिरष्टविधः स्मृतः " ( प्राचीन हिंदी शिल्पशास्त्र ).
आठ प्रकार बीजमंत्राचे - १ गुरुबीज , २ शक्तिबीज , ३ रमबीज , ४ कामबीज , ५ योगबीज , ६ तेजबीज , ७ शांतिबीज व ८ रक्षाबीज .
( मंत्रशास्त्र )
आठ प्रकार मधुराभक्तीचे - १ स्वरूपमाधुरी , २ चिंतनमाधुरी , ३ विरहमाधुरी , ४ मीलनमाधुरी , ५ ब्रह्मानंदमाधुरी , ६ लीलामाधुरी , ७ मुरलीमाधुरी व ८ रासमाधुरी . ( म . सा . मधुराभक्ति )
आठ प्रकार राष्ट्रशासनाचे - १ साम्राज्य , २ भौज्य , ३ स्वाराज्य , ४ वैराज्य , ५ पारमेष्ठयराज्य , ६ महाराज्य , ७ आधिपत्यमय व ८ सामंतपर्यायी . असे आठ प्रकार वेदकालीं होते . ( ऐतरेय ब्रह्मण ).
आठ प्रसंगीं पुनरुक्ति क्षम्य - १ खेद , २ आश्चर्य , ३ क्रोध , ४ आनंद , ५ दैन्य , ६ निर्णय , ७ अनुग्रह व ८ करुणा अथवा सहानुभूति .
विषादे विस्मये कोपे हर्षे दैन्येऽवधारणे ।
प्रसादे चानुकम्पायां पुनरुवितर्न दूष्यते ॥ ( काव्यप्रकाश )
आठ प्रहर अहोरात्राचे - १ पूर्वाह्ल - प्रातःकाल , २ मध्याह्ल , ३ अपराह्ल , व ४ सायंकाल ( दिवसाचे ), ५ प्रदोष अथवा रजनीमुख , ६ निशीथ , ७ त्रियामा आणि ८ उषा अथवा ब्राह्ममुहूर्त ( तत्त्वनिज - विवेक )
आठ वस्तु सकाळीं पाहाव्या - १ ब्राह्मण , २ गाय , ३ अग्नि , ४ सुवर्ण , ५ तूप , ६ आदित्य , ७ जल आणि ८ राजा .
लोकिस्मिन् मङ्गलान्यष्टौ ब्राह्मणो गौर्हुताशनः ।
हिरण्यं सर्पिरादित्य आपो राजा तथाष्टमः ॥ ( आह्लिक सूत्रावलि )
आठ महादशा - १ मंगला २ पिंगला , ३ धन्या , ४ भ्रामरी , ५ भद्रिका , ६ उल्का , ७ सिद्धा आणि ८ संडटा . या आठ महादशा आहेत .
( फळ ज्योतिषशास्त्र )
आठ प्राचीन व्याकरण शास्त्रकार - १ गार्ग्य , २ आपिशलि , ३ चाक्रवर्मण , ४ शाकटायन , ५ शाकल्य , ६ भारद्वाज , ७ सेनक व ८ स्फोटायन . ( व्याकरण महाभाष्या प्रस्तावना )
आठ मौक्तिक उत्पत्ति स्थानें - १ हत्तीचें मस्तक , २ वराहाचें मस्तक , ३ वेळु , ४ मत्स्य , ५ मेघ , ६ शंख , ७ सर्पाची फणा व ८ शुक्ति
( शिंप ) ( रसरत्न समुच्चय - १ - २२ )
आठ प्रकार संकेतांचा बोध करून देणारे - १ व्याकरण , २ उपमान , ३ कोशाचे आधारे , ४ आप्तोपदेश , ५ व्यवहारावरून होणारा अर्थबोध , ६ वाक्यशेष , ७ विवृत्ति - विवरण आणि ८ दुसर्या शब्दाचे सान्निध्य जसेः रामकृष्णौ - बलराम व रामलक्ष्मणौ - दाशरथिराम
( भारतीय साहित्यशास्त्र )
आठ प्रमुख वैष्णव क्षेत्रें - ( अ ) १ श्रींरग , २ श्रीमुष्ण , ३ वेंकटस्थल , ४ शालग्राम ( नेपाळ ) ५ नैमिष , ६ तोताद्रि , ७ पुष्कर आणि ८ बदरिकाश्रम , ( कल्यान तीर्थांक ) ( आ ) १ बदरिका - बदरी नारायण , २ सालग्राम , ३ पुरुषोत्तम - पुरी , ४ द्वारका , ५ बिल्वाचल , ६ अनन्त , ७ सिंह व ८ श्रीरंगम् ( बार्हस्पत्यसूत्रम् )
आठ प्रमुख शाक्त क्षेत्रें - १ ओग्घीन , २ जाल , ३ पूर्ण , ४ काम , ५ कोल्ल , ६अ श्रीशैल , ७ कात्र्ची व ८ महेन्द्र ( बार्हस्पत्यसूत्रम् )
आठ प्रमुख शैव क्षेत्रें - ( अ ) १ श्रीसूर्यदेवतामंदिर , २ सोमनाथ , ३ पशुपतिनाथ ( यजमान मूर्ति ), ४ शिवकांची ( पृथ्वी ), ५ जंबुकेश्वर
( आप ), ६ अरुणाचल ( तेज ), ७ कालहस्ती ( वायु ) आणि ८ चिदंबरम् ( आकाशलिंग ). ( कल्याण तीर्थांक ) ( आ ) १ अमिवुक्त - काशी , २ गङ्गाद्वार , ३ शिवक्षेत्र , ४ रामेश्वर , ५ यमुना , ६ शिवसरस्वी , ७ मध्य शार्दूल व ८ गज . ( बार्हस्पत्यसूत्रम )
आठ प्रकारचें शौच - १ कालशौच , २ अग्निशौच , ३ भस्मशौच , ४ मृत्तिकाशौच , ५ गोमयशौच , ६ जलशौच , ७ पवनशौच व ८ ज्ञानशौच . ( रत्नकरण्डकश्रावकाचार अ . १ )
आठ प्रमुख स्मृतिकार - १ मनु , २ याज्ञवल्क्य , ३ नारद , ४ विष्णु , ५ कात्यायन ६ आपस्तंब , ७ व्यास व ८ देवल . एकंदर ऐंशी स्मृतिकारांत हे आठ प्रमुख स्मृतिकार होत .
आठ ब्रह्मसूत्रकार - १ जैमिनि , आश्मरथ्य , ३ बादरि , ४ बादरायण , ५ औडूलोमि , ६ काशकृत्स्न , ७ कार्ष्णाजिनि , आणि आत्रेय ,
( भ . गी . साक्षात्कारदर्शन )
आठ मंगल वस्तु - १ डाव्व्या कुशीकडे निजलेल्या पुण्यवती पत्नीचें मुख , २ आरसा , ३ भरलेली घागर , ४ बैल , ५ दोन चामर , ६ श्रीवत्स , ७ कमल व ८ शंख , अशा आठ मंगल वस्तु सकाळीं पाहाव्या .
वामभागस्थितां नारीं निजपुण्यप्रकाशिनीम् ।
दर्पणं पूर्णकुंभं च वृषभं युग्मचामरम् ।
श्रीवत्सं स्वस्तिकं शंखमेवमष्टमंगलम् ( वी . प्र . )
आठ मराठी छंद ( शब्दांची गायनयोग्य विशिष्ट रचना )- १ अभंग , २ दिंडी . ३ साकी , ४ घनाक्षरी , ५ सवाई , ६ छप्पा , ७ ओंवी आणि ८ कटिबंध . ( मराठी छंद )
आठ महा पंडित जनकसमेचे - १ अश्वल , २ जारत्कारव - आर्तभाग , ३ भुज्यु ; ४ उषस्त , ५ कहोल - कौषीतकेय , ६ गार्गी , ७ उद्दालक आणि ८ विदग्ध - शाकल्य . ( बृहदारण्यक अ . ३
आठ म हा रोग - १ वातव्याधि , २ प्रमेह , ३ कुष्ठ , ४ अर्श ( मूळव्याधि ), ५ भंगदर , ६ अश्मरी , ७ मूढगर्म आणि ८ उदररोग . या अशा महारोगांची चिकित्सा व निदान करणें कठीण असतें .
वातव्याधिः प्रमेहाश्च कुष्ठमर्शो भगन्दरम् ।
अश्मरी मूढगर्मश्च तथैवोदरस्मृतम् ॥ ( सुश्रुत ३३ - ४ )
आठ महारस रस ( रसायनशास्त्र )- १ कपिला , २ गौरीपाषान ( सोमल ), ३ नवसागर , ४ कवडी , ५ अंबर , ६ गिरिसिंदुर , ७ हिंगुळ आणि ८ मुरदाडशिंगी . ( र . र . समुच्चय अ . ३ - १२० )
आठ राज ( शासन ) कर्तव्यें - १ आदान - कर घेणें , २ विसर्गपागर देणें , ३ प्रैष - आमात्यांच्या कामाची पाहाणी , ४ निषेढ - आज्ञा मोडल्याबद्दल नापसंती , ५ अर्थवचन , ( शेवटची आज्ञा ) ६ न्यायनिवाडा , ७ जिंकलेल्यापासून दंड घेणें व ८ शुद्धि - अपराधाबद्दल प्रायश्चित्त देणें , ( मुक्तेश्वर समा . ३ - ११५ )
आठ राष्ट्रीय ध्येय प्रतीकें - १ उपनिषदांतील विश्वचक्र , २ बौद्धांचें कार्यकारण चक्र , ३ अशोअकाचें धर्मचक्र , ४ गीतेंतील संसार चक्र , ५ भागवतांतील शिशुमार चक्र , ६ इस्लाममधील दैवीचक्र , ७ कबीराचें योग चक्र आणि ८ संतांच्या अनुभबांतील अध्यात्मचक्र ,
( रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान )
आठ लक्षणें ज्वराचीं - १ अन्तर्दाह , २ तहान फार लागणें , ३ बडबड , ४ श्वास , ५ चक्कर येणें , ६ सांधे व हाडें दुखणें , ७ घाम न येणें व ८ वायु व मलमूत्रावरोध . ( सार्थ माधवनिदान )
आठ लक्षणें साधूंचीं - १ निरपेक्षता , २ मच्चित - चित्स्वरूपीं चित्त जडून राहणें , ३ प्रशांत , ४ समदशीं , ५ निर्मम , ६ निरभिमान , ७ निर्द्धंद - अमेदभाव आणि ८ अपरिग्रही .
सन्तोऽनपेक्षा मच्चिताः प्रशान्ताः समदर्शिनः ।
निर्ममा निरहङ्कारा निर्द्वंद्वा निष्परिग्रहाः ॥ ( भाग - ११ - २६ - २७ )
आठ वर्ग सुगंधी द्रव्यांचे - १ पानें , २ फुलें , ३ फळें , जायफळ वेलदोडे इ . ४ झाडाच्या सालीं - लवंगा वगैरे , ५ लांकूड - चंदन इ ., ६ मुळे , ७ वनस्पतींचा स्त्राव - कापूर आणि ८ प्राणिज पदार्थ - कस्तुरी , मघ , लाख इ . ( गंधसार )
आठ वस्तु लौकिकांत मंगलप्रद - १ दीप , २ आरसा , ३ सुवर्ण , ४ धान्यपात्र , ५ फल , ६ दहीं , ७ हस्तलिखित ग्रंथ आणि ८ पूर्णपात्र .
दीपिका दर्पणं हेम धान्यपात्रं फलं दधि ।
पुस्तामङ्लमात्राणि लौकिकं मङ्गलाष्टकम् ॥ ( शिवरत्नम् २२ - ३७ )
आठ विवाह ( घटित ) कूटें - १ वर्ण , २ वश्य , ३ तारा , ४ योनि , ५ ग्रह , ६ गण , ७ भकुट ( सत्कूट ) आणि ८ नाडी . हीं आठ घटित कूटें असून यांस घटिताष्टक म्हणतात . यांचें क्रमांनें १ , २ , ३ , ४ , ५ , ६ , ७ , ८ , अशी संख्या मिळून ३६ गुण होतात आणि १८ चे वर गुणांचें मेलनं विवाहास ग्राह्म मानलें जातें . कोणी कोणी बारा विवाह - कूटें मानतात . ( विवाहसार )
आठ विद्येचे अधिपति - १ अनंतेश , २ सूक्षम , ३ शिवोत्तम , ४ एकमूर्ति , ५ एकरूप , ६ त्रिमूर्ति , ७ श्रीकंट आणि ८ शिखंडी ,
अनंतेशश्च सूक्ष्मश्च तृतीयश्च शिवोत्तमः ।
एकमूर्येकरूपस्तु त्रिमूर्तिरपस्तथा ।
श्रीकष्ठश्च शिखण्डी च अष्टौ विद्येश्चराः स्मृताः ॥ ( अग्नि )
आठ शिष्टाचाराचीं लक्षणें - १ दान , २ सत्य , ३ तपस्या , ४ ज्ञान , ५ विद्या , ६ स्वार्थत्याग , ७ पूजा व ८ इंद्रियनिग्रह .
दानं सत्यं तपो लोके विद्येज्या पूजनं दमः ।
अष्टौ तानि चरित्राणि शिष्टाचारस्य लक्षणम् ॥ ( मत्स्य . अ . १४४ )
आठ सन्मित्र लक्षणें - १ कृतज्ञ , २ धार्मिक , ३ सत्यनिष्ठ , ४ अक्षुद्र - मनाचा मोठेपना असणें , ५ द्दढ भक्ति करणारा , ६ जितेंद्रिय , ७ योग्यतेप्रमाणें वागणारा व ८ कोणताहि प्रसंग आला तरी त्याग न करणारा .
आठ साधारण धर्म - १ अक्रोध , २ सत्यभाषण , ३ संविभाग ( आपण मिळवितो त्यात सर्वांचा भाग आहे असें समजणें ), ४ स्वस्त्रीचे ठायीं प्रजोत्पत्तिअ , ५ शुचिर्भूतता , ६ द्रोहाचा अभाव , ७ प्रामाणिकपना आणि ८ पोष्यवर्गाचें पोषण .
अक्रोधः सत्यवचनं संविभागश्च सर्वशः ।
प्रजनं स्वेषु दारेषु शौचमद्रोह पव च ।
आर्जवं भृत्यभरणं त एते सार्ववर्णिकाः ॥ ( म . भा . शांति ५९ - ९ )
आठ संकेत स्थानें ( प्रियकाराला भेटण्याचीं )- १ शेत , २ गृहोद्यान ३ , पडकें देवालय , ४ दूतीचें घर , ५ वन , ६ एकांतस्थान , ७ स्मशान ८ नदी , तळें , ओढा इत्यादिकांचा कांठ ,
क्षेत्रं वाटी भग्नदेवालयो दूतीगृहं वनम् ।
मालापञ्चः श्मशांन च नद्यादीनाम तटी तथा ॥ ( साहित्य दर्पण ३ - ८० )
आठ स्थानें कामजनक ( मानव देहांतलीं )- १ मस्तक , २ हनु , ३ कक्षा व ४ प्रजननांग हीं चार श्मश्रुल आणि ५ ओष्ठ , ६ चुचुक , ७ गुद आणि ८ उपस्थ ही चार श्लेष्मल . ( नासदीय सूक्त भाष्य - उत्तरार्ध )
आठ स्थानें चुंबनाचीं ( कामशास्त्र )- १ ललाट , २ केशकलाप , ३ कपोल , ४ नयन , ५ वक्ष , ६ स्तनद्वय , ७ ओष्ठ आणि ८ अंतर्मुख .
( नासदीय सूत्र भाष्य )
आठ हर्ष स्थानें - १ सन्मित्रसमागम , २ विपुलद्रव्य , ३ पुत्राचें आलिंगन ४ रतिसमयीं उभयतांची एक कालीं तृप्ति , ५ समयानुरूप प्रिय भाषण , ६ समाजांत उन्नतस्थिति , ७ इष्ट वस्तूंचा लाभ आणि ८ चारचौघांत प्रतिष्ठा . ( म . भा . उद्योग ३३ - ९८ )
आठ जणांना मार्गांत अग्राधिकार - १ वाहन हांकणारा , २ नव्वद वयाचे वरील व्यक्ति , ३ रोगी , ४ ओझेबाला , ५ स्त्री , ६ स्नातक , ७ राजा अथवा शासनाधिकारी व ८ वर . ( कल्यान मासिक )
आठजण परदुःख्क जाणत नाहींत - १ राजा - अधिकारी . २ अग्नि , ३ यम , ४ वेश्या , ५ चोर , ६ बाल , ७ याचक आणि ८ गांवगुंड .
राजा वेश्या यमो वह्लिः प्राघूणों बालयाचकौ ।
परदुःखं न जानाति ह्मष्टमो ग्रामकंटकः ॥ ( सु . )
आठजण विशिष्ट कालपर्यंतच स्वाधीन राहतात - १ मुलगा झाला नाहीं तोंपर्यंत बायको . २ सोळा वर्षें होईतों मुलगा , ३ लग्न हीईपर्यंत मुलगी , ४ यौवनदशा येईपर्यंत सून , ५ सासर्याकडून मिळकत होते तोंपर्यंत जांवई , ६ आपण बरें आहों तोंपर्यंत मित्र , ७ गुरुकिल्ली मिळाली नाहीं तोंपर्यंत शिष्य आणि ८ पैसा आहे तोंपर्यंत इतर जन . हे आठजण त्या त्या कालपर्यंत स्वाधीन राहतात . ( सु . )
आठ स्वर्गाचे अधिकारी होत - १ मातृपितृभक्त पुत्र , २ पतिव्रत स्त्री , ४ निःस्वार्थी सेवक , ४ गुरुजनांची सेवा करणारा , ५ प्रजापालन करणारा राजा , ६ कर्मनिष्ठ ब्राह्मण , ७ परोपकारार्थ देह झिजविणारा आणि ८ युद्धांत पाठ न दाखविणारा वीर पुरुष . ( चंद्रकांत भाग २ रा . )
आठजण हिंसक होत - १ खाणारा , २ संमति देणारा , ३ पाक करणारा ४ विकणारा , ५ विकत घेणारा , ६ प्रत्यक्ष हिंसा करणारा , ७ वाढणारा अथवा वाटणारा आणि ८ सांगून हिंसा करविणारा .
भोक्तानुमन्ता संस्कर्ता कयिविक्रयी हिंसकाः ।
उपहर्ता घातयिता हिंसकाश्चाष्टधा स्मृताः ॥ ( स्कंद काशी ४० - २२ )
गीताष्टक - १ कपिलगीता , २ गर्मगीता , ३ परमहंसगीता , ४ उद्धवगीता , ५ अवधूतगीता , ६ हंसगीता , ७ मिक्षुगीता आणि ८ ऐलगीता . या आठ ज्ञानप्रतिपादक ग्रंथांस गीताष्टक म्हणतात . ( भागवत )
गंगाष्टक - महर्षि वाल्मीकिविरचित गंगास्तोत्र . यांत आठ पदें आहेत .