मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६

संकेत कोश - संख्या ६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


षड्‌‌रिपु - १ काम , २ क्रोध , ३ मोह , ४ लोभ , ५ मद आणि ६ मत्सर . हे मनुष्याच्या मनाचे शत्रु समजले गेलेले सहा विकार .

षड्‌‍राग ( गायनशास्त्रांतील )- १ श्री , २ वसेत , ३ भैरव , ४ पंचम , ५ मेघ किंवा मेघमल्हार व ६ बृहन्नाट किंवा नटनारायण . हे सहा पुरुष राग होत .

श्रीरागोऽथ वसंतश्र भैरवः पंचमस्तथा ।

मेघरागो बृहन्नाटो षडैते पुरुषाः स्मृताः ॥ ( संगीतरत्नाकर )

षडंगोदक - १ नागरमोथा , २ पित्तपापडा , ३ वाळा , ४ काळा वाळा , ५ रक्तचंदन आणि ६ सुंठ . या सहा जिनसा घालून उकळलेलें ऊन पाणी .

षडंगन्यास - १ हातांचीम बोटें , २ तळहाताच्या मागचा भाग , ३ ह्रदय , ४ मस्तक , ५ शिखा आणि ६ नेत्र , गायत्री मंत्रानें शरीरशुद्धीसाठीं या सहा अवयवांस स्पर्श करावयाचा असतो .

षडंगभक्ति - १ समरस भक्ति , १ आनंद भक्ति , ३ अनुभव भक्ति , ४ अवधान भक्ति , ५ निष्ठा भक्ति आणि ६ सद्भाब भक्ति . असे सहा भक्तीचे प्रकार वीरशैव संप्रदायांत मानले आहेत .

षड् ‌‍ लवण - १ मीठ , २ सैंधव , ३ संचळ , ४ बीडलोण , ५ रोमक आणि ६ पांसन . ( निघंटु )

षड्‌‍विकार - ( अ ) १ अस्ति - गर्मांत संभवणें , २ जायते - जन्मास येणें , ३ वर्धते - वाढणें , ४ विपरिणमते - तारुण्यांत येंणेंज , ५ अपषीयते - वृद्धत्व येणें आणि ६ विनश्यति - मरण . हे सहा विकार देहाला असतात . ( आ ) १ जन्म , २ बुद्धि , ३ परिणाम म्हणजे बदल , ४ क्षय , ५ रोग व ६ मृत्यु , ( विवेक चूडामणि )

षड्‌‍विधि ( गणितशास्त्र )- १ बेरीज , २ वजाबाकी , ३ गुणाकार , ४ भागाकार , ५ वर्गमूळ आणि ६ घनमूळ . अशा गणिताच्या सहा प्रक्तिया अथवा प्रकार आहेत .

षड्‌‍विध अधिकारी - १ मनु , २ मनुपुत्र , ३ देव , ४ ऋषि , ५ इंद्र व ६ परमेश्ररी अवतार . प्रत्येक मन्वतरांत या सहा प्रकारच्या अधिकार्‍यांची योजना लोकस्थिति चांगली राखण्यासाठीं आहे अशी कल्पना आहे . ( भाग - स्कंध * )

षड्‌‍विध अन्न - १ मक्ष्य - चर्वण करून खाण्याचे - भाकरी , पोळी वगैरे , २ भोज्य - भात वगैरे , ३ पेय - प्यावयाचें , ४ लेह्म - चाटून खाण्याचें पंचामृत वगैरे , ५ चोष्य - चोखून खाण्याचें व ६ पिच्छिल - चटण्या - कोशिंबिरी .

भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम् ‌‍ ।

इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः ॥ ( सु . )

षड्‌विध भक्ति - १ श्रद्धा भक्ति , २ नैष्ठिक भक्तित , ३ अवधान भक्ति , ४ अनुभवभक्ति , ५ आनंद भक्ति आणि ६ समरम भक्ति . असे भक्तीचे सहा प्रकार वीरशैव संप्रदायांत मानले आहेत . ( विवेक चिंतामणि )

षडविधभाव - १ दास्यरति , २ सख्यरति , ३ वात्सल्यरति , ४ शान्तरति , ५ कान्तरति आणि अद्‌‍भुतरति , असे भक्तिरसाला पोषक सहा भाव अथवा रस मानले आहेत .

षड्‌‍विधसाधनें आदर्श गृहस्थ धर्माचीं - १ धन , २ कीर्ति , ३ न्याय्यवर्तन , ४ राष्ट्रसेवा , ५ विचक्षण व ६ विमर्शित्व ( विवेक )

( चित्रमयजगत् ‌‍ मासिक )

षट्‌‍सूत्रें - १ जैमिनीय सूत्र , २ आश्वलायन सूत्र , ३ आपस्तंब सूत्र , ४ बौधायन सूत्र , ५ कात्यायन सूत्र आणि ६ वैशेषिक सूत्र , हीं सहा ग्रह्य - सूत्रें होत .

सहा अंगें चित्रकलेचीं - १ रूपभेद , २ प्रमाण , ३ भाव , ४ लावण्ययोजना , ५ साद्दश्य व ६ वर्णिकाभंग - विषयानुकूल रंगाचा यथोचित प्रयोग .

रूपमेदो प्रमाणानि लावण्यं भावयोजनम् ‌‍ ।

साद्दश्यं वर्णिकाभङ्‌‌गमिति चित्रषडङ्‌‍गकम् ‌‍ ॥ ( वा , कामसूत्रे - यशोधरी टीका )

सहा अंगें नाटकाचीं - १ कथानक , २ स्बभाव , ३ भाषाशैली , ४ विचार , ५ देखावे - सजावट व ६ संगीत हीं होत . ( ऑरिस्टॉटल )

सहा अंगें योगाचीं - १ प्रत्याहार , २ ध्यान , ३ प्राणायाम , ४ धारणा ५ तर्क आणि ६ समाधि .

" तर्कश्वैव समाधिश्व षडंऽगो योग उच्य्ते " ( अमृतनादोपनिषद् ‌‍ )

सहा अणुव्रतें - १ हिंसा , २ लबाडी , ३ चोरी , ४ मैथुन , ५ परिग्रह व ६ रात्रीं भोजन न करणें . हीं सहा अणुव्रतें जैनधर्मांत मानलींज आहेत . ( रत्न - श्राव्काचार अ . ३ )

सहा अतिरथी भारतीय युद्धांतले - १ अर्जुन , २ अभिमन्यु , ३ द्रोण , ४ अश्वत्थामा , ५ भूरिश्रवा व ६ भीष्म .

अहं भूरिश्रवाश्चैव षडैत्तेऽतिरथाः स्मृताः ( भारतसावित्री )

सहा अवस्था ( वस्तुमात्रांच्या )- १ उत्पत्ति , २ अस्तित्व , २ वृद्धि , ४ बदल - परिणत होणें , ५ क्षय - क्षीण होणें आणि ६ नाश पावणें . या सहा अवस्था प्रत्येक वस्तुमात्राला आहेत . " क्षयश्च षडमी भावाः विकाराः कालनिर्मिताः ( शिवभारत . अ . ८ )

सहा अवस्था ( स्थूल शरीराचे काल )- १ शिशु - एक वर्ष , २ कौमार - दोन ते पांच वर्षें , ३ पौगंड - सहा ते दहा वर्षें , ४ किशोर - अकरा ते पंधरा , ५ यौवन - सोळा ते चाळीस वर्षेंपर्यंतचा काल व ६ जरा - चाळीस वर्षांनंतरचा काल . ( मो . प्र . )

सहा अधिष्ठानें ( दानाचीं )- १ धर्म , १ अर्थ , ३ काम , ४ ब्रीडा ( जज्जा ), ५ हर्ष व ६ भय . हीं दानाचीं सहा अधिष्ठानें होत .

सहा अनर्थ सदैव टाळावेत - १ अतिनिद्रा , २ आळस , ३ भय , ४ क्रोध , ५ मृदुता आणि ६ चेंगटपणा .

’ निद्रालस्यं भयं क्रोधो मार्दवं दीर्घसूत्रता ॥ ’ ( म . मा . सभा . ५ - १२८ )

सहा आस्तिक दर्शनें - १ सांख्य , २ पातंजल , ३ पूर्वमीमांसा , ४ उत्तरमीमांसा , ५ न्याय व ६ वैशोषिक . हीं सहा आस्तिक दर्शनें होत .

सहा उपाय ( पैसा मिळविण्याचे )- १ भीक मागणें , २ सरकारी चाकरी , ३ कला ( हुन्नर ), ४ शेती , ५ सावकारी आणि ६ व्यापार - उदीम करणें . ( पंचतंत्र )

सहा उपदर्शनें - १ योगाभ्यास , २ संन्यास , ३ जैन , ४ बौद्ध , ५ प्राभाकर आणि ६ चार्वाक . ( म . वा . को .

सहा कर्तव्यें ( संन्यासाश्रमास विहित )- १ मिक्षेवर निर्वाह , २ जप , ३ ध्यान , ४ स्नान , ५ शौच आणि ६ देवतापूचन

( यतिधर्मसंग्रह )

सहा उपरत्नें - १ वैक्रांत , २ सूर्यकांत , ३ चंद्रकांत , ४ राजावर्त , ५ लाल आणि ६ पेरोज .

सहा कर्ण - १ दातृत्वांत - महारथी कर्ण , २ कौरवांत - विकर्ण , ३ क्षेत्रांत - गोकर्ण , ४ राक्षसांत - कुंभकर्ण , ५ घोडयांत - श्यामकर्ण , आणि ६ देहांत - अंतःकरण . हे सहा कर्ण म्हणून वाङमयांत प्रसिद्ध आहेत .

सहा कलिकौतुकें - १ संत - दुःखी , २ असंतांचा उदोउदो , ३ मुलें अल्पायुषी , ४ मातापितरें दीर्घायु , ५ परक्याशीं मैत्री आणि ६ स्वकीयाशीं वैर . हीं सहा कलिकौतुकें प्रत्यक्षांत अनुभवास येतात .

सीदन्ति सन्तो विलसन्त्यसन्तः पुत्रा म्रियन्ते जनकश्चिरायुः ।

परेषु मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोकाः कलिकौतुकानि ॥ ( सु . )

सुहा कालविभाग - १ वर्ष , २ अयन , ३ ऋतु , ४ मास , ५ पक्ष आणि ६ दिवस . असे सहा कालविभाग मानले आहेत . ( धर्मसिंधु )

सहा कारणांनीं रोगोत्पत्ति होते - १ अति पाणी पिणें , २ अति कठीण पदार्थ खाणें , ३ धातुक्षय , ४ मलमूत्रावरोध , ५ दिवसा झोप आणि ६ रात्रीं जागरण .

अत्यम्बुपानं कठिनाशनश्च धातुक्षयो विगविधारणं च ।

दिवाशयो जागरणं च रात्रौ षड्‌‍भिर्नराणां प्रभवन्ति रोगाः ॥ ( सु . )

सहा कारणें प्रायः परमार्थप्रवृत्तीचीं - १ वंचना , २ अज्ञानाची निद्रा , ३ अविवेकाचें आंधळेपण , ४ जगांतील अन्याय , ५ पापाची जाणीव व ६ जरामृत्यूंचें दुःख . ( परमार्थपर व्याख्यानें )

सहा कारणें सृष्टयुत्पत्तीसंबंधीं ( आयुर्वेदमतें )- १ स्वभाववाद , २ ईश्वरवाद , ३ कालवाद , ४ यद्दंच्छावाद , ५ परिणामबाद आणि ६ नियतिवाद . ( सुक्षुत - शारीर - १ - ११ )

सहा कुलपरीक्षेचीं लक्षणें - १ सामानसुमान , २ जन्मभूमि , ३ घर , ४ आचार , ५ अन्न आणि ६ आच्छादन . या सहा गोष्टींवरून कुलाची परीक्षा केली जाते .

सहा गायनमहर्षि - १ अग्नि , २ ब्रह्मा , ३ चंद्र , ४ विष्णु , ५ नारद आणि ६ तुंबरु .

वह्लिर्वेधाः शशांकश्चा लक्ष्मीनाथस्तथैव च ।

नारदस्तुंबरुश्चैव षड्‌‍जादीनां ऋषीश्वराः ॥ ( गायनाचार्यमाला )

सहा गुण ( आत्म्याचे )- १ सर्वज्ञत्व , २ नित्यत्व , ३ नित्यतृप्तत्व , ४ बोधरूपत्व , ५ स्वतंत्रत्व आणि ६ नित्यस्फूर्ति . ( अ . रा . उत्तर सर्ग . ५ )

सहा गुण ऐश्वर्याप्रत नेणारे - १ उद्योग , २ साह्स , ३ धैर्य , ४ बल , ५ बुद्धि आणि ६ पराक्रम .

उद्यमः साहसं धैर्यं बलं बुद्धिः पराक्रमः ।

षडिमे यत्र तिष्ठन्ति स सर्वं प्राप्नुयात् ‌‍ पुमान ‌‍ ॥ ( सु . )

सहा गुण कुत्र्यापासून घ्यावेत - १ पुष्कळ खाणें , २ अल्पसंतुष्टता , ३ झोंप सावध , ४ एकदम तुटून पडणें , ५ इमानी आणि ६ शूर . ( वृ . चा . ६ - २० )

सहा गुण नाटय कवीस आवश्यक - १ बहुश्रुतता , २ प्रतिभा , ३ भाषाप्रभुत्व ४ शब्दलालित्य , ५ प्रसाद आणि ६ स्वतःनट

( रंगभूमि )

सहा गुण ( पाठकाचे )- १ गोडी , २ स्पष्टोच्चार , ३ पदें पाडून म्हणणें , ४ गोड आवाज , ५ धीटपणा आणि ६ तन्मयता .

माहुर्यमक्षरव्यक्तिः पद‌‍च्छेदस्तु सुस्वरः

धैर्यं लयसमर्थं च षडेते पाठका गुणाः ॥ ( पाणिनिशिक्षा )

सहा गुण मनुष्यानें टाकूंज नयेत - १ सत्य , २ परोपकार , ३ अनालस्य , ४ अनसूया , ५ क्षमा आणि ६ धैर्य . ( प्रमाणसाहस्त्री )

सहा गुण ( मित्रत्वाचे )- १ कायम टिकणारा , २ अनुकूल , ३ सहज किंवा अल्प प्रयासानें सज होणार , ४ वाडवडिलांपासून चालत आलेला , ५ वैभवशाली आणि ६ प्रतारणा न करणारा . असे मित्राचे सहा गुण म्हणून सांगितले आहेत .

नित्यं वश्यं लघूत्थानं पितृपैतामहं महत्‌६ ।

अद्धैध्यं चेति सग्पन्नं मित्रं षड्‌‍गुणमुच्यते ॥ ( कौटिल्य अ . १०७ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP