शून्य - आकाशवाचक शब्द , पूर्ण . हें जगत् असत् आहे म्हणून तें शून्य आहे . या असत् जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य , शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत . सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे . हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे . " शून्यांतील सारें चराचर " हें शून्य़ " अ - गणित " ब " अ - क्षय्य " आहे . ( ज्ञा . अभंग ) शून्याला वृद्धि क्षय होतच नाहींत म्हणून अक्षय्य .
शून्यकान - कान नाहीं असा प्राणी - - सर्व ( प्राकृत ग्रंथांत त्यास चक्षु : - श्रवा म्हणतात . )
शून्यचरण - चरण नाहीं असा प्राणी - सर्प ( प्राकृत ग्रंथांत त्यास पादोदर किंवा उरग म्हणतात .
शून्य जिव्हा - जिव्हा नाहीं असा प्राणी - बेडूक ( दु . श . कोश )
शून्यवाद - जग हें केवळ शून्यापासून - अभावापासून उत्पन्न झालें . त्यास बौद्धांचा शून्यवाद म्हणतात . ( बौद्धदर्शन )
शून्यशिर - शिर नाहीं असा प्राणी - खेंकडा .