एकशें एक कुलें - २१ पित्याचीं , २१ मातेचीं , १२ जामाताचीं , १२ पितृभगिनीचीं , ११ आत्मभगिनीचीं , १६ स्त्रियेचीं व मावशीची . पितरांचें श्राद्धतर्पण केल्यानें त्यांचा उद्धार होतो . " उद्धरेत् सप्त गोत्राणि कुलमेकोत्तरशतम् " ( श्राद्धप्रयोग ) ( दु . श . को . )
एकशें एक यादव कुलें - यादबांचीं एकशें एक कुलें होतीं . " अवतीर्णाः कुलशतं तेषामेकाधिकं नृप " ( भाग . १० - ९० - ४४ )
एकशे एक प्रमुख नाडया - शरीरांत असंख्य नाडया असल्या तरी त्यांतील प्रमुख १०१ आहेत . १०१ वी नाडी हीच मस्तकापर्यंत पोंचणारी सुषुम्ना नाडी . " शतं चैका च ह्रदयस्य नाडयः । : ( कठ २ - ६ - १६ )