मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ८

संकेत कोश - संख्या ८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अष्टविधार्चन - १ जल , २ गंध , ३ अक्षता , ४ पुष्प , ५ धूप . ६ दीप , ७ नैवेद्य व ८ तांबूल . या आठ पदार्थांनीं देवतेचें पूजन करतात .

नैवेद्यैरपि तांबूलैर्मवेदष्टविधार्चनम् ‌‍ ॥ ( वी . प्र . अ . १९ )

अष्टविध परीक्षा ( रोग्याची )- १ नाडी , २ मूत्र , ३ मल , ४ जिह्ला , ५ शब्द , ६ स्पर्श , ७ नेत्र व ८ रूप ( चर्या ). अशी आठ प्रकारची परीक्षा आयुर्वेदांत सांगितली आहे . ( नि . र . )

अष्टविध पूजास्थानें ( परमेश्वराचीं )- १ प्रतिमा , २ स्थंडिल . ३ अग्नि , ४ सूर्य , ५ जल , ६ ह्र्दय , ७ ब्राह्मण आणि ८अ गुरु .

एवं हीं आठ पूजास्थानें । तुज सांगितलीं सुलक्षणें ।

तेथलीं पूजेचीं लक्षणें । तें ही भिन्नपणें सांगेन ॥ ( ए . भा . २७ - ८२ )

अष्टविध प्रमाणें - १ प्रत्यक्ष , २ अनुमान , ३ उपमान , ४ शब्द , ५ ऐतिह्म , ६ अर्थापत्ति , ७ संभव व ८ अभाव . अशीं आठ प्रमाणें मानिलीं आहेत . ( सत्यार्थप्रकाश )

अष्टविध प्राणायाम - १ सूर्यभेदन , २ उज्जयी , ३ सीत्कारी , ४ शीतली , ५ भस्त्रिका , ६ भ्रामरी , ७ मूर्छा आणि ८ प्लविनी , ( ह . प्र . )

अष्टविध मूर्ख - १ निर्लज्ज , २ शठ , ३ क्लीव , ४ निर्घृण , ५ व्यसनी , ६ अतिलोभी , ७ गर्वित , व ८ निष्ठुर ( रत्नकोश )

अष्टविध रत्न परीक्षा - १ नाम , २ रूप , ३ उत्पत्ति , ४ गुण , ५ दोष , ६ तोल , ७ मोल व ८ शुभाशुभ , अशा आठ प्रकारांनीं करावयाची असते . ( रत्नपरीक्षा )

अष्टविध समाधि - १ यम , २ नियम , ३ आसन , ४ प्राणायाम , ५ प्रत्याहार , ६ धारणा , ७ ध्यान व ८ समाधि , असे समाधि - योगाचे आठ प्रकार .

अष्टविधसृष्टि - ( अ ) १ शब्दसृष्टि , २ मानसिकसृष्टि , ३ कल्पनासृष्टी , ४ मायावीसृष्टि , ५ पार्थिकसृष्टि , ६ भावसृष्टि , ७ जडसृष्टि व भूतसृष्टि , ( आ ) १ कल्पनासृष्टि , २ शाब्दिकसृष्टि , ३ प्रत्यक्षसृष्टि , ४ चित्रलेपसृष्टि , ५ स्वप्नसृष्टि , ६ गंधर्वसृष्टि , ७ ज्वरसृष्ठि , व ८ द्दष्टिबंधनसृष्टि ,

( दा . वो . ६ - ६५३ )

अष्ट व्याकरणशास्त्रकार - १ इंद्र , २ चंद्र , ३ काशकृत्स्न , ४ अपिशली , ५ शाकटायन , ६ पाणिनि , ७ अमर आणि ८ जैनेंद्र , हे आद्य

शब्दशास्त्रप्रणेते व व्याकरणकार होत .

इंद्रश्वन्द्रःअ काशकृत्स्नापिशली शाकटायनः ।

पाणिन्य्मर्जैनेंद्रा जय्यन्त्यष्टादिशाद्धिकाः ॥ ( बोपदेवकृत मुक्तबोध )

अष्ट व्यूह ( सैन्य रचनाप्रकार )- १ भोग ( सर्प ) व्यूह , २ दंडव्यूह , ३ मंगलब्यूह , ४ सर्वतोभद्र्व्यूह , ५ असह्मव्यूह व ६ असंहतव्यूह ७ विजय व्यूह व ८ गरुडव्यूह असे व्यूहाचे मुख्य प्रकार महाभारत - कलीं होते . खेरीज चक्र व्यूह व सूचिमुख असे आणखीहि प्रकार असत . ( म . ज्ञा . को . वि . १९ )

अष्ट शक्ति ( श्रीविष्णूच्या )- १ श्री , २ भू , ३ सरस्वती , ४ प्रीति , ५ किर्ति , ६ शांति , ७ तुष्टि , व ८ पुष्टि , या अष्टशक्ति १ संपत्ति , २ पृथ्वी , ३ विद्या , ४ प्रेम , ५ कीर्ति , ६ शांति , ७ सुख व ८ वल यांच्या देवता होत . ( पद्म . पु . )

अष्ट शिवगण - १ नंदी , २ शृंगी , ३ भृगिरिटि , ४ गोकर्ण , ५ घंटाकर्ण , ६ वीरभद्र , ७ महाविकट , व ८ शैल .

अष्टशुद्धि जपानुष्ठानास आवश्यक - १ द्र्व्यशुद्धि , २ क्षेत्रशुद्धि , ३ स्मयशुद्धि , ४ आसनशुद्धि , ५ विनयशुद्धि , ६ मनःशुद्धि , ७ वचनशुद्धि व ८ कायशुद्धि , अशी आठ प्रकारच्या शुद्धि आवश्यक मानली आहे . ( मङ्रगल मंत्र - एक अनुचिंतन )

अष्ट सात्त्विक गुण - १ शोभा , २ विलास , ३ माधुर्य , ४ गांभीर्य , ५ स्थैर्य , ६ तेज , ७ ललित व ८ औदार्य . ( भ . ना . )

अष्ट सात्त्विक भाव - ( अ ) १ कंप , २ रोमांच , ३ स्फुरण , ४ प्रेमाश्रु , ५ स्वेद , ६ हास्य , ७ प्रलास्य आणि ८ गायन , हे शरिराचे सत्त्वगुणांचे आठ भाव - प्रकार आहेत ( हंसकोश ); ( आ ) १ स्तंभ - गति - निरोधन , २ स्वेद , ३ रोमांचे , ४ विरस्य , ५ वैपथु - कंप , ६ वैवर्ण्य - वर्ण पालटणें , ७ अश्रुपात आणि ८ प्रलय - चेष्टानिरोध ( भ . ना . ७ - १४८ ); ( इ ) परमार्थ पथावरील - १ रोमांच , २ स्वेद , ३ अश्रु ( शारीरिक )

४ कंप , ५ स्तंभ किंवा ताटस्थ्य ( शारीरिक - मानसिक मिश्र ) ६ मानसिक , ७ शांति आणि ८ आनंद ( मानसिक ) ( भ . गी . साक्षात्कार दर्शन )

अष्ट सौभाग्य द्रव्यें - १ ऊंस , २ पावटे , ३ जिरे , ४ धने , ५ दूध , ६ करडी , ७ केशर किंवा कुंकू आणि ८ मीठ , या आठ पदार्थांस सौभाग्य अष्टक म्हणतात . ’ लवणं चाष्टमं तद्वत ‌‍ सौभाण्याष्टकमुच्यते । ’ ( मल्स्य , अ . ५९ )

अष्ट स्वभावधर्म - १ क्षुधा , २ पिपासा , ३ मल , ४ मूत्र , ५ शीत , ६ उष्ण , ७ भय व ८ निद्रा , हे आठ स्वभाव किंवा देहधर्म होत .

अष्ट स्थायीभाव - १ रति , २ हास , ३ शोक , ४ उत्साह , ५ क्रोध , ६ भय , ७ निंदा व ८ विस्मय , हे आठ स्वायीभाव . ज्या

मनोविकारांस रस ही संज्ञा प्राप्त होते अशा आठ मनोवृत्ति वा रस भरतकालीं साहित्यशास्त्रांत मानले जात . त्यांना स्थायीभाव म्हणत .

रतिर्हासश्च शोकश्च क्रोधोत्साहौ भयं तथा ।

जुगुप्सा विस्मयश्चेति स्थायीभावाः प्रकीर्तिताः ॥ ( म . ना . ६ - १८ )

अष्ट क्षार - १ पळस , २ निवडुंग , ३ सज्जी , ४ आघाडा , ५ रुई , ६ तील , ७ जव व ८ टांकणखार .

अष्टाक्षरी मंत्र ( पारमार्थिक )- ( अ ) " ॐ नमो नारायणाय " नमो नारायणेति तारकं मंत्रमुत्तमम् ‌‍ ( रा . गी . १३ - ११ ); ( आ ) " ॐ नमो बासुदेवाय "’ ( ई ) " कृष्ण कृष्ण हरि हरि "; ( उ ) ( वल्लम संप्रदाय ) " श्रीकृष्णः शरणं मम " ; ( ऊ ) ( व्यावहारिक ) " कसें करूं काय करूं . "

अष्टाक्षरी मंत्र - ( अ ) " ॐ भवति भिक्षां देहि " हा वैदिक अष्टाक्षरी मंत्र - समर्थांनीं लोककार्यार्थ प्रसूत केला . ( दा . बो . १४ - २१ )

( आ ) ( वारकरी संप्रदाय ) " ज्ञानदेव - तुकाराम " हा वारकरी संप्रदायांत उच्चारला जाणारा व भाविक मनाला मुग्ध करणारा महामंत्र ;

( इ ) " हरहर महादेव " हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महामंत्र होय ; ( ई ) " ॐ भवति मिक्षां देहि " उपनयनानंतर बटूनें प्रथम मातेकडून मिक्षा घेतेसमयीं म्हणावयाचा मंत्र .

अष्टावरण - १ विभूति लावणें , २ रुद्राक्ष धारण करणें , ३ मंत्र ( नमः शिवाय ) जपणें , ४ गुरु - आज्ञापालन , ५ लिंगपूजा , ६ जंगमाविषयीं

आदर , ७ पादोद्क घेणें आणि ८ प्रसाद , हीं वीरशैव संप्रदायाचीं मुख्य आठ आवरणें अथवा तत्त्वें व आचार आहेत . ( कल्यान गो . अंक )

अष्टांग योग ( प्रकार )- १ लययोग २ तारकयोग , ३ अमनस्कयोग , ४ सांख्ययोग , ५ लंबिकायोग , ६ राजयोग , ७ कुंडलीयोग व ८ हठयोग . असे आठ प्रकार , ( पंचग्रंथी )

अष्टांग वैद्यक - १ द्र्व्याभिधान , २ गदनिश्चय , ३ कामसौख्य , ४ शल्यादि , ५ भूतनिग्रह , ६ विषनिग्रह , ७ बालवैद्यक आणि ८ रसायन , हीं आयुर्वेदाचीं आठ अंगें ; ( आ ) १ कायचिकित्सा , २ बालचिकित्सा , ३ ग्रहचिकित्सा , ४ उर्ध्वांगचिकित्सा , ५ शल्यतंत्र , ६ विषचिकित्सा , ७ रसायन व ८ वाजीकरण . ( वाग्मट अ १ )

अष्टांगिक मार्ग - ( अ ) १ सम्यक् ‌ द्दष्टि , २ सग्यक् ‌‍ संकल्प , ३ सम्यक् ‌‍ वाचा , ४ सम्यक् ‌‍ कर्मान्त , ५ सम्यक् ‌‍ आजीव , ६ सम्यक ‌‍ व्यायाम , ७ सम्यक् ‌‍ स्मृति आणि ८ सम्यक् ‌‍ समाधि , असे बुद्धधर्मांचें आठ मार्ग ; ( आ ) १ श्रद्धा , २ संकल्प , ३ भाषण , ४ कृति , ५ धंदा , ६ योग , ७ स्मृति व ८ घ्यान ,

अष्टांगें ( अर्घ्याचीं )- १ जल , २ दूध , ३ दर्भाग्रें , ४ दहीं , ५ तूप , ६ तांदूळ . ७ सातु व ८ पांढर्‍या मोहर्‍या , या आठ वस्तूंनीं अर्घ्यप्रदान करावयाचें असते . ’ यवासिद्धार्थकाश्चेति ह्मर्घ्योष्टांगप्रकीर्तितः । ; ( व्रतरत्न ) ( भविष्य , पु . )

अष्टांगें ( औषधीचीं )- १ मूळ , २ कंद , ३ पान , ४ फळ , ५ पुष्ण , ६ सर्वांग , ७ डिंक व ८ साल , अशीं औषधींचीं आठ अंगें . ( नि . र . )

अष्टांगें ( गायत्रीचीं )- १ नाद , २ बिंदू , ३ कला , ४ ज्योति , ५ रूप , ६ रेखा , ७ स्वरवर्ण व ८अ आवृत्ति , ( प्रणवोपासना )

अष्टांगें ( चिकित्सेचीं )- १ निदान , २ पूर्वलिंग , ३ रूप , ४ उपशम , ५ संप्राप्ति , ६ औषधि , ७ रोगी व ८ परिचारिका .

अष्टांगें ( धर्माचीं )- ( अ ) १ देवपूजा , २ धार्मिक ग्रंथांचें पठण , ३ दान , ४ तप , ५ सत्य , ६ क्षमा , ७ इंद्रियनिग्रह आणि ८ निलोंभता .

( म . भा . व . २ - ७५ ); ( आ ) १ तप , २ सत्य , ३ क्षमा , ४ दया , ५ शौच , ६ दान , ७ योग व ८ ब्रह्मचर्य . ( वामन . पु . अ . २२ )

अष्टांगें ( नमनाचीं )- १ मस्तक , २ छाती , ३ हात , ४ गुडघे , ५ पाय , ६ द्दष्टि , ७ वाणी व ८ मन . हीं नमनाचीं आठ अंगें . या आठ अंगांनीं करावयाच्या नमस्कारास साष्टांग नमस्कार म्हणतात .

पद्‌‍भ्यां कराभ्यां जानुभ्यामुरसा शिरसा तथा ।

मनसा वचसा द्दष्टया प्रणामोऽष्टांगमुच्यते ॥ ( सु . )

अष्टांगें ( न्यायाचीं )- १ स्मृति ( निर्बंध ) २ न्यायाधीश , ३ पंच - न्यायाचें कामीं सहाय्यक सभासद , ४ लेखक , ५ ज्योतिषी , ६ सुवर्ण , ७ अग्नि व ८ जल , हीं न्यायाचीं आठ अंगें अथवा न्यायसाधनें म्हणून मानिलीं आहेत .

अष्टांगें ( पात्रतेचीं )- १ क्षमा , २ निरिच्छता , ३ सत्य भाषण , ४ दान , ५ सुस्वभाव , ६ सदाचार , ७ तप आणि ८ शास्त्रज्ञान ,

क्षान्त्यस्पृहा तथा सत्यं दांन शीलं तपःश्रुतम् ‌‍ ।

एतदष्टांगमुद्दिष्टं परं पात्रस्य लक्षणम् ‌‍ ॥ ( ब्राह्म . १७२ - ३३

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP