मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५

संकेत कोश - संख्या ५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पांच दैवी प्रकोप - १ आग लागणें , २ अतिवृष्टि , ३ रोगराई , ४ दुष्काळ व ५ पटकीचा उपद्रव .

पांच दोष घरा ( निवासस्थान ) बाबत वर्ज्य - १ पदाघात - एका खोलींत चालणार्‍या माणसाचा आवाज दुसर्‍या खोलींत ऐकू येणें , २ परा - घात - आपल्या घराच्या चांदईत दुसर्‍याचा संबंध ३ पथाघात - घरांतून दुसर्‍याचा वापर असणें , ४ जलदोष - आसपास पाणी सांचून होणारा त्रास . आणि ५ वृक्षदोष - जवळच्या झाडांपासून कृमी कीटकांचा वगैरे त्रास . असे पांच - दोष टाळावेत .

पदाघातः पराधातः पथाघातस्तथैव च ।

जलदोषो वृक्षदोषो गृहदोषाः प्रकीर्तिताः ॥ ( युक्तिकल्पतरु )

पांच दोष दानासंबंधीं - १ अनादर , २ विलंव , ३ तोंड चुकविणें , ४ अप्रिय भाषण व ५ दिल्यानंतर पश्चात्ताप होणें .

अनादरो विलंबश्च वैमुख्यं चाप्रियं वचः ।

पश्चाद् ‌ भवति संतापो दानदूषणपंचकम् ‌‍ ॥ ( दानशासनम् ‌‍ )

पांच द्रविड देशीय पवित्र नद्या - १ ताम्रपर्णी , २ कृतमाला , ३ पयस्विनी , ४ कावेरी व ५ प्रतीची .

ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी ।

कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी ॥ ( भाग , स्कंद ११ )

पांच नरकाचीं द्वारें - १ जीवहिंसा , २ सुरापान , ३ अगग्यागमन , ४ चोरी व ५ विश्वासघात .

जीवहिंसा सुरापानमगम्यागमनं तथा ।

चौर्यं विश्वासघातं च पञ्चैतानि मुनीश्वराः ॥ ( लक्ष्मीपूजनमंत्र )

पांच नांवें ( श्रीगीतेचीं )- १ श्रीमद्भगवद्नीता , २ उपनिषद , ३ ब्रह्मविद्या , ४ योगशास्त्र आणि ५ श्रीकृष्णार्जुनसंवाद .

पांच नियम ( आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें - १ शौच , २ संतोष , ३ तप , ४ स्वाध्याय आणि ५ ईश्वरप्रणिधान , ( योगसूत्रें २ ’ ३२ )

पांच नियम ( भिक्षूचे )- १ अक्रोध , २ गुरुशुश्रूषा , ३ शौच , ४ मिताहार आणि ५ नित्यस्वाध्याय .

अक्रोधो गुरुशुश्रूषा शौचमाहारलाघवम् ‌‍ ।

नित्यस्वाध्याय इत्येते नियमाः पञ्च कीर्तिताः ॥ ( सु )

पांच परमेश्वरी कृत्यें - १ सृष्टि , २ पालन , ३ संहार , ४ अनुग्रह आणि ५ निग्रह .

पांच पवित्र नद्या - १ किरणा , २ धूतपापा , ३ सरस्वती , ४ गंगा व ५ यमुना .

किरणा धूतपापा च पुण्यतोया सरस्वती ।

गंगा च यमुना चैव पञ्च नद्यः प्रकीर्तिताः ॥ ( बृहन्नारदीय उत्तर खंड ५१ . १५ )

पांच पवित्र पर्वत जैन धर्मीयांचे - १ शत्रुंजय , ( सिद्धाचल ), २ अर्बुदाचल ( आबु ), ३ गिरनार , ४ कैलास व ५ सम्मेतशिखर ( पारसनाथ )

पांच परिघ रावणाच्या होमस्थानाभोंवतीचे - १ आनंदाचा , २ महामोहाचा , ३ संकल्पाचा , ४ वादळी वार्‍याचा आणि ५ क्षुधेचा , असे पांच परिघ रक्षनासाठीं होते अशी कथा आहे . सर्वांबाहेर राक्षसांचा ( परिघी ) घेरा होता . ( एकनाथ वाङ्मय आणि कार्य )

पांच पंचकें ज्योतिषांत - १ राजपंचक , २ अग्निपंचक , ३ रोगपंचक , ४ चोरपंचक आणि ५ मृत्युपंचक .

पांच पुराणकालीन मणि - १ कौस्तुभ मणि , २ स्यमंतक मणि , ३ चिंतामणि मणि , ४ चूडा मणि ( वा . रा . सर्व . ६५ - २३ ) आणि ५ संजीवक मणि ( म . भा . आश्चमेधिक अ ८० ) खेरीज अभीवर्त नामक मणि असल्याचा उल्लेख अथर्ववेदांत आहे . ( अथर्व - अनु - मराठी भाग ३ रा )

पांच पुराण प्रसिद्ध स्वयंवरें - १ सावित्री , २ दमयन्ती , ३ रुक्मिणि , ४ सीता व ५ द्रौपदी . पैकीं शेवटचीं दोन " स्वयंवरें " नसून समाह्लय होत . औपचारिकपणें स्वयंवर म्हटलें गेलें आहे . कारण या विवाहाचे बाबतींत त्या त्या कन्यांच्या वडिलांनीं पण लावले होते . स्वतः मुलींनीं नव्हे ( वा . रा . निरीक्षण . )

पांच पुरुषार्थ - १ धर्म , २ अर्थ , ३ काम , ४ मोक्ष आणि ५ भक्ति . पांच पुरुषार्थांत भक्ति हा पांचवा श्रेष्ठ .

" चहूं पुरुषार्थांशिरीं भक्ति ॥ " ( ज्ञा . १८ . ८६७ )

पांच पंचायतनें - १ विष्णुपंचायतन , २ शिवपंचायतन , ३ सूर्य - पचायतन , ४ देवीपंचायतन आणि ५ गणेशपंचायतन . ज्या देवतेची उपासना करावयाची ती मध्यभागीं स्थापून इतर चार देवता चार बाजूंस स्थापावयाच्या . ( धर्मासिंधु )

पांच प्रकारचे अग्नि - १ मंदाग्नि , २ तीक्षणाग्नि , ३ विषमाग्नि , ४ समाग्निव ५ मस्माग्नि . ( वैद्यक )

पांच प्रकारचे आनंद - १ आत्मानंद , २ ब्रह्मानंद , ३ सुरतानंद , ४ विद्यानंद आणि ५ शौचानंद ,

पांच प्रकारच्या अभिज्ञा - १ निरिंद्रय श्रवण , २ अलौकिक प्रत्यक्ष , ३ पूर्वजन्माचें ज्ञान , ४ दुसर्‍याच्या चित्ताचें ज्ञान आणि ५ जादूविद्येसारखे प्रयोग करण्याची शक्ति , अशा पांच प्रकारच्या अभिज्ञा बौद्धांनीं मानिल्या आहेत . ( गुरुदत्त योग )

पांच प्रकारचें कर्म - १ कायिक , २ वाचिक , ३ मानसिक , ४ कृत व ५ अकृत . ( वेदांत विचार दर्शन )

पांच प्रकार ( अनुभवांचे )- १ पाहणें , २ वास घेणें , ३ रस चाखणें , ४ स्पर्शणें व ५ ऐकणें . ( अनुभवामृत - साररहस्य )

पांच प्रकारचीं कर्में - १ नित्य , २ नैमित्तिक , ३ काम्य , ४ प्रायश्चित्त व ५ निषिद्ध . ( विचारचंद्रोदय दर्शन )

पांच प्रकार कल्पांचे ( शास्त्रांचे )- १ नक्षत्रकल्प , २ वितानकल्प , ३ संहिताकल्प , ४ अङ्रिगरसकल्प व ५ शांतिकल्प .

नक्षत्रकल्पो वैतानस्तृतीयो संहिताविधिः ।

चतुर्थोऽङि‌‌गरसः कल्पः शान्तिकल्पश्च पञ्चमः ॥ History of Dharmashastra VOL V. Part. II

पांच प्रकार गद्य काव्याचे - १ आख्यायिका , २ कथा , ३ खण्डकथा , ४ परिकथा व ५ कथानिका . ( अग्निपुराण )

पांच प्रकारचे गुप्तहेर - १ कापटिक - कपटी शिष्य अथवा विद्यार्थी , २ उदास्थित - भ्रष्ट संन्यासी , ३ गृहपतिक - कफल्लक शेतकरी , ४ वैदेहिक - व्यापारांत दिवाळें निघालेला आणि ५ तापस - व्यवसाय करूं इच्छिणारा जटाधारी . ( कौटिल्य १ . १ )

पांच प्रकार हेराचे - १ स्थानिक , २ अंतर्गत , ३ परिवर्तित , ४ शासनक्षम व ५ उर्वरित . या पांचहि प्रकारच्या हेरांचा राष्ट्रबळकटीस उपयोग असतो . ( युद्धकला )

पांच प्रकारें द्रव्याचा विनियोग करावा - १ धर्म , २ यश , ३ अर्थ , ४ काम आणि ५ स्वजन , या पांच गोष्टींप्रीत्यर्थ द्रव्याचा विनियोग करणार्‍या पुरुषास इहपर आनंद मिळतो . ( भागवत . ८ - १९ - ३७ )

पांच प्रकार धनुर्वेदाचे - १ वसिष्ठ धनुर्वेद , २ भरद्वाज धनुर्वेद , ३ विश्वामित्र धनुर्वेद , ४ उशनस धनुर्वेद आणि ५ जमदग्नि धनुर्वेद .

पांच धार्मिक कृत्यें इस्लामचीं - १ कलमा -’ ला इलाह मंत्राचे ’ पठण , २ नमाज - द्विवसांतून पांच वेळां प्रार्थना , ३ रोजा - रमजान महिन्यांत सूर्यास्तानंतर एकदा भोजन करणें , ( या महिन्यांत कुराण पृथ्वीवर अवतीर्ण झालें . ) ४ जकात - वार्षिक उत्पन्नाचा चाळीसावा हिस्सा दानधर्मांत व्यय आणि ५ हज अर्थात् ‌‍ मक्केची यात्र . ( संस्कृतिकोश )

पांच धर्माधिकारी मुसलमान समाजाचे व त्यांचीं कार्यें - १ काझी - विवाह नोंदणी वगैरे , २ मुल्ला - मशीदीची व्यवस्था और्ध्वदेहिक वगैरे , ३ मौलवी - कायदा जाणणारा व उपदेशक , ४ खतीब - शुक्रवारीं व ईददिवशीं मशिदींत उपासना करणारा व ५ मुजावर - कनिष्ठ दर्जाचा अधिकारी मशिदीची व्यवस्था वगैरे ( म . ज्ञा . को . वि . १८ )

पांच प्रकारचे पेशीजाल ( Tissues )- १ उपलेपक , २ मज्जा , ३ स्नायु , ४ संयोगी व ५ अस्थि , अशा पांच प्रकारच्या पेशीजालांनीं मानवशरीर बनलेलें असतें . ( शारीरिक शिक्षण )

पंच प्रकार परमात्मशक्तीचे - १ चित् ‌‍ , २ आनंद , ३ इच्छा , ४ ज्ञान आणि ५ क्रिया . ( शैवागम )

पांच प्रकार पूजेचे - १ अभिगमन ( सफाई निर्माल्यविसर्जन वगैरे ) २ उपादान ( पूजासामग्री - संग्रह ), ३ योग ( इष्ट देवतेचेंध्यान ), ४ स्वाध्याय आणि ५ प्रत्यक्ष पूजा . ( कल्याण साधनांक )

पांच प्रकारचें भस्म - १ विभूति , २ भसित , ३ भस्म , ४ क्षार व ५ रक्षा .

पांच प्रकार भाजीपाल्याचे - १ पालेभाजी - चुका , चाकवत इ ., २ फळभाजी - भेंडी , गवार इ ., ३ मूळभाजी - मुळा , गाजर इ ., ४ खोड भाज्या - बटाटे , सुरण इ . आणि ५ फूल भाजी - केळफूल , कोबी ह्रदगा इत्यादि .

पांच प्रकार मनाचे - १ नास्तिक , २ रोगी - पापी , ३ अचेत - पोटभरू , ४ उलटें मन - व्याजावर निर्वाह करणारांचें आणि ५ शुद्ध मन - साधुसंतांचें .

पांच प्रकारचीं माणस - १ दगड - बेदर्दी , २ झाड - कुटुंबप्रिय , ३ पशुजतिप्रिय , ४ मनुष्य - देशप्रिय , व ५ संत - विश्वकल्याण . अशीं पांच प्रकारचीं माणसें जगांत असतात . ( गुरुदेव मासिक )

पांच प्रकारचीं मात्रा वृत्तें - १ आर्या , २ गीति , ३ उपगीति , ४ उद्नीती आणि ५ आर्यागीती . ( छंदःशास्त्र )

पांच प्रकार मंत्रांचे - १ त्वरित फलदायी , २ बीजमंत्र , ३ गुरूपदिष्ट मंत्र ४ सिद्धमंत्र व ५ आसूरीमंत्र ( जारण मंत्र ). ( याज्ञवल्क्य - मासिक )

पांच प्रकारचे यज्ञ - ( अ ) १ द्रव्ययज्ञ , २ तपोयज्ञ , ३ योगयज्ञ , ४ वाग्यज्ञ आणि ५ ज्ञानयज्ञ . ( भ . गी . ४ - २८ ); ( आ ) १ अग्निहोत्र , ३ दर्शपूर्णमास . ३ चातुर्मास्य , ४ पशुयाग , व ५ सोमयाग .

पांच प्रकारचीं युद्धें - १ तंत्रयुद्ध , २ दंडयुद्ध , ३ पाषाणयुद्ध , ४ पाशयुद्ध आणि ५ क्षेपण युद्ध ( फेकून मारण्याचें ). ( वसिष्ठ धनुर्वेद )

पांच प्रकारचे योग - ( अ ) १ मंत्रयोग , २ स्पर्शयोग , ३ भावयोग , ४ अभावयोग व ५ महायोग . ( लिंग . अ . ५५ ); ( आ ) १ क्रियायोग , २ भक्तियोग , ३ हठयोग , ४ ज्ञानयोग व ५ राजयोग .

पंच प्रकारचें रासनृत्य - १ महारास , २ वसंतरास , ३ कुंजरास ४ उत्कलरास व ५ राखालरास .

पंच प्रकारांनीं रोगनिदान होतें - १ निदान , २ पूर्वरूप , ३ रूप , ४ उपशय आणि ५ संप्राप्ति . ( माधवनिदान १ - ४ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP