मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ४

संकेत कोश - संख्या ४

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


चार प्रकारचे गण ( समूह ) औषधींचे ( रसशास्त्र )- १ रसौषधि , २ महौषधि , ३ सिद्धौषधि व ४ दिव्यौषधि .

रसौषध्यो महौषध्यः सिद्धौषध्यस्तथापराः ।

दिव्यौषध्य इति प्रोक्ता भैरवेण चतुर्विधाः ॥ ( रसेंद्र चूडामणि अ . ६ )

चार प्रकारच गुण ( थोर पुरुषांचे )- १ विभूतिमत्त्व , २ साधुत्व , ३ सिद्धत्व आणि ४ प्रचारकत्व . ( एकनाथ दर्शन भाग १ ला )

चार प्रकार गृहस्थाचे - १ वार्ताक - नित्यकर्म तत्पर , २ यायावर - अयाचित्त वृत्ति असलेला , ३ शालीन - षट्‌‍कर्मनिरत असून धनसंचय करणारा व ४ घोरसंन्यसिक - उंच्छ्रवृत्तीवर निर्वाह करणारा गृहस्थ ( ब्र . सू . शा . भा . अ . ) ३ पाद ४ )

चार प्रकार घोडयांचे व त्यांचीं गुणदर्शक नांवें - १ अश्चवाटेल तेव्हां कामाला तयार , २ तुरंगम - त्वरेनें चालणारा , ३ वाजी - वेगवान् ‌‍- वेगानें चालतो तो व ४ हय - खिंकाळत चालणारा ( सु . )

चार प्रकार जपाचे - १ रसना जप , २ ओष्ठ जप , ३ श्वास जप , ४ मानसजप ( Pathway to God )

चार प्रकार चैतन्याचे ( वेदांतशास्त्र )- १ कृटस्थचैतन्य , २ जीवचैतन्य , ३ ईश्वरचैतन्य आणि ४ ब्रह्मचैतन्य . ( विचार सा . रहस्य ).

चार प्रकार तानांचे ( संगीत शास्त्र )- १ सरलतान , २ मिश्र तान , ३ अलंकारित तान व ४ कूटतान .

चार प्रकार दीक्षेचे ( योगशास्त्र )- १ स्वर्शदीक्षा , २ शब्ददीक्षा , ३ चाक्षुषी दीक्षा व ४ संकल्प दीक्षा अथवा ध्यान दीक्षा ( गुरुदत्तयोग ).

चार प्रकार दीक्षेचे ( वीरशौव )- १ देहदीक्षा , २ मंत्रदीक्षा , ३ आज्ञा दीक्षा आणि ४ उपमादीक्षा ( विवेके चिंतामणि )

चार प्रकार दानाचे - १ नित्य , २ नैमित्तिक , ३ काम्य व ४ विमल ( निष्काम ).

चार प्रकारची देहशुद्धि ( वैद्यक )- १ वमन , २ विरेचन , ३ निरुह आणि ४ नस्य . या चार प्रकारांनीं देहशुद्धि करतां येते .

चार प्रकार ध्यानाचे - १ आधिभौतिक ध्यान - शालिग्राम वगैरेंचे , २ आधिदैविक - सूर्य इ . ३ आध्यात्मिक - चक्रचिंतन करणें व ४ निराकार - नादानु - संधान ( श्रीगुरुदत्तयोग )

चार प्रकारचे नायक ( नाटयशास्त्र )- १ धीरोदात्त , २ धीरोद्धत ३ धीरललित आणि ४ धीरप्रशांत .

चार प्रकारच्या नायिका - ( अ ) १ अनुकूला , २ दक्षिणा , ३ शठा व ४ दुष्टा .

( आ ) १ धीरा , २ ललिता , ३ उदात्ता व ४ निभृता ( अनंगरंग ).

चार प्रकार नांवाचे - १ नाक्षत्रनाम , २ मासनाम , ३ देवनाम व ४ व्यावहारिकनाम .

चार प्रकारें पुरुषपरीक्षा - १ शास्त्राभ्यास , २ स्वभाव , ३ कुल व ४ कर्म .

तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन कुलेन कर्मणा ॥ ( सु . )

चार प्रकारचे पुरुंष राष्ट्रोद्धारास आवश्यक - १ संत व साक्षात्कारी पुरुष , २ शास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ते , ३ कवि वा ग्रंथकार आणि ४ शूरवीर ( भक्ति - सारामृत अ . ४६ )

चार प्रकारची पुष्टिभक्ति - पुष्टि म्हणजे ईश्वरी अनुग्रह - १ प्रवाह - पुष्टिभक्ति , २ मर्यादा - पुष्टिभक्ति , ३ पुष्टि - पुष्टिभक्ति आणि ४ शुद्ध - पुष्टिभक्ति .

( वल्लभ ) संप्रदाय ).

चार प्रकार ( प्राणायामाचे )- ( अ ) १ पूरक ( श्वास वर ओढून घेणें ), २ कुंभक ( श्वाअस स्थिर करणें ), ३ रेचक ( श्वास हळूहळू खालीं सोडणें ) आणि ४ शून्यक अथवा केवल कुंभक ( आंतून श्वास बाहेर न सोडणें व बाहेरूनहि न घेणें . )

रेचकः पूरकश्चैव कुंभकः शून्यकस्तथा ।

एवं चतुर्विधः प्रोक्तः प्राणायामो मनीषिभिः ॥ ( बृ . ना . पूर्व . ३३ - १२० )

( आ ) १ बाह्म , २ अभ्यंतर , ३ स्तंभवृत्ति आणि ४ संघटकरण ( केवल ) कुंभक )- प्राणगतीचा निरोध करणें ( श्रीगुरुदत्तयोग ).

चार प्रकारचे महापुरुष ( गीतोक्त )- १ स्थितप्रज्ञ , २ त्रिगुणातीत , ३ भक्तिमान् ‌‍ आणि ४ निष्काम कर्मयोगी .

चार प्रकारचीं पापें - १ कायिक , २ वाचिक , ३ मानसिक आणि ४ सांसर्गिक . ( काशी खंड )

चार प्रकारचे प्राणी - १ अण्डज ( पक्षी , मासे वगैरे ), २ जारज ( मनुष्य , पशु वगैरे ), ३ स्वेदज ( उवा , ढेकूण वगैरे ) आणि ४ उद्भिज ( झाडें , वेली वगैरे ). या चार प्रकारच्या जीवकोटि आहेत . यांना योनिचतुष्टय म्हणतात .

चार खाणी चारी वाणी । चौर्‍यांयशी लक्ष जीवयोनि ॥

निर्माण झाले लोक तिन्ही । पिंड ब्रह्मांड ॥ ( दा . बो . १३ - ३ - १५ )

चार प्रकारचे प्रेम - १ अनुयोगी ( लहानाचें मोठयावर ) २ परायोगी ( मोठयाचें लहानावर ), ३ समयोगी - समानतेच्या दर्जावरून वाटणारें प्रेम व ४ भिन्नलिंगी - प्रकृति आणि पुरुष या नैसर्गिक भेदावर असलेलें . यालाच अनुक्रमें १ भक्ति , २ वात्यल्य , ३ सौहार्द व ४ शृंगार . अशा संज्ञा आहेत . ( सह्मादिर एप्रिल १९५३ )

चार प्रकार प्रेमाचे - १ लालन प्रेम , २ वात्सल्य प्रेम , ३ सख्य प्रेम व ४ माधुर्य प्रेम . व्यवहारांत तसेच अध्यात्मांत असे चार प्रकार मानले आहेत . ( ज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका खंड ३ )

चार प्रकारचें बल - १ वीर्यबल , २ प्राणबल , ३ शरीराची बृद्धि आणि ४ पुष्टि . मनुष्यानें आपलें शरीर या चतुर्विध बळांनीं युक्त केलें पाहिजे . ( अथर्व - अनु - मराठी ).

चार प्रकार भक्तिचे - १ गुर्वी , २ अनन्या , ३ अव्यभिचारिणी व ४ परा . " अर्जुना हे गुरुवी । भक्ति सांगीतली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञ यजिती । ते भक्त आइके ॥ ( ज्ञा . ९ - २२८ )

चार प्रकार भक्तांचे - १ आर्त - ध्रुव , २ जिज्ञासु - उद्धव ३ अर्थाथीं - बिभीषण व ४ ज्ञानी - शुकाचार्य ( भ . गी . ७ - १६ )

चार प्रकार मानवी रक्ताचे - १ अ , २ अब , व ४ ओ असे चार प्रकार मानवी रक्ताचे असतात . ( लॅन्डस्लीनर . १९ - ७ )

चार प्रकार मित्राचे - १ औरस पुत्र , २ संबंधी - नातलग बगैरे , ३ पिढिजाद मैत्री असलेला व ४ संकट निवारण करणारा . असे मित्राचे अथवा मित्रात्वाचे चार प्रकार .

" औरसं कृतसम्बन्धं तथा वंशक्रमागतम् ‌‍ ।

रक्षितं व्यसनेभ्यश्च मित्रं ज्ञेयं चतुर्विधम् ‌‍ " ( कार्मदकीय नीतिसार )

चार प्रकारची माणसें - १ विशाल ह्रदय - आपण न खातां दुसर्‍यास देतो तो , २ उदार ह्रदय - आपण खातो व दुसर्‍यासहि देतो , ३ अनुदार ह्रदय - आपण खातो पण दुसर्‍यास देत नाहीं तो आणि ४ कृपणा ह्रदय - आपणहि खात नाहीं व दुसर्‍यासहि देत नाहीं असा .

( कल्याण मासिक )

चार प्रकार मंत्रांचे - १ सिद्ध , २ साध्य , ३ सुसिद्ध आणि ४ अरिउच्चाटन ( नाम चिंतामणि ).

चार प्रकारचे मेघ - १ आवर्त - विशेषस्थानीं वृष्टि , २ संवर्त - सर्वत्र वृष्टि , ३ पुष्कर - अल्प पर्यन्य व ४ द्रोण - विपुल पर्जन्य . ( कृषिपाराशर - २४ - २६ )

चार प्रकार योगाचे - १ मंत्रयोग , २ हठयोग , ३ लययोग आणि ४ राजयोग ( शिवसंहिता ).

चार प्रकारचे लोक - ( अ ) १ कर्मी , २ भक्त , ३ ज्ञानी व ४ योगी . ’ कर्मिणः सन्ति भक्ताश्च ज्ञानिनो योगिनस्तथा ॥ ’ ( रा . गी . ११ - ३ )

( आ ) १ दुर्जन , २ मतलबी , ३ सज्जन आणि ४ संत .

दुर्जन रत संसारी । मतलबी कामापुरता धरी ।

सज्जन त्याचा विचार करी । संत त्यागी सर्वथा ॥ ( भ . सा . १७ - ६४ )

( इ ) १ सत्पुरुष - स्वार्थ सोडून लोकांचें कल्याण करणारे , २ सामान्य - स्वार्थ स सोडतां लोकांसाठीं झटणारे , ३ मानवराक्षस - स्वर्थासाठीं लोकांचे नुकसान करणारे व ४ पशुराक्षस - सार्थहि नसतां दुसर्‍याची निरर्थक हानि करणारे . असे चार प्रकारचे लोक जगांत असतात .

एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये ।

सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये ॥

तेऽमी मानुषराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये ।

ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ॥ ( भ . नी . ८४ )

चार प्रकारचें वर्षमान ( कालगणना )- १ चांद्रवर्ष , २ सौरवर्ष , ३ नाक्षत्रवर्ष आणि ४ सायन अथवा संपातवर्ष .

चार प्रकारचे वाद - १ आरम्भवाद - हा काणादांचा पक्ष - नैयायिक मीमांसक वगैरे , २ संघातवाद - हा बौद्धांचा पक्ष , ३ परिणामवाद - सांख्य , पातंजल वगैरेंचा पक्ष आणि ४ विवर्तवाद किंवा मायावाद - अद्वैत वेदान्त्यांचा पक्ष .

चार प्रकारचीं वाद्यें - १ तंत - तारेचीं वाद्यें , २ वितंत - टाळ , चिपळ्या वगैरे , ३ घन - नगारा , डफ वगैरे व ४ सुस्वर - सनई वगैरे .

चार प्रकार वानप्रस्थाचे - १ वैखानस , २ औदुंवर , ३ वालखिल्य व ४ फेनपा ( ब्र . सू . शां . भाष्य - अ ३ पाद ४ )

चार प्रकार विदूषकाचे - १ तापस , २ द्विज , ३ राजजीवि आणि ४ शिष्य ( भ . ना . )

चार प्रकारचे वैद्य - १ विषवैद्य , २ शाल्यवैद्य , ३ रोगवैद्य आणि ४ कृत्यावैद्य , असे चार प्रकारचे वैद्य राजानें जवळ बाळगावेत . चतुर्विधांश्व वैद्यान्वै संगृह्‌‍णीयाद्विशेषतः । ( म . भा . शांति )

चार प्रकारचें वैराग्य - ( अ ) १ यतमान वैराग्य , २ व्यतिरेक वैराग्य , ३ एकेन्द्रिय वैराग्य व ४ वशीकार वैराग्य . ( आ ) १ भयजनित वैराग्य , २ विचारजनित वैराग्य , ३ साधनयुक्त वैराग्य आणि ४ ज्ञानजनित वैराग्य .

सविरागः पुराणेषु चतुर्धा सम्प्रकीर्तितः

यतमानवशीकारव्यतिरेकादिभेदतः ॥ ( सु . )

चार प्रकारची वैद्याची वृत्ति असावी - १ रोग्याविषयीं ममता . २ दया , ३ साधा रोग वरा करण्याचा उत्साह व ४ रोग असाध्य असेल तर ( अगोदरच ) सोडणें , अशी वैद्याची वृत्ति असावी .

मैत्री कारुण्यमार्तेषु शक्ये प्रीतिरुपेक्षणम् ‌‍ ।

प्रकृतिस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तिश्वतुर्विधा ॥ ( च . सू . ९ - २४ )

चार प्रकार व्यूहाचे ( सैन्यरचनेचे )- १ मानुष , २ दैव , ३ गांधर्व व ४ आसुर . असे चार प्रकार भारतकालीं होते . ( म . भा . भीष्म १९ - २ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP