मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७

संकेत कोश - संख्या ७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सात रथी यादव सैन्यांतील - १ चारुदेष्ण , २ चक्रदेव , ३ सात्यकि , ४ श्रीकृष्ण , ५ बलराम , ६ सांब व ७ प्रद्युम्न . ( म . भा . सभा , १४ - ५८ )

सात महारथी यादव सैन्यांतील - १ कृतवर्मा , २ अनाधृष्टि ३ समीक , ४ समितिंजय , ४ कंक , ६ शंकु व ७ कुंति , ( म . भा . सभा . १४ - ५९ )

सात रानधान्यें - १ कुलित्थक - कुळीथ , २ श्यामक - सांवे , ३ नीवार - देवसाळी , ४ जर्तिल - रानतीळ , ५ गवेधुक - तृणधान्य , ६ वेणुयन - वेळूचें बीं आणि ७ सर्कंटक - एक प्रकारचें धान्य . ( वि . पु . )

सात रुद्रगण - १ शंकुकर्ण , २ महाकर्ण , ३ कुंभकर्ण , ४ सागरालय , ५ गजेंद्रकर्ण , ६ गोकर्ण , आणि ७ पाणिकर्ण . असे सात रुद्रगण आहेत . परंतु शंकराशीं अभिन्न असल्यामुळें त्यांचींच नांवें शंकरास दिलीं आहेत .

सात रेषा ( हस्तसामुद्रिक शास्त्रांत )- ( अ ) १ आयुष्यरेषा , २ मस्तकरेषा , ३ अंतःकरणरेषा , ४ धनरेषा , ५ आरोग्यरेषा , ६ रविरेषा आणि ७ मन्मथ ( विवाह ) रेषा , अशा हातावरील रेषा हस्तसामुद्रिकांत सांगितल्या आहेत . ( ब्रह्मलिखित ), ( आ ) १ आयुष्यरेषा , २ मस्तकरेषा , ३ अंतःकरणरेषा , ४ भाग्यरेषा , ५ विद्यारेषा , ६ बुधरेषा आणि ७ चंद्ररेषा .

सात ललितकला - १ काव्य , २ गायन , ३ चित्रकला , ४ मूर्तिकला , ५ वास्तुकला , ६ नर्तनकला व ७ नाटयकला . अनेक माणसें एकस - समयावच्छेदेंकरून जिचा आस्वाद घेऊं शकतात ती ललितकला .

सात वस्तूंचा संग्रह कोठूनहि करावा - १ स्त्रिया , २ रत्नें , ३ विद्या , ४ धर्म , ५ सदाचार , ६ सुभाषित आणि ७ विविधकला .

स्त्रियो रत्नान्यथो विद्या धर्मः शौचं सुभाषितम् ‌‍ ।

विविधानि च शिल्पानि समादेयानि सर्वतः ॥ ( मनु . २ - २४० )

सात वार - १ रविवार , २ सोमवार , ३ मंगळवार , ४ बुधवार , ५ गुरुवार ६ शुक्रवार आणि ७ शनिवार .

आदित्यःअ सोमो भौमश्च तथा बुधबृह्स्पती ।

भार्गवः शनैश्चरश्चैव एते सप्त दिनाधिपाः ॥ ( अथर्व . ज्योतिय )

याच अर्थाचीं वारांचीं नांवें सर्व भाषांतून सर्वत्र आढळतात .

सात वैदिक छंद - १ गायत्री , २ उष्णिह , ३ अनुष्टु्भ् ‌‍ ४ बृहती , ५ पंक्ति , ६ त्रिष्टुभ् ‌‍ आणि ७ जगती . छंद याचा अर्थ " मनाला प्रसन्न करणारें गानामध्यें रुचिर असें वृत्ताचें रूप . "

सात वैदिक देणग्या ( वेदमातेच्या )- १ आयु , २ प्राण , ३ प्रजा , ४ पशु , ५ कीर्ति , ६ द्रविणं ( धन ) आणि ७ ब्रह्मवर्चसम् ‌‍ ( ब्रह्मतेज ).

सात व्यसनें राज्यशासकांनीं त्यागावींत - १ कटु भाषण , २ कठोर दंड करणें , ३ धनाचा अपव्यय , ४ मद्यपान , ५ स्त्रियांसबंधीं आसक्ति , ६ शिकारींत कालहरण व जुगार .

सात शल्यें - ( अ ) १ दिवसाचा निस्तेज चंद्र , २ यौवन संपलेली स्त्री , ३ कमलहीन सरोवर , ४ निरक्षर सुंदर मुख , ५ द्रव्यलोभी प्रभु अथवा धनी , ६ दारिद्रय असलेला सज्जन आणि ७ राजगृहांत दुर्जनांचा प्रवेश . हीं सात शल्यें होत .

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी

सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृतेः ।

प्रभूर्धनपरायणः सततदुर्गतः सज्जनो नृपाङ्रणगतः खलो मनसि सप्त शल्यानि मे ॥ ( भ . नी . ५६ )

( आ ) १ समाजकंटकापासून होणारा उपद्रब , २ गर्विष्ठ लोकांचा उद्दामपणा , ३ प्रेमभंगामुळें होणार्‍या मानसिक वेदना , ४ न्यायाच्या कामीं लागणारा अज्ञ लोकांकडून भिळणारे लत्तप्रहार व ७ दुर्वह प्रपंचमार डोकीवर घेऊन दुःसह आयुष्य कंठण्याचा प्रसंग . ( हॅम्लेट अंक ३ )

अतर्क्य असें दुर्दैव हें आठवें शल्य होत .

सात शब्दांत ब्रह्मविद्येचें रहस्य १ ब्रह्म - अक्षर म्हणजे अविनाशी तत्त्व , २ अध्यात्म - वस्तूंचा मूळ स्वभाव , ३ कर्म - सृष्टिव्यापार , ४ अध्हिभूत - नश्वरवस्तू - देह , ५ अधिदैवत - जीवात्मा , ६ अधियज्ञ - भगवंत आणि ७ अंतकालीं भगवंताचें स्मरण , या सात शब्दांत सर्व ब्रह्लाविद्येचें रहस्य भगवान् ‌‍ श्रीकृष्णानें अर्जुनास सांगितलें . ( भ . गी . ८ - १ ते ५ )

सात शारीर - संस्था - १ अस्थिसंस्था , २ स्नायुसंस्था , ३ अभिसरणसंस्था , ४ श्वसनसंस्था , ५ पचनसंस्था , ६ उत्सर्जकसंस्था व ७ मज्जासंस्था .

अस्थि स्नायूचाभिसरणं श्वसनं पचनं तथा ।

उत्सर्जकं च मज्जा च सप्त संस्था विशेषतः ॥ ( सु . )

सात षडगुणसंपन्न भगवद्भक्त - १ वसिष्ठ , २ बामदेव , ३ नारद , ४ व्यास , ५ वाल्मीकि , ६ प्रह्लाद आणि ७ शुकाचार्य . ( चतुःश्लोकी भागवत )

सात ’ स ’ कार दुर्लभ - १ संपत्ति , २ सरस्वती , ३ सत्य ( सचोटी ), ४ संतति , ५ सदनुग्रह , ६ सत्ता आणि ७ सुकृतसंचय .

’ सत्तासुकृतसंभाराः सकाराः सप्त दुर्लभाः । ’ ( सु . )

सात सत्याग्रही ( रामायणकालीन )- १ विश्वामित्र , २ सीतामाई , ३ लक्ष्मण , ४ केवट , ५ भरत , ६ श्रीराम आणि ७ शम्बूक . या सातांनीं आपल्या ध्येयसिद्धीसाठीं सत्याग्रह केला होता . ( कल्याण - रामायणांक )

सात सहज प्रेरणा - १ प्रेप्सा - आशा , २ जिजीविषा - जगण्याची इच्छा , ३ चिकीर्षा - करण्याची इच्छा , ४ जिज्ञासा , ५ शोक , ६ भय आणि ७ अतृत्पि . या सात सह्ज प्रेरणा होत . ( पातंजल योगसूत्रें )

सात साधनें उत्कर्षप्राप्तीचीं - १ उद्योग , २ स्वार्थत्याग , ३ अहंपणाचा विसर , विश्वव्यापक प्रेम , ५ उल्हास , ६ निर्मयता व ७ स्वावलंबन . ( स्वामी रामतीर्य )

सात साधनें कीर्तीचीं - १ दान , २ पुण्य , ३ विद्या , ४ वक्तृत्व , ५ काव्य , ६ आर्जव व ७ शौर्य .

सात साधने ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यचीं - १ सत्‌‍संग , २ गुरूपासून ज्ञान , ३ सार - असार विचार , ४ परमवैराग्य , ५ श्रवण , ६ मनन आणि ७ निदिध्यास . ( दा . बो . )

सात सिद्धांत - १ पांचरात्रसिद्धान्त , २ कापिलसिद्धान्त , ३ अपान्तरतमसिद्धान्त - ४ ब्रह्मिष्ठसिद्धान्त , ५ पाशुपतसिद्धन्त , ६ हैरण्यगर्मसिद्धान्त आणि ७ शिबसिद्धन्त , प्राचीन चौदा विद्यांखेरीज हे सात स्वतंत्र सिद्धान्त मानले आहेत . ( कल्याण - हिन्दु संस्कृति अंक ).

सात सिद्धमंत्र - १ नृसिंह , २ राम , ३ विष्णु , ४ शंकर , ५ देवी , ६ गणेश व ७ गुरु . मंत्रांत सांगितलेल्या फलांत तत्काल प्राप्ती होण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहे तो ’ सिद्धमंत्र ’ म्हणतात .

नृसिंहरामौ विष्णुश्च शंकरश्चाम्बिका तथा ।

गजननो गुरुश्चैव सप्तैते सिद्धमंत्रदाःअ ॥ ( शारदातिलक )

सात सूर्य - १ आरोग्य , २ भ्राज , ३ पटर , ४ पतंग , ५ स्वर्णर , ६ जोतिषिमान ‌‍, व ७ विमार , जगाला प्रकाशित करणार्‍या सूर्यांत सात सूर्य समाविष्ट आहेत . ख्रेरीज कश्यप नांवाचा आणखी एक आठवा सूर्य आपण पाहिल्याचें वैदिक कालचे खगोल शास्त्रज्ञ वर्णितात .

( तै - आरण्यक )

सात सोमसंरक्षक - १ स्वान , २ भ्राज , ३ अंधारि , ४ बंभारि , ५ ह्स्त , ६ सुहस्त , आणि ७ कृशानु . हे सात जण सोमसंरक्षक होत .

( तैत्तिरिय १ - २ - ७ , वैदिक आर्यांचें ज्योतिर्विज्ञान )

सात सौभाग्य द्र्व्यें - १ हळद , २ कुंकू , ३ शेंदूर , ४ काजळ , ५ गळसरी , ६ मंगळसूत्र आणि ७ चुडा .

हरिद्राकुंकुमश्चैव सिंदुरादिसमन्वितम् ‌‍ ।

कजलं कंठसूत्रं च सौमाग्यद्र्व्यमुच्यते ॥ ( वार्षिक व्रतपूजाविधि )

सात संकटें ( शेतीला )- १ अतिवृष्टि , २ अनावृष्टि , ३ उंदीर फार होणें , ४ टोळधाड , ५ पांपरांचा उपद्रव , ६ स्वसैन्याकडून अथवा ७ परसैन्याकडून लुटालूट .

अतिबृष्टिरनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।

स्वचक्रं परचकं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥ ( सु . )

सात स्त्रीजातीय विभूति - १ कीर्ति , २ संपत्ति , ३ वाणी , ४ स्मृति ५ बुद्धि , ६ धैर्य आणि ७ क्षमा , या सात स्त्रीजातींतील सात विभूति ( परमेश्चरी अंश ) होत .

एवं नारी माझरी । या सातहि शक्ति अवधारी ॥

ऐसे संसार गजकेसरी । म्हणतां जाहला ॥ ( ज्ञा . १० . २८० )

सात स्वदेशी शूंखला ( सावरकरप्रणीत )- १ वेदोक्तबंदी २ व्यवसायबंदी , ३ स्पर्शबंदी , ४ सिंधुबंदी , ५ शुद्धिबंदी , ६ रोटीबंदी आणि ७ वेटीबंदी . महान् ‌‍ हिंदु राष्ट्राच्या एकतेला बाध आणाणार्‍या पण समाजांत फार खोलवर रुजलेल्या या सात बंद्या अथवा सात शृंखलाच होत . त्या उच्छेदून टाकल्याच पाहिजेत , असें स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीं आग्रहानें प्रतिपादिलें आहे .

सात स्वर्गप्राप्तीचीं महाद्वारें - १ तप . २ दान , ३ शम , ४ दम , ५ लज्जा , ६ सरळपणा आणि ७ सर्वभूतीं दया . ( म . भा . आदि , ९० - २२ )

सात स्वातंत्र्यें - १ भाषण - स्वातंत्र्य व मतस्वातंत्र्य , २ शांततेनें शस्त्रशिवाय एकत्र जमणें , ३ संस्था व संघस्वातंत्र्य , ४ संचारस्वातंत्र्य , ५ वास्तव्य - स्वातंत्र्य , ६ संपत्तीचें संपादन , धारण व वासलात लावणें आणि ७ व्यवसाय - स्वातंत्र्य . हीं सात स्वातंत्र्यें भारतीय नागरिकांना घटनेनें दिलीं आहेत . ( हिंदी राज्यघटना )

सात स्थानें उच्चाराची - १ ऊर्ध्व , २ तालु , ३ दांत , ४ कंट , ५ ओठ , ६ नाक , व ७ अप्रयत्न - सहज उच्चारण .

सात हांमद्वव्यें - १ समिधा , २ तूप . ३ चरु ( भात ), ४ लाह्या , ५ मोहरी , ६ यव आणि ७ तीळ . हीं सात प्रकारचीं द्र्व्यें हवनीय होत .

सातजण आश्रयास अपात्र - १ निरुद्योगी , २ अधाशी , ३ लोकांच्या द्वेषास पात्र झालेला , ४ कपटी , ५ निर्दय , ६ देशकाला न जाणणारा आणि ७ अनिष्ट वेष धारण करणारा . ( म . भा . उद्योग . ३७ - ३५ )

सात जणांना चरणस्पर्श करूं नये .- १ अग्नि , २ गुरु , ३ ब्राह्मण , ४ गया , ५ कन्या , ६ बृद्ध , आणि ७ शिशु , ( व्र . चा ७ - ६ )

सात जणांचा जन्मच परोपकारार्थ - १ सूर्य , २ चंद्र , ३ मेघ , ४ बृक्ष , ५ नद्या , ६ गायी , व ७ सज्जन , या सातांना परमेश्चरानें सृष्टीच्या आरंभीं परोपकारार्थच उत्पन्न केलें . " एते परोपकाराय देवेन निर्मिताः " ( सु . )

सातजप झोपले तरीहि जागृत करावे - १ विद्यार्थी २ सेवक , ३ मार्गस्थ , ४ भुकेलेला , ५ भयभीत , ६ कोठीवाला आणि ७ राखणदार .

विद्यार्थी सेवकः पांथः क्षुधार्थी भयकातरः ।

भाण्डारी प्रतिहारी च सप्त सुप्तान्प्रबोधयेत् ‌‍ ॥ ( वृ . चा . ९ - ६ )

सातजण परभक्ष होत - १ माश्या , २ डांस , ३ वेश्या , ४ उंदीर , ५ याचक , ६ ग्रामाधिकारी आणि ७ ज्योतिषी .

मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा ।

ग्रामणीर्गणकश्चैव सप्तैते परमक्षकाः ॥ ( सौर . ६७ - १८ )

सातजण पित्यासमान - १ जन्म देणारा , २ पालन करणारा , ३ सासरा , ४ थोरला भाऊ , ५ मंत्रदीक्षा देणारा , ६ अभय देणारा व ७ ज्ञान देणारा . ( तत्त्व - निज - विवेक )

सातजणांमुळें पृथ्वीची धारणा होते - १ गाय , २ ब्राह्मण , ३ वेद , ४ सती स्त्री , ५ सत्यवादी पुरुष , ६ लोभहीन मनुष्य व ७ दानशूर .

गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः ।

अलुब्धैर्दानशीलैश्च सप्तभिर्धार्यते मही ( स्कंद . मोहश्चर २ - ७१ )

सात जणी मातेसमान - १ जन्मदात्री , २ गुरुपत्नी , ३ ब्राह्मणी , ४ राजपत्नी , ५ गाय , ६ दाई व ७ मातृभूमि . ( तत्त्व - निज - विवेक )

सातजण योगपारंगत - १ सुमन , २ कुमुद , ३ शुद्ध , छिद्रदशीं , ५ सुनेत्रक , ६ सुनेत्र आणि ७ अंशुमान ‌‍. असे सातजण योगपारंगत होऊन गेले .

सुमनः कुमुदः शुद्धश्र्छिद्रदशीं सुनेत्रकः ।

सुनेत्रश्चांशुमांश्चैव सप्तैते योगपारगाःअ ॥ ( मत्स्य २० - १८ )

सातजण सत्कमीं क्षीण झाल्यामुळें अधिक शोभतात - १ सहाणेवर घासलेला हिरा , २ जखमी झालेला पराक्रमी असा शूर , ३ मदस्त्रावानें क्षीण झालेला हत्ती , ४ शरदूऋतूंत ओसरलेल्या नद्या , ५ प्रतिपदेचा चंद्र , ६ सुरतश्रमानें म्लान झालेली नवयौवना आणि ७ दान दिल्यामुळें धनहीन झालेले दाते .

मणिः शाणोल्लीढः समरविजयी हेतिनिहतो

मदक्षीणो नागः शरदि सरितः श्यानपुलिनाः ॥

कलाशेषश्चन्द्रः सुरतमृदिता बालललना - स्तनिम्ना शोभन्ते गलितविभवाश्चार्थिषु जनाः ॥ ( भर्तृ . नीति . ४४ )

सातजण साक्षीस वर्ज्य - १ सामुद्रिक जाणणारा , २ पूवींचा चोर पण नंतर व्यापारी बनलेला , ३ शकुन वगैरे सांगून दुसर्‍यास फसविणारा , ४ वैद्य , ५ शत्रु , ६ मित्र आणि ७ नट , ( म . भा . उद्योग . ३५ - ४४ )

सातजण सात गोष्टीमुळें वश्य - १ देव - भावानें , २ राजसत्ताधारी - कलेमुळें , ३ कांता - धनानें , ४ शत्रु - कपटानें , ५ मित्र - सत्यानें , ६ पुत्र - कृपेनें आणि ७ मोक्ष - ज्ञानानें प्राप्त होतो .

भावेन देवं कलया नरेंद्रम ‌‍ । धनेन कांता कपटेन शत्रुं ॥

सत्येन मित्रं , कृपया च पुत्रम् ‌‍ । ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति ॥ ( सु . )

सातजण स्वर्गाचे अधिकारी - १ आज्ञाधारख पुत्र , २ प्रतिष्ठित भार्या , ३ निःस्वार्थी सेवक , ४ गुरुजनांविषयीं आदर असलेला . ५ प्रजापालक शासक , ६ स्वधर्मरत ब्राह्मण आणि ७ धारातीर्थी पतन पावलेला वीर पुरुष . ( चंद्रकांत भाग २ रा )

गीतासप्तक - १ भगवद्नीता , २ रामगीता , ३ गणेशगीता , ४ शिवगीता , ५ देवीगीत , ६ कपिलगीता व ७ अष्टावक्रगीता . या सात प्रमुख गीत होत .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP