मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १७

संकेत कोश - संख्या १७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सतरा अक्षरी मंत्र ( खालसा पंथाचा )- " बाहे गुरुका खालसा श्री बाहे गुरुजीकी फत्ते " परमेश्वर म्हणजे खालसा आणि परमेश्वराचा जय " ( शिखांचा इतिहास )

सतरा तत्त्वांचें शरीर - ५ पंचज्ञानेंद्रियें , ५ पंचकर्मेंद्रियें , ५ पंचप्राण , १ मन , आणि १ बुद्धि , या सतरा तत्त्वांच्या गटाला लिंगशरीर अथवा लिंगदेह म्हणता . त्यांत असणारा आत्मा हें अठरावें तत्त्व होय .

पंचज्ञानैद्रिंयें पंचकर्मेंद्रियें । पंचप्राण आणि मन बुद्धि द्वयें ।

ऐसा सतरा क्लांचा समुदाये । लिंगदेह ॥ ( ज्ञानमोदक )

सतरा तंतवाद्यें ( तारा व ताती लावून वाजणारीं )- १ तंबोरा , २ तंबोरी , ३ सूरसोटा , ४ एकतारी , ५ रुद्रवीणा , ६ बीन , ७ सतार , ८ कछवा , ९ ताऊस , १० दिलरुबा , ११ सारंगी , १२ सारमंडल , १३ रबाब , १४ सुरसिंघार , १५ सरोद , १३ फिडल् ‌ व १७ तुणतुणें ,

सतरा प्रकारचे गुरु - १ गुरु , २ मंत्रगुर , ३ यंत्रगुरु , ४ तंत्रगुरु , ५ वस्तादगुरु , ६ राजगुरु , ७ कुलग्रुरु , ८ मानिला गुरु , ९ विद्यागुरु , १० अविद्यागुरु , ११ असद्‌‍गुरु , १२ यतिगुरु , १३ मातागुरु , १४ पितागुरु , १५ राजगुरु , १६ देवगुरु , १७ जगद्‌‍गुरु , ( दासबोध ५ . २ )

सतरा प्रबंध ( गीतप्रकार )- १ धृपद , २ धमार , ३ ख्याल , ४ चीज , ५ तराणा , ६ चतरंग , ७ होरी , ८ टप्पा , ९ ठुमरी , १० सा , रे , ग , म , ११ लक्षणगीत , १२ अष्टपदी , १३ गझल , १४ अभंग , १५ रासगर्बा , १६ लावणी आणि १७ पोवाडे . ( संगीतशास्त्र )

सतरा शब्ददोष - १ अप्रयुक्त , २ अपुष्टार्थ , ३ असमर्थ , ४ निरर्थक , ५ नेयार्थ , ६ च्युतसंस्कार , ७ संदिग्ध , १३ अप्रयोजक , ९ क्लिष्ट , १० गूढार्य , ११ ग्राम्य , १२ अन्यार्थ , १३ अप्रतीतिक , १४ अविसृष्ट विधेयांश . १५ विरुद्धमतिकृत , १६ अश्लील व १७ परुष ( श्रुतिकटु ). ( प्रतापरुद्र )

सतरा जण मूढ होत - १ उपदेशासे अपात्र अशास उपदेश करणारा , २ अल्प लाभानें संतुष्ट होणारा , ३ आपला द्वेष करणाराशींहि दीर्घकाळ व्यवहार करणारा , ४ स्त्रीच्या जिवावर मोठेपणा मिळविणारा , ५ न मागण्यासारखी वस्तुअ मागणारा , ६ आत्मसुति करणारा , ७ चांगल्या कुलांतील असूनहि निंध कृत्य करणारा , ८ दुर्बल , असूनहि बलवानाशीं वैर करणारा , ९ श्रद्धा नसलेल्यास उपदेश करणारा , १० भलतीच इच्छा करणारा , ११ सुनेच्या माहेरच्या साहाय्यानें भीतींतून पार पडला असूनहि तेथें मानमान्यतेची इच्छा करणारा , १२ सुनेची थट्टा करणारा सासरा , १३ परस्त्रीगमन करणारा , १४ वेळीं अवेळीं पत्नीची निंदा करणारा , १५ एखादी गोष्ट माहीत असूनहि आठवत नाहीं म्हणणारा , १६ याचनेनंतर आत्मप्रशंसा करणारा आणि १७ असत्य गोष्टीचें सत्यत्व प्रतिपादन करणारा .

( म . भा . १७ . १ ते ६ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP