मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
स्वानंदपुरींचा रहिवासीं आ...

मोरया गोसावी - स्वानंदपुरींचा रहिवासीं आ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


स्वानंदपुरींचा रहिवासीं आला ॥

आह्मासी भेटला मोरेश्वरीं ॥१॥

आहो मुर्ती गोजिरवाणी सेंदूर साजिरीं ॥

सिंहासनावरी मिरवतसे ॥२॥

आहो कोटिकंदर्पाला ओवाळुनी टाका ॥

सिद्धीच्या नायका वरोनियां ॥३॥

आहो ज्याच्या बीरुदाचा ॥

त्रैलोकी दणाणा ॥ पतिपावन नाम गर्जे ॥४॥

(माझ्या) वडिलांनीं जोडी जोडी केली ह्या पायाचीं ॥

हीच हो आमूची कामधेनू ॥५॥

आहो याजवीण आह्मा अन्य नसे कोणी ॥

मछीया जीवन तैशापरी ॥६॥

(मोरया) माझी लज्जा रक्षी सर्वही दिनानाथा ॥

तुजवीन आह्मा कोण आहे ॥७॥

आहो महाद्वारीं उभा उभा कर जोडुनियां ॥

भक्ती दान मोरया देंई मज ॥८॥

आहो मोरया गोसाव्यांच्या वंशींचा किंकर ॥

मागें निरंतर हेंचि सुख ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP