मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
अतिकाळ झाला येथें ॥ मूळ प...

मोरया गोसावी - अतिकाळ झाला येथें ॥ मूळ प...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


अतिकाळ झाला येथें ॥ मूळ पाठवी लवकरी ॥

प्राण माझा स्थिर नाहीं ॥ आहो आणिक एक नवल झालें ॥

विपरित देखिलें स्वपन ॥ निर्गुणरुप सदोदीत ॥

मुर्ती देखिली (पाहिली) मनो मय ॥ विस्मित झालें मन माझे ॥

नोळखे भ्रांतीचा समावेश ॥ भेट देइ वरदमूर्ती ॥

आहो जय जय विघ्नराजा ॥१॥

पूर्व जन्म रे (जन्मीचें संचित ॥

प्रालब्धाची कोण गती ॥ देव (मोरया) भेटला अवचीत ॥

आहो जय जय जय विघ्नराजा ॥धृ०॥

आहो आणिक एक नवल झालें ॥

सकळा देवाचें एकरुप ॥ आहो मन माझें स्थीर नाहीं ॥

कोठें (पहावा) ओळखावा हा देव ॥

भ्रांतीरुप शरीर माझें ॥ विषय करिती चेतना ॥

मन माझें पांगूळ हो ॥ आहो जय जय जय विघ्नराजा ॥२॥

आहो ऐसें देवा काय केलें ॥ ऊदंड गाईलें स्वपन ॥

प्रपंचाची कोण गती ॥ सुत्रधारी रे कवित्व करी ॥

नेणती बा कोण देही ॥ वेगीं (मूळ) पाठवी लवकरी॥

मूळावीण नये बापा ॥ आहो जय जय जय विघ्नराजा ॥३॥

मोरया गोसावी अवधारी ॥ विनंती माझी परीस देवा ॥

सुख पावलों भक्तीचें ॥ भक्तालागीं कृपा करी ॥

ऐसें संचित पुर्वींचे ॥ निर्माण तुंचि जाण ॥

कृपा (दया) करावी लवकरी ॥ वेगीं मूळ पाठवावें ॥

आहो जय जय जय विघ्नराजा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP