मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया मोरया हो मोरया मोरय...

मोरया गोसावी - मोरया मोरया हो मोरया मोरय...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


मोरया मोरया हो मोरया मोरया मोरया मोरया ॥

मोरया मोरया हो मोरया मोरया हो ॥

दैवा केले डोळा हो पुण्य केले पाई ॥

मोरयासि बाही हो आलिंगीन ॥१॥

दैवाचिया नरा हो बुद्धि केली लाटी ॥

मोरयासि दृष्टि हो देखलिया ॥२॥

सेंदुर वर्णिला हो जयाच्या रे माथा ॥

तया गणनाथा हो नमन माझे ॥३॥

भागलो कष्टलो हो आलो मोरेश्वरा ॥

त्याचे घरी डेरा हो अमृताचा ॥४॥

भादवे चौथिसी हो जे द्वारे करीती

ते फळ पावती हो अभिलाषीचे ॥५॥

मायाबापाहूनि हो मोरया आगळा ॥

न करी वेगळा हो जीवाहूनि ॥६॥

मायबागहूनी मोरया परी हे ॥

(लिंब) लोण मी घडिये हो उतरीन ॥७॥

कर्‍हेच्या पाठारी हो नांदे ईच्छादानी ॥

नाम चिंतामणी हो मोरेश्वर ॥८॥

मोरेश्वर देव हो कमंडलू गंगा ॥

पापें जाति भंगा हो देखलिया ॥९॥

कनकाचा परियेळु हो उजळु दीपका ॥

भावे ओवाळु नायका हो मोरेश्वर ॥१०॥

शंख भेरी तूरे हो वाजती कोल्हाळा ॥

होतसे सोहळा हो मोरयाचा ॥११॥

हाति पंचारति हो हरिदास नाचति ॥

भावे ओवाळिती हो मोरेश्वरा ॥१२॥

दुरुनि दिसती हो पांढरीया ध्वजा ॥

तेथें नांदे राजा हो मोरेश्वर ॥१३॥

यादवाचा हीरा हो आला माझे घरा ॥

(नव) रत्‍नाचा डोल्हारा हो लांबविला ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP