मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरेश्वरा विधिजावरा ये ये...

मोरया गोसावी - मोरेश्वरा विधिजावरा ये ये...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


मोरेश्वरा विधिजावरा ये ये हा चरण सकुमारा ॥

दावी नयनीं धीरा नेंई माहेरा ॥धृ०॥

संचित प्रालब्धासीं ये ये हा आलों जन्मासीं ॥

माझा मी सासुरवासी पडिलों भ्रांतीसीं ॥१॥

माझें माझें म्हणतां ये ये हा आयुष्य सत्ता ॥

व्यर्थ गेले आतां मज धांव रे येकदंता ॥२॥

धांव रे पाव रे दीनराया ये ये हा गेलों मी वायां ॥

पतीतासीं उद्धरी या पवन गुणवर्या ॥३॥

जन्मोजन्मीं तुज न सोडी ये ये हा पायीं मुर्कुंडी ॥

दिधली बापा न करीं सांडी चरण न झाडीं ॥४॥

माथा मुगूट रत्‍न जडीत ये ये हा कुंडले तळपत ॥

केशर भाळीं मृगमद टीळा झगझगींत ॥५॥

प्रसन्न वदन मनोहार ये ये हा शिरिं दूर्वांकुर ॥

आयुधें सहित चार्‍ही कर दे अभयवर ॥६॥

चंदन चचित पुष्प माळा ये ये हा नवरत्‍न गळां ॥

यज्ञोपवीत आंगुळ्या नखीं चंद्रकळा ॥७॥

लंबोदर रत्‍नदोरी ये ये हा कटी पितांबर ॥

सर जानु जंघा पोटर्‍या वाकी तोडर्‍या ॥८॥

हिर जडित सिंव्हासनीं ये ये हा पाऊलें दोन्हीं ॥

दावीनलें देवा वाणी ते मनूजा धणी ॥९॥

सिद्धिबुद्धि दोही हातीं ये ये हा चवरे ढाळीती ॥

पादुका घेऊनी उभा हातीं बाळ गर्जे किती ॥१०॥

थय थय अपसरा नाचती ये ये हा गंधर्व गाती ॥

टाळ मृदंग वाजवीती देवा वोवाळीती ॥११॥

मोरेश्वरा विधिजावरा० ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP