मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
प्रथम आरंभी ध्यातों चिंता...

मोरया गोसावी - प्रथम आरंभी ध्यातों चिंता...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


प्रथम आरंभी ध्यातों चिंतामणि देव ॥

रहिवास मूळ गंगे ॥ कैसा सभवता हा वेढा ॥

जळचरे उल्हास देती मुक्ति द्यावया रहिवास ॥जय जय विघ्नराजा ॥१॥

उग्र रुप रे स्वामि तुझें अरण्यांत वास तुझा नाम चिंतामणि देव जय ॥धृ॥

अहो सभवती तीर्थे भारी ॥ पूर्व भागीं रे सिद्धेश्वर प्रगट झाली भागिरथि ॥

तीर्थे काय रे वर्णू आतां ब्रह्म हत्या निरसती जय॥२॥

दक्षिण भागी मोहंमाया माता कृपाळु जननी समस्ता मोक्ष देती रहिवास रे देवापाशीं ॥जय॥३॥

पश्चिम भागीं तीर्थ थोर ॥ जग ध्याति रे मोहंमाया ॥

समरता सिद्धी देती ॥ प्रगट झाली रे मोरेश्वरी ॥

काय वर्णु उत्तर भागीं ॥ जननी (माता) खेळती कल्लोळी ॥

माता ते मोहंमाया ॥ समागमे रे ब्रह्मचारी सकळिक मिळोनिया ॥

ध्यातो चिंतामणी देव आरती उजळोनी ॥

छंदनाचे ( अंदनाचे) गौरीबाळ मोरया गोसाव्यानें चरण (पाय) धरीले देवाचे ॥

नुपेक्षिया भक्तालागीं ॥ आहो जय जय विघ्नराजा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP