मोरेश्वरी आहे माझा मायबाप ॥
(माझा) तयासि निरोप हो सांगा वेगी ॥१॥
तूझे भेटिची आरत ॥ वेगी पुरवी मोरेश्वरा ॥
(मोरेश्वरा) एक वेळा माहेरा मज नेई बापा ॥२॥
मज दिधले असे दुरी ॥ माझी निष्ठूर सासुरी ॥
(मोरेश्वरा) त्याच्या घरच्या रे थोर कष्टविले ॥३॥
मज करिती सासुर्वास ॥ निरंतर किती सोसूं ॥
मजलागि उदास (मोरेश्वरा) तूं नोव्हे देवा ॥४॥
देवा तूं उदास होसी ॥ दुःख सांगू कोणापासी ॥
(माय) बाप सखा होसि रे तुचि माझा ॥५॥
ह्मणुनि येतो काकुलती ॥ वेगी पावे मंगलमुर्ति ॥
(मोरया) गोसावी तुजप्रति विनवीतो आहे ॥६॥