मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
गणराज चरणीं माझें लुब्धले...

मोरया गोसावी - गणराज चरणीं माझें लुब्धले...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


गणराज चरणीं माझें लुब्धलेसे मन ॥

पहावया निजरुप द्यावे भक्तिचें अंजन ॥

समदृष्टि झालिया जीवा होईल समाधान ॥

न बोले लटकें विघ्नराजा तुझि आण रे ॥१॥

मोरेश्वर भजनीं प्राण्या कां रे न भजसि ॥

दुर्लभ हा नरदह देहीं हित न विचारिसि ॥

यातायाति भोगून व्यर्थ वेरझार भागसी ॥

त्यजुनि कामक्रोध शरण जाई सद्गुरुसि ॥२॥

निरसुनि अहं सोहं विघ्नराजा शरण जावें ॥

धर्म अर्थ काममोक्ष सर्वार्थि भजावे ॥

जप तप अनुष्ठान नलगे साधन करावे ॥

अखंड मोरेश्वर ध्यान हृदई धरावे ॥३॥

भजतां मोरेश्वर आह्मा देह सार्थक झाले ॥

न करितां सायास आह्मां ब्रह्म सांपडलें ॥

मोरया गोसावी गुरुकृपें आह्मां निजरुप जोडले ॥

विनवी चिंतामणी गोसावी आह्मा निजसुख पावलें हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP