विश्वरुप सदाशिव ये ये हा (देखिले डोळा) ॥
सवे पाळ नीळा नंदी ढवळा ॥
अर्धांगीं बैसली ये ये हा (शैल्यबाळा) ॥
मुगूटी गंगा वाहे झुळझूळा ॥१॥
जय जय शंकर ये ये हा शूळ पाणी ॥
(ब्रह्मादिक) सनकादिक ऊभे कर जोडूनि ॥ध्रु.॥
त्रिपुंड्र टिळकू ये ये हा दिव्य कुंडले ॥
मुख प्रभा कोटी भानु तेज लोपले ॥
अधरा दिप्ति हळ हळ ये ये हा कंठीं मिरवले ॥
वासुकि हार गळा ॥ पदक शोभलें ॥२॥
त्रिशूळ डमरु ये ये हा जटाचा भारु ॥
विभूतिचे उधळण जळा अंधारु ॥
रुंड माळा शोभति ये ये हा सर्प विखारु ॥
अति रुप लावण्य उमा शंकरु ॥३॥
कमंडलू आधारु ये ये हा मेखळा साजे ॥
किर्ती मुख बाह्यवट शोभती भुजे ॥
शृंगिया एक नादें ये ये हां गगन गर्जे ॥
आनंदे ब्रह्मानंदे नाचती भुजे ॥४॥
व्याघ्रांबर परिधान ये ये हा चरणि तोडरु ॥
नूपुरे झणत्कारे गर्जे आंबरु ॥
मोरयागोसावी ये ये हा योगी गंभीर ॥
वरद मूर्ति कृपेनें ध्यानी शंकर ॥५॥