मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
तुजविण काय करुं देवराया ॥...

मोरया गोसावी - तुजविण काय करुं देवराया ॥...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


तुजविण काय करुं देवराया ॥ येंई माझ्या विसाव्या ॥

झणीं तूं उदास न धरीं ॥ येंई येंई लवकरी ॥

तुजविण देह माझा हळहळी ॥ झालों बहूत उदास ॥

कैसें म्यां कंठावे देवराया ॥ येंई माझ्या विसाव्या ॥

येंई माझ्या दयाळा ॥ येई माझ्या कृपाळा ॥

आहो जय जय जय गणराज दातारा ॥धृ०॥

अहो यातनें गांजलों गर्भवासी ॥

म्हणूनि आलों शरण ॥ नुपेक्षीं गणराज दयाळा ॥

आणिका न करी पांगिळा ॥ अभिमान तुज आहे भक्तांचा ॥

ब्रीद बांधिले साचा ॥ तुजविण जाऊं कोणा शरण ॥

आणिक दैवत नेणें ॥ अहो जय० ॥२॥

प्रपंच माया ही न सोडी ॥ तेथें लुब्धलों बहुत ॥

पुत्र दारा धनादिक देखोनी ॥ अंतिं नोव्हे तीं कोणी ॥

जोंवरी आहे रे संपत्ति ॥ तोंवरी अवघेचि होती ॥

अंतीं कोणी नाहीं सोडवीतां ॥ मग होसील दुश्चित्ता ॥ अहो जय० ॥३॥

सोय नका धरुं मायेची ॥ गुंतू नका प्रपंचीं ॥

ईच्यानें संगें हें नाडलों ॥ जन देखतां भुलला ॥

चरण (पाय) धरा या मोरयाचें ॥ त्रास करी कर्माचें ॥

निज पद देऊनी स्थापिले ॥ आम्हा चरणीं (पायीं) ठेविलें अहो जय० ॥४॥

अहो ह्मणुनियां आवडि बहु जीवा ॥ तुझी लागली देवा ॥

माये पासून तूं सोडवी ॥ व्यर्थ नाडलों देवा ॥

आयुष्य गेलें रे देखतां ॥ मज नाहीं भरवंसा ॥

विनवि चिंतामणी गोसावी ॥ भक्ति आपुली द्यावी ॥

सेवा आपुली घ्यावी ॥ अहो जय जय जय गणराज दातारा ॥

येंई माझ्या विसाव्या ॥ येंई माझ्या कृपाळा ॥

येई माझ्या दयाळा ॥ अहो तुजविण गांजिलों गर्भवासी ॥

कोणी नाहीं सोडवितां ॥ अहो जय जय जय गणराज दातारा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP