मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
ब्रह्मकमंडलु गंगा ॥ पवित्...

मोरया गोसावी - ब्रह्मकमंडलु गंगा ॥ पवित्...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


ब्रह्मकमंडलु गंगा ॥ पवित्र पावन जगा ॥

तटी दक्षिणभागा मोरेश्वर ॥ जो पठिजे पुराणी ॥

आदि चिंतामणी ॥ तो पाहूं लोचनी ॥ धरणीवरी बाप ॥१॥

चला चला हो जाऊ ॥ मोरया पाहूं ॥

इच्छिले फळ देईल देव ॥ धृ॥

भाद्रपद शुद्ध चतुर्थिसी पोहा मिळाला यात्रेसी ॥

मोरया धरुनि मानसिं गर्जताती ॥

करुनि भीमकुंडि स्नान ॥ निर्मळ होउन मन ॥

देवदर्शना मग येति बाप ॥२॥

प्रथमता गवराई जननी ॥ तेथें वंदुनी आदिस्थानिं ॥

मग प्रवेश भुवनीं भैरवदेवा ॥ यथाशक्ति सेवा ॥

कुंभजा संभवा ॥ नमन देवराया ॥ तुज केलें बाप ॥३॥

मग भीतरीं प्रवेशति ॥ मंगलमूर्ती देखति ॥

आहो दंडवत जाति लोटांगणी ॥ षोडश उपचारे पुजा ॥

करुनि विघ्नराजा ॥ आरंभ द्वाराचा तेथूनिया बाप ॥४॥

पूर्वद्वारासि जातां ॥ तेथें मांजराई माता ॥

आहो तिची पुजाकरितां वेळो नलगें ॥

बरवी ते मोहंमाया ॥ पूजा करुनि पाया ॥

सवेंचि देवराया ॥ जवळी येति बाप ॥५॥

दक्षिणद्वारासी जातां ॥ तेथें आसराई माता ॥

आहो तिचि पूजा करितां वेळो नलगे ॥

बरवी दीनदक्षा ॥ भक्ति करुन लक्षा सवेंची कल्पवृक्षा ॥ जवळी येतां बाप ॥६॥

पश्चिम द्वारासी जातां ॥ तेथें वोझराई माता ॥

आहो तेथें पंडुसूता श्रम झाला ॥ बरवि ते गिरिजा ॥

चरणा करोनी पूजा ॥ सवेचि विघ्नराजा ॥ जवळीं येतीं बाप ॥७॥

पावतां उत्तरद्वार ॥ तेथें वेदमाता मनोहर ॥

आहो मुक्ताईचि थोर फरिति पूजा ॥

उल्हास होय जीवां ॥ तेथुनि घेति धांवां ॥

त्या होय विसावा ॥ मोरेश्वरी बाप ॥८॥

ऐसा अस्त न होता गभस्ती ॥ जे चारी द्वारें करिती ॥

आहो तें फळ पावती अभिलाषिचे ॥ मोरयागोसावी ह्मणे ॥

मज आलि प्रचिति ॥ ह्मणुनि तुम्हाप्रति सांगतसे बाप ॥९॥ चला चला हो०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP