मोरया तूं जनक जननीं हो ॥
कृपाळ (दयाळू) तूं आमूचा ह्मणूऊनीं ॥
दुरुनीं आलों तुज बा टाकूनीं हो ॥
कृपा करीं या दीना (दया करी) अनाथा लागुनी ॥१॥
तूझें (तुमचें) आदिस्थान मोरेश्वरीं हो ॥
अष्टमसिद्धी उभ्या ह्या हो तुमचे द्वारीं ॥
तुह्मां (तुमचे) येणें झालें येथवरी ॥
चिंचवड पुण्य हो क्षेत्र भारी ॥२॥
पवनगंगा आहे हो सुस्थळ हो ॥
अनूष्ठाना योग्य तें निर्मळ ॥
गोसावी तूझा अंश तो (हा) केवळ ॥
अनुष्ठान करीतो सोज्वळ ॥३॥
दर्शन (स्मरण) मात्रें होतसे पावन हो ॥
सकळा कर्माचें (पापाचें) दहन ॥
एवढें थोर तुमचें महीमान हो ॥
गोसाव्यासीं लाधले (मोरयासी जोडलें) निधान ॥४॥
तुझें (तुमचे) ध्यान धरुनियां एक हो ॥
सकळीक टाकिला लौकीक ॥
विनटलों चरणीं निकट हो ॥
मोरया गोसावी दोन्ही एक ॥५॥
मोरया तूं जनक जननी हो ॥
कृपाळू (दयाळु) तूं आमुचा ह्मणऊनी ॥
तूझा (छंद) ’वेधू’ रात्रंदिवस मनीं हो ॥
कृपा (दया) करीं या दीना (अनाथा) लागूनीं ॥