मोरेश्वरा तूं मन भेटावया लागूनीं ॥ भक्त येती लोटांगणी ॥
फिटली डोळ्याचीं पारणी ॥ विघ्नहार देखिलीया ॥१॥
माझें मानस गुंतलें ॥ चरणीं तुझ्या लय गुंतलें ॥धृ०॥
योगिया मानस समरंजना ॥ तुज स्मरलें गजानन ॥
पावें मूषक वाहना ॥ कृपाळू बा मोरेश्वरा ॥मा० ॥च० ॥२॥
माझे अंतरिचें निज सुख ॥ मज भेटवा गजमुख ॥
क्षेम देऊनीयां सन्मुख ॥ त्रिविध ताप हरलें ॥मा० ॥च० ॥३॥
पैल कर्हेतिरीं उभा राहे ॥ निज भक्ताची वाट पाहे ॥
वरद उभारुनी बाहे ॥ अभय वरद देत आहे ॥मा० ॥च० ॥४॥
मोरया गोसावी योगी बोलती ॥ सत्य साक्ष गणपती ॥
भेटी देऊनी पुढतां पुढतीं ॥ शरणांगतां नुपेक्षिसी ॥
माझें मानस गुंतलें ॥ चरणीं तुझ्या लय गुंतलें ॥५॥