मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
प्रथम नमूं देव गणराजु ॥ द...

मोरया गोसावी - प्रथम नमूं देव गणराजु ॥ द...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


प्रथम नमूं देव गणराजु ॥ देवि गौरिचा आत्मजु ॥

चतुर्भूज फरश ध्वज ॥ तो गणराजा (महाराजा) वंदू आतां ॥१॥

उपांग श्रुती टाळ मृदंग ॥ स्वरजा गायन करिति शुद्ध ॥

तेणें रंग उडवी नानाविध ॥ गणराज (महाराजा) माझा नृत्य करी ॥२॥

साहि राग छत्तिस भार्या ॥ अलाफ करि सारजा माया ॥

धित् धित् घिम किटि नाचें गणराया ॥ रंग पाहवया देव आले ॥३॥

ऐसा रंग बरवा वोजा ॥ प्रसन्न होई तुं विघ्नराजा ॥

मोरया गोसावी ह्मणे दास तुझा ॥ विघ्नराज (महाराजा) माझा नुपेक्षीं रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP