मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
माझी मयुरपुरी हेचि पंढरी ...

मोरया गोसावी - माझी मयुरपुरी हेचि पंढरी ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


माझी मयुरपुरी हेचि पंढरी ॥ नाम गर्जे अंबरीं ॥

माझी विठ्ठल मुर्ती देउळांत ॥ शोभे शेंदुर चर्चिंत ॥

आहो दुर्वांकुर तुळसी दळ ॥ शोभे शिरीं अद्‌भूत ॥माझी म० ॥१॥

आहो शुंडा दंड कटीवरी ॥ शोभे हाताच्या परी ॥

भक्ती भाव दृढ धरी ॥ पाय तया विटेवरी ॥माझी म० ॥२॥

माझी रुक्मिणी राधा सिद्धी बुद्धी ॥ वरी चवरे ढाळिती ॥

नित्य भेटि देऊनियां ॥ दिधली भक्ताच्या आधिं ॥माझी म० ॥३॥

ब्रह्म कमंडलू भीम गंगा ॥ गणेशतीर्थ चंद्रभागा ॥

तेहतिस कोटी देव येती ॥ नित्य स्नानाच्या योगा ॥माझी म० ॥४॥

आहो भैरवभाई पुंडलिक ॥ कल्पवृक्ष कळंबक ॥

विघ्नेश्वर दास बोले ॥ सुक्ष्म गाईचा रक्षक ॥

माझी मयुरपूरी हेचि पंढरीं ॥ नाम गर्जे अंबरीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP