सासुर हो माझे हो ऐका हो साजणी ॥
त्याचि हेंचि परि मी सांगतसे ॥१॥
निर्दय दादुला हो काम हाचि दीर ॥
क्रोध हाचि भावा हो आहे मज ॥२॥
आशा तृप्णा दोन्ही जावा ह्या अनिर्वाच्या ॥
यांचा हाचि संग हो नको मज ॥३॥
लोभिष्ट सासुरा हो निंदा हेचि सासू ॥
यांचे हेचि संगे मी त्रासलीसे ॥४॥
ह्मणोनिया छंद हो माहेरी लागला ॥
जाईन मोरेश्वरा मी आजि तेथें ॥५॥
तेणे संग तुटती गणराज देखलीया ॥
सुख तेचि पावे हो जन्मोजन्मी ॥६॥
तेथें असतील हो सिद्धी बुद्धी माता ॥
भेटेल हा पिता हो गणराज ॥७॥
तेणे सुख वाटे मज हें बहुत ॥
प्रपंचाचे दुःख हो जाय तेव्हां ॥८॥
ऐसें हें सासुर हो गाई चिंतामणी ॥
(एका) मोरया वाचोनी हो नाहीं कोणी ॥९॥