मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
तूझिये भेटिचि बहू आस रे म...

मोरया गोसावी - तूझिये भेटिचि बहू आस रे म...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


तूझिये भेटिचि बहू आस रे मोरया ॥

लेखितां बहुत झाले दिस रे मोरया ॥

कां बापा धरियेलें उदास रे मोरया ॥

वियोगे झालों कासाविस रे मोरया ॥१॥

तूजविण कोण आह्मा आहे बा मोरया ॥

एक वळ कृपादृष्टि पाहे रे मोरया ॥धृ॥

रात्रंदिवस वाट पाहे रे मोरया ॥

निढळावरीं ठेऊनी बाहे रे मोरया ॥

वेगि तूं येई लवलाहि रे मोरया ॥

धेनू वत्सालागि जसि मोहे रे मोरया ॥२॥

जन्मो जन्मीचा तुझा दास रे मोरया ॥

आणिक कोणाचि नाहीं आस रे मोरया ॥

एक वेळ उद्धरिं या दिनास रे मोरया ॥

त्रास देई सकळा कर्मास रे मोरया ॥३॥

संसारसागरीं दुःखभारीं रे मोरया ॥

एक वेळ भवसिंधु तारि रे मोरया ॥

आयागमन तूं निवारीं रे मोरया ॥

दिनानाथा एक वेळ तारिं रे मोरया ॥४॥

दीन वत्सल बाप आला रे मोरया ॥

साष्टांगि दडवत घाला रे मोरया ॥

मोरया गोसावी तन्मय झाला रे मोरया ॥

चरणांबुज देखोनिया निवाला रे मोरया ॥

तूजवीण कोण आम्हा आहे बा मोरया ॥

एकवेळ कृपादृष्टी पाहि रे मोरया ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP